गर्भारपणातल्या तक्रारी

गर्भारपणातल्या तक्रारी, मळमळ, कोरड्या ओकार्‍या, डोहाळे, घरगुती उपाय, आयुर्वेदिक औषधे इत्यादी

Orginally written by Mrudulahg
Wednesday, December 17, 2003 - 6:10 pm:

Ashwini,

Me pregnant ahe. mala jast ulati cha tras hot nahi pan malmallya sarakhe vatat asate divasbhar. asha veli biscuits, bread vagaire khalle ki tatpurate bare vatate.
Me varache pitta vishayi posting vachale. pan ahaarat ajun kuthali kalaji ghyavi?
mhanaje asha veli kuthalya goshti talavyat ani kuthalya goshti khavyat?

Mala khup damalya sarakhe pan vatate. sagale aang kadhi-kadhi dukhun yete. Asha veli Tribhuvan-kirti ghetali tar chalel ka?

Thanx

मृदुला,
वरचे पित्तासाठीचे उपाय तुला मळमळ थांबायलाही उपयोगी आहेत.
आहार विहारात बदल केल्याने खूपच फायदा होतो.

pregnancy मध्ये शक्यतो उपाशी राहू नये. खूप तिखट, पचायला जड, मळाचा अवरोध करणारे, रूक्ष, शिळे अन्न खाउ नये. रात्रीची जागरणे ,exertion टाळावीत.

तिखट, आंबट, खारट पदार्थांनी पित्त वाढते. मुळे, लसूण, दही, लोणची, पीठ आंबवून केलेले पदार्थ, ( इडली, डोसा, पिझ्झा etc.) ने पित्त वाढते.

मन आनंदी व प्रसन्ना ठेवावे. भय, क्रोध, चिंता अशा भावनांना थारा देउ नये.

त्रिभुवनकीर्ति घेउ का म्हणून विचारलेस ते बरे केलेस. कारण उत्तर आहे की अजिबात घेउ नकोस. कफाचा ताप येउन जेंव्हा अंग दुखत असेल तेंव्हा त्रिकी घ्यावी. pregnancy मध्ये तर खूपच गरज पडल्याशिवाय घेउc नये, कारण ती भयंकर उष्ण पडते.

तुला थकवा आणि अंगदुखीसाठी pregnancy मध्ये चालतील अशी औषधे म्हणजे, अश्वगंधा - हे कदाचित Indian Store मध्ये मिळू शकेल. नाहीतर कुठल्याही Herbal stores मध्ये नक्कीच मिळेल. अश्वगंधा अंग दुखणे कमी करून शक्ती वाढवते, गर्भवृद्धी करते. पुढे दूध चांगले येण्यासाठी पण तिचा आंगला उपयोग होतो.

दुसरे औषध म्हणजे, चंद्रप्रभा. त्याचेही गुणधर्म वरीलप्रमाणेच आहेत. पण ती तुला इथे मिळणे कठिण आहे.

घरगुती उपाय म्हणजे, मेथ्या. मेथिच्या भाजीचा सुद्धा उपयोग होतो. तसेच मेथ्या ( बीया ) भाजून त्याचे पीठ करून साखर, बेदाणे घालून लाडू करावेत. त्याचाही अंगदुखीसाठी आणि शक्तीसाठी चांगला उपयोग होतो.

Ashwinitai ..please tell me if i can take ashwagandha tablets and chandraprabha tablets as well. I am 20 weeks pregnant now and feel lot tired all the time. I have both tablets at home as newly bought

रूपान्तर, तुला काही त्रास होतो आहे का? अश्वगंधा घ्यायला काही हरकत नाही. रोज एकच गोळी घे काही विशेष त्रास नसला तर. चंद्रप्रभा घ्यायची आवश्यकता नाहीये. तिचा जास्त उपयोग गर्भधारणेसाठी होतो. प्रेग्नन्सीमध्ये जर काही त्रास होत असेल, अंग, कंबर दुखणे इ. तर घेता येते. सगळं नीट असेल तर आवश्यकता नाही.

सातव्या महिन्यात जर कळल कि रक्तातिल हिमोग्लोबिन च प्रमाण कमि आहे तर त्याचि काय कारण असु शकतात?

माझ्या बायकोचा पिरियड मिस झाला , १५ दिवसांनी तिला आल्यासारखा वाट्ला पण फक्त काळ स्पॉट्टींग झाल , आम्ही गेल १ वर्ष ट्रीट्मेंट घेतोय डॉक्टरांनी सांगितलय की मिसड ऍबॉरशन झालय म्हणुन अरेरे अस का झाल असेल ? तिला गोळ्या सहन होत नाहीयेत रिएकशन होते लगेच . काही आयुर्वेदीक उपचार आहे का ??

deepurza,
गर्भधारणेसाठी पुष्कळ आयुर्वेदीक उपचार आहेत. पुण्यात असाल तर एखाद्या वैद्याकडून treatment घ्या. भोळे वैद्य म्हणून या विषयातले तज्ञ आहेत. हमखास गुण येतो असा त्यांचा लौकिक आहे.
नाहीतर नेहमीचे अश्वगंधारिष्ट, चंद्रप्रभा वटी, शतावरी कल्प चालतील.

Hi,

I am 10 weeks pregnant with twins. I am suffering from the vomiting and weakness/sleepyness.

Can you suggest me what extra care i need to take

-- Ruparani