महाराष्ट्राचे वैभव: गोन्देश्वर मंदिर
नाशिकपासून सुमारे २६ कि.मी. अंतरावर सिन्नर येथील गोन्देश्वराचे मंदिर हा हेमाडपंती स्थापत्यकलेचा आणखी एक उत्कृष्ट नमुना मानला जातो. मध्ययुगीन काळातील अतिशय सुंदर आणि सुबक कारागिरीचा आविष्कार म्हणून गोन्देश्वर प्रसिद्ध आहे. या मंदिराचे मूळ नाव गोविंदेश्वर असल्याचे सांगितले जाते. सुमारे सातशे वर्षांपूर्वी सिन्नरवर यादव वंशातील राजा राव गोविंद यांचे शासन होते. त्यांच्या कारकिर्दीत या मंदिराची निर्मिती झाल्याचा इतिहास कळतो. या राजावरूनच मंदिराचे नाव गोविंदेश्वर पडले असावे असा अंदाज बांधला जातो तर काही तज्ज्ञांच्या मते इ.स. ११६० मधील यादव राजा गोविंदराज याच्या नावावरून या मंदिराचे नाव गोन्देश्वर (गोविंदेश्वर) पडले असावे. महाराष्ट्रात आढळणार्या मध्ययुगीन वास्तूंपैकी अत्युत्तम शिल्पकलेचा नमुना म्हणून गोन्देश्वर मंदिराची गणना होते.
या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे मंदिराची वास्तू पायर्या पायर्यांनी बनलेल्या १२५ फूट x ९५ फूट मापाच्या ओट्यावर उभी आहे. मंदिराची बांधणी अतिशय प्रमाणबद्ध आणि सममितीत असून स्थापत्य अतिशय मोहक आहे. संपूर्ण मंदिराचा परिसर सुमारे आठ हजार चौरस फुटांचा आहे. मंदिर पूर्वाभिमुख असून दक्षिणेकडूनही त्याला दरवाजा आहे.
हे मंदिर इतर हेमाडपंती मंदिरांपेक्षा किंचित वेगळे असून उत्तरेकडील नागरी मंदिरांची झाक त्यावर दिसते. हे मंदिर पाच मुख्य मंदिरांचा समूह असल्याने त्याला शैवपंचायतन म्हटले जाते. यांतील गोन्देश्वराचे मुख्य शिवमंदिर मध्यावर असून सभोवतीची चार उपदिशांना असणारी मंदिरे पार्वती, गणपती, सूर्य आणि विष्णू यांची आहेत. इतर मंदिरांपेक्षा मुख्य मंदिर थोडे उंचावर असून मंदिराचे सभामंडप आणि गर्भगृह असे भाग आहेत. गर्भगृहावर बांधलेले, आकाशाकडे झेपावणारे मंदिराचे पटईचे शिखर अतिशय देखणे असून अप्रतिम कोरीवकामाने सजवलेले आहे. गर्भगृहात रेखीव शिवपिंडी आहे. सभामंडपातील खांब नक्षीने कोरलेले असून त्यांवर आणि मंदिरांच्या भिंतींवर देव-देवता, गंधर्व-अप्सरा, पौराणिक आणि रामायणातील प्रसंग कोरलेले आहेत. मंदिरातील शिल्पकाम त्रिमित असून त्यावर पडणार्या परावर्तित प्रकाशाच्या आणि सावलीच्या छटांतून मंदिराचे देखणेपण अधिकच उठावदार दिसते.
नैसर्गिक उत्पात आणि मानवी औदासिन्यातून टिकून राहिलेली ही मंदिरे काही स्थानिकांच्या आस्थेतून अद्याप सुस्थितीत आहेत. कला, शिल्प आणि स्थापत्याचा हा समृद्ध वारसा असल्याचे ध्यानात आल्यावर पुरातत्त्वखात्यानेही या मंदिरांकडे लक्ष पुरवण्यास सुरुवात केली आहे. शासनाने या स्थळांचा पर्यटन विकास केल्यास आणि स्थानिकांनी योग्य काळजी घेतल्यास सर्वांच्या अथक प्रयत्नांतून आणि श्रद्धेतून महाराष्ट्राला हेमाडपंतांनी दिलेला हा वैभवशाली वारसा टिकून राहील याची खात्री वाटते.
(माहिती साभार : प्रियाली, मनोगत्.कॉम)
मुळ प्रकाशचित्रे येथे पहा.
http://www.flickr.com/photos/-g-r-a-c-e-/sets/72157623333670590/
वा ! इथे आणखी थोडी
वा ! इथे आणखी थोडी प्रकाशचित्रे चालली असती की.
दिनेशदा.... धन्यवाद !!! चुकुन
दिनेशदा....
धन्यवाद !!!
चुकुन upload झाले नव्हते !! आत्ता केलेत.
सुंदर फोटो आणि माहीती.
सुंदर फोटो आणि माहीती.
फोटो व माहितीबद्दल धन्यवाद!
फोटो व माहितीबद्दल धन्यवाद!
असे कोरीव काम बघितले कि मला
असे कोरीव काम बघितले कि मला नवल वाटते, कि दगडासारख्या माध्यमात
कसे केले असेल हे. जराही चूक सुधारण्याची संधी नाही. एखादा टवका जास्त
उडाला, तर सगळा पाषाण वाया जाणार.
कोरण्या आधी याचे रेखाटन कसे केले असेल ? या मूर्त्यांची प्रमाणबद्धता
बघता, त्या एखाद्या जिवित मॉडेलवरुन बेतल्या असतील, याची शक्यता
कमीच वाटते.
आता असे काम करणारे कलाकारच दुर्मिळ झालेत. आणि ज्यानी
हे घडवले, त्यांचे तर नावही इतिहासाला माहित नाहि.
मस्त आहे एकदम! अँगल्स एकदम
मस्त आहे एकदम! अँगल्स एकदम भारी आणि शेड्स पण!!!
अप्रतिम... काही पोस्ट
अप्रतिम...
काही पोस्ट प्रोसेसिन्ग??
जबरी फोटो.. आणि माहिती...
जबरी फोटो.. आणि माहिती...
सहीच फोटो. मला कॉपीराईटही
सहीच फोटो. मला कॉपीराईटही आवडला.
सुरेख प्रकाशचित्रे!
सुरेख प्रकाशचित्रे!
देखणी देवळं. सुंदर फोटो.
देखणी देवळं. सुंदर फोटो.
सही फोटोज !
सही फोटोज !
मीन्वा अरुंधती
मीन्वा
अरुंधती कुलकर्णी
ऋयाम
हिम्सकूल
आऊटडोअर्स
शैलजा
मृण्मयी
श्री
दिनेशदा.....
सगळ्यांचे धन्यवाद.
@ अमोघ: पोस्ट प्रोसेसिन्ग केलय थोडेसे croping, copyright mark and HDR tonel adjustment for last image
झकास फोटोज् मित्रा... खुप
झकास फोटोज् मित्रा... खुप आवडले... फारच सुंदर मंदिर आहे...
अप्रतिम फोटो आणि माहितीपुर्ण
अप्रतिम फोटो आणि माहितीपुर्ण लेख

आवडला
खल्लास फोटो. कुठल्याही
खल्लास फोटो. कुठल्याही पुस्तकाच्या मुखपृष्ठाला आणखी सुंदर करतील एवढे देखणे. अप्रतिम आहेत खरोखर.
खुपच सुंदर फोटो सगळेच
खुपच सुंदर फोटो सगळेच
कुठल्याही पुस्तकाच्या मुखपृष्ठाला आणखी सुंदर करतील एवढे देखणे>>>>> रैनाला अनुमोदन.
अगदी खरं आहे, अतूल्य भारत !
अगदी खरं आहे, अतूल्य भारत ! सारख्या पोस्टकार्डसाठी अप्रतीम छायाचित्रे.
कसले फोटो काढतात
कसले फोटो काढतात तुम्हीलोक्स.. लै भारी मित्रा !
प्रकाशचित्रे - अप्रतिम
प्रकाशचित्रे - अप्रतिम !!!
इतक्या सुंदर अप्रचलित मंदिराची माहिती करून दिल्याबद्दल धन्यवाद !!!
फोटोज् खुपच सुंदर
फोटोज् खुपच सुंदर .........महिती पण उप यु क्त ........
@ चंदन.. धन्यवाद... मंदिर
@ चंदन.. धन्यवाद...
मंदिर सुंदर आहे... म्हणुन फोटो झकास आलेत.
@ लाजो.. फोटोज साठी धन्यवाद...
लेख माहिती साभार : प्रियाली, मनोगत्.कॉम
@ रैना, योगेश २४, सूर्यकिरण ...
मित्रांनो... तुमच्या शुभेच्छा असल्यात तर नक्की तो दिवस येईल.
@ Yo.Rocks, भालचन्द्र, दादाश्री ... धन्यवाद
अतिशय सुंदर फोटो. पहिला आणी
अतिशय सुंदर फोटो. पहिला आणी उभ्या खांबाचा (७वा) एक्दम बेस्ट
हाय ग्रेस ! हे मन्दिर
हाय ग्रेस !
हे मन्दिर अतिसुन्दर आहे खरेच पण काहिसे दुर्लक्शित पण ! त्यामुळे सगळयासमोर माहिति आण्ल्याबद्दल मनापासुन धन्यवाद !!
या मन्दिराच्या परिसरात गेले असता मनाला एक वेगळिच शान्तता मिळते . मी खुपदा गेलेलो आहे.
वा, मस्त आहेत सारी
वा, मस्त आहेत सारी छायाचित्रे.
फार पुर्वी गेल्याचे आठवते या मंदिरात.
आवडल...
आवडल...
सुरेख फोटोग्राफी!
सुरेख फोटोग्राफी!
सुंदर प्रकाशचित्रं
सुंदर प्रकाशचित्रं
सावली, राहुल१९८१, साजिरा, रोह
सावली,
राहुल१९८१,
साजिरा,
रोहित ..एक मावळा,
प्रकाश काळेल,
पाटील,
सगळ्यांचे मनापासुन धन्यवाद.
एकदम सही काढलेत फोटो.
एकदम सही काढलेत फोटो.
Pages