कवचांकित

शेवटची विणली वीण
कवचांकित मी मज केले
माझे सरपटणारे
मीपण अभंग झाले

विश्वाशी तुटली नाळ
वेदना मुळीच नव्हती
संवेदन बधीर होता
शल्यांची कसली भीती?

भय इथले संपविले मी
जिंकले दुर्बल न्यून
माझाच मी खरा झालो
ना उरले कसले भान

चालले सरकत पुढती
वेगाने पाउल माझे
पाठीवर परंतु होते
कवचाचे थोडे ओझे

-श्रीराम