Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through July 28, 2006

Hitguj » My Experience » बहु(जनांकडून)श्रुत » लग्नातल्या वेगवेगळ्या पद्धती व गमती जमती. » Archive through July 28, 2006 « Previous Next »

Nakshatra
Wednesday, July 26, 2006 - 4:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लग्नाच्या माण्डवातून समर्थ रामदास पळून गेले होते. आमच्या लग्नात गुरुजीच पळून गेले.

त्या गुरुजीन्चे कुणी दोस्त गुरुजी आजारी पडल्यामुळे एक लग्न खोळम्बले होते. त्यामुळे सकाळचे थोडेसे विधी करून कोणलाही न सान्गता हे महाशय २-३ गल्ल्या पलीकडे असलेल्या कार्यालयात दुसरे लग्न लावायला गेले ते २-३ तास गायब! आमच्या मुहूर्तच्या आधी १५-२० मिनिटे उगवले आणि कसेतरी बाकीचे विधी उरकले. ते येइपर्यन्त सगळ्यान्चा जीव वरखाली...वरती मला म्हणाले...मुहूर्ताला १० मिनिटेच राहिली आहेत. उगाच साडी नेसण्यात, नट्टापट्ट करण्यात फ़ार वेळ घालवू नका!!!


Storvi
Wednesday, July 26, 2006 - 8:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>मने!हे यासाठी असत की सासरचे लोक पण मुलिला काही दागिने घालतात रिपिट होवु नये म्हणुन विचारत असावे.
>> Do you seriously believe that?

Maudee
Thursday, July 27, 2006 - 6:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझे आजोबा भिक्षुकी करायचे. ते लग्न नव्हते लावत पण त्यांचा एक मित्र लग्न लावत असे.
तर ते मित्र लग्न लावत असताना म्हणाले हाताला हात लावा.... तर त्या मुलीने नवर्‍याच्या हातला हात लावण्या ऐवजी चुकून भटजींच्याच हाताला हात लावलेला.


Prajaktad
Thursday, July 27, 2006 - 3:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>मने!हे यासाठी असत की सासरचे लोक पण मुलिला काही दागिने घालतात रिपिट होवु नये म्हणुन विचारत असावे.
>> Do you seriously believe that? >>>

शिल्पा!त्यामागचा हेतु हाच आहे.... लोक त्याचा गैरफ़ायदा घेतात.

Supermom
Thursday, July 27, 2006 - 3:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शिल्पा,प्राजक्ता,असे काही वेळा खरेच रिपीट होऊ नये म्हणून विचारतात.मी आमच्याकडच्या दोन तीन लग्नात हे बघितलेय की मुलाकडचे विचारतात की आम्ही बांगड्या व नेकलेस घालणार आहोत.तुम्ही काय घालणार?म्हणजे दोन दोन नेकलेस होण्यापेक्षा काहीतरी अजून वेगळा दागिना अशी त्यांची अपेक्षा होती.

पण माझे स्पष्ट मत आहे की काय घालणार हा प्रश्न योग्य,पण किती तोळ्याचे घालणार हा प्रश्न उचित नाही.


Rachana_barve
Thursday, July 27, 2006 - 8:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दागिने घातलेच पाहिजेत का पण? :-) नाही घालणार आम्ही काही म्हंटल तर काय होईल?

Junnu
Thursday, July 27, 2006 - 8:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी आमच्या लग्नात गुरुजींना नवर्‍याचे पाय धुवायचे विधी नकोत अस सांगितल होत, मला ते पटत नाही. त्याप्रमाणे गुरुजींनी विधी adjust केले.

Junnu
Thursday, July 27, 2006 - 8:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दागिने घातलेच पाहिजेत का पण? नाही घालणार आम्ही काही म्हंटल तर काय होईल? >>
रचना, तु करुन पहा आणि आम्हाला सांग काय झाल ते. पण मुलीला हौस नसेल तर दागिने नसले तरी काय झाल.

Moodi
Thursday, July 27, 2006 - 8:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या एका मैत्रीणीच्या लग्नात खूप मजा आली. एका माणसाने मंगलाष्टके म्हणायला सुरुवात तर केली पण कशाचा कशाला ताळमेळ नव्हता. मुलाचे नाव अतुल होते तर मंगलाष्टके म्हणणार्‍याने चक्क त्याचे नाव अंतुले म्हणून जाहीर केले. आमच्या तोंडाचा भला मोठा आ झाला.

मंगलाष्टकातली ओळ तर एवढी मजेशीर की आम्हा मैत्रीणींसकट जमलेल्या लोकांची हसून हसून वाट लागली.
ओळ अशी " आपण आज इथे कशासाठी जमलो आहोत, हा प्रसंग मोठा महत्वाचा आहे वगैरे " चक्क या ओळी तो पद्यात म्हणत होता.


Manuswini
Thursday, July 27, 2006 - 9:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्राजक्ता

मी विचारायचे कारण हेच होते की मुलानी आपल्या वडिलांचे बोलणे Defend करायला सांगितले की ही पद्धत सगळ्यांकडे आहे.

माझी मैत्रिण confuseD , तिने मला विचारले मी म्हटले मे नाही एकले बाबा
आणी माझ्या मताप्रमाणे आपल्या मुलिल्ला काय घालयचे का नाही हे मुलिच्या कडल्य्यंनीच ठरवावे.
जरी repeaT दागिने होतील म्हणुन विचारले तरी 'वाद' कशाला व्ह्यायला पाहिजे? सांगा मला?
लग्न म्हण्जए काय business deal आहे का?
साधारण पणे मला असे वाटते की अश्या लोकांन मोठेपणा सांगायचा असतो की आमच्या अमेरिकेतुन आलेल्या मुलाला ५० तोळे घालणारी मुलगी मिळली वगैरे वगैरे
त्यात वाद वगैरे शब्द म्हणजे अतिच आहे. खुपच जुनाट thinking आहे असे मला वाटते
anyways हा BB लग्नातेल्ल पद्धत वगैरे खाली येतो म्हणुन हे discussion .

आणी जसे रचना म्हणते की मुलिला दागिने घालयचे नसतेल्ल तर???
भले परिस्थ्ति चांगली असो वा नसो मुलिचा आणी तिच्या घरच्यांचा प्रश्ण आहे हे माझे मत आहे.


Maitreyee
Thursday, July 27, 2006 - 9:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ते लग्नात विहिणीला कार्ल्याचा वेल देतात त्याचा काय significance आहे कुणाला माहित आहे का?
विदर्भात माझ्या दिराच्या लग्नात तर जावेकडच्या लोकांनी खरा कार्ली लटकलेला वेल खोलीला तोरणा सारखा लावला होता आणून!! आणि विहिणीच्या पंगतीत कार्ल्याची भाजी पण खास करून आणली होती. या कार्ल्याला का इतका भाव ते नाही समजले:-)


Storvi
Thursday, July 27, 2006 - 10:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अगं मैत्रेयी ते पहिल्या मुलाच्याच लग्नात असतं ना फ़क्तं? का असतं ते मला ही माहित नाही..
आमच्याकडे तर, माझ्या मंगळसुत्रात दोन करली आहेत, वाट्यांच्या शेजारीच.

आणि महाराष्ट्रात पहिले काही दिवस मंगळसुत्र उलटं घाळ्ण्याची पद्धत आहे ना? तर तसे माझे होते. पण माझे सासर धारवाडकडचे आहे. तेंव्हा लग्नानन्तर मी तिकडे गेले असता मुरगोड ला बस ने जायचा प्रसंग आला, तर बस मधली एक बाई मला म्हणाली तुझं मंगळसुत्र उलटं का घातलंस? सरळ करून घे:-O


Manuswini
Thursday, July 27, 2006 - 10:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आमच्याकडे पण मंगलसुत्र उलट घालतात
आणी ते गुढीपाडवा किंवा दिवळी असे मोठे सण आले तर सुलट करतात
सणाच्या दिवशी बहुतेक मुहुर्त चांगले असतात म्हणुन बहुतेक.

मला पण माहीत नाही ते उलटं का घालतात
आणी त्या वाट्यांमधे हळद आणी कुंकु भरतात बरेच काही दिवस.

माझ्या बहिणीने ते फक्त एक आठवडा वगैरे केले आणी सोडुन दिले
पण तिचा उलट ते सुलट मंगळ्सुत्र प्रकार जवळपास ६ महिन्यांनी झाला कारण गुढीपडवा नंतर लग्न झाले तर दिवळीची वाट बघत होती मोठी माणसे.:-)


Supermom
Thursday, July 27, 2006 - 11:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ते काहीतरी असे आहे की मुलाचे लग्न होईपर्यंत कारले खाणार नाही वा कारल्याच्या वेलाखालून जाणार नाही असे काही बायका संकल्प करतात.म्हणून लग्नात मग सासूला कारल्याचा खरा वेल, चांदीचे कारले वा वेल असे देतात. हे मला एका मैत्रिणीने सांगितलेय.
खरेखोटे देव जाणे.
मंगळसूत्रात कारली मात्र मी प्रथमच ऐकली.त्याचा अर्थ नाही माहीत.


Savani
Thursday, July 27, 2006 - 11:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मंगळसुत्रात कारली हे मी पण पहिल्यांदाच ऐकलयं. कारल्याच्या वेलाबद्दल माझ्या माहितीप्रमाणे असं असे की( अर्थात फ़ार पुर्वी) मुलाच्या मुन्जीनंतर त्याची आई वरमाई होणार नाही तोपर्यंत ती कारलं खाणं सोडत असे इतकच काय तर कारल्याच्या वेलाच्या मांडवाखालून पण जाणं सोडत असे. त्याचप्रमाणे हिरवी साडी सुद्धा ती मुंजीत नेसल्यानंतर नेसत नसे. म्हणुन मुलाच्या लग्नात त्याच्या आईला कारल्याची भाजी करून घालत. आणि कारल्याच्या मांडवाखालून आणत. पण आता कार्यालयांमधे कुठला मांडव म्हणून मग प्रतिक म्हणुन चांदीचा वेल द्यायची पद्धत आली. तसेच मुलाच्या आईला ज्या ३ साड्या देतात त्यात एक हिरवी साडी देतात लग्नात ती पण ह्याच साठी.



Savani
Thursday, July 27, 2006 - 11:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आता ह्या सगळ्या प्रकारात फ़क्त कारलचं का हे मात्र मला माहिती नाही :-)

Supermom
Friday, July 28, 2006 - 12:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कारलं तसेही कडू असल्याने कोणी फ़ारसे खात नाही.ते सोडल्याने फ़ार फ़रक पडत नसावा.म्हणून बाकी कोणत्या भाजीऐवजी कारलेच सोडत असावे

Ajjuka
Friday, July 28, 2006 - 4:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कारल्याबद्दलचे किंवा दागिन्यातल्या इतर अनेक चिन्हांचे अर्थ म. वि. सोहोनींच्या मराठी दागिन्यांवरच्या प्रबंधात मिळतील. २-३ वर्षांपूर्वीच्या हितगुज दिवाळी अंकात मी एक लेख लिहिला होता 'सालंकृत' या नावाचा त्यात हा रेफरन्स आहे.
कारल्याशी संबंधित उल्लेख इथे स्पष्ट करण्यासारखा नाही.
दिवाळी अंक सापडत नाहीयेत. कोणी शोधाल तर बरे!
असो.. लग्नपद्धतींशी संबंधित थोडेसे काही... माझ्या लग्नाच्या वेळेला आम्ही दोघांनी ठरवले की जे विधी योग्य वाटतील तेच करायचे. पण ते योग्य की अयोग्य कसे कळणार? म्हणून मग अर्थातच संशोधन सुरू. वैदिक, धार्मिक, ज्ञानप्रबोधिनी इत्यादी सर्वांच्या पुस्तिका आणून झाल्या. ज्ञानप्रबोधिनी आणि वैदिक मधे फार फरक दिसला नाही आणि विधिंचे स्पष्टीकरण प्रबोधिनीच्या पुस्तिकेत जास्त चांगले आहे. पण तेही अपूरे वाटत होते(मुळात थोडाफार indology मधे रस असल्याने काही अभ्यास होता). सगळ्या चालीरितींचा उगम कशात असेल हा प्रश्न होताच, आणि असेच का हाही. मग आवडत्या ग्रंथालयाला शरण गेले, भारत इतिहास संशोधक मंडळात, तिथे राजवाड्यांचं 'भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास' हे पुस्तक वाचलं. अतिशय तर्कशुद्ध पण सर्व गोडगोड संकल्पनांना धक्का देणारं पुस्तक. त्यात प्रत्येक विधी चा अर्थ वेदातले संदर्भ घेऊन स्पष्ट केला आहे. so basically disillusioned... लग्नाचा साधासोपा अर्थ आपल्या अगदी गेल्या शतकापर्यंतच्या पूर्वजांनाही माहित होता तो म्हणजे शरीरसंबंध ठेवण्यास आणि मुले जन्माला येण्यास दिलि गेलेली सामाजिक मान्यता. आपण गोष्टी खूप complicated करतो. त्याही आधी म्हणजे वैदिक काळात 'विवाह' शब्दाचा अर्थ नीट बघू पाह्यला तर मुलगी पळवून नेणे हा होतो (संदर्भ्: भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास). अजूनही काही चालीरिती याची साक्ष देतील. लग्न मुलीच्या घरी होणे, मुलीला नेताना नवर्‍याला अडवले जाणे हे अजूनही काही काही समाजात दिसते. पण एकंदरीतच लग्न ही गोष्ट मुळात शारीर व्यवहारांशी आणि प्रजोत्पादनाशी जुळलेली आहे. असो...
back to my story.. या सगळ्या अभ्यासानंतर काही विधींचा आजच्या संदर्भात अर्थ लावून घेतला आणि तेवढेच विधी केले. या सगळ्यात दोन्ही घरच्यांची पूर्ण साथ होती. आणि मी सोडून सगळे (माझ्या नवर्‍यासकट..) रजिस्टर लग्नासाठी तयार होते. :-)



Psg
Friday, July 28, 2006 - 5:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मंगळसूत्र उलटं घालतात पहिले काही दिवस. आमच्याकडे पहिले १६ दिवस उलटे आनि १७व्या दिवशी सुलटे घालायचे. काही लोकांकडे वर्षभर उलटे. कारण हेच की ही नवं लग्न झालेली मुलगी आहे हे कळावे म्हणून. :-)
कारल्याच्या वेला बरोबर चांदीच्या लवंगाही देतात मुलाच्या आईला. याचही कारण काय असेल? मला वाटत हौस हाच भाग आहे, साधी लवंग जेवण झाल्यावर तोंडात टाकायला आणि चांदीची समृध्दी दर्शवायला :-)


Ajjuka
Friday, July 28, 2006 - 6:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिवाळी अंक प्रतिक्रिया सापडल्या पण अंक मात्र सापडत नाहीयेत.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators