दिवेआगर

Submitted by नितीनचंद्र on 28 March, 2010 - 01:52

मी आणि माझी पत्नी मीना यांनी दिवेआघरला जायच ठरवल. पुण्यातुनच रहायच बुकींग केल. सिझन असुनही मिळाल. आमच्या कन्येने नाक मुरडल. नको जा तुम्ही दोघच. मग काय निघालो पुण्याहुन सकाळी अगदी सहज पोचलो दुपारी २:०० वा.

जेवायला श्री.परकारांच्या खानावळीत सुंदर व्हेज भोजनाचा आस्वाद घेऊन दिली ताणुन. पु. ल. म्हणतात एस्.टी. च्या प्रवासानंतर हाड मोजुन घ्यावी लागतात ते काय उगाच ?

संध्याकाळी ५ वाजता सुरु केली दिवेआगरची भटकंती. प्रथम दिवेआगरची स्थानदेवता, १४ विद्या आणि ६४ कलांचा दाता, विघ्नेश्वर श्री. गणपतीचे दर्शन घेतले.
DAM14.jpg
हा गणपती इथल्या स्थानिक लोकांना शेतीच काम करताना जमिन खणताना सापडला. गावात असलेल्या मुळच्या मंदिरात याची स्थापना झाली. श्री गणरायाच्या आगमनानंतर दिवेआगर पर्यटनाच्या क्षेत्रात दिसु लागल. चला तर दर्शन घेऊया.
श्री गणेशायनमः
DAM13.jpg
मंदीर छोटस, कोकणातल्या मंदिराला साजेस. पण गणरायाची संपुर्ण सोन्याची मुर्ती पाहुन मन हरखुन जात. या मुर्तीची बारिक कलाकुसर १४ वैशिष्ठ्यांसह येथे नमुद केली आहे.

DAM16.JPG
मग पोचलो समुद्र किनार्‍यावर. अतिशय सुरेख, प्रदुषण व घाण मुक्त समुद्रकिनारा. यावरची वाळु, हळु हळु खोल होणारा समुद्र, छान वारा व त्या बरोबर समुद्राची गाझ. अस वाटल हलुच नये.

रात्र पडु लागली त्यामुळे पुन्हा मुक्कामी परत आलो. रात्री पुन्हा परकारांच्या मेस मध्ये. यांच्या इथला मासा प्रिपरेशन म्हणजे अप्रतिम. बायकोने डोळे मिटुन घेतले पण नाईलाज होता नाक उघडच ठेवाव लागल. आयुष्यात हा पहिला प्रसंग मी मासा चापला आणि बायको किमान शेजारी होती. अन्यथा हे काम मला एकट्यालाच करावे लागते.

सकाळी लवकर उठुन पुन्हा भटकंतीला सुरवात केली.
DAM1.JPG

एक जुन देऊळ मिळाल यातल्या सुंदर मुर्ती इथे पुर्वापार असलेल्या काही प्राचीन अवशेषांची साक्ष देतात. एका आर्किओलाजिस्टची भटकंती मधे माबो वर वाचल होत. त्यांच्या साठी हा ख़जीना आहे आज पर्यत न पाहिलेला नसल्यास.
DAM3.JPG
खात्री पटायची असेल तर ही मुर्ती पहा. त्याच बरोबर या शिलालेखाचा अभ्यास करा आणि केला असेलच तर आम्हाला सांगा काय लिहीलय यावर.DAM4.JPG

चला जाऊया अजुन काही मंदिर पहायला
DAM2.JPG

या मंदीरांची बांधणी साक्ष देते ही मंदिरे पुरातन असल्याची.

काही लोकांना नसेल आवड पुरातन मंदीरे आणि तत्सम गोष्टींची म्हणुन काय कोकण मागे राहील ? इथली नारळी पोफळी, झाडे निसर्ग आपल्याला वेड लावेल. DAM5.JPG ही पहा केळ्याची बाग इथे मीना उभी आहे.

DAM8.JPGDAM9.JPG

मला ही फोटु काढुन घ्यायची इच्छा झालीच.

DAM10.JPG

नारळ झाडाला लगडलेत की सुपार्‍या ? बघा ओळखता येतात का ?

DAM12.JPG

हा निसर्ग वेड लावतो.
DAM5.JPG

हे रस्ते, बैलगाडी, साधी सुधी माणसे याच अप्रुप वाटत.

DAM17.JPG

माणस इतकी साधी मी विचार केला पुढे हरीहरेश्वराच्या दर्शनाला जाऊ. किमान दहा ठिकाणी विचारले, एखादी टुरीस्ट कार मिळेल का म्हणुन. पण छे, असला व्यवसाय कराव हे लोकांच्या मनात येतच नाही बहुतेक. शेवटी एक जण म्हणाला जा कि सिक्स सिटर ने.
मी मनात हसलो.

हेच महाबळेश्वरला प्रत्येक जण आपली गाडी न ठेवता दुसर्‍याची गाडी बोलाऊन कमिशन मिळवता झाला असता.

अस वाटत इथेच एक घर बांधाव आणि रहाव.पण कस शक्य आहे ? अजुन निव्रुत्त व्हायला वेळ आहे. आणि नोकरीतुन झालो तरी छंद आहेतच ना ? दिवेआगर असो की अजुन काही . कोकणात शांतता टिकुन आहे. माणुसपण टिकुन आहे. आणि जोवर हे आहे तोवर यास्थळांची गंम्मत टिकुन आहे.

-----------------------------------------------------------

गुलमोहर: 

झक्कास लिहिलंय !!! खरंच मस्त आहे दिवे-आगर

बीच छोटाच आहे पण सुदंर आणी शांत आहे, अजुन फोटो असतील तर टाका !!!

छानच!! थोडे अजुन फोटो येऊ द्यात.
नारळ झाडाला लगडलेत. बघा मोजता येतात का ?>>>> एक शंका - ते नारळ आहे कि सुपार्‍या Light 1

इथल्या घरगूती खानावळी मस्तच आहेत. एका ठिकाणी घरी कांडलेल्या पोह्याचे पोहे खाल्ले होते, त्याची आठवण झाली. आणि पाटील खानावळ म्हणजे क्या कहने...

छान .

>>नारळ झाडाला लगडलेत. बघा मोजता येतात का ?
योगेश ला अनुमोदन. मलाही ते सुपारीचे झाड वाटते आहे.

नारळ झाडाला लगडलेत. बघा मोजता येतात का ?
>>> ते झाड पोफ़ळीचेच आहे!!!!!!! नारळ माडाला लागतात आणि सुपार्‍या पोफळीच्या झाडाला.

दिवेआगर-हरिहरेश्वरला १०-१२ जणांचा ग्रुप जायचं ठरवतोय.
घरगुती रहाण्या-जेवणाचे दर साधारण काय आहेत सध्या ?

मस्तच

छान फोटु आणि वर्णन पन झाक...
दिवेआगार नक्कि कुठे आहे. ( म्हणजे कोकणात पण कुठे )>>>
पुणे - ताम्हिणी घाट - मान गांव - दिवेआगार (चु.भु.दे.घे.)

आवडले!
बीचचे अजुन फोटो हवे होते, तिथली वाळू वेगळीच आहे, मऊशार, संगमरवरी भूकटी सारखी!
अन हरिहरेश्वर नाही केलंत?
अख्खा कातळ पोखरलाय लाटांनी अन काय देखणी कलाकृती मिळते पहायला!
झक्कासच!

सही Happy

आर्च +१

दिवेआगरला जाऊन बापटांच्या खानावळीत उकडीचे मोदक खाल्ले नाहीत?
(हे 'तुम्हें PSPO नही पता?' या चालीवर वाचावे).

निदान बायकोला तरी हे सुख द्यायचे होते.

आम्ही दिवेआगर ला गेलो कि मी बापटांच्या खानावळीत जाते आणि नवरा समोरच्याच पोतनीसांच्या एकविरा खानावळीत अगदी बांगलादेशातुन नुकतेच आल्यासारखे चापतो. Wink

'सुहास बापट' इज सिंपली ग्रेट. इतकी वर्ष होऊन जेवणाची चव, क्वालिटी जशीच्या तशी मेंटेन करुन किंमतही कमी आहे.

सुहास वि. बापट
मराठी शाळेजवळ, मु.पो. दिवेआगर,
ता. श्रीवर्धन, जि. रायगड,
पिन - ४०२४०४.
मोबाईलः ९४२३८३७९६७, ९२७११२७३३७

मी फॅनीण आहे त्यांच्या उकडीच्या मोदकांची. :स्लर्पः

Pages