Submitted by क्रांति on 8 February, 2011 - 09:08
थांबले मी, तोच आल्या सावल्या सांगायला,
"थांबणे सोसेल तोवर लागते चालायला!"
स्पंदनांनी छेडली गात्रांत नवखी कंपने,
प्रीतवीणा लागली प्राणांत झंकारायला
दाटले काहूर, झाल्या मंद, धूसर आकृती,
खेळ आता सावल्यांचा लागला रंगायला
पाहिले केव्हातरी तू आणि मी जागेपणी,
ये जरा स्वप्नी तरी ते स्वप्न साकारायला!
मेघ त्यांच्या चाहुलींचे काळजाला वेढती,
लागले मागे यमाचे दूत घोटाळायला!
संचिताच्या देणगीने एवढी तेजाळले,
चंद्र आला काल रात्री चांदणे मागायला!
केवढा हा दूर पल्ला, एवढे थांबे, तरी
एक क्षण आहे पुरेसा यायला अन् जायला!
तरहीनं वेड लावलंय. पण लिहायला गेले गझल, झालं भावगीत असं काहीसं वाटतंय. "चांदण्या रात्रीतले ते स्वप्न तू विसरून जा" या गझलेचं मीटर डोक्यात होतं ना, त्यामुळे असेल कदाचित, पण तरहीचे शब्द घेतल्यामुळे इथे पोस्टलीय. चालली तर गझल, नाही तर कविता!
गुलमोहर:
शेअर करा
संचिताच्या देणगीने एवढी
संचिताच्या देणगीने एवढी तेजाळले,
चंद्र आला काल रात्री चांदणे मागायला!
केवढा मोठा प्रवास अन् एवढे थांबे, तरी
एक क्षण आहे पुरेसा यायला अन् जायला!
आवडली.
केवढा मोठा प्रवास अन् एवढे
केवढा मोठा प्रवास अन् एवढे थांबे, तरी
एक क्षण आहे पुरेसा यायला अन् जायला!
वरच्या ओळीत वृत्तभंग झाल्याचे जाणवत आहे.
मात्र हाच शेर सर्वाधिक आवडला.. .:)
क्रान्ति, पूर्ण गजल आवडली.
क्रान्ति,
पूर्ण गजल आवडली. प्रत्येक शेर सुरेख.
डॉ.कैलासजी यानी दाखवलेला वृत्त भंग खलील प्रमाणे ओळ बदलल्यास ठीक होईलः
"केवढा हा दूर पल्ला एवढे थांबे, तरी"
अनाहूत सल्ल्याबद्दल क्षमस्व !
क्रांति हिटस् बॅक. आवडली. खरच
क्रांति हिटस् बॅक.
आवडली. खरच
धन्यवाद! डॉ.कैलासजी अगदी
धन्यवाद!
डॉ.कैलासजी अगदी बरोबर आहे. लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद.
निशिकांत, मीही अगदी हाच विचार करत होते, सुचवणी [सूचना नाही!]आवडली, बदलही केलाय त्याप्रमाणे. धन्यवाद.
क्रांती माझा रबर स्टॅम्प
क्रांती माझा रबर स्टॅम्प
सुरेख गझल नेहमी प्रमाणेच 
संचिताच्या देणगीने एवढी
संचिताच्या देणगीने एवढी तेजाळले,
चंद्र आला काल रात्री चांदणे मागायला!
>>>>
अप्रतिम...
क्रांती,आवडली गझल. मतला आणि
क्रांती,आवडली गझल.
मतला आणि स्वप्नं आवडलं.
थांबले मी, तोच आल्या सावल्या
थांबले मी, तोच आल्या सावल्या सांगायला,
"थांबणे सोसेल तोवर लागते चालायला!" - या तरही ओळीवरचा सर्वात सुंदर मतला आत्तापर्यंतचा! अतिशय सुंदर!
स्पंदनांनी छेडली गात्रांत नवखी कंपने,
प्रीतवीणा लागली प्राणांत झंकारायला - 'मला प्रीतवेणा' असे सुचले. प्रीतवेणा लागल्या असे!
दाटले काहूर, झाल्या मंद, धूसर आकृती,
खेळ आता सावल्यांचा लागला रंगायला - ठीकठाक! परत सावल्या का?
पाहिले केव्हातरी तू आणि मी जागेपणी,
ये जरा स्वप्नी तरी ते स्वप्न साकारायला! - उत्तम! अतिशय छान!
मेघ त्यांच्या चाहुलींचे काळजाला वेढती,
लागले मागे यमाचे दूत घोटाळायला! - समजला नाही.
संचिताच्या देणगीने एवढी तेजाळले,
चंद्र आला काल रात्री चांदणे मागायला! - फारच सुंदर!
केवढा हा दूर पल्ला, एवढे थांबे, तरी
एक क्षण आहे पुरेसा यायला अन् जायला! - कनेक्शन स्ट्रॉन्ग हवे असे वाटले.
तरहीनं वेड लावलंय. पण लिहायला गेले गझल, झालं भावगीत असं काहीसं वाटतंय. "चांदण्या रात्रीतले ते स्वप्न तू विसरून जा" या गझलेचं मीटर डोक्यात होतं ना, त्यामुळे असेल कदाचित, पण तरहीचे शब्द घेतल्यामुळे इथे पोस्टलीय. चालली तर गझल, नाही तर कविता>>> हे उगाचच लिहीलंत! नऊ शेरांच्या ( उदाहरणार्थ) गझलेतील तीन शेर चांगले असले तरी खूप आहे असे समजण्याचा काळ आहे हा! आपले त्याहू जास्त चांगले आहेत.
क्रान्ती,
शुभेच्छा!
-'बेफिकीर'!
थांबले मी, तोच आल्या सावल्या
थांबले मी, तोच आल्या सावल्या सांगायला,
"थांबणे सोसेल तोवर लागते चालायला!"
क्रांतीजी, मतल्याच्या प्रेमात पड्लोय.... व्वा!!!
सुंदर!! मतला आणि मागायला फार
सुंदर!!
मतला आणि मागायला फार आवडले
सुंदर.. मतला, चांदणे आणि
BEAUTY!!!!!!!!! फारच फारच छान
BEAUTY!!!!!!!!!
फारच फारच छान शेर..
दाटले काहूर, झाल्या मंद, धूसर आकृती,
खेळ आता सावल्यांचा लागला रंगायला
पाहिले केव्हातरी तू आणि मी जागेपणी,
ये जरा स्वप्नी तरी ते स्वप्न साकारायला!
किती सहज (वाटतात!!)...
केवढा हा दूर पल्ला, एवढे थांबे, तरी
एक क्षण आहे पुरेसा यायला अन् जायला!
चंद्र आला काल रात्री चांदणे मागायला
वाह!!
आता काय काय लिहू अजून?
अभिनंदन!!!
सुंदर, फारच सुंदर!!
सुंदर, फारच सुंदर!!
सुंदर
सुंदर
अप्रतिम
अप्रतिम