Submitted by बेफ़िकीर on 4 October, 2010 - 00:08
गर्वमुक्त होण्यासाठी जन्म घेतला मी
देहमुक्त होतानाही गर्व पोसला मी
ज्यात श्वास दरवळताना सैल होत जाती
त्या मिठीत सुस्कार्यांचा ताण सोसला मी
कोणत्याच मुक्कामाला पोचलोच नाही
पण नव्या नव्या रस्त्यांचा शोध लावला मी
लाख रंग आयुष्याने लावले मनाला
मूळ व्यक्तिमत्वाचा पण डाग ठेवला मी
तू असूनही नसल्याचे केवढे पुरावे
एवढ्याच खटल्यामध्ये जन्म नासला मी
एक काम नाही केले नीटसे कधीही
घोळ घालतानासुद्धा घोळ घातला मी
'आजही तुझी आहे मी' हा निरोप आला
गंधवान वार्यालाही दूत मानला मी
आपल्याच लोकांसाठी बांधली घरेही
आपल्याच भिंतीलाही कान लावला मी
आपलेच हेही सारे... बोलुदेत त्यांना
'बेफिकीर' टीकेसाठी जीव टाकला मी
गुलमोहर:
शेअर करा
आशय छान आहे.... पण लयीत वाचता
आशय छान आहे.... पण लयीत वाचता नाही आली भूषणजी...
उषःकाल होता होता ....
उषःकाल होता होता .... काळरात्र झाली... - अशा लयीत वाचा!
आणखीन एक माझी अशी गझल होती पुर्वी!
काल जाम भिनता भिनता का उदास झाला
खूप त्रास झाला मित्रा खूप त्रास झाला
प्रतिसादाबद्दल मनापासून आभार!
-'बेफिकीर'!
हो... आता वाचली... धन्यवाद
हो... आता वाचली... धन्यवाद .
आवडली हे सांगणे न लगे.
भुषणजी, सगळी गझलच भिड्लीये
भुषणजी,
सगळी गझलच भिड्लीये पण,
लाख रंग आयुष्याने लावले मनाला
मूळ व्यक्तिमत्वाचा पण डाग ठेवला मी
हा शेर अफाट आवडला............
लाख रंग आयुष्याने लावले
लाख रंग आयुष्याने लावले मनाला
मूळ व्यक्तिमत्वाचा पण डाग ठेवला मी
क्या बात है बेफिकिरजी... वाह...
कोणत्याच मुक्कामाला पोचलोच
कोणत्याच मुक्कामाला पोचलोच नाही
पण नव्या नव्या रस्त्यांचा शोध लावला मी
एक काम नाही केले नीटसे कधीही
घोळ घालतानासुद्धा घोळ घातला मी
व्वा!!
बेफिकिर जी....खुप आवडली
बेफिकिर जी....खुप आवडली !!
"कोणत्याच मुक्कामाला पोचलोच नाही
पण नव्या नव्या रस्त्यांचा शोध लावला मी"
"लाख रंग आयुष्याने लावले मनाला
मूळ व्यक्तिमत्वाचा पण डाग ठेवला मी"
व्वा! .......
छान आहे गझल <<'आजही तुझी
छान आहे गझल
<<'आजही तुझी आहे मी' हा निरोप आला
गंधवान वार्यालाही दूत मानला मी>> हे जास्तच आवडल.
विजय, विद्यानंद, नचिकेत,
विजय, विद्यानंद, नचिकेत, विद्या बालन व जुयी,
आपल्या सर्वांचे मनःपुर्वक आभार!
-'बेफिकीर' !
सुंदर गझल... अलिकडच्या
सुंदर गझल...
अलिकडच्या काळातली आपली सर्वाधिक आवडलेली गझल...
पुलेशु!
लाख रंग आयुष्याने लावले
लाख रंग आयुष्याने लावले मनाला
मूळ व्यक्तिमत्वाचा पण डाग ठेवला मी
एक काम नाही केले नीटसे कधीही
घोळ घालतानासुद्धा घोळ घातला मी
आपल्याच लोकांसाठी बांधली घरेही
आपल्याच भिंतीलाही कान लावला मी
सुरेख !
गझल आवडली.
आनंदयात्री, ज्ञानेश, आभारी
आनंदयात्री, ज्ञानेश,
आभारी आहे.
आनंदयात्रींना अनुमोदन. गझल
आनंदयात्रींना अनुमोदन.
गझल आवडली
तू असूनही नसल्याचे केवढे
तू असूनही नसल्याचे केवढे पुरावे
एवढ्याच खटल्यामध्ये जन्म नासला मी
व्वा!
आपल्याच लोकांसाठी बांधली घरेही
आपल्याच भिंतीलाही कान लावला मी
व्वा!
हे दोन शेर फार छान आहेत.
*** मला वाटते की, उषःकाल होता होता ची चाल लावायची गरज नाही. तो लगक्रम थोडा वेगळा आहे.
होय, तो लगक्रम वेगळा आहे.
होय, तो लगक्रम वेगळा आहे. भटसाहेबांच्या या (म्हणजे या वरील गझलेच्या) वृत्तातल्या काही गझला आहेत. पण म्हणताना थोडेसे 'उषःकाल होता होता' सारखे म्हंटले जाते असे वाटते.
या वृत्तातील भटसाहेबांच्या मूळ गझला या क्षणी आठवत नाहीत, पण त्यातील एक फारच भारी आहे.
आपल्या प्रतिसादाबद्दल मनापासून आभार!
-'बेफिकीर'!
सगळेच शेर आवडले.. छानच...
सगळेच शेर आवडले..
छानच...
नंदन व सुजाता, मनःपुर्वक आभार
नंदन व सुजाता,
मनःपुर्वक आभार आपल्या दोघांचे!
-'बेफिकीर'!
छान.
छान.
व्वा!! सुंदर गझल!
व्वा!! सुंदर गझल!
अजून एक मस्त गझल
अजून एक मस्त गझल भूषण
कोणत्याच मुक्कामाला पोचलोच नाही
पण नव्या नव्या रस्त्यांचा शोध लावला मी
लाख रंग आयुष्याने लावले मनाला
मूळ व्यक्तिमत्वाचा पण डाग ठेवला मी >>> फारच छान...
तू असूनही नसल्याचे केवढे पुरावे >>> हा मिसरा पण खूप आवडला...
आवडली
आवडली
छान आहे. कोणत्याच मुक्कामाला
छान आहे.
कोणत्याच मुक्कामाला पोचलोच नाही
पण नव्या नव्या रस्त्यांचा शोध लावला मी
लाख रंग आयुष्याने लावले मनाला
मूळ व्यक्तिमत्वाचा पण डाग ठेवला मी
ॠयाम, झाड, मिलिंद, वीरा,
ॠयाम, झाड, मिलिंद, वीरा, श्री. केदार,
आपल्या सर्वांच्या प्रेमळ प्रतिसादांचे मनःपुर्वक आभार!
-'बेफिकीर'!
लाख रंग आयुष्याने लावले
लाख रंग आयुष्याने लावले मनाला
मूळ व्यक्तिमत्वाचा पण डाग ठेवला मी
आपल्याच लोकांसाठी बांधली घरेही
आपल्याच भिंतीलाही कान लावला मी
हे खासच आहेत भुषणजी.........
"मूळ व्यक्तिमत्वाचा डाग"........ क्या बात है सर.....!!!
एक काम नाही केले नीटसे
एक काम नाही केले नीटसे कधीही

घोळ घालतानासुद्धा घोळ घातला मी
बेफिकीरजी,
वाह ! क्या बात है !
श्री. भुंगा - आपल्याला ते शेर
श्री. भुंगा - आपल्याला ते शेर आवडले याचा खूप आनंद झाला. मनःपुर्वक आभार!
श्री अनिल ७६ - तो एक बर्यापैकी शेर जमला आपला मध्येच! आपण नेमका तोच निवडलात याचा आनंद झाला. आपलेहि आभार!
-'बेफिकीर'!
सुस्कार्यांचा
सुस्कार्यांचा ताण्,व्यक्तीमत्वाचा डाग, घोळ हे आवडले शेर. चांगल्या गझला करता आपण. आपलं लेखन वा गझला पुस्तकरुपात प्रसिद्ध आहे का? असल्यास कृपया माहीती द्यावी.
खूप छान गझल!!! << कोणत्याच
खूप छान गझल!!!
<< कोणत्याच मुक्कामाला पोचलोच नाही
पण नव्या नव्या रस्त्यांचा शोध लावला मी >>
क्या बात है!!!
धन्स मंडळी
धन्स मंडळी
मतला, मक्ता, अन हा शेर तू
मतला, मक्ता,
अन हा शेर
तू असूनही नसल्याचे केवढे पुरावे
एवढ्याच खटल्यामध्ये जन्म नासला मी
कातिल.....!
(नतमस्तक)
- सुप्रिया.
Pages