वसंतोत्सव

आमच्या घराजवळच्या रस्त्यावर काढलेला हा फोटो. वसंताची चाहूल आणखी काय वेगळी असते?statue_of_liberty_april_2008_031.jpg


वसंतोत्सव फारच छान आहे.



वॉव.. काय लकी आहात तुम्ही अश्या सुंदर जागी राहता.. स्मित
इकडे जागोजागी गुलमोहर बहरलाय, पण फार उंचावर आहे फोटो काढण्यासाठी..
सुमॉ, मी हा फोटो सेव्ह करू प्लीज?



अप्रतिम छायाचित्र. रंग फारच मोहक आहे. धन्यवाद.



सुमॉ सुन्दर छायाचित्र . हे चेरी ब्लॉसम आहे का?



पूनम, अग विचारतेस काय? खुशाल सेव्ह कर. (मी काय प्रोफेशनल फोटोग्राफर थोडीच आहे?स्मित)
अन अग, सध्या बहुतेक सगळ्याच अमेरिकाभर अशी सुरेख झाडं फुललीत. काही लोकांच्या तर घराच्या अंगणात. असे लोक तर किती लकी सांग बरं. आम्ही तर नुसते रस्त्यावरूनच बघतो.
चेरी ब्लॉसम नसावं बहुधा. हा रंग जरा डार्क आहे फुलांचा. पण मला नक्की नाही माहीत.
एक अजून झाड आहे त्याला पानं नाहीतच. नुसती चांदण्यांसारखी फुलंच फुलं... पांढरीशुभ्र...
टाकते त्याचाही फोटो काढता आला तर.



या फुलांचा क्लोजप बघायला मिळेल का ? आणि त्या पांढर्‍या फुलांचा पण.



चाहूल कसली? दवंडी आहे वसंत आला, वसंत आला! सुंदर फोटो सुमॉ!!

पांढरं फुल बहुतेक star magnolia असावं. हा एक ( कोणीतरी काढलेला ) फोटो.
http://www.pbase.com/image/96109517 . याच साइटवर चेरी ब्लॉसमचे पण भरपूर फोटो आहेत.