Submitted by विशाल कुलकर्णी on 7 February, 2011 - 23:00
चालण्याचे दु:ख जोवर लागते विसरायला
थांबणे सोसेल तोवर लागते चालायला...
लाघवी भासांसवे संवेदना सुखवायला
वास्तवाचे पाश ते मग लागती जाचायला...
लाजणार्या मोगर्याचे हासणे फसवे किती..,
लागलेला वेळ थोडा वागणे समजायला...
मी फुलांना सांगतो हे भुलवणे आता नको
त्या कळ्यांचा धीर आता लागला संपायला...
या जगाची रीत न्यारी शिकवते भोगायला
लागते मग सवय वेड्या.., वेदनांची व्हायला...
विशाल
गुलमोहर:
शेअर करा
या जगाची रीत न्यारी शिकवते
या जगाची रीत न्यारी शिकवते भोगायला
लागते मग सवय वेड्या.., वेदनांची व्हायला>>> अगदी खरे आहे विशालराव!
छान गझल!
धन्यवाद!
लाजणार्या मोगर्याचे हासणे
लाजणार्या मोगर्याचे हासणे फसवे किती..,
लागलेला वेळ थोडा वागणे समजायला...
मी फुलांना सांगतो हे भुलवणे आता नको
त्या कळ्यांचा धीर आता लागला संपायला...
वाह...
मी ऋतूंना सांगतो हे भुलवणे आता नको असे वाचले.. तेही आवडले..
हेही मस्तच!
मी फुलांना सांगतो हे भुलवणे
मी फुलांना सांगतो हे भुलवणे आता नको
त्या कळ्यांचा धीर आता लागला संपायला............व्वा !!
छान आहे गझल. अभिनंदन.
धन्यवाद बेफ़िकीरजी,
धन्यवाद बेफ़िकीरजी, आनंदयात्रीजी, कैलासदादा ... मन:पूर्वक आभार
या जगाची रीत न्यारी शिकवते
या जगाची रीत न्यारी शिकवते भोगायला
लागते मग सवय वेड्या.., वेदनांची व्हायला...
मस्तच..
आनंदयात्रींना अनुमोदन....
मस्तच गझल विशाल!!! शेवटचा शेर
मस्तच गझल विशाल!!!
शेवटचा शेर खूप आवडला... मतला अजून प्रभावी होऊ शकला असता
छान ! आवडली या जगाची रीत
छान ! आवडली
या जगाची रीत न्यारी शिकवते भोगायला
लागते मग सवय वेड्या.., वेदनांची व्हायला... >>> वेड्या हा तखल्लुस घेतला की काय
शेवटचा शेर झकास.....!!
शेवटचा शेर झकास.....!!
या जगाची रीत न्यारी शिकवते
या जगाची रीत न्यारी शिकवते भोगायला
लागते मग सवय वेड्या.., वेदनांची व्हायला... >> अप्रतिम विशल्या..
पुलेशु!!!
या जगाची रीत न्यारी शिकवते
या जगाची रीत न्यारी शिकवते भोगायला
लागते मग सवय वेड्या.., वेदनांची व्हायला... >> छानच
छान झालीय गजल. मोगरा आवडला.
छान झालीय गजल.
मोगरा आवडला.
धन्यवाद सगळ्यांना पंत...
धन्यवाद सगळ्यांना

पंत...
या जगाची रीत न्यारी शिकवते
या जगाची रीत न्यारी शिकवते भोगायला
लागते मग सवय वेड्या.., वेदनांची व्हायला...
सही! मस्त गझल.
तखल्लुसबद्दल पंतांच्या म्हणण्यावर विचार करायला हरकत नाही!
या जगाची रीत न्यारी शिकवते
या जगाची रीत न्यारी शिकवते भोगायला
लागते मग सवय वेड्या.., वेदनांची व्हायला...
सुंदर!!!
कळ्या व वेदना अप्रतिम!
कळ्या व वेदना अप्रतिम!
सुरेख गझल
सुरेख गझल
धन्यवाद मंडळी क्रांतीताई, ती
धन्यवाद मंडळी

क्रांतीताई, ती पदवी तु आधीच दिली आहेसच ना!
सुरेख!
सुरेख!
व्वा! आवडली गजल!
व्वा! आवडली गजल!
उमेश, शरददादा मनःपूर्वक आभार
उमेश, शरददादा मनःपूर्वक आभार