छत्तिसगडची सफर

Submitted by सुनिल परचुरे on 8 January, 2011 - 03:52

छत्तिसगडची सफर

हं , मग काय ? ह्या वर्षि कुठे जायच ठरवलय ?
छत्तिसगडला.
काय ? छत्तिसगडला ?
अरे बाबा आपल्या इथे शिक्षा म्हणुन गडचिरोलिला पाठवतात आणि तु तर तिथे त्यांच्या गडातच जातोयस ?
हो. बुकिंगपण केल.
ठिक आहे. मग जिवंत परत आलास तर नविन वर्षाच्या शुभेच्छा देइन.

ज्या ज्या मित्रांना मि छत्तिसगडला जातोय हे सांगितले त्यांच्याशि ह्याच प्रकारचा संवाद झाला.

छत्तीसगड टुरीझमची पेपरात जाहिरात होति की, डिसेंबर महिना हा त्यांनि टुरीझम प्रमोशनल महिना जाहिर केला होता. आधि तिथे जाऊन सगळी चौकशी करुन आलो. पहिला प्रश्न आला नक्षलवाद्यांचा. कारण पेपरात ब-याच वेळा पोलिसांवर केलेल्या हल्याचे वर्णन वाचले होते. पण तिथल्या ऑफीसमधल्या लोकांनी सांगितले की, त्या नक्षलवाद्यांच भांडण सरकारशि आहे. सामान्य किंवा टुरीस्ट लोकांशी नाही. तेव्हा हो नाही करता करता नेहमीप्रमाणे मी व माझी पत्नि सुषमा तसेच माझा मित्र संजय शेट्ये व त्याची बायको साधना असे चौघा जणांचे बुकींग केले. नेहमिप्रमाणे फोटो काढायचि जबाबदारि सुषमाने पार पाडलि आहे. प्रमोशनल महिना असल्याने चौघांचे बुकींग अगदी स्वस्तात झाले.

पहिल्या दिवशी दुपारी छत्तीसगडचि राजधानी रायपुरला पोहोचलो. त्या दिवशी आम्हाला सगळ्यात जास्तीचा म्हणजे जवळ जवळ 300 कि.मी. पल्ला गाठायचा होता तो रायपुर ते जगदलपुर हा. तिथे पोहोचेस्तोवर रात्रीचे आठ वाजले होते. पण थंडी जरी खुप होती तरी गरमागरम अतिथ्यशील जेवणाने थकवा पळुन गेला. आसना येथील हे छत्तीसगड टुरीझमचे हॉटेल. ते बस्तर जिह्यात आहे. बस्तरला छत्तीसगडचे काश्मीर म्हणतात.
IMG_1397.JPG
सकाळि भरपुर थंडि होति. हे तिथल्या बागेतिल पानांवरच दव.
IMG_1394.JPGIMG_1410.JPGIMG_1413.JPG

सकाळी प्रथम तिथून कांगेर व्हॅली नॅशनल पार्कमधील तिरथगड फॉल्सला भेट दिली. जगदलपुर पासून 40 कि.मी. वर हा धबधबा साधारण 100 फुटावरुन खाली झेप घेतो. डिसेंबरमध्येही हा असा खळाळत होता.
IMG_1434.JPG
हि रस्त्यातलि द्रुश्य
IMG_1445.JPGIMG_1447.JPG
आजुबाजुचे डोंगरही लगोरी खेळतांना आपण एकावर एक दगड रचतो तसेच आहेत. पण सर्व छत्तीसगड राज्यात डोंगर हे असेच आहे. त्याच कारणामुळे असेल पण इथे कच्च लोखंड व त्याच्या पासून बनणार स्टील ह्याच्या खुप मोठमोठ्या खाणी आहेत. तसेच काळ्या किंवा वेगळ्या प्रकारच्या फरशाही इथुन निघतात.

कांगेर व्हॅलीतच तिथून जवळच परत 40 कि.मी.वर कुटुमसर केव्हज आहेत. ह्या खरच अफलातुन आहेत. ह्या गुहा जवळ जवळ 6000 वर्षे जुन्या आहेत. ज्यांना श्वसनाचा त्रास आहेत असे रोगी , दमेकरी, हार्टच्या दुखण्याचे रोगी, गर्भवती बायका यांनी आत जाऊ नये असा बोर्ड बाहेर लिहीलेला आहे. कारण प्रथम आत शिरतांना अक्षरश एक फुटभर सुध्दा जागा नाही अशी फट आहे. त्यातुन आत गेल्यावर रांगतच जवळ जवळ 40 फुट खोल पाय-या आहेत तिथे ऊतरावे लागते. त्यात निम्यावर गेल्यावर गोल लोखंडी जिना आहे. म्हणजे प्रथम आत उतरतानाच आपली कसोटी लागते. आत उतरल्यावर अद्भुत दृष्य दिसते. पाणी ह्या गुहेत हजारो वर्षे झिरपुन पडत असताना कॅल्शियम कार्बोनेटचे वरुन छताला किंवा खालुन वर असे स्तंभ उभारल्यासारखे तयार झाले आहेत. (Stalactite आणि Stalagmite फोर्मेशन्स) हि गुहा जवळ जवळ 200 मिटर लांब, 35 मिटर रुंद व 55 मिटर उंच अशी आहे. आत ब-याच ठिकाणी दिवे आहेत. गुहेच्या अगदी टोकाला जमीनीवर असे काही बनले आहे की ते शिवलिंग म्हणून लोक पूजा करतात. आतील खडकाचे रंगही वेगळेच आहेत. पण गुहेतुन बाहेर पडतांना बरीचशी माणस आंघोळ केल्यासारखी घामेजुन येत होती.
IMG_1470.JPGIMG_1471.JPG

आम्ही परत जगदलपुरला येऊन तिथून 40 कि.मी.वर असणा-या चित्रकोट फॉल्सला गेलो. तो इंद्रावती नदीवर आहे. ह्याला भारताचा नायगारा म्हणतात. डिसेंबरमध्येही हा 100 फुट खाली घोंगावत येत होता. समोरच असणा-या छत्तीसगड टुरीस्ट बंगल्यावर ही रात्री धबधब्याचा आवाज येत होता. पावसाळ्यात जेव्हा सर्व बाजूनी पाणी पडते तेव्हा तो नायगारा धबधब्याची आठवण करुन देतो. त्याच्या उडणा-या तुषारात भिजायला बोटींगचीही सोय आहे. तसेच रात्री ह्यावर लाईटसही टाकतात. त्यामुळे हा खरोखरच अविस्मरणीय असा दिसतो.
IMG_1498.JPGIMG_1501.JPG

दुस-या दिवशी सकाळी निघुन आम्ही आधी कोसा साडी केंद्राला भेट दिली. तुतीची पाने खाऊन रेशमाचे किडे स्वतः भोवती कोश करुन घेतात. प्रथम हे कोश गरम पाण्यात उकळतात व आतील किडा मारतात. नंतर असे आठ कोष एकत्र मशिनमध्ये ठेवतात. प्रत्येक कोषातुन निघणारा धागा एकत्र करतात. म्हणजे आठ कोषांचा मिळून एक धागा तयार होतो. तो साधारण 30 मिटर लांब असतो. एका कोसा साडीला 300 मिटर धागा लागतो. म्हणजे 80 कोषांपासून एक कोसा साडी तयार होते.
IMG_1562.JPGIMG_1561.JPGIMG_1567.JPGIMG_1573.JPG

तिथूनच जवळ असणा-या कोंडागावाला आम्ही भेट दिली. तिथे बेल मेटल व रोट आयर्नपासून ब-याच वस्तु बनवतात. ह्या सर्व करतांना कुठल्याही मोठमोठ्या मशिनचा वापर न करता पूर्वापार चालत आलेल्या प्रथेनुसारच त्या तयार करतात. ब-याच बंगल्यांची दारेही स्पेशल असतात. त्यात खुप नक्षीकाम असते. तिथून आम्ही नथीयानगाव किंवा कांकेरला टुरिझमच्या हॉटेलमध्ये राहिलो.

दुस-या दिवशी आम्ही सकाळी लौकरच निघालो. कारण आम्हाला बारनवापारा ह्या अभयारण्यात जायचे होते. कांकेर पासून रायपुर साधारण 140 कि.मी. व तिथुन हे जंगल 60 कि.मी. वर आहे. वाटेत जाताना सिरपुर गावी गेलो. ती पूर्वी दक्षिण खोसलाची राजधानी होती. सध्या होत असलेल्या उत्खननात शैव, वैष्णव, बुध्द व जैन लोकांशी संबंधित देवळे, मठ, बौध्दविहार तसेच त्यावेळचे शिलालेख मिळत आहेत.
IMG_1598.JPGIMG_1621.JPG

बारनवापारा हे जास्त करुन बिबट्यांकरता प्रसिध्द आहे. तसेच गवे, वाघ, निलगाई, अस्वल, सांबर, हरणे, मोर व अजगरही इथे खुप आहेत. 245 स्क्वेअर किलोमीटर क्षेत्रफळात हे वसले आहे. आम्ही तिथे पोहोचस्तोच रस्ता चुकल्याने दुपारचे 3 वाजले. जेवून लगेच जंगल सफारीला मारुती जिप्सितुन गेलो. जंगल खरोखरच डिसेंबर महिना असुनही खुप दाट होते. कारण ह्यावेळी पावसाळा बराच लांबला असल्याने पाणी, झाडी मुबलक होती. वाटेत मोर, निलगाई दिसल्या. अचानक गव्याचही दर्शन झाले. खरतर दाजीपुरला गवा अभयारण्यात जाऊनही ते दिसले नव्हते. पण इथे भरपुर बघितले. दिडतास आत फिरल्यावरही बिबट्यांचे किंवा वाघाचे दर्शन झाले नाही. परत रिसॉर्टवर आलो. रात्री जेवणाला म्हणून बाहेर पडलो तर कळले कि एक बिबटा रिसॉर्टपर्यंत आला होता व आमच्या ड्रायव्हरने व तिथल्या मॅनेजरने तो पाहिला. एकाच वेळी बिबटा न बधितल्याची रुखरुख तर अरे बापरे तो इथपर्यंत येतो ही भितीही वाटली.
इथले टुरिस्ट बंगले व लागुनच असलेला परिसर
IMG_1668.JPGIMG_1662.JPG
दुस-या दिवशी सकाळी लौकर जंगल सफारीला निघालो. वाटेत बिबटा किंवा वाघ सोडून बाकी प्राणी दिसले. शेवटी हिरमुसले होऊन परत फिरणार तेवढ्यात एक क्वचितच दिसणारे दृष्य पाहिले. तळ्यावर एक मोठे सांबर होते व 10-15 जंगली कुत्रे त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करत होते. व ते सांबर त्यांना सारखे हुसकावुन लावत होते. पण ते कुत्रे त्याच्यावर हल्ला करत नव्हते म्हणून गाईडने गाडी थोडी आणखीन पुढे नेण्यास सांगितली. तेव्हा तळ्यातील खोल पाण्यात तिची दोन पिल्ले दिनवाणीपणे बसलेली दिसली. त्या कुत्र्यांना त्या पिल्लात इंटरेस्ट असल्याने ति आईवर हल्ला करत नव्हती. सकाळि ते तिघे पाणी पिण्यास आले असणार. तेव्हा कुत्र्यांपासून बचाव करण्यास ती पिल्ले खोल पाण्यात गेली असणार. बराच वेळ त्यांचा हा खेळ सुरु होता. मध्येच एकदा ती आई खाली पाण्यात आली. तिने पिल्लांना काय सांगितले कळले नाही. पण ती जंगलात पसार झाली. कदाचित पिल्लांनो मी ह्यांना घेऊन जंगलात जाते ती संधी साधुन तुम्ही बाहेर या किंवा तिने त्यांच शेवटच डोळे भरुन दर्शन घेतले असणार. कारण ती जी जंगलात गेली ति परत आलिच नाहि . तिच्या पाठोपाठ हे सर्व कुत्रेही गेले. पण मिनिटभरातच ते परत आले. तेवढ्या वेळात पाण्याबाहेर येण्याची काही त्या पिल्लांची हिंमत झाली नाही. ते सर्व दृष्य बघुन खुप वाईट वाटत होते. आमचा ड्रायव्हर तर त्या पिल्लांना सोडवायला निघाला. पण गाईडने व आम्ही त्याला मनाई केली. एकतर हा निसर्गाचा नियम ते पाळत होते व आमची रखवालदारी करायला एक कुत्रा समोरच बसून होता. अक्षरक्षः त्यांनी जबरदस्त फिल्डिंग लावली होती. शेवटी खिन्न मनाने आम्ही तिथुन बाहेर पडलो. पण फक्त डिस्कव्हरी चॅनेलवर बघतो तसे दृष्य बघितल्याचे अनामिक समाधान मिळाले.
IMG_1647.JPGIMG_1652.JPGIMG_1653.JPGIMG_1646.JPGIMG_1649.JPGIMG_1656.JPG
दुस-या दिवशी तिथून निघुन रायपुरला आलो. खरतर हे राजधानीचे ठिकाण. पण हे राज्य अजून बाल्यावस्थेत असल्याने त्यांची राजधानी ही अजून सावरत सावरत उभी रहात आहे. नवी मुंबई सारखे नवे रायपुर शहर वसत आहे. ज्यात सर्व सरकारी कार्यालये, विधानसभा एकाच ठिकाणी असतील. संध्याकाळी गावात हिंडलो.
सकाळी परत निघतांना जाताना तिथुन जवळच 30 कि.मी. वर पुरखौती मुक्तांगण म्हणून नवीनच वसवले आहे. त्यात छत्तीसगडी लोक , त्यांचे सण तिथल्या स्त्रियांची आभुषण व प्रत्येक ठिकाणची रिप्लिका केलेली आहे.
IMG_1691.JPGIMG_1697.JPGIMG_1719.JPGIMG_1700.JPGIMG_1714.JPG

तिथेच खास बस्तरहुन बोलावलेलि माणस आलि होति. ति लोखंडि पत्र्यापासुन तो तापवुन हातोड्याने माणसाचा चेहरा ,ओठ , नाक व त्याचे डोळे बनवत होति.
IMG_1748.JPGIMG_1745.JPG

हे तेथिल गेट
IMG_1750.JPGIMG_1751.JPG
अजुन खरतर आम्ही दक्षिणेकडचा छत्तीसगड बघितलाच नव्हता.पण ह्या 5 दिवसांच्या आठवणीवरच आम्ही ठरवल की तोही भाग लौकरात लवकर बघायचाच.

गुलमोहर: 

लिंक दिसतेय, त्यावर तारीख ८ जानेवारी आहे तेव्हा ती लिंक तारखेप्रमाणे मागच्या पानावर गेली,
तुम्ही लेख ज्या दिवशी लिहायला घेतला त्यानंतर कितीही दिवसांनी तो लिहून पूर्ण केला तरी त्याची प्रकाशनाची तारीख तिच रहाते त्यामुळे प्रकाशित झाल्यावर लेख त्या तारखेच्या लेखांच्या रांगेत मागच्या पानांवर जातो. त्यावर कोणी प्रतिसाद दिला तरच तो प्रतिसादाच्या तारखेप्रमाणे वर पहिल्या पानावर येतो.
यावर सध्या उपाय नाही पण बरेच जण लेख प्रकाशित केल्यावर स्वतःच पहिला प्रतिसाद देवून लेख वर पहिल्या पानावर आणतात

चला.........छान झाले..............लेख वाचला..........अतिशय आवडला...........

पैसे सुद्धा वाचले..........छत्तीसगड ला जायचे होते..........इथेच बघीतले............आणि अप्रतीम लेख सुद्धा वाचला........

धन्यावाद......

सुनिल ..व्वा ..मस्तच ट्रिप झाली आणी पर्यटनासाठी एकदम हटके स्थळ निवडलं म्हणून कौतुक ही वाटलं. या भागांची विशेष कुणालाही माहिती नसते ..तू आणी सुषमा ने वर्णन आणी फोटोंच्या माध्यमाने छत्तीसगड सहलीकरता आम्हाला एनकरेजच केलंय !!
सांबर आणी तिच्या पिल्लांची अगतिकता इथपर्यंत भिडली. फार अस्वस्थ वाटलं.हम्म्म्..पण नाइलाज आहे
बाकीचे फोटो पण एक से बढकर एक

अप्रतिम वृतांत आणि त्याला साजेसे असे अप्रतिम फोटो Happy
सुनिलजी, मनापासुन धन्यवाद एका अनोळखी प्रांताची ओळख करून दिल्याबद्दल.
मला प्रचंड आवडले सगळेच फोटो. सुषमाजी, तुम्ही उगाच माझ्या फोटोचे कौतुक करतात.

तू आणी सुषमा ने वर्णन आणी फोटोंच्या माध्यमाने छत्तीसगड सहलीकरता आम्हाला एनकरेजच केलंय !!
>>>>>वर्षुदीला अनुमोदन Happy

अतिशय इंट्रेस्टिंग.
ते गेट काय सुंदर आहे. ते 'बस्तर' पद्धतीचे काम आहे ना? इतक्या सुंदर कारागिरीपासून जो शब्द आला तो 'बस्तर' म्हणजे अगदीच नॉट फेअर.
आणि कोसा साडीच्या माहितीबद्दल आभारी आहे. बर्याच दिवसापासून शोधत होते.
च्च. च्च. जंगली कुत्री सांबरांना खातात? कुत्री? Sad

सुंदर वर्णान आणि फोटॉही.. मलाही कोळ्याच्या जाळ्याचा फोटो आवडला..

जंगली कुत्री सांबरांना खातात? कुत्री?

हो खातात. जंगली कुत्री हा अगदी भयानक प्रकार आहे. इतर प्राणी भक्ष्याला मारल्यावर त्याला खातात, पण जंगली कुत्री भक्ष्याला कोंडीत पकडुन त्याचे लचके तोडुन थेट खायला सुरवात करतात. किती भयानक मरण येत असेल त्यांच्या भक्ष्याला...:( नेहमी ८-९ च्या कळपात राहतात आणि पुर्ण प्लॅनिंग करुनच शिकार करतात. त्यांच्या तावडीतुन भक्ष्य सुटणे अशक्यच...

मस्त लेख आणि फोटो.. छत्तिसगड टुरिसम बद्दल नविनच माहिती कळली. धन्यवाद.
>> पण गाईडने व आम्ही त्याला मनाई केली.
हे अगदी बरोबर केलं... आपण तिथे फक्त बघायला गेलेलो असतो... एखाद्या नाटकासारखं!

हे सगळं इथे लिहिलंत अन मायबोलीकरांना वाचायला मिळालं हेच छान. फोटो, काही निवडक प्रसंग, सर्वात जास्त आवडलेलं ते गेट. अप्रतिम आहे सारं.

स्वर्गाहून आणखी सुंदर या भारतातच पहायला मिळतं हेच खरं. !

अप्रतिम छायाचित्र आणी लेख वाचून जणू तेथे जाऊन आल्यासारखच वाटलं, आणी त्याच वेळी तेथे जायची उत्कंठा निर्माण झाली.

shrikkk>>>>>>खरंच मलासुद्धा ह्याच बातमिचि आठवण झाली.
वर्णन आणि फोटो अप्रतिम! त्या सांबरांच्या पिल्लांचा शेवट मन विषण्ण करून गेला.

आवडलं Happy

Pages