माझी तरही - कधी काळी तुझ्यासाठी...

Submitted by शरद on 6 January, 2011 - 03:14

संपादित केले आहे! संपादित केले आहे! संपादित केले आहे! Happy

गुलमोहर: 

मतला अजून वेगळा असायला हवा होता असे वाटते...

जसे फैलावले बाहू गळ्याशी लावण्या त्याला..
दगाबाजीमधे त्याने गळ्याला कापले होते!

फुले वेचून घेण्याला पसरला हात मी जेव्हा..
निसर्गाने पुन्हा मागे वसंता घेतले होते!

पुनव येता चकोराच्या मनी त्या चांदणे नाचे..
अशा वेळीच ग्रहणाने कसे अंधारले होते!

कुणाला दोष मी द्यावा? नशिबाला? कपाळाला?
अरे! आयुष्य हे सारे जळाया लागले होते!

हे शेर फारच छान झाले आहेत... मस्तच. सुंदर गझल. Happy

फुले वेचून घेण्याला पसरला हात मी जेव्हा..
निसर्गाने पुन्हा मागे वसंता घेतले होते!

पुनव येता चकोराच्या मनी त्या चांदणे नाचे..
अशा वेळीच ग्रहणाने कसे अंधारले होते!

सुंदर!!!

कुणाला दोष मी द्यावा? नशिबाला? कपाळाला?
अरे! आयुष्य हे सारे जळाया लागले होते!

गळाया लागली नौका, पळाया लागले सारे,
'शरद' तेव्हा गजल आली, तिने मज तारले होते!>>> छान शेर! 'नशीबाला' असे हवे बहुधा !(सफाई थोडी अधिक आणू शकाल आपण हे नक्की माहीत आहे.)

धन्यवाद!

-'बेफिकीर'!