वादात या कुणीही सहसा पडू नये

Submitted by छाया देसाई on 16 February, 2011 - 21:48

'' कोणा गझल कुणाची का आवडू नये ?''
वादात या कुणीही सहसा पडू नये

मी जे म्हणेन त्याला ''हॉ जी'' तुम्ही म्हणा
नसती सखोल चर्चा ,वार्ता घडू नये

दारूसमान चढुनी ओठात वाहवा
यावी ,अशी गझल जी ,कोणा नडू नये

माझी गझल कळाया ,घ्या हो तुम्ही जरा!
चढवून या तुम्हीबी ,आता रडू नये

छाया प्रकाश यांचे पत्ते उघड उघड
ही थोर बुद्धीमत्ता,पत्ता दडू नये

या गझलेतील पात्रे काल्पनीक असून गझलेतील पात्रांचे कोठे साधर्म्य आढळल्यास कोणीही जवाबदार नाही .
छाया देसाई

गुलमोहर: 

आवडली!!!!

या गझलेतील पात्रे काल्पनीक असून गझलेतील पात्रांचे कोठे साधर्म्य आढळल्यास आम्ही जवाबदार नाही Biggrin

मतला अगदी मार्मिक. व्वा...

दुसरा शेर ही झक्कास.

चांगलीये गझल. Happy

मी जे म्हणेन त्याला ''हॉ जी'' तुम्ही म्हणा
नसती सखोल चर्चा येथे घडू नये
Proud

या गझलेतील पात्रे काल्पनीक असून गझलेतील पात्रांचे कोठे साधर्म्य आढळल्यास कोणीही जवाबदार नाही .
Lol Lol

Proud

लै भारी!
या गझलेतील पात्रे काल्पनीक असून गझलेतील पात्रांचे कोठे साधर्म्य आढळल्यास कोणीही जवाबदार नाही .

हे तर अतुलनीय्!!!!!!! Lol

या गझलेतील पात्रे काल्पनीक असून गझलेतील पात्रांचे कोठे साधर्म्य आढळल्यास कोणीही जवाबदार नाही .
>>>

हे तर गझलेपेक्षा भारी होतं Rofl