Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
He kadhi badalnaar

Hitguj » Views and Comments » Relationships » नवरा, बायको, संसार, तडजोड इ. » He kadhi badalnaar « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through October 14, 200535 10-14-05  9:14 am
Archive through October 14, 200535 10-15-05  12:01 am
Archive through October 16, 200528 10-16-05  4:33 pm
Archive through October 17, 200522 10-17-05  2:44 pm
Archive through October 19, 200527 10-18-05  10:45 pm
Archive through October 20, 200535 10-20-05  5:58 pm
Archive through October 24, 200535 10-24-05  11:36 pm
Archive through October 25, 200535 10-25-05  5:34 pm
Archive through October 26, 200535 10-26-05  2:06 pm
Archive through October 29, 200535 10-29-05  5:32 pm
Archive through February 27, 200625 02-27-06  5:43 pm
Archive through March 03, 200625 03-03-06  5:20 pm
Archive through March 16, 200625 03-16-06  11:57 am

Mrdmahesh
Thursday, March 16, 2006 - 12:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जोपर्यंत नवरा म्हणजे नोकरी / धंदा आणि बायको म्हणजे चूल आणि मूल ही मानसिकता बदलत नाही तोपर्यंत अशा मुलाखती येत रहाणार. आज स्त्री घराबाहेर पडली असली तरीही तिच्या घराबाहेर पडण्याला चूल आणि मूल अजूनही चिकटलेले आहेच. मुलाखतकर्त्याच्या मनात (त्यातून तो पुरूष) "नीरजा" = चूल आणि मूल हे पक्के रुजलेले. मग म्हणून त्याच्या मते ती बाहेर पडली आहे आणि तरीही ती वरचे गणित ही सांभाळते आहे म्हणजे ग्रेट!! बेसिक में राडा म्हणतात ना तो हाच.
जोपर्यंत
१. नोकरी / धंदा = दोघांपैकी कुणीही किंवा दोघेही.
२. चूल / मूल = दोघांपैकी कुणीही किंवा दोघेही.
असं गणित होत नाही तो पर्यंत अशा मुलाखती होत रहातील आणि (नीरज ला नाही तर) "नीरजाला" (आणि तेही एखाद्याच नीरजाला) असा प्रश्न पडत राहील.


Sharmila_72
Thursday, March 16, 2006 - 1:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अजुका, खरच कौतुक वाटतं तुझ. छानच आहे मुलाखत. पण अजुका अगदी खरच सांगतेय गं की या मुलाखतीतून तुझ 'एक स्वयंभू स्त्री' असंच impression होतं. तुला जसं वाटतय तस बिल्कुल impression होत नाही आहे.
अजुका, संदीप सावंत प्रसिद्ध असल्यामुळे त्यांची पत्नी असा उल्लेख केला असणार, नाही आहे.. केवळ संदीप 'पुरुष' आहे म्हणुन तु अस म्हणतेस. पण मग मृणाल कुलकर्णी बद्दल काय म्हणायचय तुला? रुचिर कुलकर्णी मृणाल इतके प्रसिद्ध तर नक्कीच नाहीत आणी त्यांची ओळख कित्येक ठिकाणी 'अभिनेत्री मृणाल कुलकर्णी' यांचे पती अशी करुन दिली जाते. but I dont think he takes it negatively in fact he tells everyone with a pride की आम्ही कुठेही गेलो तर साहजिकच मृणाल भोवती लोकांचा गराडा पडतो. तेव्हा असं नाही आहे की फक्त स्त्रीयांचीच ओळख अमुक अमुक यांची पत्नी अशी करुन दिली जाते तर पुरुषांचीही ओळख अमुक अमुक यांचे यजमान अशी करुन दिली जाते. आणि अस एकमेकात गुंतलेलं आयुष्य असताना कुठेतरी उल्लेख येण स्वाभाविक नाही का?
आणि जर तुला वाटत होत की संदीप सावंतांची पत्नी असा उल्लेख व्हायला नको होता \मला एवढच म्हणायचंय की अमक्या तमक्याची पत्नी हा शिक्का लावल्याशिवाय मुलाखत होऊ शकत नाही/ तर मग तू सुद्धा मुलाखतीत 'श्वास' चा उल्लेख संपूर्णपणे टाळायला हवा होतास. आणि जर केलाच आहेस उल्लेख तर मग साहजिकच आहे गं अस वाक्य येण..


Ajjuka
Thursday, March 16, 2006 - 4:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>तर मग तू सुद्धा मुलाखतीत 'श्वास' चा उल्लेख संपूर्णपणे टाळायला हवा होतास. आणि जर केलाच आहेस उल्लेख तर मग साहजिकच आहे गं अस वाक्य येण..<<

का साहजिक आहे? श्वास ही माझी स्वतःची costume designer म्हणून accomplishment आहे. माझाही पहिला चित्रपट आहे आणि तिथे काम करताना दिग्दर्शकाची बायको म्हणून नाही तर एक trained costume designer म्हणून अत्यंत professionally काम केले आहे. मला श्वास करायला मिळाली ते मी संदीपची बायको म्हणून नाही तर माझी ती capacity आहे म्हणून. असे असताना हा उल्लेख टाळणे योग्य नाही पण श्वास चा उल्लेख म्हणजे मी संदीपची बायको असणं एवढच जर तुम्हालाही वाटत असेल तर मी तरी काय करणार? मुलाखतकाराला मी श्वास संबंधी पार पाडलेल्या सर्वच जबाबदार्‍यांबद्दल अत्यंत तपशीलात सांगितले होते अगदी coceptual work पासून. ते काम करताना आमचं नातं दिग्दर्शक आणि वेशसंकल्पक एवढच असायचं हेही सांगितलं होतं पण तरीही त्याच्यासाठी महत्वाचा मुद्दा मी संदीपची बायको असणं हा होता हे खटकलं

Sharmila_72
Thursday, March 16, 2006 - 4:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ओह, ओके! now I got you . पण मग मला वाटत की या मुलाखतीत तुझ श्वास साठी costume designer असणं हे emphasize झालेल नाही. तू इतक डीटेल्स मध्ये सांगून सुद्धा मुलाखतकाराने त्यावर जास्त जोर दिला नाही हे नक्कीच बरोबर नाही. he should have interviewed you as a 'Costume Designer' of Shwaas'. बरोबर आहे तु म्हणतेस ते.

Manuswini
Thursday, March 16, 2006 - 5:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे बी मला कुठलाच font दिसत नाही सकाळ च्या पानावर कुठ्ला font install करायचा?

जरा सांगील का?


Storvi
Thursday, March 16, 2006 - 5:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Neeraja, usually I agree with you on almost every point:-) (I know there's a 'but' in here) :-) I do agree with all the statements made here.. (and here it comes) but I think this may be a slightly different case. You are mentioned as his wife, and to some extent yes it is attributed to our age-old beliefs but I think some of it can be attributed to the success of Shwas and Sandeep as a director. Now if this had been a film directed by Sai Paranjpe they would have said सई परांजपे यांच्या अमुक तमुक चित्रपटात त्यांनी costume designing केले.. अस म्हणण्याच कारण त्याचं यश आहे असं नाही वाटत? I am not discounting the fact that our society has a hard time imagining a girl with her own beliefs/principles/capabilities making a mark on the soc. in her own standing, and she is thereby associated with some male in some way shape or form, but I also think that we those who rebel against these transgressions of the society are also sometimes so biased in our beliefs that we sometimes have difficulty seeing things for what they are, and read too much into it. म्हणजे आता असं बघ, जेंव्हा जेंव्हा तुझी मुलाखत येते तेंव्हा तेंव्हा संदीप ची पत्नी म्हणून ओळख करून दिली जाते हे खरय आणि ते चुकीचं ही आहे हे ध्यानात घेउन असा ही विचार कर की वर दिलेल्या मुलाखातीत फ़क्त एक क दोन references aahet tyaa baddal अश्या वेळी ती एक statement of fact आहे असं नाही का वाटत?

त्या लेखातल मला खरतर जे खटकलं ते वेगळच होतं ते म्हणजे " कौटूंबीक जबाबदारी पासुन ती अद्याप लांबच आहे" हे वाक्य...
:-)

Ajjuka
Thursday, March 16, 2006 - 6:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शिल्पे, अग दिग्दर्शकाचे नाव यावेच ना पण नाते highlight करायची गरज का? अर्थातच मला अभिमान आहे की संदीप सावंत या दिग्दर्शकाबरोबर मी काम केले आहे. he happens to be my husband पण म्हणून नाही ना ते काम केले? मी मी चा डाग लागण्याचा धोका पत्करून अजून एका माझ्याच मुलाखतीची लिंक देतेय. जेणेकरून माझा मुद्दा आणखी स्पष्ट होईल. दोन्हीतला फरक लक्षात घ्या. बाकी तपशीलात वाचले नाहीत तरी चालेल कारण मला अजूनही मी जे केलेय किंवा करतेय ते तितके मोठे आहे असे वाटत नाही.
गेल्या वर्षी म. टा. मधे श्वास च्या सगळ्या technical team च्या मुलाखती आल्या होत्या त्यातली ही आहे.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/839887.cms
असो
/ त्या लेखातल मला खरतर जे खटकलं ते वेगळच होतं ते म्हणजे " कौटूंबीक जबाबदारी पासुन ती अद्याप लांबच आहे" हे वाक्य... /
शिल्पे तुला तर सगळं माहीतीये आणि तसेही माझ्यावर regular घर चालवायच्या जबाबदार्‍या नाहीत म्हणून तर मी खुशाल कामासाठी तीन तीन महिने पुण्यात मुक्काम ठोकून रहाते. अर्थात परत हे highlight करायची किंवा उल्लेख करायची गरज मला वाटत नाही. आणि बाईची मुलाखत म्हणून हे दिले जाते हे परत आहेच..
बाकी भेटलीस की बघते तुझ्याकडे.. नाहीतर आता आरोहीला किल्ल्या मारते... :-)


Manuswini
Thursday, March 16, 2006 - 7:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बाई म्हटली की कौटिंबिक जबाबदारी पहिली हा दृष्टीकोण आहे ना जगाचा
मग ती कितीही मोठी career मधे तर काय तिचा संसार काय करते का नीट

त्यामुळे ते तसे वाक्य असेल ती कौटींबिक जबाबदारी पासुन लांब आहे


Storvi
Thursday, March 16, 2006 - 8:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

च्या मारी मुळात कौटुंबीक जबाबदारी म्हणजे काय? हे आधी मला कोणीतरी सांगा. जर त्या संसारातली मुख्य दोन माणसं खुष असतील तर घरी स्वैपाक कोण करतं घर कसं ठेवलय घरी जेवता का बाहेर याच्याशी काय देणं घेणं आहे हे मला कळतच नाही लग्न करणे म्हणजे ' घर सांभाळण्याचा करार करणे' असे होउन बसले आहे. लग्न करणे हे माझ्यालेखी फ़क्त त्या व्यक्ती बरोबर रहणे सुख-दुःख वाटणे या पलीकडे काही दुसरं का असाव? आणि लौकिकार्थी संसार तर सगळेच करतात.. पण तसा एखाद्याने केला नाही तर का छळतात मला कळत नाही....

असो समाज असाच आहे आणि पुर्वी मी खुप optimistic होते के थेंबे थेंबे तळे साचे... बदलेल हळू हळू पण आताशा माझी निराशा होत चालली आहे.
उंबरातले किडे मकोडे उम्बरी करिती लिला जग हे बंदीशाला हेच खरे...

आम्ही आरोहीचं नाव आरोही शिल्पा तोरवी असं ठेवलंय.. तर माझी मामी म्हणते तु तशी कर्तबगार आहेस, तेंव्हा तुला तसं करायला काहीच हरकत नाही... आता पुरुष असे काय कर्तबगार असतात की त्यांचं नाव लावलेलं चालतं? कित्येकदा हे पुरूश adulterous पण अस्तात ना पण तरी त्यांचं नाव लावतातच ना मुलांना? कदाचीत तीच कर्तबगारी अपेक्षीत असेल..:-O

असो तु येच आणि आरोहीला कसली किल्ली देतेयस? ती already शेरास सव्वाशेर आहे.. ती उद्या मला म्हणणार आहे Mom your thinking is so backward शीः
:-O

Renushahane
Thursday, March 16, 2006 - 9:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुळात माझं म्हणनं आहे की मधलं नाव हे आई चं किंव अबाबाचं कशाला हवं?इथे जशी पद्धत आहे की first name आणी middle name हे स्वतह्चच असतं तसं काय हरकत आहे?साऊथ इंडीयन लोकांमधे असच असतं.आमच्या ओळखीच्यांनी त्यांच्या मुलीचं नाव " माया राधिका अय्यर " असं ठेवलं आहे.


Storvi
Thursday, March 16, 2006 - 9:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रेणु तसं करायला काहीच हरकत नाहीये. तसं केलं तर लोक म्हणतील तुम्ही अमेरिकेतले ना.. तुमचं असंच अशणार येनकेनप्रकारेण काय तुम्ही प्रस्थापिताच्या विरुद्ध काही केलं की झालं सुरू शेरे ताशेरे..

Renushahane
Thursday, March 16, 2006 - 9:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

समाजाच्या चाली-रितीं प्रमाणे वागलं तरी मागून बोलणारी लोकं असतातच.
चालत आलेल्या पद्धतींच्या पेक्षा काही वेगळं करायला काही लोकांकडेच मानसीक बळ असतं,आणी ह्या लोकांच्या आयुष्यात सतत
struggle असतोच,पण अशी लोकच समाजाला पुढे न्हेतात असं मला वाटतं

Polis
Thursday, March 16, 2006 - 10:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

च्यामारी, मग मुलीच नाव तरी कशाला ठेवलय....? एक दोन तीन(इथेच थाम्बुया.) वगैरे आकडे ठेवा बरं.
कदाचित मुलगी मोठी होवून म्हणेल : mom, मला न विचारता माझे नाव ठेवायचा शहाणपणा कशासाठी..? बिन्डोकच आहेस!


Mbhure
Friday, March 17, 2006 - 12:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी मुलाखत आधीच (चर्च्या चालू होण्याआधी) वाचली. प्रथम मला ती गुळगुळीत (non-informative) वाटली. कारण बहुतेक गोष्टी ईथे वाचल्यामुळे आधीच माहिती होत्या. पण परत लक्षात आले की सकाळच्या त्या एव्हढ्याश्या कॉलममध्ये काय काय लिहीणार? तु म्हणतेस तसे त्या वाचकांना असेच वाचायला आवडत असेल. " दोन्ही घरातुन पाठींबा " वगैरे. तु मुलाखतकारांना तुझ्या achievement आणि व्यवसायाबद्दल माहीती दिली होती. पण लेखाचा आवाका, जागा आणि वाचकांची आवड लक्षात घेता कदाचित एडिटरने तो कापलाही असेल. त्यामुळे मुलाखत लिहीणार्‍याचा दोष नसेलही.

त्याचप्रमाणे तुझे त्या मुलाखतीसंबंधातले मुद्देही वाचले आणि थोडेफार पटले. तु म्हणतेस की " संदीप सावंत " ची पत्नी हे हायलाईट करण चुकीचे आहे.... तुझा श्वास मधील सहभाग वगैरे... पण असे आहे की, बोटीचा कप्ताना बरोबर सर्व Crew असला तरी वाहवा ही कप्तानाची होते. तसे चित्रपटाचा डायरेक्टर हा जास्त गाजतो. तु त्याची पत्नी सल्याने हा उल्लेख स्वभाविक आहे असे मला वाटते. पुढे जेंव्हा तु भानु अथ्थैया (संदर्भ चुकला असल्यास Sorry ) प्रमाणे झालीस तर कदाचित लोक संदीपला तुझा नवरा म्हणुन ओळख्तील. पुढे तु डायरेक्ट केलेला एखादा चित्रपट हिट झला तर " दोघेही एकाच व्यवसायात आपाअपल नाव कमवुन आहेत " असे लिहुन येईल. उदाः माझ्या पिढी जया " भादुरी " ला ओळखते, जया " बच्चन " ला नाही.

शिल्पा Good Question . कौटुंबीक जबाबदारी म्हणजे काय? नविन V&C सुरु..... :-)



मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators