एका पेक्षा एक - अप्सरा पर्व

Submitted by निंबुडा on 31 December, 2010 - 01:00

झी मराठी वर एका पेक्षा एक चे "अप्सरा आली" सेलेब्रिटी चे पर्व सुरु झाले आहे. बर्‍याचशा डान्सर्स नृत्यकला शिकलेल्या वाटतात. त्यामुळे कार्यक्रम रंगतदार होणार यात शंकाच नाही. या पर्वावर चर्चा इथे करु या. Happy

या पर्वातल्या ९ सहभागी:
१) सुरेखा पुणेकर (प्रसिद्ध लावणी नृत्यांगना)
२) उर्मिला कानिटकर (असंभव ची शुभ्रा)
३) गिरिजा ओक (लज्जा ची मनु)
४) आरती सोळंकी (फू बाई फू फेम)
५) स्मिता तांबे (अनुबंध ची किटी)
६) नेहा पेंडसे (भाग्यलक्ष्मी ची काशी)
७) मृण्मयी देशपांडे (कुंकू ची जानकी)
८) नेहा जोशी (अवघाची हा संसार मध्ये प्रसाद ओक ची बहिण म्हणून काम केले होते हिने)
९) सोनाली खरे (चेकमेट मध्ये अंकुश चौधरी ची हीरॉईन होती.)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो आणि सोनाली खरे? कित्ती स्टिफ आहे ती..........आणि ती नाचल्यावर कुणा एका जजनी चक्क डोळे पुसले. अरे इथेही ग्लिसरीनच्या बाट्ल्या असतात की काय?

मी आता असे ठरवुन टाकले आहे की हा कारेक्रम बघाचाच नाइ, फक्त इथे येवुन काय काय लिहिले ते वाचायचे आणि पोट न धरता हसायचे.

प्रामाणिकपणे सांगते कोणतीही भाग घेतलेली नृत्यांगना मला तिथे मनाने उपस्थित आहे
असं कधीही जाणवलं नाही.... त्यामुळे कार्यक्रमात जान येत नाही. त्यापेक्षा तो फु बाई फु चा अँकर निलेश परवडला.... आधी तो मला अजिबात सहन व्हायचा नाही. पण पुष्कर श्रोत्रीची थेरं पाहून निलेश बराच बरा म्हणायची वेळ आली.. Sad

प्रत्यक्ष कार्यक्रमा पेक्षा इथल्या पोस्ट्स वाचूनच छान करमणूक होते आहे ! Lol
मला असं म्हणावसं वाटतय की- 'फू बाई फू' हा डान्सचा छान कार्यक्रम होता आणि 'ए पे ए (अप्सरा आली)' हा धमाल विनोदी कार्यक्रम आहे !

सोनाली , मिस तांबे आणि गिरिजाचा डान्स पाहिला, धन्य ते कोरिओग्राफर्स ,ते कपडे आणि त्या अप्सरा (!)
उगीच अवजड कोलांट्या उड्य मारणे, वेड्या सारख्या हवेत लाथा झाडणे म्हणजे कंटेपररी डान्स फॉर्म अशी पक्की समजुत आहे ए.पे.ए टिम ची !
कोणीही बायका येतात पॅरॅशुट सारखे किंवा भोजपुरी आयटेम गर्ल्स सारखे चीप कपडे घालून आणि हवेत लाथा झाडून घेतात , वाहवा पण मिळवतात .. कमाल आहे त्या महागुरुची !
नाही तरी गाणी हिंदीच बरीचशी, डान्स फॉर्म मोस्ट्ली वेस्टर्न मग डान्स इंडिया डान्स च पहा सगळ्यांनी !
सध्या डा.इं.डा सोडून दुसरीकडे गेले असले तरी कंटेंपररी मधे टेरेन्स लुइस , बॉल रुम मधे संदिप सोपरकर आणि स्ट्रीट डान्सिंग मधे रेमो फर्नँडिस च्या डान्स इंडियाच्या कोरिओग्राफी आणि डान्र्स ना पर्याय नाही !:).

मागच्या गुरुवार च्या एपिसोड मध्ये खरंच एका पेक्षा एक सुमार डान्सेस.

कुणीतरी त्या कार्यक्रमापैकी एकाला तरी या धाग्यावर यायचे आवतण द्यायला पाहिजे Biggrin

परोगराम एवढाच धांगडधिंगा धाग्यावर चालू आहे की. मस्त मस्त. चालू दे आमच्या सारख्या टिव्ही शत्रुंचं फावतय. इथल्या अप्सरा मात्र खरंच एकापेक्षा एक आहेत. Proud

काय मित्रांनो.. कालचे डान्से कसे वाटले????
सुप्रिया आल्याने छान घरगुती सोहळा वाटत होता...

भुताचा द्यांस बघून लई घाबरलो हा मी... Lol

ती नेहा जोशी डोक्यात जाते राव.. तिने आधी ते डोळे गरागरा फिरवणे बंद करावे..
>>> अगदी अगदी. तिच्याविषयी अशीच प्रतिक्रिया या आधीही याच बीबी वर डीजे ने दिली तेव्हा पटले नव्हते. मात्र कालचा नेहा जोशीचा परफॉर्मन्स पाहून आणि तिचे डोळे मोठ्ठे करणे पाहून माझ्या डोळ्यांचे पारणे फिटले.

काल कुणी एक गोष्ट मार्क केली का? नेहा जोशीने ज्या गाण्यावर डान्स केला. त्या गाण्याचे शब्द असे होते "चमचम चांदण्या रातीने चंद्राची बिंदली चोरून नेली...." .

बिंदली चा अर्थ लहान मुलांच्या हातातील चांदीचे कडे असा होतो. पण गाण्यात प्रत्येक वेळी बिंदली हा शब्द आला की नेहा कपाळावरच्या बिंदी कडे इशारा करत होती. तिला एक बिंदली चा अर्थ माहीत नसेल, पन तिच्या कोग्रा (म.वै.) लाही माहीत असू नये? माहीत नसल्यास आधी शब्दाचा अर्थ नीट माहीत करून मग त्याच्यावर डान्स स्टेप्स बसवता येत नाहीत का? सचिन त्यावर काही कमेंट्स देईल असे वाटले पण इतरच वायफळ बडबड केली.

यावरून आठवलं. मागे ए.पे.ए. च्याच एका पर्वा मध्ये एका नर्तिकेने "बीडी जलैले..." या गाण्यावर डान्स केला. त्यात एका कडव्याच्या शेवटी "अंगीठी जलैले....." असे शब्द येतात. त्यावर चक्क बोटातल्या अंगठीकडे इशारा केला. वास्तविक अंगीठी चा अर्थ "चूल" असा होतो. (किंवा शेकोटी असे. जाणाकरांनी सांगावे). इथेही कोग्रा चे सामान्य ज्ञान उघडे पडले. व महाग्रूंनीही ऑब्जेक्शन घेतले नाही.

महाग्रूंनी तर मीना कुमारीकडून वगैरे उर्दू भाषा शिकली आहे. हिंदी आणि मराठीवर त्याचे भाषाप्रभुत्व असल्याचा इतका टेंभा मिरवतात. मग मराठीतला बिंदली आणि हिंदीतला अंगीठी हे शब्द ठाऊक नसावेत त्यांना??? Uhoh डान्स काय नुसत्या ह्रिदमवर करायचा असतो का? शब्दांना काहीच महत्त्व नाही??

किती कौतुक करतात सगळे जज्ज आणि महागुरू! त्याना खरंच असं वाटतं?
आपल्यासारख्या नाच न येणार्‍याना जर ते विचित्र वाटतं, तर त्याना हे कसं काय वाटतं? कि कार्यक्रम चालू रहावा म्हणुन काहीही करतात?

मी काल चुकून एक भाग पाहिला. आरतीला नाचताना बघवत नाही.

महाग्रूंनी तर मीना कुमारीकडून वगैरे उर्दू भाषा शिकली आहे. >> निंबुडा, मीना कुमारीकडून नाही काही मीना आपांकडून.. आणि बहुदा मीना कुमारीच शिकल्या असतील महाग्रूंकडून. शेवटी काहीझाले तरी महाग्रूते.. त्या सचिन पिळकर ने एकदा हा धागा वाचावा..देवा प्लीज प्लीज असे होउदे.

प्रसन्न, अत्ताच मी झी नेटवर्कला फोन करून कळवतो कि असे पायताण गुरू सुद्धा असावेत तुमच्या कार्यक्रमात. महागुरूंना सुट्टी द्यायला सांगतो. आता तुम्हीच बसा त्या खुर्चीवर पायताण हातात घेऊन. नाही आवडला कोणाचा डान्स कि द्या लगावून. निदान त्यांना नाचता तरी येतं पण आपलं काय?

नाचता येईना पायताण वाकडं !

टिका करताना नेहमी विचार करावा, कि अप्सरांसोबत काही खाजगी वैर आहे का आपलं ?

>>>> सगळ्यांना पायताण काढून हाणल पाहिजे =)) <<<<<
>>> प्रोग्राम आवडला नाही म्हणून प्रतिक्रिया काहीही द्यायच्या का? त्या सगळ्या चांगल्या नाचत नसल्या तरी पायताणाने हाणण्याजोगं काय केलंय त्यांनी?
अनुमोदन!
ही अस्ली ब्रिगेडी दळभद्री भाषा इथे शोभत नाही, चालत नाही.
तुम्ही पायताणाने मारायला (वा त्यान्यावर नोटा उधळायला) त्या काय जत्रेतल्या तमाशाचा फडावर किन्वा दारुच्या अड्ड्यावर नाचायला उभ्या नाहीयेत, बघवत नसेल तर गुमानं टीव्ही बन्द करा!

लिंबुटींबु , अनुमोदन. पण आता जत्रेतल्या तमाशाच्या फडालासुध्दा चांगले दिवस आले आहेत. असे प्रकार घडत नाहीत. अन डान्सबारही बंद झाले आहेत Proud मग ते शेवटी टिव्हीलाच पायताण हाणत बसतील.

>>महाग्रूंनी तर मीना कुमारीकडून वगैरे उर्दू भाषा शिकली आहे

अरे देवा! बिच्चारी मीनाकुमारी! महाग्रू कसले उर्दू शिकतात, मीनाकुमारीच मराठी शिकली असेल. पण असो. ते उर्दू शिकूनसुध्दा किती वर्ष झाली असतील. मग वापर करायची संधी मिळाली नसेल म्हणून विसरले असतील हो. त्यांच्या बायकोने त्या तिच्या टीव्हीवरच्या जाहिरातीतलं मॅगी द्यावं त्यांना खायला. ते म्हणे सॉल्लीड पौष्टिक आहे. कुणी सांगावं, महाग्रूंची गेलेली "उर्दू याददाश्त" परतही येईल.

>वास्तविक अंगीठी चा अर्थ "चूल" असा होतो. (किंवा शेकोटी असे. जाणाकरांनी सांगावे)

मी जाणकार नाही,पण ह्याचा अर्थ शेकोटी असा आहे असं वाटतं.

हिंदी आणि मराठीवर त्याचे भाषाप्रभुत्व असल्याचा इतका टेंभा मिरवतात.>>>>>>>>>>ह्या रविवारी एका वाहिनी´वरील मुलाखतीत सचिनने सांगितले कि लग्न होईपर्यंत त्याचे मराठी नीट नव्हते,का तर तो हिंदी चित्रपटस्रुष्टीत होता म्हणून Uhoh नंतर सुप्रियाने त्याला मराठी शिकवले.

अंगीठी म्हणजे कपड्यांच्या आत ठेवायची शेकोटी.. काश्मीरमध्ये वापरली जाते...

त्याला काहीतरी कांगडी की काही म्हणतात. अंगिठी हा शब्द मी पहिल्यांदा ७ वीत की ८वीत असताना हिंदी च्या पुस्तकात वाचला. मला कळेना अंगठीत जेवण कसे शिजवतात ते. सरांनी अंगिठी म्हणजे कोळश्याची शेगडी असे सांगितले तेव्हा कळले

....

>>> ह्या रविवारी एका वाहिनी´वरील मुलाखतीत सचिनने सांगितले कि लग्न होईपर्यंत त्याचे मराठी नीट नव्हते,का तर तो हिंदी चित्रपटस्रुष्टीत होता म्हणून <<

माझ्या मते त्याचे आई वडील मराठी आहेत आणि त्याचे वडिल तर मराठी चित्रपट निर्माते होते.

Pages