समर्थ

संहिता जुनी नवीन अर्थ मागते
अन्यथा विसर्जनास गर्त मागते

आज कोणत्या अटीत गुंतणार मी?
(भेट नेहमीच ती सशर्त मागते!)

कल्पनेस तेज, ओज, चेतना हवी,
ले़खणी सशक्त शब्द, अर्थ मागते

तोच घेउनी फिरे रिता कमंडलू,
काय त्या दयाघनास व्यर्थ मागते?

स्वत्व जागवील, राष्ट्र उद्धरील जो,
भूमि ही असा नवा समर्थ मागते

Submit to kanokani.com

व्वा व्वा मस्त

आज कोणत्या अटीत गुंतणार मी?
(भेट नेहमीच ती सशर्त मागते!) >>> आवडला

मतलाही मस्त

मस्तच स्मित

>> आज कोणत्या अटीत गुंतणार मी?
(भेट नेहमीच ती सशर्त मागते!)

व्वा!!

छान .गझल आवडली .

सशर्त.. लै आवडला! मस्तच!

व्वा! बहोत खूब!! स्मित

व्वा!! मस्त गझल!! सशर्त वाला शेर एकदम खास!!

क्या बात है क्रान्ति.....!!
कल्पना सगळ्याच एकदम नवीन !!
सशक्त लेखणी, सशर्त भेट एकदम जबरी स्मित

व्वा- गझल फार आवडली, पहिले तीन विशेष !

मस्तच !! स्मित वाटत्ये एकदम सोपी पण सही बांघलीये.. सशर्त, समर्थ मस्त आहेत..

गर्त म्हणजे काय ? तसचं "भूमि" मि र्‍ह्स्व आहे ??

तोच घेउनी फिरे रिता कमंडलू,
काय त्या दयाघनास व्यर्थ मागते?

सुंदर.

धन्यवाद मंडळी.
पराग, गर्त म्हणजे खोल खळगा. पाण्यातला भोवराच म्हणा ना! जुन्या संहितेला एक तर कालानुरूप नव्या अर्थानं अंमलात आणा, नाही तर बुडवून टाका!
भूमि शब्दात काव्यापुरती तडजोड केलीय. स्मित

मस्त! ग्रेट.

क्रांति, अतिशय सुंदर! स्मित
अशा लेखनाचं पुस्तक निघालं तर काय बहार येईल!

>>स्वत्व जागवील, राष्ट्र उद्धरील जो,
भूमि ही असा नवा समर्थ मागते

व्वाह !

व्वा! बहोत खूब!! वेगळीच !!

सुरेख गझल!

विषयही छान निवडला आहे

वा मस्त, अगदी खणखणीत प्रत्येक शेर.
सशर्त तर सहीच स्मित

धन्यवाद क्रांति... स्मित

आज कोणत्या अटीत गुंतणार मी?
(भेट नेहमीच ती सशर्त मागते!)

हा एकच आवडला.