Submitted by ह.बा. on 30 January, 2011 - 04:27
दोन होते चार झाले
बेगडी संसार झाले!
माणसांची वानवा अन
दु:ख आता फार झाले
बिलगता तारुण्य, अल्लड
चालणे अलवार झाले
कापराला पाहिल्यावर
बावळे अंगार झाले
काव्य जडले जीवनाला
जीवनावर स्वार झाले
************
खूबसुरत इश्क, त्याला
का उगी इन्कार झाले?
पाच वर्षे ओरबाडुन
आज ते दिलदार झाले!
गुलमोहर:
शेअर करा
माणसांची वानवा अन दु:ख आता
माणसांची वानवा अन
दु:ख आता फार झाले>>
छान आहे..
बाकी वृत्तात बसली नाहिये का फार?
पाच वर्षे ओरबाडुन आज ते
पाच वर्षे ओरबाडुन
आज ते दिलदार झाले!
दमदार झालाय.
बिलगता तारुण्य, अल्लड चालणे
बिलगता तारुण्य, अल्लड
चालणे अलवार झाले
क्या बात है.. !! एकदम हळुवार शेर.
खूबसुरत इश्क, त्याला
का उगी इन्कार झाले?......थोडा विचार केल्यावर कळला... मस्त शेर.
पाच वर्षे ओरबाडुन
आज ते दिलदार झाले!........ मुटेजी म्हणताहेत तसा.. दमदार शेर.
सर्वाना धन्यवाद!!! बाकी
सर्वाना धन्यवाद!!!
बाकी वृत्तात बसली नाहिये का फार? >>> हो! म्हटलं फार कशाला वृत्तात बसवा. म्हणून थोडीशीच वृत्तात बसवली.
हो! म्हटलं फार कशाला वृत्तात
हो! म्हटलं फार कशाला वृत्तात बसवा. म्हणून थोडीशीच वृत्तात बसवली>>> हा हा हा हा!
बिलगता तारुण्य, अल्लड
चालणे अलवार झाले>>> व्वा!
सुंदर शेर!
हो! म्हटलं फार कशाला वृत्तात
हो! म्हटलं फार कशाला वृत्तात बसवा. म्हणून थोडीशीच वृत्तात बसवली. >>
अलवार खूपच अलवार! मस्त!
अलवार खूपच अलवार! मस्त!
अलवार चा शेर कातील आहे ह. बा.
अलवार चा शेर कातील आहे ह. बा.
अलवार मस्त!!!
अलवार मस्त!!!
सर्वांचा आभारी आहे!!!
सर्वांचा आभारी आहे!!!
हो! म्हटलं फार कशाला वृत्तात
हो! म्हटलं फार कशाला वृत्तात बसवा. म्हणून थोडीशीच वृत्तात बसवली.>>>
मस्तच...... !
मस्तच...... !
खल्लास
खल्लास
सर्वांचा आभारी आहे!!!
सर्वांचा आभारी आहे!!!