सौंदर्य

Submitted by जिप्सी on 3 February, 2011 - 10:02

अजय यांचा चित्र संते हा सुंदर धागा पाहुन मला असेच एक सुंदर चित्र जुन्नर भटकंतीत एका हॉटेलात पाहिलेले आठवले आणि त्या चित्राचा फोटो इथे देण्याचा मोह आवरला नाही. Happy
चित्रातील चेहर्‍यावरचे हावभाव, पोशाख पाहुन नकळत "जैत रे जैत" मधल्या "चिंधीची" (कै. स्मिता पाटिल) व्यक्तिरेखा आठवली.
हॉटेलच्या मालकाला चित्रकाराचे नाव विचारले, पण त्याला हि त्याबद्दल काहि माहिती नव्हती. चित्रकाराचे नाव कुठेहि त्या चित्रावर नव्हते. Sad

गुलमोहर: 

व्वाह! अ प्र ति म!!
पण याच चित्राला काहीतरी (अनाम चित्रकार वै.)वॉटरमार्क टाकला तर? नाहीतर इथुनही कोणीतरी उचलेगिरी करेल!!

धन्यवाद Happy

पण याच चित्राला काहीतरी (अनाम चित्रकार वै.)वॉटरमार्क टाकला तर? >>>>खरंतर मी चित्राचाच फोटो काढल्याने आणि चित्रकाराचे नाव माहित नसल्याने वॉमा टाकला नाही.

सुरेखच..! चित्र आणि प्रचिही..:)

चित्रकार दलाल यांचे असावे का हे चित्र योगेश? कारण तसेच वाटते आहे हे चित्र..!

<<"जैत रे जैत" मधल्या "चिंधीची" (कै. स्मिता पाटिल) व्यक्तिरेखा आठवली.>>अगदी खर.

Pages