Submitted by webmaster on 27 October, 2026 - 17:26
गेले काही दिवस सुरक्षिततेच्या कारणामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मायबोली ऑफलाईन ठेवली होती.
फक्त मायबोलीच नाही तर जगातल्या लाखो वेबसाईटस , त्यात मोठ्या कंपन्या, काही सरकारी वेबसाईटस ही होत्या.
आता सर्व सुरळीत असले तरी डागडुजी करत रहावी लागणार आहे . त्यामुळे पुढचे काही दिवस मायबोली मधून मधून बंद ठेवावी लागेल.
तसेच ब्राऊझर मधून येणारी प्रत्येक मागणी तपासली जात असल्यामुळे मायबोली हळू चालते असे वाटेल. ही गोष्ट माहिती आहे आणि आता लगेच त्यावर उपाय नाही.
सुरक्षिततेच्या कारणासाठी नवीन सभासद नोंदणी सध्यासाठी थांबवली आहे.
तुम्हाला काही अडचण असली तर कृपया याच धाग्यावर कळवा.
इथे ही बातमी वाचता येईल.
https://www.theguardian.com/technology/2026/oct/22/websites-across-world...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अरे व्वा, छान, मायबोलीची साईट
अरे व्वा, छान, मायबोलीची साईट सुरु झाली !!
झाली का सुरू!!
झाली का सुरू!!
चैन पडत नव्हतं आम्हाला!
अरे व्वा! छान. अभिनंदन.
अरे व्वा! छान. अभिनंदन.
मला वाटतंय माबो च्या इतिहासात पहिल्यांदाच इतके दिवस बंद राहिली असेल.
हो!
हो!
वा.झाली का चालू?बरं वाटलं.
वा.झाली का चालू?बरं वाटलं.
झाली झाली ... मायबोली चालू
झाली झाली ... मायबोली चालू झाली!
काही दिवस काही लोकांनी नविन धागे काढणंपण थांबवलं पाहिजे
अरे व्वा! सुरू झालेलं पाहून
अरे व्वा! सुरू झालेलं पाहून मस्त/ हायसं वाटलं.
अजून दोन दिवस सुरू झाली नसती तर विरहाच्या दुःखाने मी शिवणकाम शिकून निरूपा रॉय झाले असते. पण आता कॅंसल! 
झाली का सुरू!! Happy
झाली का सुरू!! Happy
चैन पडत नव्हतं आम्हाला!>>>> +१११
मी पण सकाळ संध्याकाळ ट्रेनमध्ये मायबोलीच वाचत असल्याने आता एखादे भजनी मंडळ जॉइन करावे असा विचार करत होतो.
मला वाटतंय माबो च्या इतिहासात
मला वाटतंय माबो च्या इतिहासात पहिल्यांदाच इतके दिवस बंद राहिली असेल.>> हो ना ! काहि तास किवा फार फार तर एक दिवस बन्द राहिली असेल.
अरे वा. झाली सुरू. खरंच
अरे वा. झाली सुरू. खरंच मायबोली पहिल्यांदाच इतके दिवस बंद होती. मायबोलीच्या फेसबुकवर एखादा मेसेज टाकायला हवा होता तुम्ही, अॅडमीन.
मायबोली सुरू झाली !
मायबोली सुरू झाली !
मायबोली बंद असल्याने खूपच चुकल्या चुकल्या सारखे वाटत होते, कारण मला इथे माहेरी आल्यासारखे वाटते!!
तू भजनी मंडळ जॉइन करणार होतास
तू भजनी मंडळ जॉइन करणार होतास, आणि मला इथे सद्दाम हुसेनची चीझ केक फॅक्टरी आणि निकी मिनाजचे....$¢€£ .. असं काय काय लिहिता न आल्याने ह्या पीएचपी अटॅक मध्ये परकीय शक्तीचा हात वगैरे आहे का काय वाटू लागलेलं.
फारच चुकल्याचुकल्यासारखं वाटत
फारच चुकल्याचुकल्यासारखं वाटत होतं इतके दिवस. आता छान वाटतंय!
वाट बघून पेशन्स संपून मला
वाट बघून पेशन्स संपून मला दुखणं आलं मायबोली बंद झाल्यावर. काल संध्याकाळपासून झोपून आहे.
आता बरी होईन.
व्वा, झाली सुरू मायबोली. जरा
व्वा, झाली सुरू मायबोली. जरा भीतीच वाटत होती की साईट बंद का झाली असेल.
किती सांगू मी सांगू कुणाला
किती सांगू मी सांगू कुणाला
आज आनंदी आनंद झाला
आज आनंदी आनंद झाला!
मायबोली बंद असल्याचा
मायबोली बंद असल्याचा गैरफायदा घेत अडाणीने झाडांची बेसुमार कत्तल केली. आता सुरू झाले तर हाताबरोबर धागा काढा नाहीतर तो अडाणी वाळवंट करेल.
समजा मायबोली पासून आपण एक
समजा मायबोली पासून आपण एक वर्षापेक्षा अधिक काळ वंचित राहिलो तर?
पर्याय 1- माबोकराने स्वत:च एक वर्षे मायबोली न उघडणे
पर्याय 2 मायबोली ने स्वत:च एक वर्ष साईट बंद ठेवणे
हा एक धाग्याचा विषय होउ शकतो
वा वा वाह. हुश झालं मायबोली
वा वा वाह. हुश झालं मायबोली बघून. रोज चारदा तरी बघायचे येऊन.
वाह, छान, बरं वाटलं सुरू झाली
वाह, छान, बरं वाटलं सुरू झाली हे बघून. सारखं येऊन चेक करणं एवढंच हातात होतं.
लिहून टाक निरूपा रॉयचा प्रवेश तुझ्या आयुष्यात.
अस्मिता
वा वा धन्यवाद वेमा!
वा वा धन्यवाद वेमा!
अजिबात करमत नव्हते. उगाच इकडेतिकडे फिरत होतो
इतक्यात सुरू झालेय का?
इतक्यात सुरू झालेय का?
चार पाच दिवसांपूर्वी (बहुतेक) साईट अंडर मेंटेनंस , बाहेर जाऊन स्वच्छ हवा खा असा मेसेज दिसला म्हणून थेट मुंबईला आलो. महालक्ष्मीला समुद्रावरची स्वच्छ हवा मिळेल म्हणून. आदेश पाळायलाच हवा. पण एव्हढं जाम उकडायला लागलं (त्यातून व्हिसा ऑफीसच्या समोरच्या बोळीतून पोलिसांनी हाकललं) म्हणून फीनिक्स पॅलेडियमला पाचव्या मजल्यवर कार पार्क केली. धड एसी नाही धड दमट नाही अशा कॉरिडॉरमधे फिरत राहिलो. पार्किंगचे पैसे घेतले नाहीत म्हणून मनातल्या मनात पुण्याला नावं ठेवली आणि मुंबईचं कौतुक केलं. इंटरनेट स्लो चालत होतं म्हणून मुंबईत पार्किंग फ्री का असा धागा काढायचा बेत रहित केला. मायबोली चालूच नव्हतं हे लक्षातच आलं नाही. दोन दिवस लागले म्हणजे प्रॉब्लेम तिकडेपण हाच असावा.
काल निघताना शंका आली, बहुतेक इथेही फास्टॅग मधून पैसे घेतले असावेत. कालच मायबोली चालू असतं तर उगीचच दोन दिवस पुण्याला नावं ठेवून मुंबईचं कौतुक केलं नसतं. शिवाय जाऊ द्या आपली गाडी फुकटात पार्क होतेय असा विचार करून तीनशे रूपये एक कप कॉफी आणि दोनशे रूपये एका बिस्कीटाला घालवले नसते. कॉफीच्या किंमतीवरून अंदाज घेऊन मॉलमधून बाहेर पडून मागच्या बोळीत गुजराती थाळी घेतली ती स्वस्तच वाटली. मुंबईच्या लोकांचं ठीक आहे. ते डॉलर मधे कमावतात आणि रूपयात खर्च करतात. ३०% दिस्काउंट असलेल्या दुकानात बनियन सदृश्य टीशर्ट साडेतीन हजाराला आणि चोळीसदृश्य महावस्त्र बारा हजाराला होतं. इथे एखादाच पुणेकर खरेदी करू शकतो, तो ही मूळ पुण्याचा नाही.
हे सर्व मायबोलीनोंदवहीत नोंदवायचे राहिले.
इथे पाहिले तर एरव्ही "हुं, आम्ही नाही हं रोज रोज येत मायबोलीवर" अशा अविर्भावात वावरणारे आयडी कासावीस होऊन मूळ आयडीनेच आपली बेचैनी सांगून राहिलेत. आनंदाने बेभान झालं कि होतं असं.
बाकि मायबोली सुरू झालं म्हणजे इतर संवेदनशील वेबसाईटस दोन दिवस आधीच सुरू झाल्या असतील हे कन्फर्म झालं. चितळेंचं दुकान उघडलं कि लोक पुण्यात बाहेर पडतात तसा हा बेंचमार्क.
<<< मायबोली बंद असल्याचा
<<< मायबोली बंद असल्याचा गैरफायदा घेत झाडांची बेसुमार कत्तल केली. आता सुरू झाले तर हाताबरोबर धागा काढा नाहीतर....
>>>>
इथल्या पोस्ट वाचायच्या आधीही पहिले हे काम केले
ज्या वेबसाईट्स अगोदरच
ज्या वेबसाईट्स अगोदरच सुरक्षित कोडवर चालत होत्या त्या बंद झाल्या नाहीत. मायबोली स्पेशल ड्रुपल कोड ८ वरच होती. आता ते अद्यतन ११ वर आहेत.
फारच चुकल्याचुकल्यासारखं वाटत
फारच चुकल्याचुकल्यासारखं वाटत होतं इतके दिवस. आता छान वाटतंय!
सध्या 'इमेज' अपलोड होत
सध्या 'इमेज' अपलोड होत नाहीयेत
आहाहा.. दिल गार्डन गार्डन हो
आहाहा.. दिल गार्डन गार्डन हो गया आज एकदम...
दिवसभर ऑफिस काम करता करता किमान १० वेळा तरी चेक करत होते की चालु झाली का..
५०३ एरर बघुन परत फिरायचे
फेसबुक पेज वर पण चक्कर मारली.. तिकडे तरी टाकायचे कि हो अॅडमिन दादा.. आता जेव्हा परत बंद करणार असाल तेव्हा प्लीज आधीच सांगा..
अगदीच चैन पडत नव्हतं मायबोली
अगदीच चैन पडत नव्हतं मायबोली उघडत नव्हती तर..
आत्ता लॉगिन केल्यावर जरा नेहमीसारखं वाटलं.
(No subject)
छान बातमी.
छान बातमी.
काही तरी हरवले आहे असे वाटत होते. पण आता सुरु झाली आहे हे वाचल्यावर दिलासा मिळाला.
Pages