थांबणे सोसेल तोवर्..(माझा एक प्रयत्न)

Submitted by प्राजु on 8 February, 2011 - 12:34

वणवणूनी गीत माझे लागले सांगायला
थांबणे सोसेल तोवर लागते चालायला

दाटले डोळ्यांत आसू की निखारा तप्तसा
सांडताना लागले ते पापण्या जाळायला

प्रीत होती, ध्यास होता, अन तुझा आभासही
तप्त काया लागली तव स्पर्श रे मागायला..

आठवूनी चित्र सारे जीवना द्यावी मिती
लागते ऐसी शिदोरी खूप सांभाळायला

मी म्हणोनी सांगणारा सूर्य होता तापला
दाह त्याचा आज त्याला लागला पोळायला

प्रीतिच्या रंगात या मी हाय ऐसी रंगले
लागल्या त्या पाकळ्या मज रंग ते मागायला

सूर छेडी गूढ वारा, सांज होता अंगणी
दु:ख माझे लागले ओठावरी रंगायला

- प्राजु
(तरही.. चा पहिलाच प्रयत्न आहे.. सांभाळून घ्या.. प्लिज)

गुलमोहर: 

छान आहे.
काही कल्पना मस्त आहे.

प्रीत होती, ध्यास होता, अन तुझा आभास होता

या ओळीत वृत्त थोडं चुकलंय. अन तुझा आभासही किंवा आभास रे चालेल बहुदा.

पु.ले.शु.

थांबणे सोसेल तोवर लागते चालायला

दाटले डोळ्यांत आसू की निखारा तप्तसा
सांडताना लागले ते पापण्या जाळायला

आठवूनी चित्र सारे जीवना द्यावी मिती
लागते ऐसी शिदोरी खूप सांभाळायला

मी म्हणोनी सांगणारा सूर्य होता तापला
दाह त्याचा आज त्याला लागला पोळायला

प्रीतिच्या रंगात या मी हाय ऐसी रंगले - हे 'हाय' कशाला????
लागल्या त्या पाकळ्या मज रंग ते मागायला

व्वाह! वा वा! सुंदर!

आपण होतात कुठे राव?

-'बेफिकीर'!

छान आहे!!

प्राजु,

हाय! हा शब्द मराठीत शक्यतो अतृप्तता(कशाचीही) व्यक्त करायला वापरला जातो असे वाटते. आनंद व्यक्त करायला वापरू नये असे वैयक्तिक मत!!

सुटे मिसरे मस्त आहेत.. Happy छान कल्पना.. जरा व्याकरणात आहे गोंधळ पण ते होवुन जाइल.. Happy मस्तच आहे.. पुलेशु...