|
Maitreyee
| |
| Monday, September 25, 2006 - 1:04 pm: |
| 
|
त्या मुलीचे वय काय आहे? (मला या problem बद्दल अनुभव नाहीय, माझी मुलं लहान आहेत तशी, पण..) अजूबाजूला, मैत्रिणींची मुले वगैरे बाबत जे पाहिलेय त्यावरून असे वाटते की विशेष्त adolescent age मधे असेल तर बरीच कारणे असू शकतात वागण्यातील बदलाची १. वयात येतानाचे मानसिक शारिरीक बदल accept करता न येणे २. त्या वयात असलेली बंडखोरी, अशा वेळी आईबापाचे काही सांगणे पटत नाही, ते आपल्यावर फ़ार बन्धने घालतायत असेच वाटते. ३. संगत. मित्रमंडळ कशा प्रकारचे आहे. ४. घरात, घराबाहेर कुठे इगो ला, स्वाभिमानाला धक्का बसणे. काही कारणाने सतत अपमान पचवावा लागणे. हे फ़ार महत्वाचे आहे कारण कधी कधी ओळखीत, अनपेक्षित व्यक्तीने गैरफ़ायदा घेणे, abuse असे काही केले तर मुले कुणालाही सांगू शकत नाहीत. basically आई बाबा जे कोणी तिच्या जास्त जवळचे असेल त्यांनी विश्वासात घेणे जास्त गरजेचे आहे असे मला तरी वाटतेय.
|
Storvi
| |
| Monday, September 25, 2006 - 2:40 pm: |
| 
|
soultrip सोडुन द्या. म्हणजे lecture झाडणे सोडु नका पण फ़ार मनावर घेऊ नका. एकेकाळी मी देखिल अशीच होते. माझ्या अनुभवावरुन सांगते. तिला स्वप्नरंजन आवडत असणार त्यामुळे वेळ लागतो. त्यामुळे ते lecture ने जाणारी गोष्ट नाही. मनावर ताबा नाही कधी स्वप्नरंजन सुरु होतं ते कळतच नाही आणि मग वेळ लागतो. सो meditation इकंवा कुठलीही focus करायला शिकवणारी activity असेल तर त्यात तिला इन्वोल्वे करा. अभिश्रुती. वरचा सल्ला तुझ्या मैत्रिणीला देखिल लागु पडु शकतो. मी हे सांगते कारण मी नाच शिकताना आणि शिकवताना पाहिले, की नाचातुन मुलं concentration, focus, determination शिकतात. तासभर गुरु शिकवत असेल त्याकडे लक्ष देउन ते तसंच करणे ह्यातुन हळु हळु descipline बुइल्द होते. मी कित्येक आई वडीलांनी आपल्या मुलिंना Dance मध्ये मुद्दम शिस्त शिकावी म्हणून घातलेले पाहिलेले आहे आणि त्याचा फ़रक पण पडतो. अर्थात शिक्षक जरा कडक हवे..
|
Seema_
| |
| Monday, September 25, 2006 - 3:46 pm: |
| 
|
sto वरती dance विषयी लिहिलयस म्हणुन....... लहान मुलांसाठी dance class सुरु करण्यासाठी योग्य वय काय ते लिही न please . मी Good physical activity या दृष्टिने dance चा विचार करती आहे माझ्या मुलीसाठी म्हणुन विचारती आहे.
|
Storvi
| |
| Monday, September 25, 2006 - 4:39 pm: |
| 
|
तुझी मुलगी अजुन लहान आहे गं सिमा पण तु तिला general rythm introduce करू शकतेस. म्हणजे उडत्या चालीची गाणी लावायची आणि दे दणादण नाचायचे.. हो हो भरतनाट्यम मध्ये असले तरी मी हेच सांगेन. ह्याने लय म्हणजे काय हे कळेल. आजुन structured class साठी आपली मुलं लहान आहेत तशी. पण मी swimming सुरु केलं आहे. ५ वर्षाचे वय योग्य आहे नाच शिकवायला. आता काही काही मुलं खुपच interest दाखवतात लहान वयातच, अश्यांची गोष्टं निराळी. आणि अश्या मुलांना शिकवायला खुप patient शिक्षक हवे. मी वर उल्लेखलेले कडक शिक्षक नाही चालणार तिथे
|
Peshawa
| |
| Monday, September 25, 2006 - 5:40 pm: |
| 
|
गजा, तू म्हणतोयस ते खरही असेल पण मग यांना जबाबदारी कळणार तरी कधी?>>> जबाबदारी दुसर्याने समजाऊन कशी कळेल त्या करता त्यांना त्यांचे अनुभव घ्यायला नकोत का? स्वत्:बद्दल आठवा तुम्हाला कधी पहिल्यांदा जबाब्दारी कळालि? काय प्रसंग होता? प्रसंग लहन मोठ असु शकतो काही मुले लवकर जबाब्दार होतात काहिना वेळ लागतो...
|
Bee
| |
| Tuesday, September 26, 2006 - 1:59 am: |
| 
|
अभि, तू सुधा मुर्तींचे 'गोष्टी माणसांच्या' हे एक पुस्तक जरूर वाच. मी ह्या पुस्तकांच्या तीन प्रती तीन भाच्यांना आणि त्यांच्या आईबाबांनापण पाठविल्या आहेत. दिवाळीची खास भेट म्हणून! छोट्या खर्याखुर्या गोष्टी, खूप असं वांगमय वगैरे नाही. छान आहेत, अनुभव येतो. सुधा मुर्तींसारख्या स्त्रिनी लिहिले आहे म्हणून तरी अवश्य वाच! अनुवाद लीना सोहोनी ह्यांचा आहे. पहिले पाढे ५५ म्हणजे नेमके काय? मी ही म्हण हिन्दीतदेखील वाचली आहे. अर्थ लागलाच नाही. मैत्रेयी, चांगले मुद्दे मांडलेस तू..
|
Chioo
| |
| Tuesday, September 26, 2006 - 7:45 am: |
| 
|
अभिश्रुती, मी तुला मेल टाकली आहे. मिळाली का?
|
Abhishruti
| |
| Tuesday, September 26, 2006 - 12:39 pm: |
| 
|
बी, मी ते पुस्तक जरुर वाचेन (मी तुझी भाच्ची असले असते तर किती बरे झाले असते ) पेशवा, मी माझ्या कुठल्याच गोष्टी आजकालच्या मुलींशी compare करू शकत नाही कारण माझं बालपण खुपच वेगळं होतं त्यामुळे मला काही कळायच्या आतच मी जबाबदार व्यक्ती सारखी वागायला लागले . त्यानी तसं वागावं अशी अपेक्षा नाही. let them enjoy their childhood but let them be a little responsible year by year. माझ्या मुलीला आत्ता कुठे कळायला लागलाय की आपण सर्व काही फ़ारच lightly घेतोय पण नुसतचं समजून उपयोग नाही. मी सद्ध्या जे पुस्तक वाचतेय 'PLEASE MOM! IT'S MY LIFE' त्यात तो लेखक म्हणतो की if we don't learn from the blunders of others, then learning from our own would take a life time! Such learning proves to be no fun at all! आणि मलाही हे पटते upto certain extent! चिऊ, तुला मेल पाठवली आहे. आणि मलाही वाटतं की हा या अडनाडी वयाचा भाग असावा आणि तो कालांतराने दूर होईल.
|
Sashal
| |
| Tuesday, September 26, 2006 - 5:23 pm: |
| 
|
if we don't learn from the blunders of others, then learning from our own would take a life time! Such learning proves to be no fun at all! >> हे कदाचित खरं असेलही पण माझा स्वतःचा तरी असा अनुभव आहे कि स्वानुभवावरून माणूस पटकन शिकतो .. अर्थात प्रत्येक अनुभव स्वतः घ्यायलाच हवा असं नाही .. पण दुसर्यांच्या अनुभवातून शिकायला ती दुसरी व्यक्ती खरोखर जवळची असली पाहिजे .. otherwise कोणा त्रयस्थाच्या अनुभवातून आपल्याला शहाणपण येणं खूप कठिण आहे .. आणि परत माझाही मुलगा लहान आहे त्यामुळे मला या बाबतीत अजून स्वानुभव नाही पण हे माझे विचार आहेत की मुलांकडून आपल्याला अपेक्षा असतात हे जरी खरे असले तरी त्यानां त्यांचा वेळ देणंही महत्वाचं आहे .. जसजशी विचारशक्ती वाढते तसं पटकन कळायला लागतं की आपण कुठे चूकतोय, काय बदल आणला पाहिजे वगैरे .. पण हे प्रत्येक मुलात वेगवेगळ्या वेळी होईल .. आपली अपेक्षा असेल तेव्हाच होईल असं अजिबात गृहीत धरू नये .. आणि at the end of the day आपण thinking adults आहोत, मुलं minors आहेत, so we need to strike a balance .. एखाद्या गोष्टीत फ़ार नुकसान होणार असेल मुलाला त्याचा वेळ देण्यात, तर पालक म्हणून authority असतेच की आपली बरोबर त्या गोष्टी impose करण्यात .. पण मग अशा वेळी जे consequences असतील तेही rationally thinking adult म्हणूनच face करायला हवेत .. मला तरी असं वाटतं की मैत्रेयी ने मांडलेल्या मुद्द्यांचा फ़ार कमी विचार झाला आपल्या पालकांमध्ये म्हणजे मध्यमवर्गीय कुटूम्बातल्या .. आता आपण या मुद्द्यांचा जास्त विचार करायला हवा ..
|
Seema_
| |
| Tuesday, September 26, 2006 - 5:54 pm: |
| 
|
sto ती जाते swimming ला . इथे Dad and me असा class आहे . तीथे जाते ती just for fun आणि already ती दणादण नाचतच असते दिवसभर . Thanks ग. पाच वर्षानंतरच बघिन मग. वरती मैत्रेयीन जो चौथा मुद्दा मांडलाय self esteem बद्दल तो अतिशय महत्वाचा आहे.आमच्या इथे परवा त्यावर lecture आहे. मी जाणार आहे . झाल कि लिहिन मग माहीती.
|
Ajjuka
| |
| Tuesday, September 26, 2006 - 6:23 pm: |
| 
|
शिल्पे.. या मुद्द्यावर मला एकदम १६-१७ वर्ष मागे गेल्यासारखं वाटलं... तंद्री लावून बसणे आणि मग आईची बोलणी खाणे हा सगळ्यात मोठ्ठा उद्योग होता माझा.. बापरे मला तर हे वाचून टेन्शनच येत चाललंय पण एकंदरीत मूल वाढवणे या प्रकाराचं. काय होणारे माझं जेव्हा वेळ येईल तेव्हा.. देव जाणे. कसं जमवलं असेल माझ्या आईने कुणास ठाऊक!
|
Abhishruti
| |
| Wednesday, November 22, 2006 - 5:33 am: |
| 
|
बरं आता नवीन मुद्दा, मी गेल्याच आठवड्यात अगदी खडकी रेल्वेस्टेशन पासून पुण्यातल्या सगळ्या पेठांपर्यंत १०वीच्या कोचिंग क्लासेसचा सर्वे केला आणि त्यातून प्रश सुटण्या ऐवजी मी जास्तच confuse झाले. काही क्लासेस खूपच लांब आहेत, वेळ जमत नाही, लोकेशन चांगले नाही किंवा reputation नाही वगैरे कारणाने विचारात घेतले नाहीत. त्यात CBSE चे क्लासेस फ़ारच दुर्मिळ आहेत हे ही लक्शात आले. फ़ी तर न सांगितलेलीच बरी पण त्यांची शिकवण्याचे पद्धत इतकी वेगवेगळी (काही कही लोक सांगायला पण तयार झाले नाहीत) होती, म्हणजे काही सर ३ महिन्यात पोर्शन संपवून उरलेले ६ ते ७ महिने पेपर सोडवून घेतात, काही ठरलेल्या patern मधे कुठल्याही विद्यार्थ्यासाठी काहीही बदल करत नाहीत (म्हणजे special coaching or attention नाही), तर काही मुलांच्या कलाने घेऊन सर्व त्यांच्यावरच सोपवतात. मला खरच काही कळत नाही काय कराव! कोणाचा काही अनुभव असेल तर लवकरात लवकर लिहा. कारण डिसेंबरमधे या सर्व क्लासेस ची admission process चालू होते. तूच का नाही मुलीचा अभ्यास घेत असे प्लीज विचारू नकी. ती माझ्याकडे बसली असती किंवा तिला हवय तसं मला शिकवता आलं असतं तर काय! शिवाय बोर्डाचे बदलते नियम, प्रश्नपत्रिकेचा patern आपल्याला माहित नसतो म्हणुनच या लोकांचे पाय धरावे लागतात. धन्यवाद!
|
Asmaani
| |
| Wednesday, November 22, 2006 - 1:22 pm: |
| 
|
अभि, तुझ्या मुलीला ह्या क्लासेस चे काही options विचार ना. ह्या बाबतीत त्यांचा choice फार महत्त्वाचा ठरतो. कारण क्लासला जाऊन अभ्यास त्यांनाच करायचा असतो. तुझ्या मुलीला एखाद्या ठराविक क्लासला जायची इच्छा आहे का हे आधी तिला विचार. तिलाच आधी थोडे options द्यायला सांग. तुझे काम थोडे सोपे होईल.
|
Disha013
| |
| Wednesday, November 22, 2006 - 7:11 pm: |
| 
|
एक छान article ...... http://www.esakal.com/esakal/11222006/F1CCECF276.htm
|
वा सुंदर आहे हे article ...मला पट्लं त्यांचं म्हणणं...मस्तंच.
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|