सांधेदुखी

नमस्कार, माज्या बहिणीला गेल्या २ वर्शापासून सान्ध्यान्च्या सोरायसिस चा त्रास आहे. आयुर्वेदिक उपचार चालु आहेत पण म्हणावा तसा फरक नाहिये. कोणी काही पथ्य, माहीती ओषध सान्गितलीत तर बर होइल.


अमित, ह्या दुखण्यांना बरे व्हायला वेळ लागतोच. पण अजिबात बरे वाटत नसेल तर वैद्य बदलून पाहा.
पुण्यात असाल तर वैद्य दिलीप गाडगिळ, नरेन्द्र पेंडसे, त्रिलोक धोपेश्वरकर इ. अतिशय चांगले वैद्य आहेत.

हे उपचार पण करून पाहा.

पायात गोळा आला तर

सहन होईल इतक्या गरम तेलाने पायाला मसाज करणे.
त्याच्या जोडीला एखादा गुग्गूळ e.g. त्रिफळा, योगराज इ. घेतल्यास आणखी फायदा होईल.
तेलाने (तिळाचे उत्तम) मसाज केल्यावर थोडावेळ कापडाने शेकले तर जास्त फायदा होईल.



आश्विनी, खूपच चान्गली माहिती दिलीत. धन्यवाद.. मी आणि माजी बहीण दोघी मुम्बईला राहतो त्यामुळे वैद्य बदलणे शक्य नाहिये. अजिबात बरे वाटत नाहि असे नाहि पण सुधारणा स्लो आहे. असो, तुम्ही दिलेली लिन्क कळली नाही.

त्या लिन्कवर अस आहे:
//पायात गोळा आला तर
सहन होईल इतक्या गरम तेलाने पायाला मसाज करणे.
त्याच्या जोडीला एखादा गुग्गूळ e.g. त्रिफळा, योगराज इ. घेतल्यास आणखी फायदा होईल.
तेलाने (तिळाचे उत्तम) मसाज केल्यावर थोडावेळ कापडाने शेकले तर जास्त फायदा होईल. //

हा उपाय सोरायसिस ला पण चालू शकतो का ते कळल नाही . प्लीज खुलासा करावा.
-अमिता



अमिता, लिंकमध्ये जे उपचार आहेत ते सोरायसिस मधल्या सांध्याची सूज कमी होण्याच्या दृष्टीने उपयोगी आहेत.

त्याच्या जोडीला रक्तमोक्षणाचाही फायदा होईल. म्हणजे जळवा लावून रक्त काढणे.

शिळे, थंड अन्न, विरूद्ध आहार, खारट, तिखट, टोमेटो, दही याचा वापर टाळावा.

औषधात त्वकदुष्टीवर आणि रक्तदुष्टीवर काम करणारी औषधे घ्यावीत. तुमच्या वैद्याला ती माहित असतीलच. मुंबईत चांगले वैद्य सुचवू शकेन गरज पडल्यास.



अमिता ...
माझा मामा मुंबईत अंधेरी - प. इथे प्रसिद्ध आयुर्वेदिक डॉक्टर आहे. -- डॉ. सुभाष बेंद्रे.
तुम्हाला पत्ता हवा असल्यास जरूर सांगा.



अश्विनी खूप धन्यवाद. तुमचे उपाय लक्षात ठेवीन. सध्या तिला वैद्य बाइन्नि वमन करायला सान्गितले आहे त्यान्च्याच देखरेखीखाली. फरक पडेल का हो त्याने? लोक म्हणतात सोरायसिस कधीच पूर्ण बरा होत नाही. आयुष्यभर याचि औषधे घ्यावीच लागतात. ;( खरय काहो हे?
तसेच अश्विनी व सन्दीप खूप धन्यवाद. सध्या तरी वैद्य बदलणार नाही. तरी वाटल्यास अवश्य सान्गीन.



हो, वमनाचा नक्कीच उपयोग होईल. अवश्य करावे.



अश्विनी , वमन झले २ आठवड्यांपूर्वी. बराच फरक पडलाय. पूर्ण नाही पण ६०%. तरी अजून पावलाला सोरायसिस आहे जास्त प्रमाणात तिथे खाज सुटते.. काही उपाय ऐकायला आवडेल.
संदीप, तुमच्या मामांच पुस्तक प्रकाशित झालय का? नाव सांगा ना.



अश्विनी
मला १० वर्षापासून Acne चा त्रास होतो आहे. Antibiotics ने तात्पुरता फरक पडतो. काही उपाय सूचवशील का?



वमन कशावरही गुणकारी योगप्रकार आहे. पित्त असेल तर लगेच बाहेर येतं. मी नियमित करतो वमन.



हा प्रश्ण कुठे टाकावा कळेना,
माझ्या आईला गेले ६-८ महिने सायटिकाचा खूप त्रास होतोय्,उजव्या पायाला.कुणाला खात्रिचा उपाय माहितेय का?किंवा पुण्यात कुणि वैद्य ?
उजवा पाय खुब्यापासून पावलापर्यन्त खूप दुखतोय सद्ध्या.
प्लिज्,कुणाला काहि उपाय महितिइ असेल तर जरूर सुचवा.
धन्यवाद