Submitted by कमलेश पाटील on 22 January, 2011 - 10:53
कसे रहावे सुखात त्याचा, तुझ्याविना मज नकार आहे;
तुझ्याविना या जगात माझा, जगावयाला नकार आहे.
क्षणास माझ्या तुझाच हेका, उगा जगाला किती लपावे?
जरी ठरावे विसर तयाला, मनास माझ्या विकार आहे.
कशास आता जुन्याच आशा ,पुन्हा नव्याने इथे विझाव्या
लुटून जेव्हा नेशील जाई ,सुगंध माझा चिक्कार आहे.
निघून गेलास; मोजल्या मी, इथे तुझ्या आज पायवाटा;
हिशेब केला किती जरी हा, शुन्य जरासा खट्याळ आहे.
तुझेच सारे विचार माझ्या, रितेपणी मी पिटाळलेले;
तनात माझ्या तुझ्या सुराची ,उगाच छेडी सतार आहे.
मला कशाला तुझा जिव्हाळा, कळेल कारे कधी मला हे;
पुन्हा चलावे सरळ जरी मी ,रस्ता मनाचा वकार आहे.
सुखात तू वाटतोस रे पण, तुझे मुखवटे उणे ठरावे;
कशास वेडा हट्ट तुझा हा, मला जिवाला निखार आहे.
गुलमोहर:
शेअर करा
तुझेच सारे विचार माझ्या,
तुझेच सारे विचार माझ्या, रितेपणी मी पिटाळलेले;
तनात माझ्या तुझ्या सुराची ,उगाच छेडी सतार आहे.>>> छान! (वॄत्त काही ठिकाणी तपासावेत.)
शुभेच्छा!
-'बेफिकीर'!