मारेंगो केव्ह- इंडियाना

Submitted by श्री on 6 September, 2010 - 12:16

मारेंगो केव्ह इंडियाना राज्यात मारेंगो गावाजवळ आहे. १८८३ साली दोन लहान मुलांनी ही केव्ह शोधुन काढली होती. ह्या केव्ह टुरचे दोन भाग आहेत १- ड्रिपस्टोन ट्रेल - (१ माईल लांब ) आणि २- क्रिस्टल पॅलेस - (०.३ माईल लांबी).
ह्या केव्हची माहीत असलेली एकुण लांबी ५ माईल्स आहे .उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात सुध्हा ह्या केव्हच तापमान ५२ डि. फॅ. असतं.
१) ह्या रस्त्यावरुन ड्राईव्ह करताना अगदी कोकणात असल्यासारखं फील येत.
Road.JPGDSC01076.JPG
२) हा फोटो इंटरनेट वरुन ढापलाय.
dripstone.jpgdiscovery_falls.jpg

३) केव्ह
DSC01132.JPGThe Cave.JPG

३) फॉर्मेशन - १ स्क्वे. इंच फोर्मेशन तयार व्हायला १०० वर्ष लागतात असं गाईडने सांगितलं , तसं असेल तर ही फॉर्मेशन्स तयार व्हायला हजारो वर्ष लागली असतील.
Formations.JPGDSC01119.JPG
४) फॉर्मेशन - पिलर
Piller.JPGDSC01117.JPG
५) फॉर्मेशन - Stalactites
Stalactites1.JPG

६) फॉर्मेशन - Stalagmites
Stalagmites3.JPG

७) क्रिस्टल फॉर्मेशन - पाण्यासारखं चमकतयं पण त्यात क्रिस्टल आहेत
DSC01104.JPGDSC01099.JPG

गुलमोहर: 

ते क्रिष्टल पॅलेस कुठेय ? अशा गुहा अनेक देशांत आहेत, ओमानमधे पण आहेत. त्याचे देखणे फोटो गुगल अर्थ वर आहेत.

मस्त. मला अशा ठिकाणी क्लॉस्ट्रोफोबिक वाटते त्यामुळे फोटोवरच समाधान. किती तर्‍हे तर्‍हेची शिल्पे तयार होतात ना. ड्राइव मस्त असणार. जी एंच्या स्वामी कथेची आठ्वण येते कि नाही.

छान Happy

मस्त आहे रे श्री..

अलिबाबाची गुहा आठवली Proud .. केव्हमधे ती प्रकाशरचना नैसर्गिक आहे कि पर्यटकांसाठी खास बदल घडवून आणला आहे. अन ती नैसर्गिक असेल तर खरो खर अप्रतिम आहे रे.

जबरी! Happy

धन्यवाद सगळ्यांना,
@ दिनेश - त्या गुहेचाच एक भाग क्रिस्टल पॅलेस आहे, कॅमेराची बॅटरी लो असल्यामुळे फोटो व्यवस्थित काढता आले नाहीत.
@ मामी त्या रस्त्यावर ड्राईव ला जाम मजा येते.
@सुकि प्रकाशरचना नैसर्गिक नाहीये , त्या गुहेत जवळपास ७५० लाईटस आहेत, ते बंद केले की एकदम अंधार गुडुप.
@मनीष बरोबर ते मरँगोच आहे मी सोपा उच्चार म्हणुन मारेंगो करतो.

छान!!!

श्री, तुमच्यासारखं "ओळखा पाहू माझा प्रतिसाद" असं म्हणायचा मोह टाळतेय Proud

खरोखर, सुंदरच आहेत सगळी प्रचि अगदी! Happy

तुमच्यापासूनच माबोवरच्या माझ्या पहिल्या लिखाणाच्या पहिल्या प्रतिसादाचा "श्री गणेशा" झाला याची कृतज्ञता अजूनही मनात आहे. तुमच्या पहिल्या लेखाच्या निमित्ताने ती बोलून दाखवण्याची मला संधी मिळाली, पण माझा प्रतिसाद पहिला नाहीये याचे जरा वाईट वाटतेय...

असो, अशीच छान छान प्रकाशचित्रे येऊ द्या अजून. Happy