श्री. कैलास गायकवाड यांनी दिलेल्या तरही मिस-यावर अधारित गजल :
हवी हवीशी तुझीच सोबत जुनाच माझा अजार आहे
तुझ्याविना मी जगात माझा जगावयाला नकार आहे
सदैव खोटे नशीब नसते बघून तुजला मला उमगले
विरानतेच्या तळास ह्रदयी खुशीस छोटी कपार आहे
गुलाब फुलता, सभोवताली असंख्य काटे कशास देवा ?
शिवाय त्यांच्या जगी कधी का कुणास दिसली बहार आहे ?
शिकार करण्या धनुष्य घेउन हजार आले किती उशीरा !
कलेवरासम जगेन जीवन अता न उरला थरार आहे
शशी न दिसता नभात कोठे चकोर दु:खी निराश होउन
विरानतेशी जगावयाचा अखेर केला करार आहे
जिवंत असता कुणी न पुसले असून नसल्या समान जगलो
शवास देती रडून खांदा विचित्र दिसतो प्रकार आहे
उगाच "निशिकांत" आस वेडी धरून ह्रदयी उदास होशी
प्रवास खडतर तुलाच आता करावयाचा अपार आहे
निशिकांत देशपांडे मो.न. ९८९०७ ९९०२३
E Mail : nishides1944@yahoo.com
प्रतिसादाची अपेक्षा
जीवंत असता कुणी न पुसले असून
जीवंत असता कुणी न पुसले असून नसल्या समान जगलो
शवास देती रडून खांदा विचित्र दिसतो प्रकार आहे
क्या बात है... उत्तम शेर.
जीवंत चं जिवंत करायला हवं.
शिकार करण्या धनुष्य घेउन हजार आले किती उशीरा !
कलेवरासम जीवन जगतो अता न उरला थरार आहे.......
दुसर्या मिसर्यात वृत्त भंग झाला आहे....कलेवरासम जगेन जीवन....असं केल्यास जमेल .:)
मक्ता फार आवडला.
एकंदर फार सुंदर गझल. आवडली.
जिवंत असता कुणी न पुसले असून
जिवंत असता कुणी न पुसले असून नसल्या समान जगलो
शवास देती रडून खांदा विचित्र दिसतो प्रकार आहे
वा!!
गुलाब फुलता, सभोवताली असंख्य काटे कशास देवा ?
शिवाय त्यांच्या जगी कधी का कुणास दिसली बहार आहे ?
शेवटच्या मिसर्यामध्ये प्रश्नचिन्ह का?
पहिल्या मिसर्याचे उत्तरच दुसर्या मिसर्यामध्ये आहे ना?
चुभूद्याघ्या.
खुप भिडणारी गझल..!!
खुप भिडणारी गझल..!!
जिवंत असता कुणी न पुसले असून
जिवंत असता कुणी न पुसले असून नसल्या समान जगलो
शवास देती रडून खांदा विचित्र दिसतो प्रकार आहे>>> मस्तच!!
गुलाब फुलता, सभोवताली असंख्य
गुलाब फुलता, सभोवताली असंख्य काटे कशास देवा ?
शिवाय त्यांच्या जगी कधी का कुणास दिसली बहार आहे ?
शिकार करण्या धनुष्य घेउन हजार आले किती उशीरा !
कलेवरासम जगेन जीवन अता न उरला थरार आहे
सुरेख शेर.
शशी न दिसता नभात कोठे चकोर
शशी न दिसता नभात कोठे चकोर दु:खी निराश होउन
विरानतेशी जगावयाचा अखेर केला करार आहे
जिवंत असता कुणी न पुसले असून नसल्या समान जगलो
शवास देती रडून खांदा विचित्र दिसतो प्रकार आहे>>> लय भारी..