आषाढ अमावस्या - "दीपपूजन" कि "गटारी" ?

Submitted by जिप्सी on 13 August, 2010 - 00:10

नुकतीच "आषाढ अमावस्या" झाली. आषाढ अमावस्या म्हटले कि सहसा कुणाच्या लक्षात येणार नाही, पण गटारी आमावस्या सगळ्यांनाच माहित आहे. Happy
श्रावण सुरू होण्याआधीचा एक दिवस म्हणजेच "गटारी". श्रावणात महिनाभर मांसाहार करत नसल्याने या दिवशी मद्यसेवन आणि मांसाहारावर उभा आडवा हात मारला जातो. जे लोक श्रावण पाळत नाही ते सुद्धा गटारी दणक्यात साजरा करतात, अर्थात "पीने वालो को पीने का बहाना चाहिए" ;-), मग तो वर्षभरातील कुठलाही दिवस असो.
श्रावणात सगळीकडे हिरवेगार वातावरण असते. या दिवसात वर्षभर न दिसणार्‍या रानभाज्या बाजारात येतात, माश्यांच्या पैदाशीचा हा काळ, याच महिन्यात आपले बरेचसे सणही येतात आणि पावसाचे दिवस असल्याने मांसाहार पचायला देखील जड असते. म्हणुनच या महिन्यात मांसाहार वर्ज्य मानला जातो.

==================================================
==================================================
आषाढ अमावस्या हि "तमसो मा ज्योतिर्गमय" असा संदेश घेऊन येणारी मंगलमय मानली जाते. हा दिवस दिव्यांची अमावस्या साजरा केला जातो. घरात असलेले सगळे दिवे लख्ख धुऊन पुसुन त्यांची पुजा केली जाते. या दिव्यांच्या रूपात आपल्या जीवनातील अंध:कार नाहिसा व्हावा हि या मागची भावना.

==================================================
==================================================
"दिव्यांची अवस", जरी खरं असल तरी आज किती जणांना हे माहित आहे? किंवा किती जण हि अमावस्या या पध्दतीने साजरी करतात? या इतक्या सुंदर दिनाला "गटारी" हे नाव कुणी दिले कुणास ठाऊक.
सध्या गटारी म्हणजे दाऊ, मटण, चिकन, मासे यांच्यावर आडवा हात मारणे. यामुळेच हि अमावस्या बदनाम झाली आहे. आषाढातला शेवटचा रविवार तर यांच्या हक्काचाच. मद्यसेवन करून गटारात लोळणे हिच खरी गटारी यांच्यासाठी. आज कितीतरी पर्यटनस्थळे यामुळे बदनाम झाली आहे.
नुकताच आषाढातल्या शेवटच्या रविवारी "माळशेज" घाटातुन येण्याचा योग आला. मनात विचार होता मस्त पावसात माळशेज पूर्ण बहरलेला असेल, पण जसजसे खुबी फाट्याच्या पुढे यायला लागलो तसंतसे "गटारी" साजरा करणार्‍यांचा हैदोस जागोजागी दिसु लागला आणि तेंव्हाच लक्षात आले कि माळ्शेजची काय अवस्था असणार आजच्या दिवशी :(. आणि खरोखर तसंच झाले. लांबच लांब गाड्यांची रांग, मद्यधुंद अवस्थेतील "पर्यटक" (?), अंगावरच्या कपडयांचेही भान नसलेले "ज्येष्ठ नागरीक" (?), चिखलातच बसुन मटन/चिकन, दारू पिणारे आणि रस्त्याच्या कडेलाच धबधब्यात बेफाम होऊन नाचणार्‍या स्त्री/पुरूष (हो! स्त्रियासुद्धा!!!) यांचा हैदोस बघुन खरंच किळस वाटली. आतापर्यंत फक्त ऐकुन होतो याबद्दल पण प्रत्यक्षात बघितल्यावर जास्तच दु:ख झाले.
माझ्या लाडक्या माळशेज घाटाची अशी अवस्था बघुन खुप वाईट वाटले. नेहमी हिरव्यागार निसर्गाने बहरलेला, पांढर्‍याशुभ्र धबधब्यांना अंगावर खेळवणारा, बघताक्षणी मन प्रसन्न करणारा हा घाट, या गटारी साजर्‍या करणार्‍यांमुळे अक्षरशः काळवंडला होता.
नेहमीच आनंद देणारे धबधबे याक्षणी मला माळशेज घाटाचे अश्रु भासत होते. कदाचित सार्‍यांचे प्रताप बघुन धबधब्याच्या रूपात माळशेज घाट आपल्या अश्रुंची वाट मोकळी करत असावा. Sad

==================================================
==================================================
आता तुम्हीच ठरवा आषाढ अमावस्या कशी साजरी करायची.
"दिव्यांची पूजा" बांधुन कि "गटारात लोळण" घेऊन.

==================================================
==================================================

गुलमोहर: 

माळशेज घाट या हैदोसासाठीच बदनाम झालाय Sad
जास्तीत जास्त दारु ढोसुन कोण धबधब्यात जास्त भिजतो ही सध्याची क्रेझ आहे, हा हैदोस असाच चालु राहणार आहे. पोलीस केवळ बघ्याची भुमिका घेत उभे असतात त्यामुळे हैदोस घालणार्‍यांना कशाचाही धाक उरलेला नाहीय Sad

योग्या, मस्तच रे.. ह्यावर एक सुंदर लेख आला आहे सकाळमधे ३ दिवसांपुर्वी... Uhoh
हि लोकं निसर्गाचं निमित्त साधून मजा हजा करत राहतात. खरच किळसवाणी गोष्ट आहे. Uhoh
तोषा, ताम्हाणि, लोणावळा, खंडाळा इथली स्थिती सुद्धा काहीशी सारखीच आहे. येत्या रविवारी तर ह्याच गोष्टी आपल्याला बघायला मिळणार आहे. दारू पिऊन धिंगाणा करून स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहेत आपल्या देशातली युवा तरूण पिढी... Uhoh

पोलीस केवळ बघ्याची भुमिका घेत उभे असतात त्यामुळे हिदोस घालणार्‍यांना कशाचाही धाक उरलेला नाहीय>>>>तोष्दा, हे मात्र १००% टक्के खरंय. रविवारी सुद्धा हेच दृष्य दिसत होते संपूर्ण घाटात. Sad

ह्यावर एक सुंदर लेख आला आहे सकाळमधे ३ दिवसांपुर्वी... >>>>मला सुद्धा वाटत होते कि गाडीतुन सरळ खाली उतरून एकएकाचे फोटो घ्यावे आणि वर्तमानपत्रात पाठवून द्यावेत. जनाची नाहितर निदान मनाची तरी लाज वाटली असती Angry

योगेश, दारू, पैसा या दोन गोष्टींचा मोह सगळं विकायला भाग पाडतो. असोत.. व्यसन असाव कि नसावं हा वैयक्तिक प्रश्न आहे. पण तुमच्या व्यसनापायी इतरांना त्रास होणार नाही हे आपण लक्षात ठेवलं पाहीजे. असं मला वाटतं.

दीपपूजन छान.
माळशेज नाही, सगळेच धबधबे असेच असतात या दिवसात. एरवी वर्दळ नसणारे चोर्ला सारखे घाट पण यातून सुटलेले नाहीत. (इथली प्रचि फारच सौम्य म्हणायची !)

योगेश विषय चांगला निवडला आहेस. मांडणी आणखिन चांगली पाहिजे होती. प्रचि जास्त, दर्जेदार (कारण तुझ्याकडून फार अपेक्षा आहेत) आणि विषयानुरुप पाहिजे होती.
हे माझे वैयक्तिक मत आहे. Light 1

चंदन , अगदी बरोबर आहे तुझं.. बहुदा योग्याने पहिल्यांदाच अश्या सामाजिक विषयाला हात घातलेला आहे. तेव्हा तो नक्कीच दर्जेदार मांडणी करेल. योग्या, पुन्हा एकदा विचार कर अन योग्य मांडणी करून इथे प्रचि टाक.

योगेश , जागू दिव्यांचे फोटो अतिशय सुंदर... Happy
गटारी अमावस्या नावाने ओळखणार्‍या अमावस्येबद्द्ल न बोललेलच बरे Sad

योगेश्...बरं झालं फोटो टाकलेस ते! खुप सुंदररित्या मांडलास फरक! चक्क एखाद्या धार्मिक उत्सवाचं स्वरुप आलय सध्या 'गटारीला'!!
गटारीच्या दिवशी , कुठल्याशा मराठी न्युज चॅनेलवर मराठी कलाकरांनी साजरी केलेली गटारी दाखवत होते....सजवलेले हॉटेल, ओळीने मांडलेल्या नॉनव्हेज डिशेश आणि बाटल्या!
एकेक कलाकार हजर होत होते आणि त्यांच्या मुलाखती चालु होत्या....(रेशम टीपणीस खिदळत होती)
दिपपुजन बद्द्ल कोणी बोलतच नव्हते!

कलियुग म्हणतात ना..... (हंस चुगेगा दाना...)!!! Sad

बादवे, जागु तुझा झब्बु आवडला... किती प्रसन्न वाटतय पुजेची मांडणी बघुन!! Happy

ह्या प्रचिंमधे बाटल्यांचे प्रचि सोडून अजून काय आक्षेपार्ह होते ते नही कळाले? एखादा ग्रुप येतो तर असेच दिसतात ना सगळे?

लेख मात्र छान आणि वस्तुस्थिती सांगणारा.

योगेश् खुप चांगला विषय मांडलास मायबोलीवर.. प्रथमच सामाजिक विषयाला हात घातला त्या बद्दल आभारी आहे... मांडणीबद्दल मी काहिच बोलत नाहि कारण विषय महत्वाचा आहे....
मना.....

योगेश,
पहिले दोनच फक्त आवडले.
आज काल गटारीला राष्ट्रीय सणाच महत्व आल आहे.
लोक सुट्टी काढून गटारी साजरी करायला लागले आहेत.
काही दिवसांनी सरकार सुट्टी जाहीर करेना म्हनजे मिळवली.

पुन्हा पाहिले फोटो... Sad
आधी दिव्यांचे फोटो, मग चिखलातली बाटली, मग नाचणारे पुरूष, भिजणार्‍या बाया... पुन्हा भरलेल्या बाटल्या... Sad

योगेश तुझ्या प्रचिच्या संग्रहात हे शो.ना. हो.
तुला म्हणलं तसंच... बासमती तांदुळात खडा आल्यासारखं वाटतंय...

योगेश,
विषय छान मांडलास. फक्त खालचे जे (बाटली, नाचणारे इ. चे) फोटो आहेत ते छोटे (बर्‍यापैकी) करून त्याचा कोलाज करून टाकला असतास तर आणखी चांगले दिसले असते. Happy

बरका योगेश,दिव्याची अवस म्हणजे घरातील सगळे जुने नवे दिवे चांगले चिंचेने घासून लख्ख उजळ्वून त्यांची केलेली पुजा!
कणकेत गुळ घालून ते वाफवून गरम असतानाच घरच्या साजूक तुपाची धार सोडून मटकावणे म्हणजे दिव्याची
अवस,
गटारी हा शब्द तर सगळ्या या गोष्टींवर पाणी फिरवतो अस वाटत, नाही?

वरील सगळे प्रतिसाद मी पॉझिटिव्हली घेतले आहेत Happy
पुढच्या वेळेस नक्कीच चांगले देण्याचा प्रयत्न करीन Happy
असाच लोभ असु द्या.

योगेश, जो विषय तूझ्याच आवडिचा नाही, तिथे तूझा कॅमेरा पण रुसतो. (तरी बरं फुटलेल्या किंवा फोडलेल्या बाटल्या, आचरट हावभाव, झालेले, केलेले आणि घडवून आणलेले अपघात, येणार्‍या जाणार्‍या वाहनांतील लोकांना दिलेला त्रास, कर्कश संगीत, सुटलेली पोटं, डिझायनर च** टाळलेस. )
श्रावण आलाय, मग तू श्रावणी सोमवार, बेंदर (पोळा) पिठोरी अमावस्या, जिवतीची पूजा, नारळी पोर्णिमा, गोकुळाष्टमी, (दहिहंडी नको, कारण तिथे पण हेच असते) असे विषय निवड.

योगेश विषयच असा आहे की फोटो नावडावेत. जसा प्राणचा राग यायचा. त्यामुळे जितक्या जास्त निगेटीव्ह कमेंट्स तितका तुझा उद्देश सफल, नाही का?
(पहिले दिव्याचे सोडले तर) फोटो नाही आवडले.. Happy

Pages