Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics

जयश्री अंबासकर ...

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » वैशाख » काव्यधारा » मायबोली गज़ल कार्यशाळा -1 » जयश्री अंबासकर « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through March 06, 200724 03-06-07  8:07 am

Zakasrao
Tuesday, March 06, 2007 - 8:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जयावी ३ आणि ५ नंबरचे शेर मला खुप आवडले. अगदि मार डाला.

Pramoddeo
Tuesday, March 06, 2007 - 12:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कसा गंध वाहे पुन्हा तो फिरुनी
निराळेच अंदाज वा-यात होते

कशाला हवी पौर्णिमेची मुजोरी
इथे चांदणे बाहुपाशात होते

कसा रंग येईल त्या मैफ़लीला
तुझे सूर सारेच मौनात होते
हे तीनही शेर विशेष आवडले. त्यातला

कशाला हवी पौर्णिमेची मुजोरी
इथे चांदणे बाहुपाशात होते........... हा शेर 'हासिले शेर'(सर्वोत्तम) की काय म्हणतात तो आहे.
बाकी त्यातले व्याकरण वगैरे मला काही समजत नाही.Swaatee_ambole
Tuesday, March 06, 2007 - 4:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणखी कोणाला काही मूलभूत शंका असल्यास
इथे उत्तर सापडतं का बघा.

Milya
Tuesday, March 06, 2007 - 6:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा जयावी मस्तच आहे गं..

सगळ्यांप्रमाणेच बाहुपाशातले चांदणे खूप आवडले

Devdattag
Wednesday, March 07, 2007 - 3:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जयावि.. खरंच मस्त जमलिये

Pendhya
Wednesday, March 07, 2007 - 4:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बोहोत बढिया जया. अब ईसे, तरन्नूम में कहने का ईरादा कब है?

Athak
Saturday, March 10, 2007 - 7:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जयु , ग्रेट , छानच रचना manufacturing defect मुळे :-) लगे रहो यार ऐसेही शेर को खुले छोडते रहो :-)

कसा रंग येईल त्या गाण्याच्या मैफ़लीला
तुझे लक्ष सगळे त्या रंपात होते :-)


Lopamudraa
Saturday, March 10, 2007 - 8:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कसा गंध वाहे पुन्हा तो फिरुनी
निराळेच अंदाज वा-यात होते

कशाला हवी पौर्णिमेची मुजोरी
इथे चांदणे बाहुपाशात होते

कसा रंग येईल त्या मैफ़लीला
तुझे सूर सारेच मौनात होते
>>>>>.हे तीन शेर खुप खुप आवडलेत..
आताच तुझे एक सुरेख गाणे ऐकवले श्यामलीने.. आणि तुझी ही गोड गज़ल... मजा आ गया..!!!


Manas6
Sunday, March 11, 2007 - 3:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जयश्री, सर्वच शेर एकाच कल्पनेवर आधारित असावेत असे बंधन गझलेत नसते... उलट प्रत्येक शेर तू वेगवेगळ्या थीम वर रचिलास; आणि तो असावा, तर गझलेत अधिक वैविध्य,अधिक प्रगल्भता येइल...
अश्या धाटणीचे काही आले तर?..

तुला वाचता मी अरे मृत्युपत्रा,
दुरावे कसे ते अकस्मात होते....एकदम गझलेचा मूडच बदलतो..
आणि प्रत्येक शेर ही स्वतंत्र कविताच असते, नाही का?
ओके मग पहिला शेर तुला योग्य वाटत असेल तर तसाच ठेव
आणि एक सुचवू का? म्हणजे मी नाही, गझल सम्राट कै. सुरेश भट म्हणायचे, असे वाचल्याचे स्मरते- "आधे जे म्हणायचे ते चक्क गद्यात लिहुन काढावे.. मग त्याचे पद्यात रुपांतर करायचा प्रयत्न करावा"
ह्याने दोन्ही मिसऱ्यांचे आपपसात चांगले लॉजिकल कनेक्शन होईल असे वाटते...शेर हा एकदम क्लीयर-कट आणि स्ट्रेट टु द हार्ट ठेवण्याचा प्रयत्न असावा, म्हणजे त्याचा परिणाम नीट साधल्या जाईल, बरोबर ना?
मक्ता पण सुंदरच आहे..तसा राहिल्यास सुद्धा छानच वाटेल..(मी जरा वेगळा विचार करत होतो..)
आणि हो वाऱ्याचा नेमका अंदाज आला की तुला सांगतो.. हा हा
-मानस६


Jayavi
Sunday, March 11, 2007 - 9:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मानस.... तुझं म्हणणं एकदम पटेश. अगदी मनापासून. प्रत्येक शेराचं एक स्वतंत्र अस्तित्व असायला हवं. पण माझी गाडी असे रुळ बदलून चालताना थोडी गांगरते रे...! होइल सवय कदाचित हळुहळु.

सुरेश भटांच्या म्हणण्याप्रमाणे आधी गद्यात लिहून मग पद्यात करण्याची कल्पना चांगली आहे. तुझ्या ह्या टिपचा नक्की फ़ायदा होईल असं वाटतंय.
तुझ्या वार्‍याचा अंदाज लवकर कळू दे :-)


Jayavi
Sunday, March 11, 2007 - 9:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कौतुकाबद्दल पुन्हा एकवार सगळ्यांना मनापासून धन्यवाद :-)

Visoba_khechar
Sunday, March 11, 2007 - 9:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कैसी हो जयू बेटी? पेहेचाना क्या? बेटी भगवान तुझे हमेशा सुखी और हसता रखे!;)

तात्या.

Jayavi
Monday, March 12, 2007 - 6:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तात्या....आपको कैसे भूल सकती हू... :-)
तुमच्या शुभेच्छांसाठी मनापासून आभार :-)

Supermom
Friday, March 16, 2007 - 12:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जयू, फ़ारच सुरेख ग. मनापासून आवडली.
'इथे चांदणे बाहुपाशात होते.' तर खूपच सुरेख.
देवानं गोड गळ्याबरोबर सुन्दर कल्पनाशक्तीही दिलीय तुला.


.
हितगुज दिवाळी अंक २००८ 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions