Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through April 04, 2008

Hitguj » Views and Comments » General » बिजींग ऑलिंपिक्स २००८ » Archive through April 04, 2008 « Previous Next »

Kedarjoshi
Tuesday, March 25, 2008 - 4:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उपासा संजय म्हणालास तरी हरकत नाही. ( फक्त हा संजय दरवेळी भुतकाळात जातो ईतकाच फरक).

Ankt
Wednesday, March 26, 2008 - 9:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मित्रहो या पुढे आपण एक काम करु मुकुंद ने गोष्ट लिहिली की त्या व्यक्तीशी संबधीत
video/picture आपण येथे post करू.
पण गोष्ट झाल्याझाल्या बरोबर.चालेल?

Ankt
Wednesday, March 26, 2008 - 9:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

and thanks to भाग्यश्री शुन फुजीमोटोच्या video साठी

Raviupadhye
Wednesday, March 26, 2008 - 11:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी तो व्हीडियो पाहिला.शुन च्या चेहेर्‍यावरील वेदना त्या लपविण्याचा त्याचा प्रयत्न केवढे शिकवून गेले? अन आधी मुकुन्दाने लिहिलेली गाथा वाचल्यामुळे त्या विडियोत शब्दावाचून त्या फ़ुजिमोटोंच्या व्यथा अन्त्:करणास भिडल्या.
ankt खरच व्हीडियो आणि शब्दातील गाथा यांची सांगड हा स्तुत्य उपक्रम आहे. करूया!!!!


Zakasrao
Wednesday, March 26, 2008 - 2:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुकुन्द सुंदर लिहित आहात.
भाग्यश्री विडिओ लिन्क बद्दल धन्यवाद :-)
केदार अनुमोदन संजय च्या बाबतीत :-)


Bsk
Wednesday, March 26, 2008 - 6:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

actually मुकुंद इतकं चांगलं लिहीतात की व्हीडीओ ची गरज पण भासत नाही.. परंतू ही शुन ची गोष्ट वाचून, कोण तो शुन हे पाहयची फार उत्सुकता वाटली.. खरच कशी उडी मारली असेल त्यानी अशा गुढघ्यानी! शुनबद्दल वाईट वाटण्यापेक्षा स्फुर्तीदायक वाटतो तो व्हीडीओ.. की, काहीही झालं तरी प्रयत्न सोडले नाहीत त्यानी, आणि शेवटी जिंकला!
प्रत्येक लेखानंतर व्हीडीओ द्यायची आयडीया चांगली आहे, परंतू त्यानी मुकुंद यांच्या लिखाणामधे व्यत्यय नको यायला..मला पण लिंक द्यावी का नको कळत नव्हतं..


Lampan
Thursday, March 27, 2008 - 7:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जर केनिया टांझानिया इथियोपिया ह्या देशातले लोक मेडल मिळवतात तर आपण खेळासाठी प्रोत्साहन नाही facilities नाहीत असं म्हणुन दंगा का करतो ? त्यांच्याकडेतर अन्न, वस्त्र, निवारा ह्या मुलभुत गरजाही पुर्ण होत नाहीत ... का आपल्याला जमत नाही त्याचं खापर cricket वर फोडलं जातं ? खरतर माझ्यासारख्याची ह्याबद्दल असं बोलायची लायकी नाही पण ही comment नसुन genuine प्रश्न आहे .. मग कधी कधी हे सगळं genetic आहे असं वाटायला लागतं

Dineshvs
Friday, March 28, 2008 - 3:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लंपन, केनयामधील लोकाना मूळातच चालायची खूप सवय असते. वस्ती आहे तो बहुतेक भाग, निसर्गरम्य असल्याने चालण्याचा त्रास जाणवत नसावा. माझ्या ऑफ़िसमधले सहकारी रोज येताजाता दोन दोन तास पायपीट करुन यायचे.
खास स्पर्धेसाठी स्पर्धक तिथला बर्फ़ाच्छादीत डोंगर, आणि तोही अनवाणी पायाने चढण्याचा सराव करतात.


Sheshhnag
Saturday, March 29, 2008 - 9:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेशजींचे लिखाण पाहिले की एक जाणवते, ते म्हणजे हा माणूस कुठेही गेला तर नुसत्या पाट्या टाकून येत नाही. आजुबाजूच्या प्रत्येक गोष्टीचे रसग्रहण करत असतो.
मस्त!


Mukund
Monday, March 31, 2008 - 10:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सर्वप्रथम.. एक चांगली बातमी... माझी युनिव्हर्सीटी KU...... कॉलेज बास्केटबॉलमधे(कशीबशी!) आजची एलीट ८ मधली मॅच जिंकुन आता फ़ायनल ४ मधे आली आहे.. जे अमेरीकन युनिव्हरसीटीमधे शिकले आहेत त्यांनाच याचे महत्व कळेल. पुढच्या शनिवारी उपांत्य फेरी व सोमवारी अंतिम फेरी आहे...:-)

मित्रांनो... आता पुन्हा एकदा ऑलिंपिक्सच्या रंजक गोष्टींकडे वळुयात.... आजच्या गोष्टीसाठी आपल्याला पुन्हा एकदा जायचे आहे ऍटलांटा ऑलिंपिक्सला....

मागे मी तुम्हाला ऍटलांटा ऑलिंपिक्सचे माझे काही अविस्मरणिय अनुभव सांगितलेले आठवत असेलच. त्या आठवणींबरोबरच ऍटलांटा ऑलिंपिक्सबद्दल सांगताना त्या ऑलिंपिक्सच्या ओपनींग सेरीमनीबद्दल लिहीणे भागच आहे.. कोण विसरु शकेल तो सोहोळा? ऑलिंपिक्सची मोट्ठी मशाल कोण पेटवणार हे नेहमीप्रमाणे याही ऑलिंपिक्समधे सर्वांपासुन लपुन ठेवले होते. ८०,००० प्रेक्षक... ज्यात अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बिल क्लिंटन हेही होते... उत्कंठतेने कोण मशाल पेटवणार याची वाट पाहत होते... मशाल घेउन अमेरिकेची लोकप्रिय जलतरणपटु जॅनेट इव्हान्स जेव्हा स्टेडीअममधे प्रवेशकर्ती झाली तेव्हा सगळ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला... जॅनेटने स्टेडिअमला एक फेरी मारली व ती मोठ्या मशालीच्या खाली येउन उभी राहीली... मग जी व्यक्ती ती मशाल तिच्या हातातुन घ्यायला पुढे आली ती बघुन सर्व स्टेडिअम जल्लोशाने दणदणुन गेले... लटपटत्या पायानी चालणारी ती व्यक्ती होती.... मोहाम्मद अली.... अमेरिकेने जगाला दिलेला आतापर्यंतचा सर्वश्रेष्ठ मुष्टीयोद्धा...!

आज त्याचा हा एवढा मोट्ठा सन्मान अमेरिकेमधे होत होता... पार्किन्सोनीझम झालेल्या.. लटपटत्या.. मोहम्मद अलीचे डोळे... त्या सन्मानाने पाणावलेले होते... व त्याचे ते पाणावलेले.... चकाकते डोळे... सर्व जगाला दिसत होते. अध्यक्ष बिल क्लिंटनही स्वत्:चे अश्रुंनी डबडबलेले डोळे पुसत टाळ्या वाजवत या महान मुष्टीयोद्ध्याचे मनापासुन कौतुक करत होते. १९६४ मधे सनी लिस्टनला हरवुन हेवीवेट बॉक्सींगचा अनभिषिक्त सम्राट झालेल्या या मोहाम्मद अलीला हा मान देण्यामागचे कारण काय होते?तेवढेच नाही तर तेव्हाचे ऑलिंपिक अध्यक्ष... वान ऍंटोनियो समरांच यांच्या हस्ते.... या मोहाम्म्मद अलीला सुवर्णपदकही देण्यात येत होते... कशाबद्दल हे सुवर्णपदक? मोहम्मद अली तर या ऑलिंपिक्समधे कुठल्याच शर्यतीत उतरला नव्हता... आणी अजुन तर स्पर्धांना सुरुवात सुद्धा झाली नव्हती... तर काय कारण होते या आगळ्यावेगळ्या सुवर्णपदक वितरण सोहोळ्यामागे? का मिळत होता अलीला आज हा एवढा मोठा...ऑलिंपिक्सची मशाल पेटवायचा मान?कशाबद्दल होते हे सुवर्णपदक?का एवढे अलीचे डोळे अश्रूंनी डबडबलेले होते? का अध्यक्ष बिल क्लिंटनचेही डोळे आज पाणावले होते?

या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवायला आपल्याला जायला लागेल.... इसवीसन १९६० सालात... ऍटलांटा ऑलिंपिक्सच्या आधी.... ३६ वर्षापुर्वीच्या अमेरिकेत... जो काळ १९९६ च्या काळापेक्षा अतिशय वेगळा होता... त्या अमेरिकेत.... की जी आजच्या अमेरिकेपेक्षा खुपच वेगळी होती...

१९६० च्या अमेरिकेचे वर्णन ऐकताना आजच्या पिढीला त्यावर विश्वास बसणे कठीण जाईल. अमेरिकेतली गुलामगीरी अमेरिकन सिव्हील वॉर नंतर... १८६५ पासुन जरी नष्ट झाली असली तरी १९६० च्या अमेरिकेत... क्रुष्णवर्णियांना मिळणारी वागणुक ही अतिशय हीन दर्जाची होती. त्या लोकांना बसमधे व ट्रेनमधे बसण्याच्या वेगळ्या जागा होत्या... त्यांच्या मुलांना वेगळ्या शाळा होत्या... त्यांना व्हाइट अमेरिकन लोकांच्या उपहारगृहात प्रवेशास व त्यांच्यात मिसळण्यास बंदी होती... त्यांना मतदानाचा हक्क नव्हता... एकुण काय तर.. ते लोक अमेरिकेत दुय्यम दर्जाचे नागरीक म्हणुन जगत होते. अश्या काळात क्लॅशियस क्ले उर्फ़ मोहाम्मद अली... याचा जन्म अमेरिकेच्या कंटाकी राज्यात लुईव्हील इथे झाला. आपल्या मुष्टीयुद्धाच्या कौशल्यावर... या क्लॅशिअस क्लेची केवळ १८ वर्षाचा असताना..... १९६० च्या रोम ऑलिंपिक्स साठी जेव्हा निवड झाली.... तेव्हा याचा आनंद गगनात मावेनासा झाला. १८ वर्षाच्या कोवळ्या क्लॅशिअस क्लेला आपल्या सॅग्रीगेटेड जिवनाच्या पलीकडच्या जगाची अजुन ओळख झालेली नव्हती. तो अजुन त्याच्याच विश्वात रमुन गेला होता.. तो व त्याचे क्रुष्णवर्णिय सवंगडी... फक्त "निग्रो" लोकांसाठी राखुन ठेवलेल्या उपहारगृहात व क्लब्समधे मजा करत फिरायचे. त्यात त्याला काहीच वावगे वाटत नव्हते. कारण त्याला अजुन याच्या बाहेरचे मुक्त जग माहीतच नव्हते. त्याच्या मते तो जे अनुभवत होता तेच "नॉर्मल " जिवन होते

तर असा हा नाइव्ह पण उत्साहाने ओसंडुन जाणारा क्लॅशिअस क्ले... १९६० च्या रोम ऑलिंपिक्सला येउन दाखल झाला. सगळ्यांना त्याने गर्वाने आधीच सांगीतले होते की मी सुवर्णपदक मिळवायला इथे आलो आहे... माझ्याबरोबर आधीच फोटो काढुन घ्या असे तो विनोदाने सगळ्यांना तिथे सांगत होता.आणी खरोखरच त्याने लाइट हेवी वेट गटातले सुवर्णपदक पटकावुन त्याचे शब्द खरे केले. १८ वर्षाच्या क्लॅशिअस क्लेच्या आनंदाला पारावार राहीला नाही. त्याला त्याच्या सुवर्णपदकाचा एवढा अभिमान होता की तो ते पदक २४ तास गळ्यात घालुन ऑलिंपिक व्हिलेजभर फिरायचा. असेच फिरत असताना एकदा एका रशियन वार्ताहराने त्याला प्रश्न केला की.... एक "निग्रो" म्हणुन त्याचे काय मत आहे की अमेरिकेत त्याच्या सारख्या "निग्रो" ला व्हाइट अमेरिकन लोकांच्या उपाहारगृहात जाउन जेवता येत नाही?त्यावर त्याने पटकन उत्तर दिले की मी जिथे जाउ शकत नाही अश्या उपाहारगृहांची संख्या जिथे मी जाउ शकतो त्यापेक्षा खुपच कमी आहे... आम्हाला अमेरिकेत जे पाहीजे ते खायला मिळते.. आमच्या देशात मस्त गाड्या आहेत आणी अमेरिका जगातला सगळ्यात ग्रेट देश आहे... पण १८ वर्षाच्या बिचार्‍या कोवळ्या क्लॅशिअस क्लेला काय माहीत होते की लवकरच अश्या ग्रेट देशात त्याला कोणता अनुभव अनुभवयाला मिळणार आहे...

रोम ऑलिंपिक्सनंतर अमेरिकेत परत आल्यावर त्याच्या गावात अलीचे जंगी स्वागत झाले. त्याच्या घरी त्याच्या वडिलांनी त्यांच्या घराच्या पोर्चवर अनेक अमेरिकन झेंडे फडकवले होते. त्या पोर्चमधे अलीने त्याच्या वडिलांबरोबर पोझ देउन वार्ताहरांना फोटो काढायला सांगीतले... अर्थातच तेव्हाही त्याचे लाडके सुवर्णपदक त्याच्या गळ्यात लटकवलेले होतेच! त्याचे त्या पदकावर खुप प्रेम होते... तो ते झोपतानासुद्धा गळ्यातच ठेवायचा... थोड्याच दिवसात त्या पदकावरचा सोन्याचा वर्ख निघुन जाउ लागला इतके त्याने ते वापरले. अली व ते सुवर्णपदक.... सगळ्या लुईव्हील गावात अलीची अशी इमेज प्रसिद्ध झाली. अलीच्या मुष्टीयुद्धाच्या कौशल्याला पारखुन लुईव्हीलमधले अनेक लक्षाधीश व्हाइट माणसे अलीला त्यांचे कार्ड देउन गेली. त्यातल्या काहींना त्याचा एजंट बनण्याची इच्छा होती.त्यांनी त्याला सांगीतले की त्याला कधीही कसलीही मदत लागली तर त्यांना नुसता फोन करायचा... ते त्याच्या मदतीला धाउन येतील....

अश्या या सुवर्णपदक विजेत्या अलीला एक दिवशी लुईव्हीलच्या महापौराने त्याच्या कार्यालयात येण्याचे निमंत्रण दिले. त्या व्हाइट महापौराला अलीचे सुवर्णपदक काही प्रतिश्ठीत पाहुण्यांना गर्वाने दाखवायचे होते. बिचारा अली मोठ्या उत्साहाने व गर्वाने महापौराच्या कार्यालयात गेला. तिथे गेल्यावर तो महापौर उपस्थीत असलेल्या पाहुण्यांना अलिचे सुवर्णपदक दाखवुन सांगु लागला की अलीने रोमला एका रशियन वार्ताहराला कसे सडेतोड उत्तर दिले की "निग्रो" असुनही अलीला कसे लुईव्हीलमधे राहायला आवडते... वर पुढे जाउन त्या दिडशहाण्याने.. पदरचे मोडुन.... असेही अलीच्या देखत सांगीतले की... अली त्याला म्हणाला की आफ़्रीकेत सापांशी लढत बसण्यापेक्षा किंवा चिखलाच्या भिंती असलेल्या झोपडीमधे आयुष्य घालवण्यापेक्षा माझे इथले लुईव्हीलमधे "निग्रोचे" जिवन केव्हाही चांगले आहे... व असे म्हणत तो गोरा महापौर अलीसमोर काय अली? बरोबर ना? असे म्हणत खो खो हसत सुटला... पण त्याने खुप अपमानीत होउन अलीला खुप वाइट वाटले की उगाच आपण त्या रशियन वार्ताहराला खोटे सांगीतले की अमेरिका एक महान देश आहे म्हणुन... त्याला त्या क्षणी मेयरच्या त्या वाक्याची खुप शिसारी आली व उद्वेगाने त्याने तिथुन ताबडतोब काढता पाय घेतला...

मेयरच्या कार्यालयातुन घरी जाताना.... तो व त्याचा मित्र रॉनी किंग... वाटेवरच असलेल्या एका "व्हाइट ओन्ली" उपहारगृहात हॅंबर्गर व मिल्क शेक ऑर्डर करायला थांबले. ऑर्डर घेणार्‍या मुलीने अलीला सांगीतले की ते "निग्रो" असल्यामुळे त्यांना या "व्हाइट ओन्ली" उपहारगृहात काही खायला मिळणार नाही. अलीने तिला सांगीतले की हे बघ... माझ्या गळ्यातले सुवर्णपदक बघ... मी आपल्या देशासाठी ऑलिंपिक्समधे हे मिळवले आहे... मी कोणी साधासुधा "निग्रो" नाही. त्या मुलीने ही गोष्ट मालकाला सांगीतली. मालकाने अलीला येउन सांगीतले की तो ऑलिंपिक विजेता असु दे नाही तर अजुन कोणी असु दे... तो व त्याचा मित्र "निग्रो" असल्यामुळे त्यांनी तिथुन ताबडतोब चालते व्हावे... इथे " निग्रो" लोकांना येण्याची मनाइ आहे. रॉनीने अलीला त्या अनेक मिलीअनर्स व्हाइट लोकांची आठवण करुन दिली व त्यांना फोन करायला सांगीतले. पण अलीला त्यात कमीपणा वाटला. त्याला वाटले की त्याच्या ऑलिंपिक्समधील कर्तुत्वाच्या बळावर त्याला अशी हीन वागणुक मिळायला नको होती. अशी अपमानीत वागणुक न मिळण्यासाठी त्याचा ऑलिंपिक पराक्रम पुरेसा ठरायला पाहीजे होता असे त्याला प्रामाणिकपणे वाटत होते. त्याने त्या व्हाइट लोकांना फोन करण्यास नकार दिला.एव्हाना हे सगळे बघुन त्या उपहारगृहातले एक व्हाइट मुलांचे टोळके अली व त्याचा मित्र रॉनी यांच्या दिशेने येउ लागले.त्यांनी अलीकडे त्याचे सुवर्णपदक त्यांच्या हवाली करण्यास फर्मावले. एव्हाना अलीचे.. तो सुद्धा एक ऑल अमेरिकन बॉय आहे.. हे इल्युजन.. धुळीस मिळाले होते. त्या काळात अशी व्हाइट मुलांची टोळकी... "निग्रोंना" एकटे दुकटे गाठुन... मरेसपर्यंत मार द्यायची. हे माहीत असल्यामुळे अली व त्याच्या मित्रानी तिथुन मोटरसायकलवरुन ताबडतोब पोबारा केला. पण त्या व्हाइट मुलांच्या टोळक्याने त्यांचा पाठलाग करायला सुरुवात केली.

बराच पाठलाग केल्यावर... कंटाकी.. इंडीयाना बॉर्डरवर.. ओहायो नदीवरच्या जेफ़रसन ब्रिजवर.... त्या व्हाइट टोळक्याच्या दोन म्होरक्यांनी अलीला व त्याच्या मित्राला गाठलेच. त्यांच्यामधे प्रचंड मोठी मारामारी झाली व अलीने व त्याच्या मित्राने त्या म्होरक्यांना रक्त येइसपर्यंत बदडुन काढले.... अली व रॉनी सुद्धा थोडे जखमी झाले. पण त्या टोळक्याने तिथुन काढता पाय घेतला. ते गेल्यावर अली व रॉनी ब्रिजवरुन खाली चालत.... ओहायो नदीवर.. रक्ताचे डाग व कपडे धुवायला ब्रिजच्या खाली गेले... रॉनीने अलीचे... रक्ताने माखलेले सुवर्णपदक स्वछ धुतले व आपल्या गळ्यात घातले.. ते सुवर्णपदक अलीपासुन प्रथमच वेगळे झाले होते व अली त्या पदकाकडे प्रथमच एक दर्शक म्हणुन बघत होता... आणी अचानक अलीला त्या क्षणी त्या पदकाचे महत्व अजिबात वाटेनासे झाले.... महापौराच्या कार्यालयापसुन ते आतापर्यंतच्या मारामारीपर्यंतच्या आजच्या घटनांमुळे.... अलीला त्या क्षणी... त्या सुवर्णपदकाची शिसारी येउ लागली. रॉनीने ते पदक आपल्या गळ्यातुन काढुन परत अलीच्या गळ्यात टाकले... पण अलीला अचानक ते पदक व्हाइट माणसांनी... त्याच्या मानेभोवती टाकलेल्या जोखडासारखे.. एकदम जड भासु लागले... ते दोन्ही मित्र परत वर... चालत चालत.. ओहायो नदीवरच्या त्या जेफ़रसन काउंटी ब्रिजवर आले... वर ब्रिजवर परत आल्यावर अली त्या पुलाच्या कडेला.. एकटाच चालत गेला.... अलीने आपल्या गळ्यातले ते सुवर्णपदक गळ्यातुन काढले व हातात धरले...त्याने थोडा वेळ नदीकडे पाहुन विचार केला व... मग त्याने ते सुवर्णपदक ओहायो नदीच्या त्या रोरवणार्‍या प्रवाहात.... जोरात भिरकावुन दिले...... त्याला एकदम हलके हलके वाटु लागले... इतके दिवस त्याला प्राणप्रिय असलेले ते सुवर्णपदक.. ओहायो नदीच्या प्रवाहात वाहात चालले होते.... व अलीला असे वाटत होते की त्याची "व्हाइट होप" बरोबरची सुटी आता संपली होती....


Fast forward 36 years... to 1996... at Atlanta Olympics.....

आणी आज.. ३६ वर्षांनी.... त्याच अमेरिकेत... अमेरिकन अध्यक्ष व अमेरिकन जनतेच्या समोर... ३ बिलिअन्स टिव्ही दर्शकांच्या समोर.... पाणावलेल्या डोळ्याने अली ऑलिंपिक्सची मशाल पेटवत होता... व टाळ्यांच्या कडकडाटात.... वॉन ऍन्टॉनियो समरांचच्या हातुन... ते ३६ वर्षापुर्वी नदीत भिरकावुन दिलेले.. त्याचे ऑलिंपिक्स सुवर्णपदक.... मानासकट.. त्याला आज परत मिळत होते.....




Shakun
Monday, March 31, 2008 - 1:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुकुन्द, अप्रतीम !! हा माझा मायबोली वरचा पहिला पोस्ट आहे. तुमच्या लिखाणानी मला टायपायचा आळस सोडायला भाग पाडलं. :-) ही नि:संशय तुमच्या सहज सुन्दर शैलीची कमाल आहे. अभिनंदन आणि शुभेच्छा !! लगे रहो

Dineshvs
Monday, March 31, 2008 - 4:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आभार शेषनाग. आपले खेळाचे धोरण राजकारण्यानी बरबटलेले आहे. मुकुंदच्या सुंदर लेखनात हा कणसूर नको होता, पण जर आपण खेड्यापाड्यात शोध घेतला तर आपल्याला अजुनही उत्तम खेळाडू मिळतील, फक्त त्याच्या बुधिया, होवु देता कामा नये.
आणि मुकुंद काळ्याना, काळे म्हणणे जास्त योग्य आहे. तो शब्द आता कुणीच वापरत नाही.
काळ्यांमधे आणखी एक प्रथा आहे, कुठल्याही जितीनंतर ते आवर्जून एका झाडाला किंवा जमिनीला स्पर्श करतात. आपल्याला गर्व होवु नये म्हणुन मिळालेले यश ते निसर्गाला अर्पण करतात.


Mukund
Tuesday, April 01, 2008 - 4:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश... तुमचा चुकुन गैरसमज झालेला आहे. कदाचीत चुक माझीच असावी. वरील पोस्ट लिहील्यावर मी खाली तळटीप टाकायला हवी होती की.. "तो" शब्द मी मुद्दामुन quotation मधे टाकला आहे. तुम्ही म्हणता ते एकदम बरोबर आहे... सध्या हा शब्द कोणीच उच्चारत नाही... ती एक शीवी समजली जाते. पण माझ्या पोस्टात तो शब्द वापरायचे कारण मला त्या काळाची वास्तवता वाचकांच्या समोर उभी करायची होती. त्या काळात तो शब्द सर्रास वापरला जायचा व त्यातुन थबथबली हिनता मला वाचकांना दाखवुन द्यायची होती. तरीसुद्धा कोणाला त्या शब्दाच्या वापरामुळे राग आला असेल तर क्षमस्व... माझा तो शब्द वापरण्यामागचा उद्देश लक्षात घ्यावा ही वाचकांना नम्र विनंती....

भाग्यश्री... फ़ुजीमोटोची व्हिडीओ लिंक दिल्याबद्दल धन्यवाद. तुम्हा वाचकांना जर व्हिडिओ बघायची उत्सुकता असेल तर माझ्या लिखाणासंबधीत व्हिडीओ लिंक कुठे असेल तर इथे टाकु शकता.. माझी काहीच हरकत नाही पण एखादी गोष्ट शब्दरुपात वाचताना आपण आपल्या कल्पनाशक्तीची जोड त्याला दिली तर त्या गोष्टीला फक्त आपल्या कल्पनाशक्तीच्या भरारीचेच लिमीट असते... म्हणुनच आपल्याला.... एखाद्या पुस्तकावरुन जेव्हा चित्रपट निघतो तेव्हा... मुळ पुस्तकच जास्त आवडते.... हे आपले माझे मत:-)

आणी इथे मला कुठलाच वाद घालायचा नाही त्यामुळे आपल्या देशात ऑलिंपिक विजेते का निर्माण होत नाही याची चर्चा करायला पाहीजे तर आपण दुसरा फलक उघडु.. पण लंपन तुला एकच सांगावेसे वाटते... की पदक विजेते निर्माण होणे हे जेनेटिक्स व मेहनत या दोन्ही गोष्टींवर अवलंबुन असते...




Akhi
Tuesday, April 01, 2008 - 5:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्त...... (४ शब्द झाले)

Dineshvs
Tuesday, April 01, 2008 - 9:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला राग नाही आला मुकुंद, पण या शब्दाचा काळ्याना येणारा राग मला परिचित आहे इतकेच. लिखाण खुपच सुंदर होतेय. खरे तर मधे हा प्रतिक्रियेच्या व्यत्ययच नको होता.

Mukund
Friday, April 04, 2008 - 9:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ऑलिंपिक्स मधल्या डायव्हींग स्पर्धांमधील अजरामर क्लॉड डिबिआसीबद्दल आपण मागे वाचलेले तुम्हा सगळ्यांना आठवत असेलच... त्याने जर डायव्हींग स्पर्धेतल्या कामगीरीचा पाया रचला असे मानले तर त्यावर कळस कोणी चढवला असेल तर आजच्या गोष्टीत मी तुम्हाला सांगत असलेल्या ग्रेग ल्युगॅनीसने!

डिबीआसीच्या गोष्टीमधला, १९७६ च्या मॉंट्रिआल ऑलिंपिक्समधे त्याला कडवी लढत देणारा १७ वर्षाचा ग्रेग ल्युगॅनीस.... पुढे जाउन ऑलिंपिक्सच्या इतिहासात आपलेही नाव डिबिआसीसारखे कमवणार.... याबाबत जगात कोणाचेच दुमत नव्हते. असे एक्स्पेक्टेशनचे दडपण जेव्हा कोणत्याही खेळाडुवर टाकले जाते तेव्हा ते यशस्वीरित्या पेलवुन आपल्या नावाला जागणे हे फक्त काही मोजक्याच खेळाडुंना जमते व ते खेळाडु मग खेळाच्या इतिहासात साहजीकच अजरामर होतात. बास्केटबॉलमधला मायकेल जॉर्डन, गॉल्फ़मधला टायगर वुड व टेनीसमधला रॉजर फ़ेडरर.... हे त्या त्या खेळातले तसे नावाला जागणारे खेळाडु.... डायव्हींग स्पर्धांमधला ग्रेग ल्युगॅनीस हाही त्यांच्याच पंगतीतला....

तर अश्या या ग्रेग ल्युगॅनीसचा जन्म समोअन वडिल व अमेरिकन आईच्या पोटी झाला. दुर्दैवाने त्याच्या आइवडिलांनी त्याला जन्मताच टाकुन दिले. एका प्रेमळ अमेरिकन जोडप्याने याला दत्तक घेउन मग लहानाचे मोठे केले.पण अगदी लहान वयातच ग्रेगला संगत चांगली लाभली नाही त्यामुळे माध्यमीक शाळेत असतानाच याला नाना प्रकारची व्यसने लागली. जोपर्यंत हा १३ वर्षाचा झाला तोपर्यंत ड्रग्स पासुन दारुपर्यंतची सर्व व्यसने याला लागली होती. सगळ्यांना कळुन चुकले की हा मुलगा पुर्णपणे वाया जाणार आहे. याचे लक्ष ना अभ्यासात ना खेळात.... नाही म्हणायला त्याच्या आइला बॅले नृत्याची आवड असल्यामुळे यालाही बॅलेमधल्या स्टेप्स.... आइचे बघुन बघुन... लहानपणापासुन सहज जमत होत्या. खेळाची आवड नाही म्हटले तरी याला शाळेच्या जलतरण तलावात उड्या मारायला व पोहायला मात्र खुप आवडायचे. असेच एक दिवस जलतरण तलावाच्या डायव्हींग बोर्डवर... बॅलेचे स्टेप्स करत करत सुर मारणारा ग्रेग त्याच्या शाळेच्या खेळ प्रशिक्षकाच्या नजरेस पडला व ग्रेगच्या आयुष्याला त्या दिवसापासुन वेगळीच कलाटणी मिळाली...

पुढच्या ३ वर्षात मग हा ग्रेग शाळेच्या प्रशिक्षकापासुन जगप्रसिद्ध डायव्हींग प्रशिक्षक डॉ. सॅमी ली यांजपर्यंत येउन पोहोचला.... व डॉ. सॅमी लीसारख्या रत्नपारख्याला लगेच समजले की १९७६ च्या मॉंट्रियाल ऑलिंपिक्समधे क्लॉड डिबिआसीला कोण जर हरवु शकेल तर हा ग्रेग ल्युगॅनीसच! त्या ऑलिंपिक्समधे ग्रेग ल्युगॅनीस... अनुभव कमी असल्यामुळे सुवर्णपदकास जरी मुकला तरी.... पुढच्या ३ वर्षात जगातल्या सगळ्या डायव्हींग स्पर्धा जिंकुन याने आपला दबदबा निर्माण केला. १९८० चे मॉस्को ऑलिंपिक्स जेव्हा जवळ आले तेव्हा कोणाच्याच मनात संदेह नव्हता की हा ल्युगॅनीस नुसता प्लॅटफ़ॉर्म डायव्हींग( पाण्यापासुन ३० फ़ुट वर) मधेच नाही तर स्प्रिंग बोर्ड डायव्हींग(पाण्यापासुन १० फ़ुट वर) मधेही सुवर्णपदक पटकवणार. पण रशियाने अफ़गाणीस्तानवर केलेल्या अतिक्रमणाचा निशेध म्हणुन अमेरिकेने मॉस्को ऑलिंपिक्सवर बहिष्कार टाकला व ग्रेगचे ऑलिंपिक्सला जाण्याचे स्वप्न १९८४ पर्यंत स्थगीत झाले.पण १९८४ च्या लॉस ऍन्जलीस ऑलिंपिक्समधे याने स्प्रिंग बोर्ड डायव्हींगमधे अपेक्षेप्रमाणे चायनाच्या टान लिंगडी ला... न भुतो न भविश्यती अश्या... ९० गुणांच्या फरकाने हरवले व प्लॅटफ़ॉर्म डायव्हींगमधे सुद्धा ७०० च्या वर गुण मिळवुन याने सुवर्णपदक मिळवले व ऑलिंपिक्समधे एवढे गुण मिळवणारा पहीलाच खेळाडु म्हणुन मान मिळवला.तर मंडळी अश्या या महान ग्रेग ल्युगॅनीसला पाहायला आज आपण जाउयात १९८८ च्या सेउल ऑलिंपिक्सला....

क्रमंश्:



Mukund
Friday, April 04, 2008 - 9:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

१९८८ चे सेउल ऑलिंपिक्स इस्ट जर्मनीची जलतणपटु क्रिस्टीन ऑटोने मिळवलेली ६ सुवर्णपदके,अमेरिकन धावपटु फ़्लोरेन्स ग्रिफ़िथ जॉयनरने मिळवलेली ३ सुवर्णपदके,१०० मिटर्सचा विजेता कॅनडाचा बेन जॉन्सन.. ज्याचे ड्रग्समुळे दुसर्‍या दिवशी सुवर्णपदक काढुन घेण्यात आले व ते कार्ल लुइसला देण्यात आले.... अश्या गोष्टींनी जरी लक्षात राहीले असले तरी सगळ्या ऑलिंपिक्सप्रेमींच्या मनात या ऑलिंपिक्समधली स्प्रिंगबोर्डमधली डायव्हींग स्पर्धा व हे ऑलिंपिक्स...या ग्रेग ल्युगॅनीसमुळे कायमचे लक्षात राहीले आहे.१९८८ चे सेउल ऑलिंपिक्स हे ग्रेग ल्युगॅनीसचे तिसरे ऑलिंपिक्स होते व आतापर्यंत त्याने मॉंट्रियालला एक रजत पदक व लॉस ऍंजेलसला २ सुवर्णपदके व याही ऑलिंपिक्सच्या प्लॅटफ़ॉर्म डायव्हींगमधे चायनाच्या १३ वर्षाच्या झिऑन्ग नी ला... अतिशय कमी फरकाने हरवुन १ सुवर्णपदक पटकावले होते.त्यामुळे आज होणार्‍या स्प्रिंगबोर्ड डायव्हींगमधे जर त्याने सुवर्णपदक पटकावले तर लागोपाठच्या २ ऑलिंपिक्समधे डायव्हींगच्या दोन्ही(प्लॅटफ़ॉर्म व स्प्रिंगबोर्ड) स्पर्धांमधे सुवर्णपदक मिळवणारा तो एकमेव खेळाडु ठरणार होता. त्याला कट्टर लढत द्यायला परत एकदा तयार होता.... १९८४ मधला रजत पदक विजेता... चायनाचा टान लिंगडी....

१९८४ च्या पराभवाचा वचपा काढायला संपुर्ण चायनाचा डायव्हींग संघ व त्यांचे प्रशिक्षक अतिशय अधिर झाले होते. पण प्लॅटफ़ॉर्म डायव्हींगमधे त्यांच्या १३ वर्षांच्या झिऑन्ग नी ला ल्युगॅनीसला हरवण्यात थोडक्यात अपयश आले होते व सगळ्या चायनाच्या डायव्हींग पथकाला व त्यांच्या प्रशिक्षकांना हताश होउन हात चोळत बसायला लागले होते. पण या टान लिंगडी कडुन मात्र त्यांच्या सगळ्यांच्या फार मोठ्या अपेक्षा होत्या कारण या टान लिंगडीने गेली चार वर्षे ग्रेग ल्युगॅनीसच्या डायव्हींगच्या व्हिडिओ टेप्सचा अगदी बारीक अभ्यास केला होता....

तर अश्या या स्प्रिंगबोर्ड स्पर्धेची सुरुवात झाली. अपेक्षेप्रमाणे ल्युगॅनिसने एकापेक्षा एक चांगल्या डाइव्ह मारुन पहिल्या आठ डाइव्हनंतर प्रथम स्थान मिळवले होते. आणी आता प्राथमीक फेरीतली औपचारिकता फक्त बाकी राहीली होती. आणी ग्रेग ल्युगॅनीस आपल्या नवव्या डाइव्हसाठी पाण्यापासुन वर १० फ़ुट असलेल्या स्प्रिंगबोर्डवर येउन पाठमोरा उभा राहीला... नेहमीप्रमाणे त्याने शांत चित्ताने आपले ध्यान लावले.. तो तसे ध्यान लावत असे तेव्हा मला तो संत ज्ञानेश्वर असल्यासारखा भासे.. मी व माझे दोन्ही भाउ त्याला बघताना संत ज्ञानेश्वरच म्हणायचो... असा त्याचा शांत धिरगंभीर
चेहरा असायचा... ३० सेकंद... मनातल्या मनात तो मारत असलेल्या डाइव्हची मनातल्या मनात उजळणी करुन झाल्यावर..
A reverse two and half somersault in the pike position.. त्याने स्प्रिंगबोर्डवरुन उडी मारली.... आणी स्प्रिंगबोर्डवरुन वर उडुन तो जेव्हा हवेत उलटा... कोलांटी उडी मारुन पाण्याच्या दिशेने जाउ लागला तेव्हा बघणार्‍या सगळ्यांच्या तबडतोब लक्षात आले की ल्युगॅनीसचा अंदाज साफ़ चुकला आहे व त्याचे खाली वेगात येणारे डोके स्प्रिंगबोर्डपासुन फार दुर नाही... आणी काही समजायच्या आत... फाट्ट... अस्सा जोरात आवाज आला व ल्युगॅनीसचे डोके दाणकन... डायव्हींग प्लॅटफ़ॉर्मवर आपटले.... अर्थातच त्याचे संपुर्ण शरीर... अतिशय ऑकवर्ड रित्या पण्यात जाउन कोसळले.... ते भयावह द्रुश्य प्रत्यक्ष पाहणार्‍या ५००० व टिव्हीवर पाहणार्‍या लक्षावधी प्रेक्षकांचा आवंढा त्यांच्या घशातच राहीला... सगळ्या तलावात Oh No! असा दबलेला आवाज येउन भयाण शांतता पसरली... सगळे अमेरिकन प्रशिक्षक व सुरक्षा अधिकारी ल्युगॅनीस पाण्यातुन कधी वर येतो याची वाट पाहु लागले.. त्यातले काही जण तलावात उडी मारायला तयारही होते.. पण काही क्षणातच ग्रेग ल्युगॅनीस आपले ओले केस मागे करत पाण्यातुन वर आला व तलावाच्या कडेला जाउन स्वत्:च्या हाताच्या बळावर तलावाच्या बाहेर आला. लगेच त्याच्याभोवती त्याच्या प्रशिक्षकांचे व वैद्यकिय मदत करणार्‍यांचे कोंडाळे झाले.... त्याच्या डोक्यातुन भळाभळा रक्त वाहत होते... त्या जखमेवर... ताबडतोब तात्पुरते टाके घालण्यात आले. टाके घालणार्‍या डॉक्टरला एवढेही भान नव्हते की ल्युगॅनीसच्या रक्त येणार्‍या डोक्याच्या जखमेला हात लावायच्या आधी ग्लोव्ह्स घालायचे म्हणुन.... डॉक्टरचे ते उघडे हात व जलतरण तलावातले पाणी त्याच्या रक्ताने लाल झालेले पाहुन.... इथे ग्रेग ल्युगॅनीसच्या मनात एक वेगळेच विचारांचे वादळ थैमान घालत होते.... त्या विचारांची पार्श्वभुमी अशी...

ग्रेग ल्युगॅनीसला अगदी लहान वयापासुन ड्रग्स व दारुचे व्यसन लागले होते पण त्यातुन तो आता बाहेर आला आहे हे सत्य सगळ्या जगाला माहीत होते. ग्रेगनेही ते सत्य जगापासुन लपवुन ठेवण्याचा कधीच प्रयत्न केला नव्हता. पण ग्रेगबाबतचे अजुन एक सत्य मात्र... जे ग्रेग व त्याच्या अतिशय जवळच्या काही लोकांशिवाय.. कोणालाच अजुन माहीत नव्हते... आणी ते म्हणजे ग्रेग हा
Gay होता! त्याला गेली ८ वर्षे एक स्टेडी बॉयफ़्रेंडही होता व तो त्याला अतिशय अब्युजही करायचा. ग्रेगच्या प्रसिद्धीचा पैशासाठी फायदा करुन घेण्यातच त्याला जास्त उत्साह होता. ग्रेग त्याच्यावर इमोशनली डिपेंडंट असल्यामुळे गेली आठ वर्षे त्याने त्याचा तो जाच सहन केला होता. अशातच त्याचा मित्र हा हसलर असुन त्याला AIDS झाला आहे हे ग्रेगला १९८८ च्या सुरुवातीला कळले होते. आणी मार्च १९८८ मधे त्याला स्वत्:लासुद्धा AIDS आहे ही प्रचंड धक्कादायक बातमी त्याच्या पर्सनल डॉक्टरने त्याला दिली होती. तो काळ AIDS च्या बाबतीत अतिशय कमी माहीतीचा होता. डॉक्टरांना सुद्धा त्या रोगाचे नीट आकलन अजुन झाले नव्हते... नेमका कसा त्याचा प्रसार होतो.. त्यावर उपाय काय वगैरे वगैरे... आणी आजच्यासारखाच त्या काळातही हा रोग असलेल्या रुंग्णांना जोडला जाणारा सामाजीक कलंक... या सगळ्या डोके सुन्न करुन टाकणार्‍या व कन्फ़्युजींग गोष्टींमुळे ग्रेग ल्युगॅनीसने आपल्याला AIDSआहे ही गोष्ट जगाला अजुन सांगीतलीच नव्हती... आपल्या ऑलिंपीक स्वप्नांवर त्याने पाणी फिरेल अशी भितीही त्याला वाटत होती. पण त्याच्या स्वप्नातही असे आले नव्हते की तो डायव्हींग स्पर्धेत रक्तबंबाळ होउन जलतरण तलावात पडेल म्हणुन.. आणी आज नेमके तेच घडले होते... त्याला राहुन राहुन भीती वाटत होती की आपल्या रक्तामुळे बाकीच्या कोणाला आपला रोग होउ नये... पण त्याला तेव्हा हे माहीत नव्हते की AIDSचा विषाणु पाण्यामधे जिवंत राहु शकत नाही...

म्हणुन त्याला टाके घालणार्‍या डॉक्टरचे उघडे हात बघुन.. त्याचे जलतरण तलावातले रक्त बघुन... तो एकदम बावचळुन गेला होता.. जगाला त्याच्या रोगाविषयी सांगावे की नाही? सांगीतले तर जग काय म्हणेल? माझी पदके काढुन टाकली जातील का? अश्या अनेक विचारांचे काहुर त्याच्या मनात.... डोक्यावरच्या जखमेवर तात्पुरते टाके घालुन घेताना.... माजले होते...

३५ मिनिटांनी डोक्याच्या जखमेवर तात्पुरते टाके घालुन झाल्यावर ग्रेग ल्युगॅनीस परत जलतरण तलावावर आला.... अर्थातच टाळ्यांच्या प्रचंड कडकडातात! आणी उरलेल्या दोन डाइव्ह आत्मविश्वासाने मारुन त्याने सहज अंतिम फेरी गाठली. ३५ मिनिटांनी बाहेर आल्यावर त्याने जी पहीली उडी मारली....
Reverse one and a half in the layout position ती इतकी अप्रतिम मारली की त्याला ८७.१२ गुण मिलाले.... प्राथमीक फेरीतला सगळ्यात जास्त स्कोर! प्राथमिक फेरी पुर्ण झाल्यावर ग्रेग हॉस्पिटलमधे गेला. डोक्याच्या जखमेवर परमनंट टाके मारुन घेतल्यावर दुसर्‍या दिवशी टान लिंगडीने जोरदार लढत देउनसुद्धा... ल्युगॅनीसने आपल्या सगळ्या ११ डाइव्ह्ज अतिशय कौशल्याने व बिनचुक मारल्या... (त्यात प्राथमीक फेरीत त्याचे डोके आपटलेली डाइव्ह सुद्धा होती...) व सेउल मधले डायव्हींगमधले दुसरे सुवर्णपदक मिळवुन लागोपाठच्या २ ऑलिंपिक्समधे डायव्हींगच्या दोन्ही स्पर्धात सुवर्णपदके जिंकणारा.... जगातला आतापर्यंतचा एकमेव(व नंतरचा ही बहुतेक!) डायव्हर म्हणुन ग्रेग ल्युगॅनिसने ऑलिंपिक्सच्या इतिहासात आपले नाव अजरामर केले......

Akhi
Friday, April 04, 2008 - 2:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

डायव्हींग च पण समावेश असतो मला माहीतीच नव्हते

Akhi
Friday, April 04, 2008 - 2:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

डायव्हींग च पण समावेश असतो मला माहीतीच नव्हते

Dineshvs
Saturday, April 05, 2008 - 3:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुकुंद डायव्हींग पण माझा खुप आवडता प्रकार. स्प्रिंग बोर्डवर उभे राहिल्यावरच्या शेवटच्या क्षणाची एकाग्रता, मला हरखुन टाकते.
प्रत्येक जण काहितरी वेगळे करण्याचा प्रयत्न करतोच.
मला त्याच्या तंत्राविषयी, तसेच गूण कश्याच्या आधारावर दिले जातात, ते जाणून घ्यायचे होते. हे सगळे लेखनाच्या ओघातच येऊ दे.


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators