सरसगड (पाली)

Submitted by जिप्सी on 24 January, 2008 - 00:02

ही भविष्यातील एका मोठया सरस छायाचित्रकाराची सुरवात आहे ,
जिप्स्या Happy या आकाशपाळण्याचे विविध सुंदर रंग तुला आयष्याच्या प्रत्येक वाटेवर मिळोत आणि तु ते बंदिस्त करुन प्रचिंच्या स्वरुपात आमच्या पर्यंत पोहोचव पुढील वाट्चालीसाठी शुभेच्छा Happy

वाह.

जिप्स्या - नशिब तु सरसगडाचे सगळे फोटो टाकले नाहीस. नायतर मी झब्बू टाकलाच असता. सध्या तुझे फोटो आले की मी माझा झब्बू तयारच ठेवतो...
जाऊ दे यावेळी नाही टाकत...पुन्हा कधीतरी...सरसगडाचे काही पावसाळी फोटो आहेत. ते योग्य वेळी टाकीन म्हणतो.
रच्याकने हा फोटो कधीचा आहे...जत्रा कसली होती?

वरील रहाटपाळणा पाली येथील गणपतीउत्सवातील यात्रेतील आहे. पाली येथील सरकारी दवाखान्यासमोरील प्रांगणात हे पाळणे उभे केले जातात. ह्याच पावसाळ्यानंतर आम्ही येथील सरसगडावर गेलो होतो. तेथील काही छायाचित्रे आपण येथे पाहू शकतात. (एखादे छायाचित्र येथेच टाकणार होतो. पण जास्त छायाचित्रे असल्याने मग स्वतंत्र धागाच काढला.)

ही भविष्यातील एका मोठया सरस छायाचित्रकाराची सुरवात आहे

>> अगदी अगदी.. तुमचा आशिर्वाद खरा ठरला आणि असाच ठरत राहुदे.