Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 27 January, 2011 - 22:30
या तरही वरील माझी गझल. उद्या नवीन ओळ दिली जाईल.
मरुन अस्तित्वहीन होण्या,तुझ्याचसाठी तयार आहे
तुझ्याविना या जगात माझा,जगावयाला नकार आहे
धरून सूर्यास आणले अन ,हजार तेजाळले दिवेही
असा कसा दूर व्हावयाचा,मनातला अंधकार आहे
अचूक आले तुझे नयन बाण्,येथ घायाळ जाहलो मी
शिकार गेलो करावयाला,स्वतःच झालो शिकार आहे
नको धरु आज हात माझा,कठोर ही बाब आठवावी
जगावयाचा प्रवास माझा उद्या तसा संपणार आहे
कधीच कर्जात राहिलो ना ,म्हणून ”कैलास” अंत आला
जगू कसे हे जिणे तसे तर तुझ्याकडूनच उधार आहे
--डॉ.कैलास गायकवाड
गुलमोहर:
शेअर करा
व्वा!! मस्तच. शेवटचे दोन
व्वा!! मस्तच.
शेवटचे दोन विशेष आवडले
नको धरु आज हात माझा,कठोर ही
नको धरु आज हात माझा,कठोर ही बाब आठवावी
जगावयाचा प्रवास माझा उद्या तसा संपणार आहे
कधीच कर्जात राहिलो ना ,म्हणून ”कैलास” अंत आला
जगू कसे हे जिणे तसे तर तुझ्याकडूनच उधार आहे
>>>
मस्त!
अभिनंदन!
-'बेफिकीर'!
डॉक. सुंदर गझल केलीत. आवडली
डॉक. सुंदर गझल केलीत.
आवडली मनापासून.
मरुन अस्तित्वहीन
मरुन अस्तित्वहीन होण्या,तुझ्याचसाठी तयार आहे
तुझ्याविना या जगात माझा,जगावयाला नकार आहे >>> मस्तच
मस्त
मस्त
आतपर्यंत जाणारी. प्रवाही.
आतपर्यंत जाणारी. प्रवाही.
कैलासजी, उत्तम गजल ! मी या
कैलासजी,
उत्तम गजल ! मी या वृत्तात कधी गजल लिहिली नाही. आपण मला ही ओळ दिली होती. खूप प्रयत्न करत आहे. पाहू केव्हा यश येते ते. तुमच्या मस्त गजले बद्दल अभिननंदन
मस्तच डॉक..
मस्तच डॉक..
अंधकार मस्त!!
अंधकार मस्त!!
खुप छान डॉक.....
खुप छान डॉक.....
सर्वच शेर मस्त. नको धरु आज
सर्वच शेर मस्त.
नको धरु आज हात माझा,कठोर ही बाब आठवावी
जगावयाचा प्रवास माझा उद्या तसा संपणार आहे
कधीच कर्जात राहिलो ना ,म्हणून ”कैलास” अंत आला
जगू कसे हे जिणे तसे तर तुझ्याकडूनच उधार आहे
हे दोन विशेष भावले.
छान आहे गझल.. आवडली..
छान आहे गझल.. आवडली..
<<शिकार गेलो करावयाला,स्वतःच झालो शिकार आहे>> याठिकाणी .... 'शिकार गेलो करावयाला, स्वतःच शिकार झालो आहे'.... हे कस वाटेल.
फारस काही कळत नाही पण मला अशीच ही ओळ वाचायला आवड्ली.
छान आहे जुईला अनुमोदन (बाकी
छान आहे
जुईला अनुमोदन
(बाकी मात्रा फात्रा तुम्ही पहा)
असे वर खाली लिहीलेल नाही रुचत
मस्त, तब्येतीत.
मस्त, तब्येतीत.
आभारी आहे.
आभारी आहे.
छान आहे गझल.. आवडली.
छान आहे गझल.. आवडली.