बांधकाम पुर्ण होण्याआधी घरात करून घ्यावयाचे बदल..

Submitted by दक्षिणा on 5 May, 2010 - 06:28

माझं घर सध्या under construction आहे. पण स्लॅब्स पुर्ण होण्याआधी घरात आधीच कोणते बदल करून घ्यावेत या विषयी मदत हवी आहे. म्हणजे त्याप्रमाणे करून घेईन.
उदा. एकीने सांगितलं की बाल्कनीच्या दरवाज्याला आतून ३ पट्ट्या अगोदरंच बसवून घे, कारण नंतर डासाची जाळी लावायची असेल आणि पट्ट्या २ च असतील तर पंचाईत होते.

तुम्हाला तुमच्या घरात कोणत्या फॅसिलिटीज आधीच करून घेतल्या असत्या तर बरं
झालं असतं असं वाटतं ते सुचवा कृपया..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अभिनंदन डॅझ Happy दक्षिणाला लोकांनी अनेक नावांनी इथे संबोधले आहे Happy

घर लहान असल्यामुळे मुलभुत सोयींकडे आधी लक्ष पुरवं. झुला वगैरे मला वाटतं जागा व्यापेल.

कपडे वाळू घालण्यासाठी पाईप्स भितींत बसवून घे आणि ते मजबूत आहेत ना त्याची खात्री कर.

परत एकदा अभिनंदन!!!!!!

टॉयलेटसचे दरवाजे सुद्धा फायबर ग्लासचे >> ह्याला 'हार्डनर'चे दरवाजे म्हणतात. हार्डनर कही ठरावीक डीझाइन्स मध्ये उपलब्ध असते किंवा एखादे निसर्गचित्र, कार्टून असे पण करवून घेता येते पण छापताना aspect ratio बदलल्यामुळे ते कधिकधी खूप विचित्र दिसते आणि रंग पण खूप भडक किंवा धुरकट येतात.

हे दरवाजे वजनाने खूप हलके असतात आणि ते ज्या granite च्या फ्रेम मध्ये बसवतात त्याची स्क्रू पकडून ठेवायची क्षमता लाकडापेक्षा बरीच कमी असते. त्यामुळे दरवाजा वर खाली होउ शकतो. कडी किंवा इतर locking mechanism बसवताना योग्य ती काळजी घ्यावी.

DTH घेणार असाल तर डीश ते टीव्हीची जागा अशी केबल आधीच concealed करून घ्यावी.

बिल्डरकडून wiring map आवश्य घेऊन ठेवावा. पुढे जेंव्हा wiring मध्ये बदल करायची गरज पडते तेंव्हा खूप उपयोगी पडतो.

wardrobe च्या कोनाड्याला टाइल्स लाउन घ्याव्या - शक्यतो फिक्या रंगाच्या. पुढे दरवाजे आणि शेल्फ केले की झाला wardrobe तयार. पूर्ण लाकडापेक्शा स्वस्त होतो, स्वच्छ करायला सोपा पडतो आणि झुरळे व इतर किटक कमी होतात.

किचन आणि जेवायची जागा एकमेकांना लागून असतील तर त्या मधली भिंत वगळू शकता. त्या जागी पुढे कपाट करता येते ज्यात किचनच्या बाजूने स्वयंपाकाच्या वस्तू आणि डायनीग एरीआच्या बा़जूने क्रॉकरी वगैरे ठेवता येते. ह्यात भिंतीची जागा वाचवता येते.

माधव, मस्तंच पोस्ट Happy
शरद - तुम्हाला विसरून कसं चालेल?
प्राजक्ता - ओपन फ्लोअर प्लॅन म्हणजे नक्की काय? Uhoh

विश्वास असेल तर बांधकाम असतानच वस्तुशात्राप्रमाणे आहे कि नाही ते पहुन ठेव. नहीतर परत सगळी तोडफोड करावी लागते.
लिव्हिंगरुमची, बेडरुमची विंडो फ्रेन्च विंडो असेल तर त्याला लागुन ग्रनाइट्च्या दगडाची बसण्याची जागा बनवु शकतेस. (रवीवार संध्या़काळचा चहा घेउन पुस्तक वाचत बसायची मस्त जागा.)
बथरुम ओटा जस्तित जस्त सुका राहील अशि व्यवस्था करुन घे. (स्लोप पाणी बाहेर पडत त्या ठीकाणी.)
विंडो किंवा स्प्लिट ए सी लावणार असशिल तर त्याप्रमाणे व्यवथा बनवुन घे.
आजकाल बिल्डर ड्राय एरिया देतात. तसा तुझ्या घरात असेल तर त्याचा विचार करुन फर्निचर बनव.

wardrobe च्या कोनाड्याला टाइल्स लाउन घ्याव्या - शक्यतो फिक्या रंगाच्या. पुढे दरवाजे आणि शेल्फ केले की झाला wardrobe तयार. पूर्ण लाकडापेक्शा स्वस्त होतो, स्वच्छ करायला सोपा पडतो आणि झुरळे व इतर किटक कमी होतात.>>>>
अनुमोदन. मझ्याघरतही असेच शेल्फ आहेत. वळवीचा त्रास नाही शिवाय संगमरवर लावल तर थंडावा पण रहातो.
लाइट जर कमी असेल तर शेल्फ मध्ये लाइट लाउन घे. वस्तु शोधायला त्रास नाही होत.

किचन आणि जेवायची जागा एकमेकांना लागून असतील तर त्या मधली भिंत वगळू शकता. त्या जागी पुढे कपाट करता येते ज्यात किचनच्या बाजूने स्वयंपाकाच्या वस्तू आणि डायनीग एरीआच्या बा़जूने क्रॉकरी वगैरे ठेवता येते. ह्यात भिंतीची जागा वाचवता येते.>>>>>
इथे तु ब्रेकफास्ट टेबल बनवु शकतेस. त्याच्या एका बाजुला उंच टेबल किंवा उंच खुर्चि ठेवता येते. आरामात गप्पा मारत जेवण बनवु शकतेस

>>wardrobe च्या कोनाड्याला टाइल्स लाउन घ्याव्या - शक्यतो फिक्या रंगाच्या. पुढे दरवाजे आणि शेल्फ केले की झाला wardrobe तयार. >> मला काही केल्या आयडिया येत नाहिये, कुणि चित्रं काढुन टाकु शकेल का इथे? Sad

दक्षिणा, आज काल बहुतेक बिल्डर wardrobe करता जागा देतात, जी बाकीच्या भिंतीपेक्षा थोडी आत गेलेली असते. म्हणून मी त्याला कोनाडा म्हटले. त्या सर्व जागेला टाइल्स लाउन घ्यायच्या म्हणजे पुढे फक्त भिंतीच्या लेवलला दरवाजे केले आणि त्या कोनाड्यात हवे तसे शेल्फ बसवले की झाले काम.

माधव,
तो कोनाडा नव्हे / offset जेमतेम २-४ इंच असतो... त्यामूळे फक्त भिंतीच्या पुढील प्रोजेक्शन ला दरवाजे केलेत तर फार फार मनगटापर्यंत हात जाईल एव्हडा वार्डरोब बनेल... Happy
तुमच्या सूचनेचा हेतू योग्य आहे... पण तांत्रिक दृष्ट्या ते तितके सोपे नाही. त्या जागेत wardrobe बसवावा या हेतून offset दिलेला असतो ईतकच. त्या offset मूळे भिंतीत wardrobe fixing सोपे होते ईतकच.
शिवाय किचन व लिव्हींग मधील common wall ही बरेच वेळा partition wall असते, load bearing नाही. तसे असेल तरच ती भिंत मोकळी करून त्याजागी दोन्ही बाजूने उघडणारे कपाट करता येईल. तरिही त्या भिंतीवर वरच्या बाजूने concrete beam असेल किंव्वा पोट्माळ्यासाठी offset ठेवला असेल तर architect/engineer तज्ञाला विचारून मगच तोडफोड करणे ऊचित.

योग,

२-४ इंचाचा offset मी तरी पाहिलेला नाही. माझ्याकडे आणि माझ्या पहाणीत इतरांकडे पूर्ण wardrobe आत मावेल आणि त्याचे दरवाजे भिंतीच्या पातळीला येतील एवढी जागा आहे.

तुम्ही म्हणता तशी २-४ इंचच जागा असेल तरी मागच्या भिंतीला टाइल्स लावल्या तरी मी लिहिलेले फायदे मिळू शकतात.

तुमचा किचन वॉलचा मुद्दा अगदी रास्त आहे. पण मी तोडफोड करण्याबद्दल लिहिलेले नाही. मी बांधकाम चालू असतानाच ती भिंत 'वगळण्या'ची कल्पना मांडली आहे. कारण ते करताना तुम्ही म्हटल्याप्रमाणे तांत्रीक अडचणी असल्या तर बिल्डरच तुम्हाला तसे सांगेल त्यामुळे वेगळ्या architect/engineer च्या सल्ल्याची गरज नाही. (माझ्या बिल्डरने मला तसे सांगितल्यामुळे मला ती कल्पना माझ्याकडे वापरता आली नव्हती)

बाकी मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्याला माझा पण विरोधच असतो.

दक्षे, वास्तुशान्त केव्हा करायचीये?
गुरुजीन्ना बोलवावे लागेल ना?
मग तेव्हा मला बोलाव्/सान्ग! Happy
आमचा उत्कृष्ट सेट आहे. मुख्य गुरुजी (आचार्य), दोन तिन (माझ्यासारखे) हरकामे भटजी :P, सर्व साहित्यानिशी , हव तर अगदी लाऊडस्पिकर माईक, क्यामेरा सहीत आम्ही धार्मिक सर्व्हिस देतो! Proud
आम्ही दक्षिणा खणकावुन घेतो Rofl पण काम पण तसच घसघशीत करतो Happy
(प्लिज नोट, मुख्य गुरुजी देशस्थ आहेत.... सबब कशातही काटकसर खपवुन घेतली जात नाही/केली जात् नाही Lol )

घराच्या पोर्च मध्ये वॉल टाईल्स लावाव्या ? की प्लास्टर करताना डिझाईन करावे ? काय चांगले ?
कृपया सुचवा.

Pages