Manogat
| |
| Friday, October 05, 2007 - 1:01 pm: |
| 
|
PMT बस म्हण्जे सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय, आहो एखाद्या अनोळखी व्यक्ति शी तुम्हि हा संवाद साधलात तर तो देखिल पुर्ण तन मन धन लावुन तुमच्या शि संवाद साधेल. असा हा आता चौका चौका,किव्हा म्हण्तात ना माहाविद्यालयाच्या भाषेत कट्ट्या कट्ट्या वरचा विषय झाला आहे कारण कोणिच याच्या जाचा पासुन वाचलेला नाहि याची तुलना एका राणटी घोड्याशि केली तरी चालेल त्या घोड्याला जसे काबुत करायला त्याच्या मागे फिराव लागत, धावाव लागत तसच या PMT ला पकडायला तिच्या मागे धावाव लागत. अहो धावण बिवण ठिक आहे पण धावुन अंत तर काय म्हणे या युद्धा चा "बस गेली निघुन दारावर माणसांना लटकवुन" आम्हि आपले पुन्हा उभे ते उभेच. घरची काम उरकुन office च्या घाइने निघालेल्या माणसाचा अंत पाहते हि बस. आहो उशिरा गेल कि तिकडे office च्या लोकांच्या नजरा अगदि chief guest आल्या सारख्या असतात त्यात ं चि cabin जवळ असेल तर आम्हि पण अपराध्या सारखे नजर चोरुन आपल्या जागेवर जाउन बसतो, अणि शेजाराल्या विचारतो माझ्या बद्दल काही विचारल का. नाहि म्हण्ट्ल की जीव भांड्यात पडतो आणि पुढचा दिनक्रम सुरु होतो. याची तुलना तुम्हि मुंबई च्या लोकलशि करु नका तिथे 1st class ,वगैरे category असते इथे मतभेद नाहि. बाई असो वा माणुस म्हातारा असो वा म्हातारि जागा नसलि की उभे राहा. उभे राहुन आपल्या stop पर्यंत सुखरुप पोहचण म्हण्जे पाणिपतच युद्ध जिंकण. औपरोधिक वाटल ना, हो कारण उभ राहण सोइस्कर नसत, ५४ लोकांना घेउन जाणारी गाडि १०० च्या जवळ पास लोकांना साहारा देते. मग कधि इकडन लात तर कधि इकडन हात,पायाचा तर अगदि चेंदा मेंदा होतो. बारीक सारीक लोक उभी असतिल तर ठिक आहे हो पण जाड जुड लोक आली की अगदि photo च्या frame मधे fix केल्यावर कस हालता येत नाहि तस होत. बस स्टोप ची दशा तर विचारु नका माणसांचे अगदि लोंढे च्या लोंढे असतात चातका सारखे त्या बसची वाट बघत. मग बस आली कि, गुळाला कश्या माश्या चिपकतात तसे लोक भिडतात त्या दरवाज्यला, झाल मग काय चढतांना आम्हि पण मनात एकच निर्णय घेउन असतो "जिंकू किव्हा मरु". आत कस बस चढल कि मग तुमचि नजर मिळते ति condactor शि condactor कसला राजा त्या बस चा, तो आणि driver त्यच्या हाता खालि नाचणारा प्रधानमंत्रि त्यानि दोन घंट्या वाजवल्या कि निघाला एक घंटि वाजवलि कि थांबला. राज्य बद्दल सांगव म्हणाल तेवढ थोडच, त्यांचि ऐट भारी वेगळिच. गर्दित त्यांना शोधुन ticket काढावि लागते नाहि तर राज्य मंत्री बस स्टोप वर दुप्पट घेतिल याचि भिति असते. मग साहेब म्हण्जे राजे जवळ आलेकी खडसावुन विचारतात "कुठे", लगेच स्टोप सांगितल की rate तय्यार मग ticket हातात थांबवलिकि पुढे. त्यांच्या हावभावान बद्दल सांगते म्हण्टल तर एक वेगळा लेखच लीहावा लागेल, करडि नजर, त्रासिक हावभाव, चिडकि मुद्रा इति.. इति. . असा हा बसचा प्रवास कितिहि त्रासिक असला तरी तुमच्या आमच्य करमणुकिचा विषय बनतो. पण म्हण्तात ना ज्याच झीजता त्यालाच कळत, कोणाला काय कळणार चंदनाच दु:ख.
|