हिरवा पाचू

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 7 January, 2011 - 05:14

पाचुचे बन असते अस ऐकल आहे. खाली पाचुची रोपे आहेत व पाचुच्या जुड्या. सध्या पाचु फुलतो आहे. ह्या पाचुचा मंद वास मोहीत करतो. अजुनही काही बायका हे पाचु डोक्यात घालतात आवडीने. पाचुचा उल्लेख कुठल्यातरी गाण्यातही आहे.
pachu4.JPGpachu5.JPGpachu.JPGpachu6.JPGpachu2.JPGpachu3.JPG

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

वास दरवळला इथेही.
शालू हिरवा... (उषा)
असा केसात माळुन मरवा (लता)
छंद माझा पुरवा (आशा)
या तिन्ही गाण्यात आहे.

हिरवा पाचु... नाव वाचुन पुनरुक्ती झाल्यासारखे वाटले.

हिरवा पाचु आणि मरवा वेगळा काय??
जागु, माझ्यासाठी एक रोपटे आण.

काही काळापुर्वी मी माझे घर सोडुन इतरत्र मला आवडलेली रोपटी पळवायचा उद्योग करायचे (आता बंद केला हा उद्योग. जागा कमी पडतेय) गुपचुन रोपटे उपटायचे, एक वर्तमानपत्र किंवा टिशु पेपर जे मिळेल ते, पाण्यात भिजवायचे आणि ते रोपट्याच्या मुळाशी गुंडाळायचे. त्यावर एक कोरडे वर्तमानपत्र किंवा टिशु पेपर गुंडाळायचा... रोपटे मस्त दिवसभर ताजे राहते आणि रात्री आपल्या कुंडीत लावले की आनंदाने जगते.

मस्तच ग जागू Happy

श्रावणात घन निळा बरसला...या गाण्यात पण "पाचुच्या हिरव्या माहेरी उन हळदीचे आले" असं अप्रतीम वर्णन केलंय पाडगावाकरांनी!

मला तर वाचल्यावर पहिल्यांदा पाचूच्या खड्याचा फोटो टाकलात की काय असंच वाटलं होत...... Happy
फोटो बघितल्यावर कळालं की याला पाचू असं म्हणतात.... आता त्याचं काय की गुगल मधे भाज्यांची माहीती मिळवण्यापेक्षा आपल्याला विचारलं की जास्त उत्तरं मिळतील याची खात्रीच झालीए.... Happy

बादवे, फोटो छानच.... नेहमी उपयुक्त माहीती मिळते तुमच्या सदरातून...... पुलेशु...

व्वा.. मस्तच जागू.. हिरवा पाचू खुललाय अगदी
दिनेश दांनी आठवण करून दिलेली गाणी पण सुर्रेख आहेत

सुमे छान ओळ दिलीस ग.

दिनेशदा तुम्ही गाण्याच्या बाबतीत पण मास्टर आहात.

साधना मी मागच्या महीन्यात आईकडून छोट रोपट आणल आहे. उद्या जाउन तुझ्यासाठीही घेउन येईन.

असुदे हे गाण आम्हाला तुझ्यासाठी म्हणायला हव. की आहे आम्हाला वहीनी ?

स्मितहास्य धन्यवाद. पण माझ्यापेक्षा मोठे जाणकार आहेत अजुन. निसर्गाच्या गप्पांवर फेरफटका मारा.

जागमाते, मी तुझ्यासाठी अजून एक वहिनी आणायला गेलो तर तूझी एक्झिस्टींग वहिनी माझ्यासाठी वाहिनी पाठवेल अमिताप बच्पन सारखी.

पाचु आम्ही तर याला 'मली' म्हणतो. मला वाटत तुळशिच्या जातितल हे झाड आहे. फार छान वास येतो याचा. आमच्याकडे तळ कोकणात भरपुर झाड आतात याची. तुळशिच बन असत तसच मालीच बन आहे मझ्या मामकडे.
मारवा वेगळा असतो ना? त्याची पान फा छोटी असतात.

वा खुप वर्षांनी पाहिला. माझ्या आईला खुप आवड त्यामुळे आमच्या घरी तिने दवणा, मरवा, पाचू लावलेले होते. शिवाय अबोली होतीच आणि जाई-जुई-चमेलीचे वेल होते. उन्हाळ्यात संध्याकाळी गच्ची सुगंधित असायची. मरवा, अबोली आणि चमेलीचे आम्ही मद्रासी गजरे बनवुन केसात घालायचो.

मस्तच!!! त्या दिवशी दादरच्या फुलबाजारात पाहिला पण तो फुलवाला "मंडी" असं काय तरी नाव सांगत होता Sad
हिरवा पाचु आणि मरवा वेगळा काय??>>>>होय, पाचु आणि मरवा वेगळा आहे. "शालु हिरवा पाचु नि मरवा......". Happy

महादेवाला वहातात ते काय असत??>>>>महादेवाला वाहतात तो "दवणा". याचा सुंगधही भन्नाट असतो.

अच्छा..तर या झाडाला "पाचु" म्हणतात, मी ईथे ते रोपटे पाहीले तेव्हा मला वाट्लं वेगळया जातीची "तुळस" असेल... :स्मित:. आज "नेसुन पाचुचा हीरवाशालू" या ओळिचा अर्थ कळला. थॅंक्स जागुतै.

जागु,
धन्स ! नविन माहिती मिळाली !
अशीच एक तुळशीपेक्षा मोठी पाने असलेली आणि जांभळी फुले असलेली एक वनस्पती असते, मला वाटतं ती तुळशीचीच एक प्रकार असेल !
Happy

सगळ्यांचे प्रतिसाद वाचुन खुप छान वाटल.
अनिल मी ही ती पाहीली आहे वनस्पती. खाली फोटो देते. निसर्गाच्या गप्पांवर दिनेशदांनी हे तुरे विठोबाला वाहतात असे सांगितले आहे.
sabja1_0.JPGsabja_0.JPG