अभिप्राय तुमचे

मायबोलीच्या हितगुज दिवाळी अंक २००७ बद्दलच्या आपल्या अभिप्रायांचे नुसते स्वागतच नव्हे तर ते वाचण्याची आम्हाला उत्सुकताही आहे. तेव्हा अंकाबद्दलचे आपले अभिप्राय आम्हाला इथे जरुर कळवा.
-संपादक मंडळ

मुखपृष्ठ

मुखपृष्ठ उत्तम, बासरी सुरेल, अंकाचा लेआउट मस्त. अंक वाचला नाही अजुन तरीही 'देखण्या अंकाला'प्रतिक्रिया दिल्याशिवाय राहावल नाही.
संपादक मंडळाने घेतलेली मेहनत जाणवते.
आत्तापर्यंत असामी ची लांडगा वाचली , कथा म्हणुन उत्तम पण security, loss prevention setup मधे आणि २ गोष्टी असतात १- कोणताही मेजर आलार्म कन्ट्रोल dual combination नेच disable करता येतो, एक कोड घालुन नाही -२- bank मधे cashier/alarm controll रुम ऍक्सेस कन्ट्रोल्ड असते ज्याचा log maintain होतो. तसेच या भागात motion detector coupled PTZ (pan tilt zoom) camera आणि recorder असतो. त्यांमुळे तांत्रिकदृष्ट्या ही कथा नाही पट्ली.

vinay C ने काढलेले व्यंगचित्रपण आवडले

सुंदर अंक

मुखपृष्ठ आणि एकुण मांडणी मस्तच.
संपादकीय आवडले.
अजुन पुर्ण अंक वाचुन व्हायचा आहे. पण हलके-फुलके विभागातील 'मॅच' वर click केले की error येते ("Access denied
You are not authorized to access this page.'' )

सुंदर अंक काढल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन!
शुभ दीपावली!!

- महागुरु

सुंदर!

जसा वाचतोय तशी प्रतिक्रिया देतो, डिझाईन खूप छान आहे. GPS एकदम धमाल, 'चाय' ने बर्‍याच आठवणी जाग्या केल्या. संदीप, तू ही गरवारेत होतास काय? 'मयुरेश्वर' वरून वाटले.
तो 'मॅच' चा error मला ही आला.
बाकी अजून वाचून सांगतो.
संपादक मंडळ आणि 'श्रेयनामावली'तील सर्वांचे अभिनंदन!

अहा....!!

आत्ताच दिवाळी अंक बघितला....... स्मित यावर्षीचा अंक सुद्धा भारी देखणा झालाय स्मित उघडल्याबरोबर प्रसन्न वाटतंय.

अभिजित..... क्या बात है........अतिशय सुरेल आणि तरल सूर आहेत रे तुझ्या बासरीचे.... स्मित

संपादक मंडळ, आणि श्रेयनामावलीतले सगळे जण....... तुमचं मनापासून अभिनंदन स्मित

अजून फ़क्त चाळणं झालंय. जसंजसं वाचून होईल तशातशा प्रतिक्रिया देईनच.

स्वाती तुझं गाणं ऐकलं .... सगळ्यात पहिले. अ प्र ति म !!! हा एकच शब्द सुचतोय माझ्या तोकड्या बुद्धिला. तुला गोड गळ्याची देणगी मिळालीये गं....! छान छान काव्य आणि त्याला साजेसा सूर....... क्या सही combination आहे यार !! मजा आ गया जानेमन स्मित अशीच गाती रहा गं.....! वैभव चे शब्द आणि विवेकचं संगीत उत्कृष्ठ आहेच स्मित

सगळी रेखाचित्रं, प्रकाशचित्र सुरेख !!

अभीप्राय

सुंदर अंक!
अगदी डोळ्यात झोप होती तरी जागून वाचून काढला अंक. आवडीने आणि अगदी मायबोलीवरील प्रेमाने माझा अभीप्राय देतेय् ,(अजून बराच वाचयचाय)

सारीपाट : गोष्ट आवडली ....... संसार म्हणजे ... हा भाग आवडला सुमॉ.
अबोली: माझ्या डोळ्यात पाणी आले पूनम.
घरचा पाहुणा : एकदम मान डोलवली. अगदी जवळचाच अनुभव असाच घरात झालेला.
सुखात्मे : शेवट काही कळला नाही.

उद्या पुर्ण अंक वाचेन...........

सावरिया..

अजून अंक पूर्ण वाचलाही नाहीय. पण स्वाती, तुझं गाणं ऐकलं आणि राहवेना. अप्रतिम गोड गळा आहे ग तुझा. फारच सुरेख. जयूला पूर्ण अनुमोदन. आज दिवाळीच्या सकाळी तुझं गाणं ऐकलं अन सारं घरच संगीतमय होऊन गेलं. अशीच गात रहा.
वैभवची कविताही तोडीस तोड देखणी.
संपादक मंडळ आणि श्रेयनामावलीतल्या सर्वांचंही अगदी मनापासून अभिनंदन.

सुरेख

अतिशय सुंदर दिवाळी अंक. मुखपृष्ठ विशेष आवडले.

सुरेल अंक

अरे वा! काय सुरेल सुरवात आहे...आखिव्-रेखिव अंक अगदि देखणा झाला आहे..मुखप्रुष्ठ खासच!
कलर स्किम आवडलि..फ॑क्त चाळलाय.
पुढिल प्रतिक्रिया नंतर.....

'मॅच' चा दुवा दुरुस्त केला आहे.

महागुरु, farend - लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद. 'मॅच' या कथेचा दुवा दुरुस्त केला आहे.

छान जमलाय

छान जमलाय दिवाळी अंक. सगळ्या गोष्टी अजून वाचल्या नाहीत पण ट्यु, दाद, संघमित्रा ह्यांच्या लिखाणाची भट्टी छान जमून आलीये.

अप्रतिम मुखपृष्ठ !!

अजून अंक उघडलाच नाहीये. मुखपृष्ठ पाहून आणि बासरीवरची धून ऐकूनच इतका आनंद झाला की लिहील्याशिवाय राहवेना.
किती प्रसन्न वाटतंय !! नीलूताई आणि अभिजीत, तुम्ही ग्रेट आहात!! स्मित

अंक अतिशय देखणा दिसतोय. संपादक मंडळाने घेतलेले कष्ट दिसून येतायत मांडणीत. अभिनंदन संपादक! स्मित
बाकी अंकावर वाचेन तसतश्या प्रतिक्रिया देईनच.

जयू आणि सुमॉ, धन्यवाद. स्मित

वा!!! मस्त

वा!!! मस्त दिसतोय अंक. मुखपृष्ठ आवडल. रांगोळी, कंदिल ह्यांची चित्र पण मस्त आहेत.
अजुन वाचुन व्हायचाय पण रहावल नाही म्हणुन लिहिल. सर्व संपादक मंडळींचे अभिनंदन.
स्वाती तुझ गाण ऐकल, आवडल. खरच कसकाय कॉरडिनेट केलत ग?? तुम्हा तिघांचही अभिनंदन.

-अमृता.

अत्यन्त

अत्यन्त सुन्दर अंक.

मना पसून आवडला.

रश्मि.

सुंदर

चांगला अंक आहे.

विनय... ही सगळी गुजराथी मुल अशीच असतात का, मला देखील माझ्या एका जवळच्या मित्राने असेच गोड गोड बोलुन ५०,००० ला फसवले होते.

खूपच छान अंक

अतिशय देखणा अंक. सगळ्यानी घेतलेली मेहनत जाणवत आहे. मनापासून अभिनदन.
(अनुस्वार कसा द्यायचा?)
अन्जली.

क्या बात है!

संपादक मंडळ तुमच अभिनंदन.
अंक खुपच मस्त झाला आहे. स्वर-चित्रे सहीच. मुखपृष्ठ पण सहीच. रंगसंगती आवडली.

बाकी अंक आता चहा अन चकल्यांबरोबर वाचायला सुरुवात केलीच आहे.

परत एकदा संपादक मंडळाचे अभिनंदन.

शब्द सुधारणा

नरेंद्र गोळे यांच्या प्रवास वर्णनात 'उद्गिरच्य' असे झाले आहे, मला वाटते ते 'उदगीरच्या' असे असायला हवे आहे.
(१९ वी ओळ, ४था परिच्छेद- २री ओळ)

धन्यवाद!
- महागुरु

दिवाळी अंक

दिवाळी अंक एकदम अप्रतीम.. मांडणी एकदम देखणी झालीय. खरंतर पूर्ण अंकाबद्दल एकदम लिहिता येणार नाही म्हणून मग एका एका सदराबद्दल.

मुखपृष्ठ आगदी दिवाळी अंकाला शोभेलसे. दिवाळा अंकाच्या मुखपृष्ठावर बाई हवीच ('माझे शत्रूपक्ष'- पुल) ही प्रथा पण पाळली गेलीय.
दिवाळी अंक जरी अंक असला तरी तो जालावर आहे हे लक्षात आलेच नाही. कारण ईयरफोन काढून ठेवलेले. आधीच्या प्रतिक्रिया
वाचताना तिथे बासरी आहे म्हणून कळलं, मग पुन्हा एकदा अंक उघडला आणि मनसोक्त बासरी ऐकली. मुखपृष्ठावरचे चित्र पण मस्त आहे.
ज्या पद्धतीने केस चितारले आहेत त्या पध्दतीची चित्रं मी खूप पूर्वी कुठेतरी बघितलेली आठवतात. निलूला चित्राबद्दल जास्त माहीती विचारायला हवी.

'परदेसाई' विनय देसाई

बासरी सुंदर आहे

हो मलाही येथील प्रतिक्रिया वाचून कळाले बासरीबद्दल. मुखपृष्ठ पाहिल्यावर आतील मजकूर वाचण्याच्या घाईत त्यावर पटकन क्लिक करत होतो, पण तेव्हढ्या मिनिटात एक 'बीप' ऐकू यायचा आणि कळायचे नाही ते काय आहे स्मित मग या प्रतिक्रिया वाचल्यावर तेथेच थांबलो आणि मग ती बासरी ऐकू आली. छान वाटते ती बासरी ऐकायला, विशेषतः बाहेर दिव्यांची माळ, खायला केदार म्हणतो तशी चकली वगैरे असताना! त्या मुखपृष्ठावर बासरी वाजवायची आयडिया मस्त आहे.

सुधारणा केली

धन्यवाद, महागुरु. तुम्ही सुचविलेली सुधारणा केली आहे.

केवळ अप्रतीम !

BRAVO ! केवळ अप्रतीम आहे अंक. हा अभिप्राय सादरीकरण, मांडणी, सजावट इत्यादइ बद्दल आहे. नुसता चाळला आत्ता अंक. जसजसा वाचून होइल तसतशा प्रतिक्रिया देईनच.

पण संपादक, सल्लगार, चित्रकार, designers सगळ्यांचं अभिनंदन आणि इतका देखणा अंक तयार केल्या बद्दल धन्यवाद !

परागकण

महान झालाय अंक

मिनोती, केदार, छान लेख.
विनय, साधी सोपी पण उपयुक्त कथा.
अज्जुका, फारच सुंदर वर्णन, आणि खरच सुरेख प्रवास. स्वत: करतो आहे अस वाटल. फोटोंमूळे बहार आली.
झुलेलाल, नेहमीप्रमाणे सुरेख साधी पण उत्कट कथा.
लोपा, खलास कथा. सुरेख जमली आहे भाषा.
मुलाखती खूपच छान.
अजून इतर वाचायचे आहे.
बासरी खलास आणि मुखपृष्ठही.

अप्रतिम

मस्त दिवाळी अंक जमलाय.. सगळ्या कथा वाचुन काढल्या सकाळपासुन

माझा अभिप्राय. (१)

१२९४ मध्ये अल्लाऊद्दिन खिलजीने देवगिरीवर हल्ला करून रामदेवरायाचा पराभव केला. पण तह होऊन सत्ता रामदेवरायाकडेच राहिली >

गोळे तुमचे प्रवास वर्णन व त्याचे तपशिल आवडले. फक्त एक तपशिल देवगीरी बाबत लिहीतो. (इतिहास माझा विक पॉईंट त्यामुळे ... )
हा किल्ला सह्याद्री सारख्या रांगात नाही तर बैठा आहे. ह्या किल्यावर तोफा डागुन वा हल्ला चढवुन कोणीही कधीही जिंकले नाहीय. खिलजी ने हरपाल्देवास ( जो रामदेवरायाच मेहुना होता) फितुरीने राज्य देतो असे सांगीतले पण आधी देवगिरी स्वाधीन कर असा करार केला. त्यात हरपालदेवाने त्याला किल्यात कोण कसे लपुन बसते ही माहीती दिली व हल्ला चढवला, तो पुर्ण व्हायच्या आतच रामदेवराय शरन आला कारण जी दार उघडली जात होती ती दर्यांची वा तेलाचा कढईंची नसुन महालाची होती त्यामुळे रामदेवरायला हार पत्कारावी लागली. रामदेवरायाला नंतर बहुतेक फाशी दिले व किल्ला हरपालदेवाकडे गेला.
ही एकमेव लढाई या किल्यावर झाली. बाकीच्या पुर्ण इतिहासात हा किल्ला फक्त हस्तांतरीत झाला. आजही ह्या किल्याला चढाई करुन हरविने अशक्य आहे. ( त्या काळच्या साधनांनी).
पैठन ( प्रतिष्टाण) मधील ज्ञानेश्वर उद्यान हे पण सुंदर आहे. पेशव्यांचा ( अन पुण्याचा) फार फार आधी हिच नगरी महाराष्टाची सांस्कॄतीक तसेच व्यावहारीक राजधानी होती.

झुलेलाल बरसात आवडली. खासच.
दोन शेवट - एकदम डिफरंट, आवडली.
सुखात्मे आवडली, त्यावरुन एक पेटीतला माणुस (बहुतेक मुळ लेखक टॉलस्टॉय ची) आठवन झाली.

धन्यवाद सव्या.

मस्त अंक...

मुखपृष्ठ सुंदर, मांडणीपण छान आहे, श्रवणीय फारच सुंदर.
बडबडीची कथा आवडली,
सुखात्मे खुपच वेगळी भावली,
केदार जोशीचा लेख आवडला.
सध्या इतकेच....

केवळ उच्च!

अथ पसून इति पर्यंत अंक केवळ उच्च आहे!
संपादक मंडळाला, समस्त सहाय्यकांना आणि दिवाळी अंकात सहभागी होणा-यांना शतश: धन्यवाद!
आवर्जून अभिप्राय देणा-यांचे, कौतुक करून उत्साह वाढवणा-यांचे आणि कृतकृत्यतेचा भावानंद देणा-यांचे विशेष आभार! स्मित

मस्त आहे दिवाळी अंक .

अप्रतिम , अजून वाचायचा आहे . परंतु चाळल्यावर कल्पना आली .

सावरिया- जियो!

वैभवा, तुझा ते 'रे सूर तुझे मधला'- रे... विवेकचे अचुक स्वरसाधन.... आणि स्वातीचे सुरसंधान!
सारेच जीवघेणे!
स्वाते, आय हाय!

अजून काहीच बघितलेले नाही.... सवडीने अभिप्राय ही धुंद उतरल्यावर!

तिघेही... जियो!

मस्त अंक!!!

अजुन फक्त चाळलाय, पण खुप आनंद झाला बघुन.
बाकी लिहिणारे सगळे रथी-महारथी आहेतच आपल्या मायबोलीवरचे!!
सगळे लिहिणारे (काव्य, कथा, ई.), संपादक, श्रेयनामावलीतले सगळे---सगळ्यांचे आभार.

स्वातीचं गाणं ऐकलं, "तुझे सूर वेड लावतायत" खरच. शब्दांकन आणि संगीत पण उत्तम.
अजय यांची २१०७ सालातली व्यंगचित्र पण खासच.

पण लोकहो, जरा मदत करा. ते बासरीचे सुर कुठे सापडत नाहियेत. कुठे आहे त्याची लिंक?

उत्कृष्ठ !

आणखी जास्त शब्द सुचत नाहीत, ईतरांसारखीच बासरी ऐकायची राहून गेली होती. पण प्रतिक्रीया वाचल्यावर आवर्जुन ऐकली मस्त अनुभव ,
बाकी बडबडी , दाद.......... ग्रेट, आजुन सगळा अंक वाचायचा आहे पण सुरुवात छान झालीये.
सादरीकरणातली मेहनत जाणवते आहे. सगळ्याच संपादक मंडळाचे आणि संबंधितांचे मनपुर्वक अभिनंदन.
------------- चाफ्फा ( आशिष )

मागिल पानावरुन..

असामी, लांडगा......... जमेश, बाकी टेक्निकल आपल्याला माहीत नाही
हवाहवाई, शेवट.......... बढीया
PSG, संघमित्रा ...... कथा एकदम भावल्या मनाला !

दिवाळी अन्क २००७

दोन शेवटः अपेक्शाभन्ग
घरचा पाहुणा: मस्त
अवगुन्ठनः छान उतरलीये
विषबाधा: सुन्दर कल्पना व रचना
असे आसावे: वाह! क्या बात है!
कटः खास दाद टच! खल्लास!
मुन्नाभाई: एकदम भन्नाट जमलिये भट्टी
आभाळा: गझल आवडली पण बरेच शेर repeat वाटतात
पियानोची सात गाणी: my favorite from this HDA. प्रत्त्येक गाण्यातील पडद्यावरील टिपलेले बारकावे आणि मान्डणी केवळ अप्रतिम. जिवन्त "चित्री" करण.

एकन्दर अन्क छान जमलाय. सर्व चित्र व चित्रकारानी तो अधिक आकर्षक बनवलाय.

खल्लास !

मिल्या, आज रांधण्यात.................... ! मुन्नाभाई ............ खल्लास रे ! एकदम आवडेश.
लोपमुद्रा .............. जबरीच दोस्त !

आजुन पुढे वाचन चालु आहे............
चाफ्फा ( आशिष )

अप्रतिम मुखपृष्ठ !

मुखपृष्ठ - खास म्हणजे एकदम खासच !
बासरी - अगदि मनभरून एकली, अभिजित.. खूपच सुरेख !
सावरिया - प्रयोग हिट है यार.. सुपर डुपर हिट है...
वैभवा - शब्दांसाठी ... जियो !!
स्वाती - आवाज अन सुरासाठी... जियो !!
विवेक - संगीत अप्रतिमच !
अंक चाळलाच होता फक्त पण मुखपृष्ठ, बासरी, सावरिया मुळे हा प्रतिसाद !!

मस्तच!!

मुखपृष्ठ मस्तच...
मिल्यानी लिहीलेलं मुन्नाभाई... आणि 'करी' दोन्ही सहीच .. स्मित
बाकी वाचुन व्हायचय..

सुंदर!!!!!!

दिवाळी अंकची मांडणी सुंदर!!!!!!.............बासरी सुरेल.........अजून अंक पूर्ण वाचला नाही.....
पुनम आबोली खुप आवडली..........
संपादक मंडळचे अगदी मनापासून अभिनंदन.

अजून काय वाचल

मिल्या, एक मुखाने बोला जबरी जमली आहे.
अजय, बोधकथा झकास.
ट्युलिप, पियानो अतिशय सुरेख. खूप आवडल.
सावरिया-स्वाती, खूपच छान आवाज आहे तुझा.
तबला, पेटी कोणी वाजवली आहे?
माझ्या बरोबर-भट्टी नीट जमली नसली तरी छान आहे.
सतीश माढेकर, आंखो देखा हाल आवडला.
श्वना सुरेख प्रमोद.

छानच

सगळा अंक छानच जमून आलाय. अजून पुर्ण वाचायचा आहे. पण बासरी, स्वातीचे गाणे, सावनीची मुलाखत आवडली. मागच्या वेळी ती आमच्या कडे राहिली होती त्यामुळे ती खरच अजून जमिनीवर पाय ठेवून आहे हे अगदी पटल.

बाकी कथांमधे फक्त सारिपाट वाचून झालिये. ती आवडली. बाकिचे प्रतिसाद नंतर.

अंक सध्या

अंक सध्या तरि वरवर चाळलाय.. सादरिकरण नि सजावट नेहमिप्रमाणेच अतिशय सुंदर..
मुखपृष्टावर यंदा पाठमोरि बाई थोडिफार वळलि तर.. स्मित चित्र फारच छान..

देखणा अंक

यंदाचा दिवाळी अंक अतिशय देखणा झाला आहे. मुखपृष्ठ तर खासच जमलं आहे. अंकातली इतर चित्रे आणि रंगसंगती सुद्धा एकदम छान आहे. संपादक मंडळ आणि दिवाळी अंकावर मेहनत घेणारे इतर, तुम्हाला सलाम.
मी ऑफिसमधून ऍक्सेस करत असल्यामूळे ऑडीओ सिस्टीम बंद आहे. त्यामुळे श्रवणीयतेबद्दल काहीच कॉमेंट्स नाहीत. अरेरे
इन्द्रधनुष्य विभागाची प्रस्तावना अजिबात आवडली नाही. ट्युलिपचा लेख अप्रतिम जमलाय. जेलोची कथा पण आवडली. बाकी नेहमीचे यशस्वी कलाकार म्हणजे PSG, अज्जुका, मिल्या, चाफ्फा, बडबडी, लोपामुद्रा HDA मध्ये पण चमकताहेत. सन्मीची कथा आणि सु. मॉ. ची कथा विशेष आवडल्या. प्रमोद देव, झुलेलाल आणि इतर अजून वाचून व्हायचे आहेत. बाकी कॉमेंट्स नन्तर.....................

सावरिया

स्वाती मस्तच आहे तुझा आवाज ... छान गातेस गं !
स्वाती, वैभव आणि विवेक मस्त जमलंय सावरिया, अभिनंदन स्मित

पियानो Songs.

अंक सुंदर दिसतोय.
अत्ता तरी फक्त ट्युलिप ची पियानो ची गाणी वाचून झालीयेत , As always एकदम झकास स्मित !

उत्तम सुरवात

आज फक्त सुरवात केली आहे अंक बघायला... पण मुखपृष्ठ बघताच प्रतिक्रिया देण्याचा मोह आवरु शकत नाही.. मुखपृष्ठ सुरेखच झाले आहे.. आणि layout पण मस्तच आहे...

मस्त.. वाह वाह

Design खुपच छान आहे. Font मोठा आहे त्यामुळे वाचायला एकदम सोपे झाले आहे.

धन्यवाद.

'सावरिया'च्या कौतुकासाठी मनापासून धन्यवाद, दोस्त्स.

आधी वैभवची रचना, आणि त्याला विवेकने बांधलेली इतकी सुंदर चाल - याला आपण न्याय देऊ शकू की नाही याचं खूप टेन्शन आलं होतं.
तुम्हाला ते आवडलं याचं समाधान आहेच, पण माझ्या गाण्यात सुधारणेला खूपच वाव आहे याचीही मला पूर्ण कल्पना आहे.
शिवाय त्याच विभागात सावनी शेंडे यांच्या इतक्या अप्रतिम गायनाचीही क्लिप पाहून वाटणारा संकोच शब्दांत सांगण्यापलिकडचा आहे. खरंतर ती क्लिप तिथे असताना तुम्ही सगळयांनी माझं गाणं ऐकलंत हेच खूप आहे माझ्यासाठी.

या कौतुकाचे खरे मानकरी वैभव आणि विवेक आहेत. मला ही संधी दिल्याबद्दल त्यांचे शतशः आभार. स्मित

बाकी अंक जमेल तसा वाचत आहे, आणि प्रतिक्रिया लिहीनच.

सुरेख आहे हा अंक

मुखपृष्ठ बघितले की "वाह!" अशी दाद आपसूकच निघते.
अंक पूर्णपणे वाचून झालेला नाही पण तरीसुद्धा

स्वाती - सुरेल आवाज आहे गं तुझा !!
वैभव, विवेक तुमचेही अभिनंदन.
This song grows on you. संपले तरी अजून ऐकावे असे वाटत रहाते. अजून ऐकता, अजूनच आवडते.

मजा आली सावरिया ऐकताना.
अंक जसजसा वाचतोय तसतशा प्रतिक्रीया देत राहीन.
संपादक मंडळ व अंकास हातभार लावणार्‍या सर्वांचेच मनापासून अभिनंदन व आभार

चाय...

फरेंड,
'चाय...' आवडले वाचून आनंद झाला.
एकदम बरोबर ओळखलंस..मी गरवारेमधे होतो स्मित
- संदीप

करेक्ट!

well said nakul.. this song grows on you.. सावरिया अगणित वेळा ऐकलं असेल मी आत्तापर्यंत.. आणि अजूनही ते ऐकायला तितकंच आवडतं स्मित
वैभवच्या अप्रतिम ओळी, विवेकची अतिशय गोड चाल आणि स्वातीचा चपखल आवाज! परफेक्ट टीमवर्कचा नमुना आहे 'सावरिया'!

अभिनंदन आणि धन्यवाद!!

एकूण दिवाळी अंकाची भट्टी मस्तच जमुन आलीय... कथा, कविता, सुरेल श्रवणीय गाणी, मांड्णी, लेआउट सर्व सर्वच..
यासाठी सर्वप्रथम सगळ्या संपादक मंड्ळींचे, सहाय्यक मंड्ळींचे, कलाकार, लेखक, कवी, गायक मंड्ळींचे मन:पूर्वक अभिनंदन!!!!!!!!
आणि आता... मुखपृष्ठाच्या कौतुकासाठी सर्वांचे आणि विशेष करुन संपादक मंडळींचे मनापासून धन्यवाद नि आभार स्मित:)
अभिजित बासरीची धुन एकून प्रसन्न वाटले.
'सावरीया' अगदी लाजवाब!!!.. वैभव नेहमी प्रमाणे तुझे अप्रतिम शब्द, स्वाती तुझा सुरेल आवाज, नि विवेकचे संगीत सगळच मस्त.
स्वाती, सावनी शेंडे तर गातेच अप्रतिम पण एक मायबोलीकरीण पण तितकी अप्रतिम गाते ही कौतुकाची गोष्ट आहे:)

पूनम ची 'अबोली', दाद ची 'कट', संघमित्राची 'एक दिवस' आवडल्या.स्मित

दिवाळी अंक

नीलु, मुखपृष्ट खुप सुरेख आलेय .पहिले पान उघडताच सुरेख बासरीची धुन आणि प्रसन्न चित्र पाहुन खुप छान वाटते.
कथा विभागात असामीचा अनुवाद आवडला .संघमित्राची एक दिवस अप्रतीम आहे. सुमाची सारीपट भावली. सुखात्मे मधला आईबद्दलचा डायरीतला भाग मनाला स्पर्शुन गेला . कविता विभागात धृवतारा फार आवडली , हेम्स्ची टपटप्त्या फुलात मिळाल्या बरसण्याच्या साक्षी जयाची अवगुंट्।अन मस्त , पमाचे प्रश्न छाने . कविता विभागात तर स्गळे तर दिग्गजच आहेत. त्यामुळे प्रशच नाही. विषबाधा अप्रतीम सुंदर आहे. छान आहेत कविता. हलके फुलके तले मिल्याचे मुन्नाभाई मस्त आहे. चाफाचे पिकनिकमधले "जाड्या " हे पहिलेच वाक्य वाचले आणि खल्लास. चाय....रम.. सुरेख आहे. लांडगा आणि बकरा धडाच घ्यायला हवा. प्रवास वरण्न तर मस्त .अज्जुका चा प्रवास खास, देवगिरी, प्रेम वरदान खरय..!! १९४७ शेवटची ओळ सोडली तर लेख आवडला.तीन पत्त्या.न्चा तमाशा पण .. ठाव घेउन गेला...
अनामिकाच्या सैनिकाला सलाम!!!! नुरजहा या गुढकथेत you should avoid cliche. जिड्नासा बद्दल काय म्हणु ? काळजी आणि काळजाचा प्रश्न आहे. प्रगती होउ दे.. !!!
पियानोची गाणी आवडली. ६०च्या दशकात्ले सिनेमे माझा आवडीचा कारय्क्रम आहे. अजुनही रात्री एक पर्यन्त एकटी (कारण इतरांना बोअर होते)दुरदर्शवर हे सिनेमे बघते. अजुन खुप खुप गाणी आहेत .
बाकि अंकाबद्दल तर रंगसंगती आणि ले आउट खुप छान .
सपादक मंडळाचे सुंदर अंक हाती दिल्याबद्दल आभार!!!!