मंडळी, उद्या सगळ्यांच्या घरी जसे गणपती बाप्पा येणार तसेच ते आपल्या मायबोलीवर पण येणार आहेत. सालाबाद प्रमाणे यंदाही गणेशोत्सवाच्या स्पर्धा आणि इतर उपक्रम आहेतच पण ह्या वर्षीचा गणेशोत्सव घेऊन येतोय १० दिवस भरगच्च असा लिखित-श्राव्य कार्यक्रम...
इथे भेट द्यायला विसरु नका - मायबोली गणेशोत्सव २००८
दिवाळीची चाहूल कशी अगदी आसमंतात भरून राहिली आहे नाही?
वर्षातल्या सर्वात मोठ्या या उत्सवात लक्ष्मीच्या स्वागतासाठी तुमची लगबग सुरू झाली असेल. घरातली अडगळ काढून साफसफाई करायची आहे. घर रंगवायचे आहे. नवीन खरेदी करायला दोन-तीन दिवस तरी पाहिजेत. प्रियजनांच्या गाठी आणि त्यांच्यासाठी भेटी घ्यायच्या आहेत. नोकरी-धंद्यातल्या संबंधांना यानिमित्ताने उजाळा द्यायचा आहे. बर्याच नातेवाई़कांकडे जायचे नियोजन करायचे आहे.. हे ना ते. अनंत विषय मनात असतील, अन् कमी वेळेत कसे कसे होईल हा प्रश्नही!
या गडबडीत आपल्या दिवाळी अंकाला मात्र विसरू नका, म्हणजे झाले.
दिवाळी अंकाची घोषणा होऊनच आता आठवडा उलटून गेला आहे. दिवाळी अंकातला आपला सहभाग निश्चित करण्याच्या दृष्टीने हीच वेळ आहे घाई करण्याची.
आपल्या लाडक्या मायबोलीचा हा नववा 'हितगुज दिवाळी अंक', "मायबोली-मायमराठी- गेले तप आणि येणारे तप" असा विषय घेऊन महाजालावर आपणा सर्वांसमोर येतो आहे, हे दिवाळी अंक घोषणेत सांगून झालेच आहे. या वर्षी आपला दिवाळी अंक मूर्त रूप घेणार आहे तो फक्त शब्दरूपाने नव्हे, तर दृक्-श्राव्य रूपाने सुध्दा. यामध्ये कथा, कविता, ललित, हलकेफुलके लेख, प्रवासवर्णन, रसग्रहण यांबरोबरच बाल साहित्य व आपल्या गुणप्रदर्शनांचे स्वागत आहे..
आपण अजूनही विचार करत असाल, विषय ठरले झाले नसतील तर आपण घाई करायला हवी. ऐनवेळी तुमची धांदल नको, म्हणून ही आगाऊ सूचना!
तेव्हा, लागा बघू तयारीला..!!
आपले साहित्य तयार असेल तर दिवाळी अंकाची घोषणा व त्यातील सूचना पुन्हा एकदा वाचून, कृपया आपले साहित्य दिवाळी अंक लेखनाच्या खालील दुव्यावर पाठवावे. http://vishesh.maayboli.com/node/add/v-article1
नमस्कार मंडळी,
मी कालच इकडे सभासद झालो.
पन इथल्या गप्पा वाचुन आनद वाटला.
तसे इकडे सभासद व्हा म्हणुन बिपिन बराच मागे लागला होता.
मी त्याचा व तुम्हा सर्वन्चा अभारी आहे
मनोहर शेटे
नाशिक
'गेले तप, आले तप
आले गेले टपटपाटप'
"हे काय ?"
" हितगुज दिवाळी अंकाच्या 'गेले तप, आले तप' या मध्यवर्ती संकल्पनेवर केलेली कविता."
"अस्सं होय ! अहो, पण ती कविता यमकवालीच पाहिजे असे नाही. "
अन् कविताच पाहिजे असे मुळीच नाही... या संकल्पनेवर लिहिलेल्या कविता, ललित, लेख, कथा अशा सर्वांचे स्वागत आहे ! खरे तर, कुठल्याही विषयावर लिहिलेल्या सर्व प्रकारच्या साहित्याचे हार्दिक स्वागत आहे. मग लिहून पाठवताय ना दिवाळी अंकाला ?
रविवार काही फार दूर नाही, सप्ताहांत सत्कारणी लावा !
मला कोणी न्युझीलडची काही माहीती देऊ शकेल का?
काय माहिती हवीय? जरुर विचारा. देण्याचा आवर्जून प्रयत्न करीन.
विपुल
मंडळी,
मायबोलीच्या टी-शर्ट तसेच टोपीची विक्री चालू झाली आहे.
अधिक माहितीसाठी इथे पहा व लवकर आपापली ऑर्डर बुक करा...
धन्यवाद,
टी-शर्ट समिती
न्युझीलडला शाळा कधी चालू होतात? मला अजुन काही माहीती हवी आहे. मला तुमचा ई मेल मीळेल का?
नीता
मंडळी, उद्या सगळ्यांच्या घरी जसे गणपती बाप्पा येणार तसेच ते आपल्या मायबोलीवर पण येणार आहेत. सालाबाद प्रमाणे यंदाही गणेशोत्सवाच्या स्पर्धा आणि इतर उपक्रम आहेतच पण ह्या वर्षीचा गणेशोत्सव घेऊन येतोय १० दिवस भरगच्च असा लिखित-श्राव्य कार्यक्रम...
इथे भेट द्यायला विसरु नका - मायबोली गणेशोत्सव २००८
नमस्कार मंडळी.
दिवाळीची चाहूल कशी अगदी आसमंतात भरून राहिली आहे नाही?
वर्षातल्या सर्वात मोठ्या या उत्सवात लक्ष्मीच्या स्वागतासाठी तुमची लगबग सुरू झाली असेल. घरातली अडगळ काढून साफसफाई करायची आहे. घर रंगवायचे आहे. नवीन खरेदी करायला दोन-तीन दिवस तरी पाहिजेत. प्रियजनांच्या गाठी आणि त्यांच्यासाठी भेटी घ्यायच्या आहेत. नोकरी-धंद्यातल्या संबंधांना यानिमित्ताने उजाळा द्यायचा आहे. बर्याच नातेवाई़कांकडे जायचे नियोजन करायचे आहे.. हे ना ते. अनंत विषय मनात असतील, अन् कमी वेळेत कसे कसे होईल हा प्रश्नही!
या गडबडीत आपल्या दिवाळी अंकाला मात्र विसरू नका, म्हणजे झाले.
दिवाळी अंकाची घोषणा होऊनच आता आठवडा उलटून गेला आहे. दिवाळी अंकातला आपला सहभाग निश्चित करण्याच्या दृष्टीने हीच वेळ आहे घाई करण्याची.
आपल्या लाडक्या मायबोलीचा हा नववा 'हितगुज दिवाळी अंक', "मायबोली-मायमराठी- गेले तप आणि येणारे तप" असा विषय घेऊन महाजालावर आपणा सर्वांसमोर येतो आहे, हे दिवाळी अंक घोषणेत सांगून झालेच आहे. या वर्षी आपला दिवाळी अंक मूर्त रूप घेणार आहे तो फक्त शब्दरूपाने नव्हे, तर दृक्-श्राव्य रूपाने सुध्दा. यामध्ये कथा, कविता, ललित, हलकेफुलके लेख, प्रवासवर्णन, रसग्रहण यांबरोबरच बाल साहित्य व आपल्या गुणप्रदर्शनांचे स्वागत आहे..
आपण अजूनही विचार करत असाल, विषय ठरले झाले नसतील तर आपण घाई करायला हवी. ऐनवेळी तुमची धांदल नको, म्हणून ही आगाऊ सूचना!
तेव्हा, लागा बघू तयारीला..!!
आपले साहित्य तयार असेल तर दिवाळी अंकाची घोषणा व त्यातील सूचना पुन्हा एकदा वाचून, कृपया आपले साहित्य दिवाळी अंक लेखनाच्या खालील दुव्यावर पाठवावे.
http://vishesh.maayboli.com/node/add/v-article1
काही शंका असल्यास, आपल्या प्रश्नांचे स्वागत आहे..
--
संपादक मंडळ
हितगुज दिवाळी अंक २००८
नमस्कार मंडळी,
मी कालच इकडे सभासद झालो.
पन इथल्या गप्पा वाचुन आनद वाटला.
तसे इकडे सभासद व्हा म्हणुन बिपिन बराच मागे लागला होता.
मी त्याचा व तुम्हा सर्वन्चा अभारी आहे
मनोहर शेटे
नाशिक
मनोहर शेटे
नाशिक
'गेले तप, आले तप
आले गेले टपटपाटप'
"हे काय ?"
" हितगुज दिवाळी अंकाच्या 'गेले तप, आले तप' या मध्यवर्ती संकल्पनेवर केलेली कविता."
"अस्सं होय ! अहो, पण ती कविता यमकवालीच पाहिजे असे नाही. "
अन् कविताच पाहिजे असे मुळीच नाही... या संकल्पनेवर लिहिलेल्या कविता, ललित, लेख, कथा अशा सर्वांचे स्वागत आहे ! खरे तर, कुठल्याही विषयावर लिहिलेल्या सर्व प्रकारच्या साहित्याचे हार्दिक स्वागत आहे. मग लिहून पाठवताय ना दिवाळी अंकाला ?
रविवार काही फार दूर नाही, सप्ताहांत सत्कारणी लावा !
विपुल
मी वेलिन्गटन जवळ वानगानुई येथे आले आहे जवळ पास कोणी मराथि आहेत का?
वेलिंग्टन मधे किमान २०-२५ मराठी कुटुंबे आहेत. कोणाशी संपर्क झाला आहे कां? आम्ही २०००-२००२ या काळात पिटोनी-लोअरहट येथे होतो.
नाही. मला कोणीच माहीत नाही. तुमची कोणाशी ओळख असेल तर मला फोन नबर दयाल का?
अरे येथे कोणीच उत्तर देत नाही का? की वेलीगट्न जवळ कोणी मराथी नाहीत?
जोगळेकर- मी आपणास मेल केली आहे. तुम्हाला मराठी लोकांचे संपर्क मिळायला त्रास पडणार नाही असे आशा आहे.