Submitted by छाया देसाई on 9 February, 2011 - 00:43
वेळ थोडा राहिला सोंगे अता मज घ्यायला
थांबणे सोसेल तोवर लागते चालायला
मी अशी नव्हते कधी हे मज कळावे तोवरी
चेहरा मज सांगतो का मुखवटे घालायला
गाव माझा तोच पण , मी ना दिसे त्या गावची
येथल्या लकबीमुळे मी लागले हरवायला
यायचे येथेच आहे सातवे नभ सांगते
जन्म अवघा सांडला रे प्रथम नभ गवसायला
या प्रकाशाला अता वेढून घेते कोंदणी
लागल्या आता कुठे छाया पुर्या लांबायला
गुलमोहर:
शेअर करा
गाव माझा तोच पण , मी ना दिसे
गाव माझा तोच पण , मी ना दिसे त्या गावची
येथल्या लकबीमुळे मी लागले हरवायला>> वा वा!
या प्रकाशाला अता वेढून घेते कोंदणी
लागल्या आता कुठे छाया पुर्या लांबायला>> व्वा!
सुंदर.. गाव माझा तोच पण , मी
सुंदर..
गाव माझा तोच पण , मी ना दिसे त्या गावची
येथल्या लकबीमुळे मी लागले हरवायला
फार आवडला हा शेर.
गाव माझा तोच पण , मी ना दिसे
गाव माझा तोच पण , मी ना दिसे त्या गावची
येथल्या लकबीमुळे मी लागले हरवायला
या प्रकाशाला अता वेढून घेते कोंदणी
लागल्या आता कुठे छाया पुर्या लांबायला
हे दोन शेर जबरदस्त!!
गाव माझा तोच पण , मी ना दिसे
गाव माझा तोच पण , मी ना दिसे त्या गावची
येथल्या लकबीमुळे मी लागले हरवायला>> लै भारी...
मस्त खुप छान .....
मस्त खुप छान .....
मस्त खुप छान .....
मस्त खुप छान .....