मला काहितरी करायचंय..

Submitted by अजय on 15 February, 2010 - 00:50

प्रसंग -१
तो: मला काहितरी करायचंय.
मी: वा. छान. कुठल्या विषयात काय करायचंय?
तो: अमूक तमूक..
मी: मग थांबलायस कशाला?
तो: पाहतोय जरा सध्या.....

प्रसंग -२
ती: मी नेटवर्कींग सुरू करावं म्हणतेय.
मी: जरूर. मग काय केलंय त्यासाठी.
ती: अमुक तमुक ग्रूपची मेंबर झालेय.
मी: वा. छान. कुणाकुणाला भेटलीयस ग्रूपमधे? कुणाचा सल्ला विचारलास.
ती: नाही पाहतेय जरा सध्या.....

प्रसंग -३
तो: मला नवीन संकेतस्थळ चालू करायचंय. अमूक अमूक प्रकारचं.
मी: जरूर. आता संकेतस्थळ चालू करणं खूप स्वस्त आणि सोपं झालंय. आणि आता फु़कट जागा मिळते ती घेऊन सुरु करता येईल.
तो: फुकटच घ्यायचीय. पण पाहतोय मी जरा....

गेले अनेक वर्षं मी हे अनुभवतोय. व्यक्ती बदलतात. त्यांचे विषय बदलतात. कालावधी बदलतो. पण अंगात काहीतरी करावं असं वाटणारी इच्छा आणि प्रत्यक्षात काहीही न केल्याची सत्यपरिस्थिती हे मात्र सगळीकडे सारखंच. माझा एक जवळचा मित्र गेली १६ वर्षे नुसताच "पाहतोय". अजूनही "काहितरी" करायचा त्याचा उत्साह कायम आहे. यशस्वी उद्योजकांची चरित्रे आणि इतर स्फूर्तीदायक पुस्तके तो आनंदाने वाचत असतो. पण जे काही करायचं आहे त्यातलं ०.०५% ही त्याने काही केलेले नाही.

वर संकेतस्थळ चालू करणारा मित्र संगणक क्षेत्रातलाच आहे. म्हणजे तांत्रिक अडचण नाही. जागा कुठे फु़कट मिळते याचे १०-१५ पत्ते तरी त्याला ठाऊक आहे. पण प्रत्यक्ष अशा ठिकाणी जागा घेण्याचा मुहूर्त मात्र अजून लागतोय.

यातला थोडासा बदल करून अजून एक प्रकारचं उत्साही व्यक्तीमत्व असतं. यांच्याकडे भरपूर आयडीया असतात. पण प्रत्यक्षात त्यावर ते कधीच काम करत नाहीत. एकदा अशा एका मित्राने मला गोपनीयतेची शपथ घेऊन सॉफ्टवेअर मधल्या ४-५ आयडीया सांगितली. आयडीया चांगल्या होत्या. त्यावर त्याने माहितीही गोळा केली होती. हे झालं काही वर्षांपूर्वी. परत तो भेटला तेंव्हा मी चौकशी केली.

प्रसंग -४
मी: काय झालं तुझ्या कल्पनेचं.
तो: नाहीरे मायक्रोसॉफ्टने त्यांचं अगदी सेम प्रॉडक्ट आणलं.
मी : अरे छान. म्हणजे तुझ्या कल्पनेला मार्केट आहे हे सिद्ध झालं. मग तू दुसर्‍या छोट्या (Niche) मार्केटमधे काम का करत नाही? किंवा मायक्रोसॉफ्टच्या प्रॉडक्टवर Addon काही का तयार करत नाहीस?
तो: नाही रे. मला exactly मायक्रोसॉफ्टने जे केलं तेच करायचं होतं.
मी: Bad luck. पण तुझ्या त्या दुसर्‍या कल्पनेचं काय झालं.
तो: त्यावर Google ने exactly सेम प्रॉडक्ट काढलं. ते जाऊदे. तुझ्याकडे वेळ असला आणि तू कुणाला सांगणार नसला तर माझ्याकडे एक नवीन आयडीया आहे....

आपल्याला जी आयडीया आली आहे ती याच क्षणाला जगात हजार लोकांना तरी सुचत असेल ही जाणीवच त्याना नसते. त्यामुळे त्यातले काही शे जण ती प्रत्यक्षात आणून त्याची चाचणी करत असतील हे लक्षात येणं तर जाऊच द्या. बरं लक्षात आलं तरी दुसर्‍या कुणी ती आधी अंमलात आणली तर त्यांची लगेच निराशा होते. दुसर्‍यांच्या अंमलबजावणीला मर्यादा असू शकतील आणि तीच कल्पना थोडा फेरफार करून आपण स्वतः दुसर्‍या मार्केटमधे विकू शकतो हे त्यांना पटत नाही. नुसतं घराबाहेर पडलं तरी "खाण्याचे पदार्थ करून विकणे" ही हजारो वर्षे सार्‍या जगभर चावून चोथा Happy करून जुनी झालेली आयडीया, तिची विविध रुपे, विविध ग्राहकवर्ग आपल्याला दिसतात. आणि त्या कल्पनेची बहुतेक सगळी रुपं यशस्वी उद्योग करताना दिसत आहेत यांच्याकडेही या "युनिक आयडीया" वाल्यांचं दुर्लक्ष होतं.
आयडिया महत्वाची नसते तर तिची अंमलबजावणी (execution) महत्वाची असते हे ही त्यांच्या लक्षात येत नाही.

प्रसंग -५
तो: मला काहीतरी करायचंय
मी: मग लगेच आत्ता सुरु कर. (मी नाही, रामदासस्वामींनी सांगितलंय Happy त्यांचं थोडं ऐक). तुला आठवत नसेल तर "केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे" असं म्हणून गेले आहेत ते.
तो: म्हणजे लगेच नोकरी सोडून देऊ?
मी: लगेच नोकरी सोड असं नाही.

  1. पण आत्ता एका कागदावर कल्पना लिहून ती प्रत्यक्षात आणण्यासाठी पुढे काय करता येईल असं लिहून काढ.
  2. तुला जर काय करायचं हे माहिती नसेल तर पुढच्या ३ महिन्यात या विषयातल्या माहितगार व्यक्ती शोधून काढून त्यांना भेटून जास्त माहिती काढायची इतका निश्चय तर तुला करता येईल ना?
  3. आणि कुणिच माहीती नसेल तर पुढच्या १ महिन्यात तुझ्या २० मित्राना अशी माहितगार व्यक्ती कुठे मिळू शकेल असा प्रश्न विचारेन असा निश्चय करं.
  4. आणि हे सगळं या कागदावर लिहून सुरुवात कर. इतकं तर करता येईल ना तुला?

तो: येईल रे. पण पाहतो मी...

(सर्व प्रसंग सत्य घटनांवर आधारीत)

टीपः मराठी उद्योजक या ग्रूपमधला हा सार्वजनिक मजकूर आहे. या व्यतिरिक्त ग्रूपमधे इतर अनेक धागे आहेत जे फक्त सभासदांपूरते मर्यादित आहेत. या पानावर मराठी उद्योजक ग्रूपचे सभासद होण्यासंबंधी माहिती आहे.)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उरलेल्या १% लोकांमधले बहुतेक एकतर खिशात कवडी नसलेले असतात (नारायण मुर्ती वगैरे), किंवा प्लॅटीनमचा चमचा तोंडात घेऊन जन्मलेले असतात (मुकेश, अनिल..). मधली लोकं मधल्या मध्येच राहतात..

'मला उद्योजक व्हायचंय'वर परिसंवाद

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5709611.cms

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या महिला उद्योजक समितीतफेर् 'मला उद्योजक व्हायचंय' या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. शनिवार २७ मार्च रोजी सकाळी १०.३० वाजता, फोर्टमधील १२ के. दुभाष मार्ग, ओरिकॉन हाऊस, सहावा मजला, बाबासाहेब डहाणूकर सभागृहात हा परिसंवाद होणार आहे.

शाळा व महाविद्यालयांमधून शिक्षण घेऊन बाहेर पडलेला तरुण वर्ग, स्वेच्छानिवृत्ती घेऊन नवीन व्यवसाय करण्यास इच्छुक असलेले व विशेषत: वेळेनुसार व्यवसाय करू इच्छिणाऱ्या नव उद्योजक व महिला यांच्यासाठी या कार्यशाळेत विविध तज्ज्ञांचे मार्गदर्शन होणार आहे. तसेच उद्योग व्यवसायांना मदत करणाऱ्या संस्थांची ओळखही या परिसंवादात करून दिली जाणार आहे. बाजारपेठ मिळवण्याचे तंत्र, यशस्वी उद्योजकांचे अनुभवकथन, अर्थसाह्यासाठी सरकारी व अन्य योजनांची माहिती या कार्यक्रमात करून दिली जाणार आहे. हा परिसंवाद मराठीत होणार आहे.

हा परिसंवाद सशुल्क असून नोंदणी व अधिक माहितीसाठी चेंबरचा पत्ता : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री, ओरिकॉन हाऊस, ६ वा मजला, १२ के दुभाष मार्ग (म्युझियमच्या मागे) लायन गेटजवळ, मुंबई ४००००१. फोन (०२२) २२८५५८५९ किंवा ९८२१३४०८८८.

मला फुड प्रोसेसिंग युनिट्स बद्दल माहिती हवीय. जसे टोमॅटो केचप/सॉस, कॉर्नफ्लोअर, आले लसुन पेस्ट इ. युनिट टाकायचे असेल तर काय करावे लागेल. माझ्या शेतात टोमॅटो, लसुण, कांदे, मका, डाळींब व इतर थोड्याफार भाज्या इ. लागवड केली जाते.

अनेक किर्लोस्कर उभे रहावेत
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5887629.cms

महाराष्ट्रात उद्योगाचा वेग खूप वाढतो आहे. पण अजूनही, बरेच साध्य करायचे आहे. गेल्या ५० वर्षांत राज्याने जेवढी प्रगती केली तेवढीच पुढच्या पाच वर्षांत करण्याचे ध्येय आपण ठेवायला हवे. मराठी माणसांसाठी आदर्श असणा-या किलोर्स्करांसारखे अनेक उभे रहायला हवेत, असे मत उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.

मुंबईच्या पीपल्स आर्ट सेंटरतफेर् विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींना सोमवारी 'कै. शंतनूराव किलोर्स्कर गौरव पुरस्कारा'ने गौरवण्यात आले. यात ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू, साहित्य संमेलनाध्यक्ष द. भि. कुलकणीर्, पी. ए. इनामदार, डॉ. एन. आर. कुणचगी, प्रकाश देशमुख, पी. व्ही. मन्सूरे, एम. जी. खांडकर आदींचा समावेश आहे. गिर्यारोहक कृष्णा पाटील, खेळाडू धनराज पिल्ले, शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर, उद्योजिका अनू आगा यांच्यावतीने अन्य प्रतिनिधींनी पुरस्कार स्वीकारला.

राज्यात मोठे-मोठे उद्योग उभे रहात आहेत. प्रगतीचा वेगही चांगला आहे. पण काय आहे याचा सकारात्मक विचार करायचे सोडून बऱ्याच जणांना उणीवा काढण्याची सवय असते. महाराष्ट्र म्हणजे संतांची, योद्ध्यांची आणि विचारवंतांची भूमी आहे असे भुजबळ यांनी नमूद केले. मराठी माणसासाठी किलोर्स्कर म्हणजे आदर्श, मराठी माणूस व्यवसाय करू शकत नाही या संकल्पनेला त्यांनी छेद दिला. त्यांच्यासारखे अनेक जण उभे रहायला हवेत, असे ते म्हणाले.

या ग्रूपने प्रचंड प्रेरणा दिलीय, त्यामुळे गेल्या १-१.५ वर्षापासून नुसतेच करू-करू म्हणून चालढकल करणार्‍या मी व माझ्या मित्रांनी एका उद्योग कल्पनेवर काम सुरू केलय आणि आत्ता सर्वजण पूर्ण उत्साहाने यावर काम करतायत. बिझनेस प्लान बनवण्यापासून मार्केट सर्वे, लोन प्रसिजर्स पर्यंत व इतरही अनेक बाबी कळतायत व आम्ही त्या शिकतोय.

मला काहितरी करायचय या वरील प्रसंगातील प्रसंग ५ तरी सध्या अनुभवतोय. Happy पुन्हा एकदा अजय व इतर सहभागी सदस्यांचे आभार.

संजय
या पानावर http://www.maayboli.com/node/13459 ग्रूपचे सभासद कसे होता येईल याचि माहिती आहे.

रंगासेठ, सुरुवात केल्याबद्दल अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा !

एक सांगू का

काहीतरी जबरदस्त मानसिक घुसमट फेस करावी लागली. काहीतरी जिव्हारीच लागलं किंवा अगदीच आर्थिक प्रश्न पुढे उभे राहिले तर आपण हातपाय हलवतो. अगदी तिडिकेने मला यशस्वी व्हायचेच आहे असे वाट्ले पाहिजे, मला दुसर्‍याचा हस्तक्षेप नको. मला पैसे कमवायचेच आहेत अश्या थेट काळजाला भिड्णार्‍या भावना मनात उमटल्या तर त्यातून एखाद्या धड्पडीचा जन्म होउ शकतो.

मोत्याचे कल्चर बनविताना शिंपल्यात आरामात राहणार्‍या जिवाला काहीतरी टोचतात. शिंपल्यात एखादी इंप्युरिटी सोड्तात अग्दी वाळूचा कण वगैरे. मग ते टोचू नये म्हणून तो प्राणी त्यावर मोत्याचे आवरण चढवतो. तसे आहे. मी इथे नवर्‍याच्या हाताखाली काम करत होते तेव्हा मला नेहमी वाटायचे तो सांगेल तेवढे काम करावे. हे असेच वर्षानुवर्षे चालवावे जमेल तसे फ्रीलान्स लिहावे. थोडे शॉपिन्ग थोडे हे ते करावे. आताही मला नियमित पगार, सांगितलेले काम व बॉस वर जबाबदारी देणे याचे कधीतरी आकर्षण वाट्ते ना. पण ते क्षण गेले कि वाट्ते. आहे त्यातून अजून काही तरी नवे घड्वावे. आपल्या चुका सुधाराव्या कितीतरी शिकण्या सारखे असते ते शिकावे व त्यातून नव्या संधी शोधाव्या. स्टेट्स को किंवा कंफर्ट झोन मधून बाहेर पड्ण्याचा किंवा रूड्ली हाकलले जाण्याचा एक क्षण अस्तो तो आपल्या उद्योजकतेच्या जन्माचा क्षण बनू शकतो.

स्टेट्स को किंवा कंफर्ट झोन मधून बाहेर पड्ण्याचा किंवा रूड्ली हाकलले जाण्याचा एक क्षण अस्तो तो आपल्या उद्योजकतेच्या जन्माचा क्षण बनू शकतो. >> लाखमोलाची बात..! नोकरीच्या ठिकाणी झालेल्या भांडणाचेच मला निमित्त झाले होते. बाहेर पडलो तेव्हा काय करायचे, इथून सुरुवात होती. पण मग कुणाचे बघून, कुणाच्या हाताखाली, कुणाच्या सोबत असे करायचे नव्हते. अचानकपणे (काही माहिती, ज्ञान, अनुभव, पैसे, पार्श्वभुमी नसताना) हे असे स्वयंभू उभे राहण्याचा प्रयत्न महागात पडू शकतो. पण आय वाँटेड टू गो थ्रु ऑल दॅट. चुका करायच्याच होत्या मला. कारण त्याशिवाय शिकणार तरी कसे? बरोबर काय आहे, हे कळणार कसे? झालेल्या चूका, मिळालेले फटके- हीच त्या 'बरोबर काय आहे'- ते कळण्याची किंमत असते. ही किंमत देताना थकू, कोलमडू शकतो. पण ते आयुष्यभरासाठीचे संचित ठरते, हे नक्की.

उत्तम पोस्ट साजिरा. आल्दबेस्ट.

मी पण खूप विचार केला मला मानसिक द्रुष्ट्या ग्रोथ हवी आहे. Subconsciously speaking, I am standing in a very very large warehouse with lots of closed rooms. It is flooded in blinding white natural light. I have to think and open all the doors just to know what is behind. whether it will decimate me or will I be able to ride it? I won't know unless I find out myself.

इन्सेप्शनचा हँगओवर आहे. माहीत आहे. Happy

गेले अनेक महिने/वर्षे विचार करुन आता अमेरिकेत आयुर्वेदिक कन्सल्टिंगचा व्यवसाय सुरु करण्याच्या दृष्टीने पावले उचलत आहे. सर्वांचे सल्ले/मार्गदर्शनासाठी डीटेल लिहीणारच आहे परंतु आता एक माहिती हवी आहे. वेबसाइट सुरु करायची आहे. मायबोलीवर कोणी माहीतगार असेल तर प्लीज कळवा. योग्य तो मोबदला देण्याची इच्छाही आहे. किंवा तुमच्यापैकी कोणी स्वतः सुरु केली असेल आणि काही सूचना असतील तर लिहा. आगाउ धन्यवाद.

http://suryaayurveda.com/default.aspx

ज्ञाती.. हे संकेत स्थळ बघ. इथे माझा नवरा योगा cansalting देतो.. बाकीच्या २ जनी नर्स आहेत.. आणि एक इन्व्हेस्टर आहे.. पर्यायी मेडिसिन म्हणून इथे उल्लेख होतो तेव्हा नर्स सोबत असली पाहिजे.
हय्वरून तुला थोडी कल्पना येयील कि काय काय ठेवायला पाहिजे. ह्यांनी आधी मार्केट सर्व्हे केला.. योगा वगैरे पिक अप होत नाही .. कारण योगा साठी खूप खूप मार्केट आहे .. कोणाशी तरी असोसियेत राहणं इथे गरजेच असतं.. तेव्हा ते हि लक्षात घे बाकी तुला काही प्रश्न असतील तर सांग मी नवर्याला विचारून सांगेल.

वा,वा!
मला आवडला हा धागा.
इतके दिवस पाहिला नव्हता.
माझा व्यवसाय हा तसा उद्योजक स्वरूपाचा नाहि पण किमान २०-२५ जणांना कायमचा रोजगार मिळेल असा आहे.
उदा. साधारण २५ बेडचे हॉस्पिटल आणि आय.सी.यू.
आम्ही पण मागचे ३-४ वर्ष थांबलोय किंवा पहातोय. Happy
त्यात १ वेळा बेसही बदलून झाला. दुसरं गाव्,दुसरे राज्य.
मागचे सहा महिने नोकरी सोडून आणि पूर्णवेळ प्रॅक्टिस करून स्वतःचा पेशंट बेस वाढवलाय. अगोदर नोकरि करून प्रॅक्टिस्,घर बाळ काहीच नीट जमत नव्हते.
नवर्‍याच्या स्पेशलायजेशनमुळे त्याला नोकरी आणि प्रॅक्टिस दोन्ही जमते.
मला माझ्या उद्योगधंद्यासाठी नोकरी सोडायला त्याने अगदी मनापासून सहकार्य केलंय. त्यामुळे बायकांच्या उद्योगांसाठी नवरे त्यांना नोकरी सोडु देत नाहित हे किमान माझ्या बाबतित खरे नाही.
सध्या आम्ही दोघे एक १५ बेडचे नर्सिंग होम चालवतो.
इथे आय.सी.यू. ची कंसेप्ट नाही.
जरा सिरीयस पेशंट असेल तर २०० कि.मी. पर्यंत अंतरावर ३ मोठी शहरे आहेत तिथे जावे लागते. तिथे खर्च पेशंटना परवडत नाही मग कित्येक पेशंट उपचाराअभावी जातात.
आय.सी.यू. चांगल्या आणि परवडेल अशा दरात इथे चालू करण्यासाठी आमच्याच वयाच्या काही लोकांना घेऊन
प्रयत्न सुरू केले. जागेचे रेट अवाच्या सवा होते.६ जणांनी मिळून जागा घेतली त्याला आता १ वर्ष झालं. अजूनही थांबतोय्,बघतोय चालूच.
आता शेवटी एक फायनान्सर गाठून त्याच्या ट्रस्टच्या नावाखाली आम्ही दोघंच (मी आणि नवरा) हॉस्पिटल चालू करतोय. खूप थांबलो आणि बघितलं आता कामही केलं पाहिजे या सगळ्यावर Happy

मला कोणीही सांगू शकेल का कि पोस्टाचे पैसे घेऊन जातात ना बरीही महिने अशी माझी दर महिन्याची ३००० हजाराची आहे. आता माझ्या आईला मला पोस्टाच्य agency उघडून द्यायची आहे त्याला काही तिला परीक्षा द्यावी लागेल का कोणालाही माहित असेल तर मला माहिती द्या
खूप मदत होईल
माझा मोबिले नो. ९९३०९६९६११( जेणे करून तीही काही उद्योग करू शकेल. )

साती, तुम्ही कोणत्या देशात रहाता?
(अर्थात त्याने काय फारसा फरक पडत नाहीच, जागेचे भाव वगैरे बाबी सगळीकडे सारख्याच!)
तुमच्या भावी योजनान्ना मन:पूर्वक शुभेच्छा, नेटाने प्रयत्न करीत रहा, चिकाटी सोडू नका अन धीर धरुन असा! Happy

लिंबू धन्यवाद.
मी आपल्या प्रिय देशातच रहाते. Happy
आता जागा बघायची गरज सुदैवाने उरली नाही.
१ मे पासून बहुदा आय.सी. यू. सुरू होईल. ३ वर्षांचे डिल आहे.
जय फायनान्सर.
बाकी तुमची डोंगर रानाची कल्पना आवडली. मी पण या महिन्यात १-२ जागा बघून आलेय कोंकणात. बघू.

साती तुम्ही आंध्रा मधे आहात ना? माझे एक मोठे ग्राहक आहेत ते त्यांच्या जैन कम्युनिटी तर्फे खूप चॅरिटी वर्क करत असतात ­. एकदा हैद्राबादेत आलात तर त्यांना भेटू तुम्हास फंडिंग व त्यांच्या पेशंट्स ना चांगली वैद्यकीय सेवा उपलब्ध होइल. जरूर विपू करा.

वरिल सर्व लेखन वाचुन नविन उमेद मिळाली .प्रथम धन्यवाद सर्वाचे..
मी सिडनीत राहते. मला स्वताचे लेडिज पार्लर घरि सुरु करायचे आहे , माझे सर्व कोर्सेस पुण्यात झाले आहेत, तसे सध्या घरि थोडेफार clients येतात्.पण व्यवसाय वाढवियासाठी काय करु? शिवाय Products हि हवे आहेत. सुरुवात शुन्यातुन आहे क्रुपया आपले मार्ग दर्शन हवे आहे. मला काय अडचनी येऊ शकतिल त्या पण सुचवा.

वसु, तुमची विपु बघा. मला असलेली थोडी माहीती तिथे लिहीली आहे. मी या धाग्याची सदस्य नसल्याने आणि व्यवसायिक नसल्याने ईथे लिहीले नाही.

मी या गृपचा सभासद नाही आहे. फक्त एक माहिती म्हणुन विचारतोय. कि मिल्क प्रॉडक्ट्स विकण्याचा कुणाचा बिझिनेस आहे का इथे जॉइन असलेल्यां मध्ये? मुख्यत्वेकरुन पनीर.

Pages