उगाच खोटे हसून वेडा ठरावयाला नकार आहे
तुझ्याविना या जगात माझा जगावयाला नकार आहे
तिला जरासा हवा दुरावा, तिला जरासा हवा अबोला
कधी असे वाटते, कळीचा फुलावयाला नकार आहे
नको बहाणे, नको निमित्ते, खरेपणा भावतो मनाला
फसून का मी उगी रहावे? फसावयाला नकार आहे
क्षणात आसू, क्षणात हासू, असे कसे वागणे सखीचे?
तिने फुलावे, तिने हसावे, रुसावयाला नकार आहे
सुखात मी पाहतो तुला, तू तुझे दु:ख दे मलाच राणी,
तुझ्याविना या सुखासवे मी असावयाला नकार आहे
मलाच का दु:ख कोवळे हे जपावयाचा विकार आहे (?)
विशाल, दु:खे तुझी, सुखाला स्मरावयाला नकार आहे
वृत्त : हिरण्यकेशी
लगावली : लगालगागा लगालगागा लगालगागा लगालगागा
संदर्भ : डॉ. कैलास यांनी मागील आठवड्यात "तरही गझल"साठी दिलेली ओळ ... (तुझ्याविना या जगात माझा जगावयाला नकार आहे)
अर्थात या गझलेच्या जडणघडणीत क्रांतीताईचे अनमोल मार्गदर्शन आणि सटीप कानऊघाडणी यांचा सिंहाचा सॉरी सिंहीणीचा वाटा आहे.
उगाच खोटे हसून वेडा ठरावयाला
उगाच खोटे हसून वेडा ठरावयाला नकार आहे
तुझ्याविना या जगात माझा जगावयाला नकार आहे>>> व्वा!
इतर शेर ओक्के! अजून वाव होताच!
(मतला 'एका वेगळ्या' अर्थाने सुपर आहे.)
कैलासरावांनी 'नकार' हा काफिया दिला असावा, नीटसे आठवत नाही. आपण 'नकार आहे' ही रदीफ घेतलीत. अर्थात, अधिकाधिक लोकांनी गझल रचणे हा कैलासरावांच्या त्या धाग्याचा उद्देश असल्यामुळे या बाबीला तितकेसे महत्वही देण्याचे कारण नाही. आपण शुद्ध गझल रचली आहेत. अभिनंदन व शुभेच्छा!
-'बेफिकीर'!
उगाच खोटे हसून वेडा ठरावयाला
उगाच खोटे हसून वेडा ठरावयाला नकार आहे
तुझ्याविना या जगात माझा जगावयाला नकार आहे>>> मस्तच विशाल!!
अभिनंदन आणि पुलेशु
भूषणजींशी सहमत..... फार छान
भूषणजींशी सहमत.....
फार छान गझल...
क्षणात आसू, क्षणात हासू, असे कसे वागणे सखीचे?
तिने फुलावे, तिने हसावे, रुसावयाला नकार आहे
फार छान आणि हळुवार शेर...
विशालभौ..... आता आपण तरहीची वाट न पहाता गझला लिहाव्या मित्रा...
तिला जरासा हवा दुरावा, तिला
तिला जरासा हवा दुरावा, तिला जरासा हवा अबोला
कधी असे वाटते, कळीचा फुलावयाला नकार आहे >>>
वाह!!!
बाकी गझलही जमलीये!
शुभेच्छा!
मस्तच... पुलेशु...
विशल्या मस्त गझल, प्रचंड
विशल्या
मस्त गझल, प्रचंड आवडली..
बाकी ते वृत्त छंद बिंद मला तरी काही झेपले नाहीत... त्यामुळे ती नुसती माहिती म्हणून वाचली..
पुलेशु!!
विशालदा...अप्रतीम गझल...सगळेच
विशालदा...अप्रतीम गझल...सगळेच शेर आवडले...मतला तर उत्तमच!
छान! सगळ्या द्वीपदी आवडल्या.
छान! सगळ्या द्वीपदी आवडल्या.
दुसरा शेर आवडला... गझल
दुसरा शेर आवडला... गझल छानच!!!
सॉल्लीड! झालास सामील तू आता
सॉल्लीड! झालास सामील तू आता मोठ्या कंपूत.;-)
मस्त गझल...
मस्त गझल...
<<<सॉल्लीड! झालास सामील तू
<<<सॉल्लीड! झालास सामील तू आता मोठ्या कंपूत.>>>
घे जरा.
विशाल आता कंपूबाजी हा रदीफ असलेली गजल लिही बरं.
(No subject)
छान सुरुवात विशाल !!! गुड लक
छान सुरुवात विशाल !!! गुड लक !!!