परळ

परळ आणि बाजुच्या परिसरातले मायबोलीकर

Submit to kanokani.com

नेहमीची येतो मग वर्षाविहार!
वर्षाविहार २००८ लिंक खाली दिली आहे.

http://www.maayboli.com/node/2488

हेल्लो

बोल्लो...

What an IDEA Sir Ji...

hi, do you work for any ad agency?

नाहि मी कमशियल आरटिस्त आहे
पन मि एजेनसि म्धे काम करत नहि
शामल

ओके, गूड try, मी पअन मराथि ट्ईप करायला शिकटॉय. स्मित) ..प्रसाद

नमस्ते,
परळ्कर
पावसाच्या हार्दीक शुभेच्छा!

नमस्कार चिंतन... स्मित

...लंडन से गया पूना.. पूना से गया दिल्ली... दिल्ली से गया बाली... बाली से गया पॅरिस.. पॅरिस से गया पटना.. पटना से गया...............
अहो एवढं फिरून आलायत? मग तुमचे अनुभव आम्हालाही सांगा की...
पहा... गणेशोत्सव प्रवासवर्णन स्पर्धा.

आळस हा माणसाचा शत्रू आहे म्हणतात... त्यामुळेच कित्येक गोष्टींची सुरुवातच होत नाही... अहो पण मायबोली कथास्पर्धेत संयोजकांनी कथेची सुरुवात करूनच दिलेली आहे..
मारूया थोड्या कल्पनेच्या भरार्‍या आणि उतरवूया कागदावर जाडी कमी करण्याचे अनुभव, बिग बॉस मधे जाण्याची फाईट आणि रॉजर- सानिया ची डेट.....

सकाळच्या घाईत नाष्ट्याला वेळ नाही? अहो मायबोलीकारांनी झटपट न्याहरी ची यादीच केली आहे.
तुमच्या कडेही आहेत अजून काही पदार्थ?
पहा गणेशोत्सव पाककला स्पर्धा.

"आला पाऊस पाऊस.. आल्या पावासाच्या सरी.. शेतं शिवार साजरे.. गेले नदी नाले भरी... "
टिपा हा सुंदर पाऊस आपल्या कॅमेर्‍यात....
पहा गणेशोत्सव प्रकाशचित्र स्पर्धा.

थोडी गंमत, खास शालजोडीतला "आहेर", चिमटे आणि टपल्या...
पहा गणेशोत्सव नावगुंफण स्पर्धा आणि गणेशोत्सव व्यंगचित्र चारोळी स्पर्धा.

स्पर्धांच्या तयारी साठी सप्ताहांताचा वापर करता यावा म्हणून खास लोकाग्रहास्तव सर्व स्पर्धांची अंतिम मुदत सोमवार १५ सप्टेंबर पर्यंत वाढविण्यात आली आहे.

मायबोली गणेशोत्सव २००८

मी पण परळकर , माझे शालेय जीवन - शिरोडकर शाळा . निवास स्थान आणि खेळ सेन्त्रल रेल्वे मैदान ,
आता दहिसर राहतो पण मन मात्र अजुनहि परळ च्या गल्लि-बोळ्यात रमते . मी ते दिवस विसरु शकत नाही . तुम्हा सर्वाशी connect होवून पुन्हा ते जीवन अनुभवता येईल. हार्दीक शुभेच्छा!

मंडळी, गणेशोत्सवातल्या स्पर्धांसाठी मतदान केलेत ना?
नाही?? अहो मग करा बघू लगेच. आता शेवटचे फक्त ३ दिवस उरलेत. मतदान २७ सप्टेंबर पर्यंत चालू राहील.
आपल्या आवडत्या फोटोला, उखाण्याला, चारोळीला, प्रवासवर्णनाला आणि कथेला नक्की मत द्या.

ही घ्या लिंकः
http://www.maayboli.com/node/3634

नमस्कार मंडळी.

दिवाळीची चाहूल कशी अगदी आसमंतात भरून राहिली आहे नाही?
वर्षातल्या सर्वात मोठ्या या उत्सवात लक्ष्मीच्या स्वागतासाठी तुमची लगबग सुरू झाली असेल. घरातली अडगळ काढून साफसफाई करायची आहे. घर रंगवायचे आहे. नवीन खरेदी करायला दोन-तीन दिवस तरी पाहिजेत. प्रियजनांच्या गाठी आणि त्यांच्यासाठी भेटी घ्यायच्या आहेत. नोकरी-धंद्यातल्या संबंधांना यानिमित्ताने उजाळा द्यायचा आहे. बर्‍याच नातेवाई़कांकडे जायचे नियोजन करायचे आहे.. हे ना ते. अनंत विषय मनात असतील, अन् कमी वेळेत कसे कसे होईल हा प्रश्नही!

या गडबडीत आपल्या दिवाळी अंकाला मात्र विसरू नका, म्हणजे झाले.

दिवाळी अंकाची घोषणा होऊनच आता आठवडा उलटून गेला आहे. दिवाळी अंकातला आपला सहभाग निश्चित करण्याच्या दृष्टीने हीच वेळ आहे घाई करण्याची.
आपल्या लाडक्या मायबोलीचा हा नववा 'हितगुज दिवाळी अंक', "मायबोली-मायमराठी- गेले तप आणि येणारे तप" असा विषय घेऊन महाजालावर आपणा सर्वांसमोर येतो आहे, हे दिवाळी अंक घोषणेत सांगून झालेच आहे. या वर्षी आपला दिवाळी अंक मूर्त रूप घेणार आहे तो फक्त शब्दरूपाने नव्हे, तर दृक्-श्राव्य रूपाने सुध्दा. यामध्ये कथा, कविता, ललित, हलकेफुलके लेख, प्रवासवर्णन, रसग्रहण यांबरोबरच बाल साहित्य व आपल्या गुणप्रदर्शनांचे स्वागत आहे..

आपण अजूनही विचार करत असाल, विषय ठरले झाले नसतील तर आपण घाई करायला हवी. ऐनवेळी तुमची धांदल नको, म्हणून ही आगाऊ सूचना!
तेव्हा, लागा बघू तयारीला..!!

आपले साहित्य तयार असेल तर दिवाळी अंकाची घोषणा व त्यातील सूचना पुन्हा एकदा वाचून, कृपया आपले साहित्य दिवाळी अंक लेखनाच्या खालील दुव्यावर पाठवावे.
http://vishesh.maayboli.com/node/add/v-article1

काही शंका असल्यास, आपल्या प्रश्नांचे स्वागत आहे..

--
संपादक मंडळ
हितगुज दिवाळी अंक २००८

नमस्कार परळकर,
मि नितिन मी परळ ला नाहि सयानि रोड ल राहतो. तिथुन जवळच आहे.

नितिन नमस्कार... तुझे परळ मधे स्वागत आहे स्मित

नमस्कार......
चला परळ जागे झाले फार बर वाटल......
मी बोरीवलीकर

----------------------------------
If friendship is your weakest point then u r the strongest person in world........... ....

विनय इकडे जाग येण्यासारखे सध्या काहीच घडत नाही... स्मित
बोरीवलीत काय करता?

बोरीवली झोपली आहे

----------------------------------
If friendship is your weakest point then u r the strongest person in world........... ....

असे उदास होऊ नका भिडे साहेब... अख्खी मुंबईच झोपली आहे...
येत रहा...

ए शाणे, एक बात सुन. ये घाटीतात्या है ना, ये भोत बडा पंटर. इसने जो घोडे पे पेटी लगाया, वो घोडा कित्ता भी चमनचिंधी होयगा तोभी जितेगा ! क्या, समझा ना ? बोले तो, ये तात्या का जो घोडे के साथ मांडवली, वो घोडा एकदम तेज... एकदम ghoda.jpg ये घोडे के माफीक !

ऐसा ये तात्या अभी पच्चास साल का हो गयेला है, बोले तो पचासवा हॅप्पी बड्डे, क्या ? वो आप्पुन मनायले रैले है इस दिवाली क्को. अभी ये दिवाली पे माब्बो को दसवा पंख आयेला है (क्या रे पक्या ?... हां हां ठिक है) बोले तो, माब्बो का दसवा अंक आयेला है. एकदम झक्कास ! तो उस टायम ये तात्या पे लिखने का. ये बंदेने कैसा कैसा पंटरगिरी कियेला है अब तक वो लिखने का... मतबल, ये पिछ्छू के पचास साल में तात्या ने इत्ता कुछ किया उस पे कुछ लिखने का... और बोले तो तात्या अब्बी कैसा कैसा धंदापानी करेला है वो बी लिखने का... क्या ? समझा ना ?

और तू भी ए शाणी ! क्या ? बोले तो, ये शाणेको बोला है तो तेरे को अल्लग से बताने का क्या ? ये मराठी जात भोत ढासू. बोले तो, जिधर बी गया, उखाड के आयेला है ! क्या ? ये अपना सच्चूभाय और माधुरी बी वोहीच... बोले तो, मराठी. तो ये मराठी लोग के बारे में कुछ भी लिख डालने का.

तो सब लोग ये दिमाग के अंदर घुसा लो, क्या ? दिनभर ये पब्लिक सिरफ ये बाफ से वो बाफ पर भटकती रहती है... भटकती आत्मा की पनौती तेरी तो... !! आप्पुन को मालूम, इधर पे लोग भोत लोचा करेले... गाना लिखेले, शायरी करेले, कैसा कैसा श्टोरी लिखेले, चिकने चिकने फोटो निकाल रैले... ये कुछ भी लोचा किया तो बी आप्पुन के पास आने का लोचा लेके, समझा क्या ? आप्पुन का नाम (पक्या, क्या नाम बोला रे?... हां हां) संपादक हटेला, आप्पुन करता जेब फटेला, समझा क्या ?

और एक बात दिमाग में फिट्ट रखने का, क्या ? इत्ता टायम है सोच के टायम की खोटी नही करने का. बोले तो, ५ सितंबर के अंदरीच ये सब आप्पुन को भेजने का , समझा क्या ? चल चल, अब थोडी हवा आने दे.

परळ नावावरून एक आठवले. शिवसेनेच्या उदयाचा तो काळ होता. आणि सेना म्हणजे अगदी पक्की कम्युनिस्ट, आणि दाक्षिणात्य द्वेष्टी. मुम्बईतल्या भिन्तींवर खालील घोषणा लिहिलेली असे.

'परळ, परळ
हे नव्हे केरळ,
हाकलून द्या
लाल झुरळ!'

रॉबिन गेले ते दिन... आणि ती सेना...
श्रमिकांच परळ बनलयं धनिकांच परेल... अरेरे

सुप्रभात!!!

काल माझ्या वहिनीचा फोन आला होता( ती रहेजामध्ये डॉक्टर आहे). तिच्या हॉस्पिटलमध्ये सगळ्यांना हे करण्यासाठी सांगितले आहे. ह्या स्वाईन फ्लुपासुनच्या बचावासठी एक अगदी सरळ सोप्पा घरगुती उपाय सांगितला आहे.

आपल्या तर्जनीच्या आकाराचे १ सुंठीचे बारिक तुकडे
आपल्या तर्जनीच्या आकाराचे १ हळकुंडाचे बारिक तुकडे
१ वेखंडाचे(तेवढ्याच आकाराचे) बारिक तुकडे

साधारण १ लिटर पाणि घेउन त्यात चंगले उकळावाआअच्यहे. पाणि १ लिटरचे पाव लिटर झाले पाहिजे इतके उकळावे अणि मग तेच पणि थंड करुन प्यायचे. कमीत कामी ७-८ चमचे मोठ्यांनी प्यावे. हा उपचार तीन दिवस न चुकता करायचा आणि घरातल्या लहान मोठ्या सगळ्यांनी हे पाणि प्यायचे.
आंही आज घरातले सगळे हे पाणि प्यायलो. माझ्या "श्रीयाला" पण हे २-३ चमचे पाणि पाजले.

प्लिज जितक्या लोकांना तुम्हाला हे सांगणे शक्य होईल तितक्या लोकांना सांगा. कालपासुन आम्ही हे आमच्या आजुबाजुच्या सगळ्यांना सांगत आहोत.

मायबोली गणेशोत्सव २००९

**************************************************
B&W_Teaser_1.jpg

**************************************************
Paryavaran_Teaser_1.jpg
**************************************************
chitrakala_teaser_1.jpg
**************************************************
Pakakruti_Teaser_1.jpg
**************************************************

नमस्कार,
मी नंदकुमार केळकर, केरळ मधील कोचीन या मध्यवर्ती ठीकाणी आमचे होम-स्टे आहे.
ज्याचा लाभ खुप लोकांना झाला आणी होत आहे. आपणाला पण तो व्हावा
म्हणुन त्याची माहिती पाठवत आहे.आपल्याला शक्य असल्यास ही माहिती
आपल्या परिचीत लोकांना तसेच मित्रमंडळींना कळवा.

स्वत:च प्लान करा केरळची सहल कुटुंबाबरोबर किंवा मित्र मैत्रिणिंबरोबर
अगदी कमी खर्चात आणि घरगुती वातावरणात आपल्या माणसांबरोबर.

तसेच या लिंक पण तपासुन बघा
http://jahirati.maayboli.com/detail.php?id=1015
अथवा
http://nkelkar.spaces.live.com/

कळावे आपला विश्वासु
नंदकुमार केळकर

नमस्कार,
मी नंदकुमार केळकर, केरळ मधील कोचीन या मध्यवर्ती ठीकाणी आमचे होम-स्टे आहे.
ज्याचा लाभ खुप लोकांना झाला आणी होत आहे. आपणाला पण तो व्हावा
म्हणुन त्याची माहिती पाठवत आहे.आपल्याला शक्य असल्यास ही माहिती
आपल्या परिचीत लोकांना तसेच मित्रमंडळींना कळवा.

स्वत:च प्लान करा केरळची सहल कुटुंबाबरोबर किंवा मित्र मैत्रिणिंबरोबर
अगदी कमी खर्चात आणि घरगुती वातावरणात आपल्या माणसांबरोबर.

तसेच या लिंक पण तपासुन बघा
http://jahirati.maayboli.com/detail.php?id=1015
अथवा
http://nkelkar.spaces.live.com/

कळावे आपला विश्वासु
नंदकुमार केळकर