Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics

बैरागी

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » वैशाख » काव्यधारा » मायबोली गज़ल कार्यशाळा -1 » बैरागी « Previous Next »

Vaibhav_joshi
Wednesday, March 14, 2007 - 5:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


बैरागी

ऋतू येत होते, ऋतू जात होते
कुणी एकटे जोगिया गात होते!

सखी, प्रेयसी, बहिण, दुहिता नि माता
किती बंध एकाच नात्यात होते!

अशी लाजली हाय ती फोनवरती
जणू घेतले हात हातात होते

तिची भेट स्वप्नातही शक्य नव्हती
(भिकारी किती स्वप्नदेशात होते!)

खुडावे जरा वाटले चुंबनाने
किती हासणे मुग्ध गालात होते!

तुझे गंध होते कुठे मोगऱ्याला?
तुझे ओठ कोण्या गुलाबात होते?

कुठे नाव होते उखाण्यांत माझे?
उखाणे स्वतःच्याच प्रेमात होते!

कसा भेटला एकही ना शहाणा?
(शहाणे तसे खूप गावात होते!)


Mayurlankeshwar
Wednesday, March 14, 2007 - 5:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा!मजा आली वाचताना!
तिस-या शेराने गझलेचा मूडच एकदम बदलल्यासारखे वाटले.

खुडावे जरा वाटले चुंबनाने
किती हासणे मुग्ध गालात होते!

आहा!! काय खुडलाय आणि खुललाय हा शेर!

तुझे गंध होते कुठे मोग-याला?
तुझे ओठ कोण्या गुलाबात होते?

हा प्रेमाचा कहर आहे!

मक्त्यातून पुन्हा एकदा मूड बदलला!
एकूणच गझल वाचताना स्वच्छंद प्रवृत्तीचे दर्शन झाले बैरागीसाहेब :-)
लगे रहो.....


Meenu
Wednesday, March 14, 2007 - 5:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ऋतू येत होते, ऋतू जात होते
कुणी एकटे जोगिया गात होते!

सखी, प्रेयसी, बहिण, दुहिता नि माता
किती बंध एकाच नात्यात होते! >>> मस्त !!

Mankya
Wednesday, March 14, 2007 - 5:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बैरागी ... सगळेच शेर मनापासून आवडले ओ !
सखी, प्रेयसी ... खुप मस्त पकडलत शब्दात !
मुग्ध गालात ... खूप गोड वाटला हा शेर !

हि गजल नागमोडी वाटेसारखी वळणावळणाची पण स्वतःच्या चालीचा डौल कायम राखणारी वाटली !
So Bairagee... You have done it Yaar !

माणिक !


Zakasrao
Wednesday, March 14, 2007 - 5:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुझे गंध होते कुठे मोगऱ्याला?
तुझे ओठ कोण्या गुलाबात होते? >>>>>>>>>>>>
क्या मस्त शेर हे. रोमॅंटिक गजल

Chakrapani
Wednesday, March 14, 2007 - 7:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वच्छंदी वृत्ती, प्रणय, गझलेची स्वत्:ची नागमोडी चाल या सगळ्याशी सहमत आहे. 'फोन' वगैरेमुळे गझलेला आधुनिकताही आपसूकच आली आहे ;)

Mi_abhijeet
Wednesday, March 14, 2007 - 10:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाहवा..! क्या बात है...!
नाव बैरागी आणि प्रेमभावनेने काठोकाठ भरलेली गज़ल लिहिता राव..
खुडावे जरा वाटले चुंबनाने
किती हासणे मुग्ध गालात होते!
शहारे आले अंगावर....!!!


Jayavi
Wednesday, March 14, 2007 - 10:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बैरागी नावाने मी पण थोडी बुचकळ्यात पडले होते.... :-) क्या मूड पकडा है जनाब आपने...! मजा आ गया :-)
किती हासणे मुग्ध गालात होते! अहा....क्या बात है!Maitreyee
Wednesday, March 14, 2007 - 2:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मलही पहिली दोन शेर आणि बाकीची गझल यांचा मूड वेगवेगळा वाटला, पण सही आहेत कल्पना! खुडावे जरा... आणि तुझे ओठ.. .. क्या बात है!

Meghdhara
Wednesday, March 14, 2007 - 2:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बैरागी,
तुझे गंध.. व्वा!
भिकारी.. टाळता येणार नाही?

मेघाAshwini
Wednesday, March 14, 2007 - 3:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा, बैराग्यांनासुद्धा उखाण्यातल्या नावाचा मोह टाळता येत नाही तर... ~D :-)

मुग्ध हासणे... सुरेख!Chinnu
Thursday, March 15, 2007 - 3:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बैरागी, सगळे पंच सहीच. पण एकसंध वाटत नाहीये मला. नागमोडी चालीमुळे तर नव्हे? (आता 'शहाणी' असल्याचा दावा नाही हो माझा! :-)) स्वप्नातही तिच्या भेटीसाठी मागणारे भिकारी, सही! :-)

Pulasti
Thursday, March 15, 2007 - 3:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बैरागी, मस्तच गझल!
मतला सोडून सर्व शेर आवडले. "जमीन" उसनी असल्यामुळे तसे सर्वांच्याच (माझ्याही :-)) गझलांमधले मतले इतर शेरांच्या मानाने कच्चेच वाटत आहेत.. पण तरी "जोगिया" आणि "ऋतुंच्या येण्या-जाण्याचा" मला खरच संबंध लागला नाही. :-(
फोन, गुलाब, चुंबन, उखाणे - क्या बात है! मक्ताही मस्त.
काही मिसरे कंसात लिहिण्याबद्दल मी मागे कुठेतरी चर्चा वाचल्याचे स्मरते. तुमची त्यामागची तर्क-भूमिका काय आहे? उदा. "भिकारी" कंसात का आणि "उखाणे" किंवा "हासणे" कंसात का नाही?
बाकी, अजून शिकतोच आहे.. म्हणून CBDG :-)
-- पुलस्ति.

Bee
Thursday, March 15, 2007 - 4:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बैरागीचे गझल विषयावरचे पोष्ट्स वाचून त्यांच्याकडून खूप अपेक्षा होती. ही गझल अशी आहे की काही शेर विषयाची मेळ खात नाही मात्र स्वतंत्र्यरित्या सर्व शेर आवडलेत. 'फ़ोन' वगैरे शब्द नको होते, भिकारीची ती ओळ जरा वेगळी हवी होती, तिथे कमीपणा जाणवतो. काही जण कंसात ओळी लिहितात त्याचा नक्की काय अर्थ होतो मला कळलेले नाही की इथे कुणी त्या कंसातील ओळीबद्दल लिहिले नाही. मोगरा गुलाब ह्या प्रतिमा खूप common झाल्या आहेत त्यामुळे बैरागी सारख्यांकडून वेगळे काहीतरी वाचायला मिळेल अशी अपेक्षा होती. असो.. गझल छान आहे, हे नक्की.

Bairagee
Thursday, March 15, 2007 - 6:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


पुलस्ती, माणक्या, चिन्नू (तुम्हाला पंच कुठे दिसले हो:-)), झकाऽऽसराव, चक्रपाणी, मेघधारा, मयूर, मैत्रेयी, जयावी, सर्व प्रतिसादींचा मी आभारी आहे. अश्विनी, तुमचे निरीक्षण चांगले आहे:-)

बी, कार्यशाळेत मी एवढी टीका करतो तर माझाही कवी म्हणून सहभाग असावा ह्यासाठीच ही गझल. बैरागी नावाने ह्याआधी मी गझल लिहिलेली नव्हती. बैराग्याची ही पहिलीच गझल आहे. त्यामुळे काही उणिवा राहणारच:-)

गझलेत विषयाचे बंधन नसते. एकाच गझलेत अनेक विषय हाताळले जाऊ शकतात, जातात. मला ह्या गझलेतला मतला, मोगरा-गुलाब, खुडावे, आणि मक्ता बरे वाटले.

भिकारीची ओळ हझलेची वाटते हे खरे. पण थोडा द्वाडपणा करण्याचा मोह आवरता आला नाही. मेघधारा, त्या भिकाऱ्यांना घालवण्याचा प्रयत्न करतो:-)

मोगरा-गुलाब ह्या प्रतिमा कॉमन झाल्या आहेत हे खरे. पण साधारणपणे उर्दू गझलेतही काही प्रतिमा (जसे बुलबुल सैय्याद वगैरे) कॉमन असतातच. शेवटी त्याला ट्रीटमेंट (त्या काळाला अनुरूप अशी वगैरे वगैरे) कशी मिळते, लहजा कसा आहे आदी गोष्टी महत्त्वाच्या आहेत असे मला वाटते.

फोनऐवजी पत्र टाकता येईल. पण फोनवरील संभाषण अधिक जिवंत असे वाटते.:-)

कंसांतल्या ओळी अवांतर स्पष्टीकरण
(used to clarify as an aside) म्हणून वापरतात. हे स्पष्टीकरण तसे बघितल्यास फारसे महत्त्वाचे नसते. कंस कुठे घ्यायचे हे कवीवर अवलंबून आहे.

धन्यवाद.Sanghamitra
Thursday, March 15, 2007 - 10:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बैरागी अपेक्षेप्रमाणेच छान आहे गज़ल. मुग्ध हासणे, मोगरा, फोन हमखास दाद मिळेल असे. विशेषेतः मोगरा गुलाबाचा तर अगदी मैफलीचा शेर आहे.
मला दुसरा शेर आवडला. वेगळा आणि सहज. स्त्रीची इतकी नाती लगागा मधे फिट करायची म्हणजे. :-)
उखाणाही सहज आणि छान.
शेवटच्या शेरात कंस असणे जरा खटकले. जास्त पंच असलेला शेर हवा होता असे वाटले.
पण गज़ल छान यात वादच नाही.


Mayurlankeshwar
Thursday, March 15, 2007 - 10:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बैरागी गझल पुन्हा पुन्हा वाचली आणि पुन्हा पुन्हा मजा आली हे विशेष!
फोनवर लाजण्याची त-हा जगावेगळी वाटली :-)
'भिकारी' काहीही करून हटवा please !
त्यांच्या जागी 'दिवाणे' इत्यादी बसवता येतील काय हे चेक करा.
अजून एक विचारायचे होते--गझलेचा मक्ता 'जोगिये गायल्या'मुळे विरक्त आणि नावाप्रमाणे बैरागी प्रवृत्तीचा वाटतो. तिथून उडी मारून तुम्ही एकदम नात्यांच्या मायाजालात फोनच्या वायरीसकट गुंतलात हा अर्थ लक्षात आल्यावर खूप विनोदी वाटले. हा विरक्तपणा मतल्यातून हटवता येणार नाही काय? गझलेला एक प्रकारची continuity लाभेल.
इतकेच म्हणायचे होते :-)
लगे रहो :-)


Mankya
Thursday, March 15, 2007 - 11:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मयुरा ... सगळ ठिक आहे पण तु बैरागी यांची पोष्ट वाचली नाहिस बहुतेक " गझलेत विषयाचे बंधन नसते. एकाच गझलेत अनेक विषय हाताळले जाऊ शकतात, जातात. "
Continuity....?? जरा पुन्हा एकदा ती Post वाच हं ! चु.भु.दे.घे.

माणिक !


Mayurlankeshwar
Thursday, March 15, 2007 - 11:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे माणिक मी वाचलंय रे ते... :-)
पण इथे गझलेमध्ये प्रत्येक शेरात वेगळा विषय आहे असं नाही.
प्रत्येक शेरात वेगळा विषय असता तर तो मुद्दा वेगळा!
इथे नेमकं झालंय काय की-- मतला आणि मक्ता सोडून जवळ जवळ बाकीच्या सर्व शेरात एकच विषय बहारदारपणे प्रकट झाला आहे
म्हणून असे वाटून गेले की सगळीच रचना एकसंध असती तर आणखी नवा अनुभव मिळाला असता!म्हणजे ही अगदीच personal इच्छा म्हण हवं तर!
चु,भू.दे.घे :-)


Chinnu
Thursday, March 15, 2007 - 12:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहोजाहो नक्का करु हो चिन्नुला! ह्याच तुमच्या द्वाडपणाचे पंच उतरलेत गजलेतही!

Pulasti
Friday, March 16, 2007 - 3:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"कंसांतल्या ओळी अवांतर स्पष्टीकरण used to clarify as an aside म्हणून वापरतात. हे स्पष्टीकरण तसे बघितल्यास फारसे महत्त्वाचे नसते."
...म्हणजे याचा अर्थ असा अख्खा मिसराच "भरीचा" म्हणायचा की काय मग? गझल-रसिकाने वाचताना/ऐकताना, गझल-गायकाने गाताना कंस आल्यावर नेमके काय करावे? मला तरी स्वत:ला या कंसांचे कलादृष्ट्या तर्कशुद्ध काहीच प्रयोजन वाटत नाही. कृपया "उगाच वादासाठी वाद घालतोय" असे समजू नये. आणि अर्थातच हा अतिक्षुल्लक मुद्दा असेल तर .. pl ignore me! :-)
-- पुलस्ति.

Bairagee
Friday, March 16, 2007 - 5:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुलस्ती भरीचा नाही. थोडी समजावण्यात उणीव झाली; थोडी समजण्यात. एखादे वाक्य/वाक्यांश (सेन्टेन्स/क्लॉज) जेव्हा दुसऱ्या वाक्याबद्दल/वाक्यांशाबद्दल फारशी महत्त्वाची (लिहिणाऱ्यासाठी) नसणारी, अवांतरशी माहिती देते तेव्हा त्याला आपण कंसात टाकू शकतो (कधी कधी कंसाऐवजी — डॅशदेखील वापरतात), असा काहीसा व्याकरणाचा (त्यातही पंक्च्युएशन) नियम आहे. तोच नियम इथे लागू होईल. बाकी काही नाही. चूभद्याघ्या.


Vaijayantee
Tuesday, March 20, 2007 - 3:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गज़ल आवडली. उधार जमीनीने मर्यादा घातल्या तरी गज़लेत तसे दिसत नाही हे महत्त्वाचे


.
हितगुज दिवाळी अंक २००८ 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions