यु.के. मधल्या मायबोलीकरांच्या गप्पा

यु.के. मधले मायबोलीकर

Submit to kanokani.com

मृदुला, अगदी अगदी ..
अगो, खोकल्या कुठल्या पद्धतीचा झाला आहे त्या प्रमाणेच कफ सिरप घे. (म्हणजे ड्राय / चेस्टी / Tickly etc). इथे डॉ. तर काहिच सांगत नाहित.. उलट म्हणतात नुसत्या सर्दी - खोकल्या साठी येत जाउ नका
अरेरे ..
benyli / covonia ही जरा इफेक्टिव्ह सिरप आहेत..

लंडनचं बर्फ आणि सगळं भयानक जबरी मिस करतोय...
फेब ०९ मधे असंच किलो किलो स्नोईंग झालं होतं... पब्लिक ट्रान्सपोर्ट ठप्प... कॉलेजला सुट्टी.. स्मित

मै जहाँ रहूं, मै कही भी हूं, तेरी याद साथ है...

बर्याच दिवसानी चहल पहल आहे इथे.. स्मित

सगळे ठीक आहात ना?
इथे ७" स्नो होता .. आज सकाळी पण थोडा झाला.
सगळे रस्ते एकदम घसरगुंडी सारखे झाले आहेत .. चालणं पण अवघड होत होतं.

अगो काळजी घे .. सध्या फ्ल्यु ची साथ चालु आहे.

काय म्हणताय राणीच्या देशातले मायबोलीकर ? स्मित स्नोमध्ये काळजी घ्या स्मित . थोडा स्नो आमच्याकडे पाठवा डोळा मारा , स्नो न होताच तापमान - १५ ° से पर्यंत खाली उतरलंय . बोचरी थंडी आहे स्मित .

संपदा, काय म्हणतेस तुमच्या कडे स्नो नाहिये???? कस काय बुवा??
कसा पाठवु? विरघळला आता स्मित
भावना टेक केअर!!

>> अतिरेक्यासारख्या दिसू ह्या भितीने टाळत होते
खो खो अजिबात टाळू नकोस पण.
मीही दोन आठवडे ताप, खोकला, सर्दीने बेजार झाले होते. एनेचेस वगैरे म्हणे, 'लाय लो' आणि आपापले व्हा बरे.
माधुरी कफ सिरपच्या सल्ल्यासाठी धन्यवाद. इकडे शेवटी सुंठीचा काढा केला (केरळष्टाइल डोळा मारा) आणि मग गेला खोकला.

केम्ब्रिज, एकूण पूर्वेत, आग्नेयेत जास्त आहे हिमवर्षावाचा जोर. भावना सुट्टी नाही का ऑफिसला वगैरे?

संपदा, बिनपाण्याचे -१५ म्हणजे सालंच निघणार की त्वचेची, थंडीने! अतिरेक्याच्या पुढचा एस्किमो पोशाख हवा अश्यावेळी.

<< संपदा, काय म्हणतेस तुमच्या कडे स्नो नाहिये???? कस काय बुवा??

बघ ना , स्नो झाला तर जरा तरी वॉर्म होईल , पण छे स्मित . गेले आठवडाभर चिल्ल्ल्ल आहोत आम्ही डोळा मारा .

<<<संपदा, बिनपाण्याचे -१५ म्हणजे सालंच निघणार की त्वचेची, थंडीने!

अगदी अगदी स्मित , हातात २ -२ ग्लोव्हज आणि पायात ३ -३ सॉक्स खो खो .

>>भावना सुट्टी नाही का ऑफिसला वगैरे?
नाही ना अरेरे.
काल पार्किंग लॉट मधे ट्रॅफिक जाम झालं होतं .. ५-६ गाड्या ओळीने अडकल्या होत्या .. ऑफिसची जनता बर्फ उपसायला बाहेर तासभर.

मला २ मैल चालायला ५० मि. लागले .. इतर वेळी २५ मि मधे आरामात पोहोचते.

>>थोडा स्नो आमच्याकडे पाठवा
आमच्याकडे आहे अजुन पण .. घेउन जा डोळा मारा

<<संपदा, बिनपाण्याचे -१५ म्हणजे सालंच निघणार की त्वचेची, थंडीने!
बापरे इथे -६ असताना पण मी ग्लोव्हज, सॉक्स २ लेयर्स असुन पण थंडी वाजतेय.

>>मीही दोन आठवडे ताप, खोकला, सर्दीने बेजार झाले होते.
vitamin C घेत रहा .. ज्युस किंवा संत्र मधुन वगैरे ..

विचारपूस केल्याबद्दल धन्यवाद सर्वांना स्मित सर्दीखोकल्याला ( म्हणजे एकूणच सगळीकडचे अ‍ॅलोपथी ) डॉक्टर्स अँटिबायोटिक देण्यापुरतेच कामाला येतात. तिथे आयुर्वेदिकच बरं आपलं. त्यामुळे घरगुती उपायच चालले आहेत. गरम पाणी, सितोपलादी-हळद मध, कापराचे तेल हुंगणे वगैरे वगैरे. कफ ड्रॉप्स चघळावे लागत आहेत सतत. विशेषतः बाहेर पडताना. नाहीतर कोरड्या खोकल्याने प्रचंड कानकोंडं व्हायला होतं चार लोकांत.
तरी ह्या वर्षी इथे बर्फ कमीच आहे ( टचवूड ! ) गेल्या दोन वर्षी फार थंडी आणि बर्फं होतं ना ?

अग हो गेल्या वर्षी तर १ डिसेंबर ला भरपुर स्नो झाला होता..
परत x'mas च्या आसपास पण १-२ दिवस हिथरो बंद होत इतका स्नो होता (आम्ही देशात पोहोचलो आणि लगेच इकडे विमानतळ बंद, सुदैवाने आमची फ्लाईट वेळेवर उडाली) स्मित
तरी बर डिसें/जाने कोरडा गेला.. फेब्रु. एंजाय करा आता (आजारी न पडता)

आज एकदम मस्त हवा आहे इथे. लखलखीत सूर्यप्रकाश, हल्के धुके, आकाशात छोटे ढग .. स्मित

अम्मी, अँकी इकडे येताय का परत?

नाही.. फक्त आठवणी.. स्मित

वीकेण्डला पुन्हा बर्फ पडणार म्हणे. बायदवे, आपल्या घरासमोरचं बर्फं आपण स्वत:च क्लीअर करावं का?

I wish...

आज परत स्नो अरेरे

एक दिवस गप्पा मारुन सगळे थंडीने गारठलात की काय?

पाठव देशात जरा.. स्मित

पण दिवस भर नाहिये ना.. रात्री पडला बराच पण रस्ते सगळे कोरडे होते हुश्श!!...
आता तर मस्त उन पडलं आहे .स्मित
आणि लकीली विकएन्ड पण सनी आहे (बहुतेक) स्मित

>>आणि लकीली विकएन्ड पण सनी आहे (बहुतेक)
हो पण तापमान -१ च्या खाली दिसतय दोन्ही दिवस

>>पाठव देशात जरा.
कसा पाठवायचा .. by air / sea