श्री क्षेत्र सत्यसाई पांडुरंग मंदिर , हाडशी (पौड पुणे )
जाण्याचा मार्ग -:-
पुणे-नळस्टॉप-पौड रोड - चांदनी चौक - पिरंगूट - पौड - उजवीकडे वळून चाले- कोळवण खोरे- हाडशी. साधारण ६० किमी.
पाहण्यासारखी ठिकाणे - प्रकाशचित्रांवर नजर टाकावी , सुंदर अन शांत निसर्ग अध्यात्माच्या सानिध्यात पाहायचा असेल तर इथे जरूर भेट द्यावी.
राहण्याची सोय -
1.गिरीवन रिसॉर्ट (http://www.girivanpicnic.net/) 4km अंतरावर. अगदी हिरव्यागार डोंगराच्या कुशीतलं हिलसाईड हॉटेल
२. स्वच्छंद रिसॉर्ट गिरीवन सारखच पण छोटसं हॉलिडे होम्स हॉटेल.
जेवणाची सोय - मंदिर प्रवेशद्वाराजवळ एक छोटसं उपहार गृह.
जवळची ठिकाणे -
१. चैतन्य विभूती आश्रम (कोळवण)
२. अवघ्या ३० किमी अंतरावर लोणावळा.
३. ताम्हाणि घाट.
प्रचि १ -
प्रचि २ -
प्रचि ३ -
प्रचि ४ -
प्रचि ५ -
प्रचि ६ -
प्रचि ७ -
प्रचि ८
प्रचि १२-
प्रचि १३ -
प्रचि १५ -
प्रचि १६ -
प्रचि १७ -
प्रचि १९
प्रचि २० - ह्या सर्पाला जिवदान देऊन माझा स्वातंत्र्यदिन साजरा केला.
प्रचि २१ - भात लावणी करणारे शेतकरी...
प्रचि २२ - चैतन्यविभूती आश्रमाजवळच्या शेतामधे विश्रांती घेणारी बैलं.
आधिक माहितीसाठी - सुर्यकिरण. (suryakiran.satav@hotmail.com)
वरील सर्व प्रकाशचित्रे माझ्या
वरील सर्व प्रकाशचित्रे माझ्या sony ericsson W550i मोबाईल मधून काढल्यामुळे चांगली आली नाहीयेत त्याबद्दल माफी असावी.
मस्तच!!!!! मी वाटच पहात होतो
मस्तच!!!!!
मी वाटच पहात होतो या प्रचिंची
मोबाईल मधून काढल्यामुळे चांगली आली नाहीयेत त्याबद्दल माफी असावी.>>>>अरे, किरणा माफी कसली??? उलट एका नविन जागेची ओळख करून दिल्याबद्दल तुझे आभारच. छानच आहे रे जागा. बघु केंव्हा योग येतो भेट देण्याचा
पॅनोरामा प्रचि विशेष आवडली!
पॅनोरामा प्रचि विशेष आवडली!
अतिशय सुंदर प्रचि १३,
अतिशय सुंदर प्रचि १३, १४,१८,१९,२१,२२ विशेष आवडली!
सही रे.. आता ईथे भेट दिली
सही रे.. आता ईथे भेट दिली पाहिजे... पॅनोरमा प्रचि अफलातुन...
सुर्यकिरण, मस्त ठिकाण आहे. मी
सुर्यकिरण,
मस्त ठिकाण आहे.
मी या मंदिराच्या उदघाटनाला गेलो होतो.
कुणितरी जाधव नावाच्या बिल्डरनी ईथे पांडुरंगाचे मंदिर बांधले.
त्याची कथा अशी आहे.
कि जाधव नावाचा इसम बांधकाम व्यापारी होता. त्याला व्यवसायात अतोनात नुकसान झाले.
मग तो आत्महत्या करायला निघुन जातो. तिथे कुणितरी त्याला भेटतो व सत्यसाईबाबाची भेट घेण्याचे सुचवितो. जाधव साहेब शेवटचा उपाय म्हणुन पुट्टपर्थीला साईदर्शनाला जातात. तिथुन परत आल्यावर अचानक व्यवसायात प्रगती होते. नंतर इतका पैसा येतो कि त्यातला लहानसा हिस्सा खर्चुन साईच्या नावाने एक मंदिर बांधण्याचे जाधव ठरवता. ते पुढे साईंकडे तसं बोलुन दाखवितात. पण सत्यसाईनी पांडुरंगाचं देऊळ बांधायच सुचविल्यावर जाधवानी हे मंदिर बांधलं.
मागच्या वर्षी नोंव्हेंबर महिन्यात सत्य-साई स्वतः या मंदिराची रिबिन कापायला पुण्यात आले होते.
पुट्टपर्थीला त्यानी उपलब्ध करुन दिलेल्या अत्याधुनिक वैद्यकिय सेवां (मोफत) बद्दल त्यांचे आभार मानावे तेवढे कमीच. आमच्या गडचिरोली जिल्हयातिल बरिच लोकं मोफत सेवा घेऊन आलेत.
त्या सेंवांबद्दल मनातुन एकच वाक्य येतं.
जय साईराम.
अरे वा! मस्त!
अरे वा! मस्त!
मधुकर होय अगदी तसच आहे. अन
मधुकर होय अगदी तसच आहे. अन सगळ्यात आवडलेली गोष्ट म्हणजे इथे सर्व गावकरीच स्वयंसेवक आहे. मंदिर अन मंदिर परीसराची खूप छान देखभाल करतात. लवकरच इथे जाणारे रस्त्यांची सुधारणा होईल. तो छोटासा हिरवागार घाट अन संपुर्ण डोंगरावरची आमराई सगळं काही पाहण्यासारखं आहे.
चंदन, योगेश इथे यायचा काहिही विचार असेल तर जरूर कळवा. रहायची अन जेवणाची उत्तम सोय माझ्याकडे राहीली.
मस्त आहे.. जायला हवं नक्की..
मस्त आहे.. जायला हवं नक्की..
मस्तच आहे रे किरणा पुण्यात
मस्तच आहे रे किरणा
पुण्यात आल्यावर जाता येइल. एक दिवसाची छोटीशी ट्रिप
अरे, याची लिंक त्या 'सहलीला कुठे जायचे' का असाच आहितरी बाफ आहे ना त्यावर दे
छान माहिती आणि प्रचि
छान माहिती आणि प्रचि
अरे व्वा! किती सुंदर परिसर
अरे व्वा! किती सुंदर परिसर आहे ...मंदिराचा!
धन्यवाद सुकी, अनोळखी जागेची ओळख करुन दिल्याबद्द्ल!
ते तळं नैसर्गिक नाहिये का?
त्यातली एक दोन तळी नैसर्गिक
त्यातली एक दोन तळी नैसर्गिक आहे, पण काही तळी अनैसर्गिक आहेत पण आजुबाजूच्या परिसरामुळे ते जाणवतच नाही.
मस्तच..... छान प्रचि
मस्तच.....
छान प्रचि आहेत......
आणी सुक्या, अनैसर्गिक म्हणजे क्रुत्रिम की रे......
(हेच ते,,, ईतक्या सुन्दर कविता करतोस आणी सोपे शब्द विसरतोस....... :))
पण जागा खरद्च अप्रतिम....
सुक्या मस्तंच आलेत फोटो..
सुक्या मस्तंच आलेत फोटो..

ठिकाण थोडं लांब वाटतंय, पण आहे मात्रं सुरेख.
कापुरहोळच्या बालाजी मंदिराची आठवण झाली प्रचि पाहून.
देउळ छान आहे.
देउळ छान आहे. मनुष्यवस्तीपासून दूर वाटते. कदाचित म्हणूनच इतके सुंदर असावे..
देऊळ जुने नाही , हाही एक प्लस पॉइंट ठरावा... ( त्यामुळे इथला विठोबा हा विठोबाच आहे, बुद्ध नाही, असे खात्रीपूर्वक सांगता येते.
)
असे खात्रीपूर्वक सांगता येते.
असे खात्रीपूर्वक सांगता येते. >> हो, तो बुद्ध नाही, आणि नाहीच. कारण त्याच्या मुर्तीस्थापणेचा सोहळा माझ्या डोळयापूढे झाला.
मधुकर, मुर्ती स्थापनेचा सोहळा
मधुकर, मुर्ती स्थापनेचा सोहळा खरच पाहण्यासारखा होता. मी मात्र मिसला त्या दिवशी तिथली काही चित्रे पाहिली.. रात्रीचा सोहळा तर दिमाखदार होता. कसली विद्युत रोषणाई केली होती.
खूप छान!!!
खूप छान!!!
मस्त फोटो रे सुक्या
मस्त फोटो रे सुक्या

पुण्याहून फारसं लांब नाहीय, आता एकदा जायलाच हव ईथे
छान सुंदर ! खुपच आवडले
छान सुंदर ! खुपच आवडले
खुपच छान धन्यवाद!!!!!!!!
खुपच छान
धन्यवाद!!!!!!!!
नविन माहिति व फोटो
नविन माहिति व फोटो दिल्याबद्द्ल आभार.
तोशा, सुनिलजी जरूर भेट द्या
तोशा, सुनिलजी जरूर भेट द्या या स्थळाला.
मस्तच सुर्यकिरण..
मस्तच सुर्यकिरण..
छानच कि रे
छानच कि रे सुकी...............
सुक्या एकदम झक्कास प्रचि...अन
सुक्या एकदम झक्कास प्रचि...अन खुप् विलोभनिय आहेरे...
जाऊया आपण एक दिवस...