पक्षी व किडे नेहेमीचेच व दुर्मिळ

Submitted by कांदापोहे on 23 December, 2010 - 23:38

अनेक दिवस फोटो अपलोड करायचे होते पण राहुन जात होते. साईजचा प्रॉब्लेम योगेशने सोडवला. बॉर्डरचा अजुन सुटला नाहीये पण तोवर अपलोड करुनच टाकावेत असे वाटले. यातले बरेच फोटो आधी काढुन मग झुम केले आहेत.

प्रचि१ बुलबुल

प्रचि२ नाकतोडा (प्रेइंग मॅंटिस)

प्रचि३ नाव माहीत नाही

प्रचि४ सनबर्ड

प्रचि५ गरुड फॅमीली (आंजर्ले समुद्रावर २ ता प्रतिक्षा केली तेव्हा हे कुटुंब एका मोठ्या झाडावर दिसले. मुळ फोटोत मात्र फारच लांब दिसत असल्याने जास्तीत जास्त झुम केला आहे. जमल्यास खरा फोटो पण टाकेन अंदाज येण्या करता.)

प्रचि६ वेडा राघु

प्रचि७ वटवाघुळ

गुलमोहर: 

मस्त..

मस्त फोटोज....

प्रचि १: लालबुड्या बुलबुल (रेडवेंटेद बुलबुल)
प्रचि ३: बहुधा ती "स्मॉल मिनिवेट" याची मादी (फिमेल) आहे..... त्याला मराठीत "छोटा निखार" म्हणतात....
खात्री नाही, आठवतय त्यावरून सांगतोय.... महाजाल एक्सपर्ट्स लिंक्स शोढून टाकतीलच.

मस्त

कांद्या, झक्कास लेका. मस्तच आलेत फोटो.
मला बुलबुल आणि सन बर्ड शॉलेट आवडला. Happy

रच्याकने तो नाकतोडा एखादी क्रुझर (थंडरबर्ड वगैरे) चालवतोय असं वाटतय. Proud

सर्वांना धन्यवाद. Happy

किरु मलाही तो बुलबुलवाला (खास करुन त्याची शेपटी सही आली आहे असे माझे मत)आवडतो, नाकतोडासाहेब अनेकविध पोझ देत होते. सनबर्ड मात्र खुप कष्टाने मिळालाय.

अबे नाकतोडा पोझ देत नसेल, तुला घाबरवायचा प्रयत्न करत असेल Proud
चान्गले आलेत फोटो Happy
पण अस गरुडपक्षीजोडप्यांच्या "खाजगी आयुष्यात" नाक खुपसण चान्गल का? Biggrin

Pages