लाजाळूची फुले....

Submitted by श्रीकांत on 25 November, 2010 - 14:41

"मग याला इंग्रजीत काय म्हणतात?"

"टच मी नॉट"

"अन हिंदीत?"

" हिंदीत तर फार सुंदर नाव आहे, छुईमुई!!"

माझ्या मुला बरोबर चालणारा माझा नेहमीचा शब्दांचा खेळ नेहमी सारखा रंगात आला. काही पण बोलता बोलता आमचा हा खेळ सुरु होतो.
पण आज कारण खास होते. सकाळी मी वडिलां बरोबर पायी फिरायला निघालो तेव्हा पाहिलेली लाजाळू ची छोटी झाडे पाहिली होती. ती मग मुद्दाम मुलाला ही दाखवली. त्याने झाडाला हात लावताच होणारी गंमत बघून चकित वगैरे झाल्या नंतर लगेच आमचा नेहमीचा खेळ सुरु केला होता. एखादा शब्द वेगवेगळ्या भाषांमधे त्याला काय म्हणतात? ते शोधायचे, बहुतेक वेळा महाराष्ट्र राज्याच्या त्रिभाषा सूत्रा पलिकडे आमची मजल जात नाही. मग आम्ही त्यावरच समाधान मानतो.

पण यावेळी आणखी खास बाब म्हणजे या वेळी मला लाजाळूची फुले सुद्धा पहायला मिळाली.

लाजाळूची फुले...1लाजाळूची फुले..2

दुसर्‍या छायाचित्रात फुले गळल्यानंतर दिसणारी फळे (ज्यात बिया असतात की नाही ठाऊक नाही.) ही दिसत आहेत. त्या एका फुला मधे अनेक छोटी छोटी फुले होती. फुलांच्या या प्रकाराला काय म्हणतात ते बारावीला बॉटनीत शिकलो होतो आता विसरलो.

( कुणाला चुपके चुपके मधले बॉटनीचे प्रो. सुकुमार आठवतात का? Happy )

"बाबा बाबा व्हिडीओ पण काढुया"

मग मोबाइलमधेच व्हिडिओ पण काढून झाला.

http://www.youtube.com/watch?v=0VKYnc09YPA

एखाद्या फार लाजणार्‍या मुलीबद्दल "ती ना अगदी लाजाळूचे झाड आहे" असे म्हणत असत. आजकाल मुलींना लाजता येत नाही म्हणे... ..... Happy

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

अरेच्चा ! ही फुले किती वेळा पाहिली आहेत, पण लाजाळुची आहेत माहितच नव्हतं. पुढ्च्या वेळेस दिसली की पानांना लाजवुन खात्री करुन घेणार. Happy

या नविन माहिती बद्द्ल धन्यवाद. छान आहेत फोटोज पण.

मस्तच!! Happy

>>> आजकाल मुलींना लाजता येत नाही म्हणे... .....<<< हे नाही पटले ब्वॉ ... तुमच्या पहाण्यात नसतिल कदाचित लाजर्‍या मुली....

खुप सुंदर.
आमचाही लहानपणी हा लाजाळूचा खेळ चालायचा. लाजाळूसारखी कवळ्याची पानेही हात लावल्यावर मिटतात.