पुण्यातील तत्त्ववेत्ते व ज्योतिषी केदार जोशी यांनी भगवद्गीतेचे सैतानी श्लोक (The Satanic Verses of Bhagavad-gita) असा लेख इंटरनेटवर प्रसिद्ध केला असून त्याद्वारे गीतेला त्यांनी हिंदू दहशतवाद असे म्हटले आहे.
गीतेनुसार (श्लोक 9:32) स्त्रिया ह्या नीच कुळातील आहेत. त्या ब्राह्मण या संज्ञेखाली येत नाहीत. त्यांनी ब्राह्मणांचे कार्य केल्यास त्या अधार्मिक ठरतात. दुष्कृत्य करणार्यांचा नाश करण्यास व धर्माचे पुनरज्जीवन करण्यास भगवंत जन्म घेतात. म्हणजेच अशा (आधुनिक) स्त्रियांना गीतेने जीवे मारण्याची धमकी दिलेली आहे. तसेच जर श्रीकृष्णाला अर्जुनाच्या प्रतिपक्षाचा मृत्यु रचता येत असेल तर त्यांना काहीही रचता येत असेल, आणि असे असताना ते सर्व चांगल्या गोष्टीच का रचत नाहीत? जगात पाप व दुःख यांना त्यांनी स्वतःच्या हीन मनोरंजनासाठी थारा दिलेला आहे का? आणि अशा प्रकारे भगवान श्रीकृष्ण हे सैतानच नाहीत का? अशा स्वरूपाची ही टिका आहे. याचबरोबर गीतेचा दुःखाकडे पाहण्याचा दृष्टीकोन व आत्मा या संकल्पनेवर ही टिका आहे. वॉशिंग्टन स्क्वेअर न्यूज या सुप्रसिद्ध दैनिकातील एका इस्लामविषयक लेखात जोशी यांच्या लेखाचा संदर्भ आढळला. आणखीनही काही वेबसाइट्सवर त्याचा संदर्भ आहे.
मां हि पार्थ व्यपाश्रित्य
मां हि पार्थ व्यपाश्रित्य येSपि स्यु: पापयोनय: I
स्त्रियो वैश्यास्तथा शुद्रास्तेSपि यांती परां गतिम II
हा ९ व्या अध्यायातील ३२ सावा श्लोक आहे.
त्याचे भाषांतर साधारण 'वाईट प्रवृत्तीच्या बायका, व्यापारी आणि शुद्रांपोटी जन्म घेणा-यांनीही जर माझ्या चरणी आश्रय घेतला तर त्यांना मोक्षप्राप्ती होईल' असे होईल. इथे बायकांना देण्यात आलेली धमकी कुठे? उलट कितीही वाईट उगम असला तरी पुढे जाऊन चांगले काम केले तर शेवट चांगला होईल असे इथे म्हटलेय असे मला वाटते.
बाकी अर्थाचा अनर्थ करायचा झाला तर काहीही कसाही करता येईल. आता इंटरनेटमुळे आपल्या डोक्यातला अनर्थ जगात सगळीकडे पसरवता येतो.
तुका म्हणे ऐशा नरा मोजून
तुका म्हणे ऐशा नरा मोजून माराव्या पैजारा....... प्रसिद्धीसाठी लोक हल्ली काहीही करतात..
साधनानी सांगितलेला अर्थ बरोबर वाटतो.
साधनाला अनुमोदन.
साधनाला अनुमोदन.
तुका म्हणे ऐशा नरा मोजून
तुका म्हणे ऐशा नरा मोजून माराव्या पैजारा.......>>>
=======================================
सहमत १००%
"असे जर मित्र असतील तर शत्रू
"असे जर मित्र असतील तर शत्रू कशाला पाहिजेत" अशा स्वरूपाचा हिन्दी वाक्यप्रचार आहे. तो केदार यांना नक्की लागू होतो असे मला वाटते.
तुका म्हणे ऐशा नरा मोजून माराव्या पैजारा.......>>>
=======================================
सहमत १००%
शरद
याचा अर्थ केदार जोशी माझे
याचा अर्थ केदार जोशी माझे मित्र होते असा होत नाही.
शरद
संस्कृत भाषेत एका शब्दाचे
संस्कृत भाषेत एका शब्दाचे अनेक अर्थ होतात. नरपुङ्गव म्हणजे बैल तसेच नरातील श्रेष्ठ असे दोन्ही अर्थ होतात. इथे बैल हा शक्तीचे प्रतीक मानला आहे, म्हणून बैलासारखा शक्तिमान या अथाने हा शब्द स्तुतिकारक होऊ शकतो.
पण बैलोबा या अर्थाने फारशी अक्कल नसलेला या अर्थानेहि हा शब्द वापरता येईल. तर कशातून काय अर्थ काढायचे हे संदर्भावर व तुमच्या मनात काय आहे यावर अवलंबून आहे.
जर हिंदूंचे सगळे वाईट असे मनात पक्के ठरवले, तर कशातूनहि कसलाहि अर्थ काढून काही पण मुद्दा मांडता येतो.
हिंदूंच्या दुर्दैवाने आजकाल स्वदेश, स्वधर्म, व स्वभाषा यांच्याबद्दल बर्याच लोकांना प्रेम उरले नाही. असे लोकच असले अर्थ काढू शकतात.
केदार जोशी अर्थशास्त्रावरून
केदार जोशी अर्थशास्त्रावरून भगवद्गीतेवर कधी घसरले ?
केदार जोशी: खालील गाण्यातून,
केदार जोशी:
खालील गाण्यातून, पूर्वी महाराष्ट्रात काळ्या लोकांना गुलाम म्हणून वागवले जात असे व त्यांची रीतसर खरेदी विक्री होत असे निष्कर्ष काढून लिहा.
"बाइ मी विकत घेतला श्याम
..गुलाम काळा नंदाघरचा. ...
जितुके मालक तितुकि नावे...
तेव्हढीच आणखी निंदा स्वदेश, स्वधर्म यांची. त्यासाठीच तुम्ही अवतार घेतला आहे ना!
उगाच शब्दांचे काहीहि अर्थ लावायचे, संदर्भ बघायचा नाही, वाट्टेल ते लिहायचे! पु. लं च्या भाषेत, 'एकेका शब्दाचा अर्थ लावायला जाल, तर मूळव्याध उपटेल'
अहो हा केदार तो केदार वाटत
अहो हा केदार तो केदार वाटत नाही. हितगुजवरच दोन केदार जोशी आहेत.
हा केदार तो केदार नाहीच.
हा केदार तो केदार नाहीच. त्याच्या लेखांवर वेगळाच फोटो आहे.
I was born on 31 December
I was born on 31 December 1979, at 07:30 AM, in Mahim, Mumbai, India. (Precise birth
details are given for astrological reasons.) I went to Balmohan Vidyamandir, in Dadar,
Mumbai, for school education, and Sir Parashurambhau College, in Pune, for higher
education. I was in Cambridge, England, from March 2004 to March 2006.
My philosophical works are collectively called "Superultramodern Science and
Philosophy". They mainly include two theories viz. "The NSTP (Non - Spatial
Thinking Process) Theory" and "The UQV (Ultimate Questioner's Vanity)
Theory". I wrote the first versions of the NSTP theory and the UQV theory in 2002
and 2007 respectively.
वरील माहिती केदार जोशीच्या http://works.bepress.com/kedar_joshi/ ह्या ब्लॉगवर मिळते.
माहिममध्ये जन्मलेल्या, बालमोहन मध्ये शिकलेल्या तरुण मुलाला गीतेमध्ये हिंसाचार कसा दिसु शकला?
'दुष्कृत्य करणार्यांचा नाश करण्यास व धर्माचे पुनरज्जीवन करण्यास भगवंत जन्म घेतात आणि त्याच भगवंतानी एका श्लोकात वाईट चालीच्या स्त्रियांचा उल्लेख केलाय'. ह्या दोन गोष्टींचा बादरायण संबंध जोडुन भगवानांनी स्त्रियांचा नाश करण्याचा विडा उचललाय असा विचार डोक्यात येण्याइतके डोके कसेकाय, कुठे आणि कधी फिरले? की अतिशिक्षणाने माणसाला आहे ते दिसेनासे आणि नाही ते दिसायला लागते??
http://works.bepress.com/cgi/
http://works.bepress.com/cgi/viewcontent.cgi?article=1025&context=kedar_...
----------------------------------------------------------------------------
तुफान विनोदी लेख आहे हा
त्या सईट्वर पाच मिनिटात माझे
त्या सईट्वर पाच मिनिटात माझे डोके दुखु लागले.
कृपया इथे टी आर पी वढवू नकात प्लीज.
अनुल्लेखच उचीत ठरेल.
तो कदिर जोशी असेल.....
तो कदिर जोशी असेल.....
कादिर ए जैश..........
कादिर ए जैश..........
अनुल्लेखच उचीत ठरेल. बरोबर
अनुल्लेखच उचीत ठरेल.
बरोबर आहे. मोजुन माराव्या पैजारा म्हणुन का होईना लोकांनी आपल्याला शोधावे हीच इच्छा असेल जोश्यांची.
अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या
अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या झालेल्या लोकांचे विचार मनावर घ्यायचे नसतात.
केदार साहेबांच्या विचारांना " लेखन स्वातंत्र्याचा दुरुपयोग" या folder मधे गाडून मोकळे व्हा.
गीतेमधील अनेक श्लोक
गीतेमधील अनेक श्लोक प्रक्षिप्त (मागाहून घुसडलेले) आहेत, असे वाचनात आले होते.
चातुर्वण्यं मयं सृष्ट्या गुणकर्मविभागशः
जन्मना जायते शूद्र, संस्कारात द्विज उच्चते
हा श्लोक त्यातलाच असे म्हणतात.
आपल्याला पटेल तेवढे घ्यावे (यद् रोचते तद् ग्राह्यं)
संपूर्ण पुस्तक वाचल्यावाचून त्याला नावे ठेवणारा 'तो एक मूर्ख', असे समर्थ रामदास दासबोधात म्हणतात. त्याची आठवण झाली.
झाले सुरु रामायण , माहाभारत ,
झाले सुरु
, 
रामायण , माहाभारत , गीता , बायबल , कुराण , गुरुग्रंथसाहेब व महापुरुषाचे ग्रंथ आत्मचरित्र याबद्दल कोण काय लिह्तो , बोलतो आणी तुम्ही लोक याने त्याने ,इथे तिथे ,असे लिहले आहे याचे संशोधन करतात ...वेळ जात नाही का ?
जगात कितीतरी विषय आहेत , प्रश्न आहेत , घडामोडी आहेत , या वर थोडे संशोधन करा .
केदार जोशीं ना काय सांगायचे असेल आणि तुम्हाला कोणता अर्थ काढायचा असेल हे तुम्ही सगळे आणि केदार जोशी यांनाच माहीत .
मला म्हणायचे इतकेच की , "भगवतगीता हा हिन्दु दहशत वाद - केदार जोशीचे मत" . हा काय मागोवा होउ शकतो? .
हसावे की रडावे काहीच कळत नाही .
केदार जोशी, तुमच्या नावाने
केदार जोशी, तुमच्या नावाने बोंबा चालु आहेत.
येऊन खुलासा करा.
"तो मी नव्हेच"
केदार जोशीचा पत्ता द्या
केदार जोशीचा पत्ता द्या रे!
मनसे-सेना मधे आपले बरेच मित्र आहेत. हा का ना का
श्री. एम् कर्णिक यांना विनम्र
श्री. एम् कर्णिक यांना विनम्र आवाहन..
"मुकुंदा,
सध्या मा.बो. वर केदार जोशी नावाच्या गृहस्थाने श्रीमद् भगवद् गीतेवर काहीबाही भाष्य प्रकाशित केले आहे. आपण श्रीमद् भगवद् गीतेवर लेखन केले आहे. आपला अभ्यास असेलच. आपण काही मत व्यक्त करू शकाल काय?
शरद"
शरद
शरद, केदार जोशींची ही उठठेव
शरद,
केदार जोशींची ही उठठेव माझ्या निदर्शनास आणून दिल्याबद्दल आभार.
सवंग लोकप्रियतेसाठी काहीही विधाने करायची एक प्रवृत्ती असते. केदार जोशी महाशयांकडे ती प्रवृत्ती आहे असे म्हणावेसे वाटते. त्यानी निर्देशित केलेल्या श्लोकाचा (अद्याय ९ / श्लोक ३२) सरळ अर्थ असा आहे:
माझा आश्रय घेऊन स्त्रिया, वैश्य, शूद्र तसेच पापातून जन्मलेले लोकही परम् गती प्राप्त करतात.
यामधे स्त्रियांना जीवे मारण्यासाठी श्रीकृष्णाचा अवतार आहे हा साक्षात्कार या महाशयाना कसा झाला आणि भगवद्गीतेत हिंदु दहशतवाद कसा आणि कुठे दिसला हे एक कोडेच आहे. या तर्कदुष्ट विधानासाठी ते 'परित्राणाय साधूनाम्' (अध्याय ४ / श्लोक ८) या श्लोकाचा आधार दाखवतात. हा अव्यापारेषु व्यापार म्हणजे केवळ ओढून ताणून out of context referenceने उधळलेलीच मुक्ताफळे आहेत. शिवाय केवळ Satanic Verses वाल्या सलमान रुश्दीच्या जोडीने आपल्यालाही 'येनकेन प्रकारेण' प्रसिद्धी मिळावी यासाठी जोशीनी केलेला हा केविलवाणा प्रयत्न आहे. मुसलमानाने कुराणातली Satanic Verses दाखवली मग आपण हिंदु असल्यामुळे भगवद्गीतेला Satanic Verses म्हणून रुश्दींच्या पाटाला पाट लावून बसावे ही त्यांची महत्वाकांक्षा असावी.
मला या गृहस्थांचे The Satanic Verses of Bhagavad-gita हे लिखाण वाचायला मिळालेले नाही. आणि त्यात असेच अकलेचे तारे त्यानी तोडलेले असतील तर ते कुणी वाचावे इतपत लायकीचेही वाटत नाही.
आधी उत्तर काढुन नंतर त्याला
आधी उत्तर काढुन नंतर त्याला गणितात बसवायचा हा उपद्व्याप फक्त सवंग प्रसिध्दि करता केलेला दिसतोय. स्वतःचे अज्ञान कळावे एवढीही बुद्धी ईश्वराने देउ नये, दुर्दैव, दुसरं काय?
भांडारकर इंस्टीट्युटमध्ये तोडफोड करणार्यांनी तरी, आपण ज्याच्या विरोधात विध्वंस करतोय ते साहीत्य कुठे वाचलं होतं?
भांडी फोडा, चिंध्या गुंडाळा पण प्रसिध्दि मिळवा, त्यातलाच प्रकार.
तुका म्हणे ऐशा नरा मोजून माराव्या पैजारा.......>>>
हेच योग्य!