Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through April 24, 2007

Hitguj » Views and Comments » General » Cricket » Archive through April 24, 2007 « Previous Next »

Zakki
Wednesday, April 18, 2007 - 5:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

परिक्षा
श्री लंकेने आयर्लंडला दहा षटकात आठ गडी राखून हरवले. त्यांचा धावांचा वेग १० षटकात ८१ असा होता. तर आता श्री लंकेचे गुण व धावांचा वेग किती? :१० गुण
चारी संघाचे गुण व धावांचा वेग क्रमाने लिहा - जास्तीत जास्त ते कमीत कमी या क्रमाने. :१० गुण



Farend
Wednesday, April 18, 2007 - 5:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्की, आम्हाला उत्तरे दिल्यावर पेपरवर लाल रंग बघायची सवय होती, इथे आधीच? :-)

Zakki
Wednesday, April 18, 2007 - 5:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्याचे काय आहे, अमेरिकेत आजकाल शाळेमधे चूक उत्तरांना लाल शाई वापरू नये म्हणतात. कोवळ्या बालमनावर (म्हणजे १६ ते १८ वर्षाच्या बालबालिकांच्या मनावर) वाईट परिणाम होऊन त्यांच्यात नैराश्य येते, स्वाभिमान कमी होतो.

आता तुम्हाला माहितच असेल, की भारत व चीन वगळता, इतर २० राष्ट्रात आठवी ते बारावी या वयोगटातील मुलांना गणित व शास्त्र या विषयांची परिक्षा दिली. अमेरिकेचा नंबर १७ वा किंवा १८ वा लागला. फक्त self-esteem,arrogance नि confidence मधे मात्र पहिला. तर तो पहिला नंबर तसाच टिकवण्यासाठी हा नवीन नियम की लाल शाई वापरू नका.

आता self-esteem नि confidence असल्याने चुकीची उत्तरे सुद्धा अत्यंत ठामपणे मांडत असतात, नि ९ ट्रिलियनचे कर्ज व ८०,००० nuclear missiles असल्याने कुणाची हिंमत आहे त्यांना चूक म्हणण्याची?


Satishmadhekar
Thursday, April 19, 2007 - 5:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>> खाशी, आणि जसे मूळ भारतीय वंशाच्या लोकानी दुसर्‍या देशात त्या देशासाठी केलेल्या कामाचा इकडे उदो उदो करण्याची जी पद्धत आहे

अगदी बरोबर! याचे उत्तम उदाहरण म्हणजे अमेरिकेतला खासदार बॉबी जिंदाल.

Farend
Friday, April 20, 2007 - 7:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ब्रायन लारा निवृत्त! आधी फक्त वन डे म्हणाला होता, पण आता कसोटीही.

एखादा श्रेष्ठ खेळाडू करियर संपताना आधीच वर्ल्ड कप नंतर निवृत्त व्हायचे ठरवून वर्ल्ड कप गाजवून गेलाय असे क्वचितच झालेय. इम्रान झाला होता, पण होणार हे आधीच ठरले नसावे, आणि असता तरी ती 'पाकिस्तानी निवृत्ती' (पाक मधे बहुधा एक मॅच खेळणार नसेल तर निवृत्त होतो म्हणतात, उदा: आफ़्रिदी ची निवृत्ती सचिन च्या injury break पेक्षा कमी दिवस टिकली).

फक्त या वेळेस मॅग्राथ हा कप गाजवून जाईल असे वाटते.

Satishmadhekar
Friday, April 20, 2007 - 12:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रत्येक विश्वचषकानंतर काही वरिष्ठ खेळाडूंचा बळी जातो. २००३ च्या विश्वचषकानंतर अरविंद डिसिल्वा, वकार युनुस, वासिम अक्रम, मोइन खान, सैद अन्वर इ. बाहेर पडले. या वर्षी तर पुष्कळ खेळाडू कायमचे बाहेर जातील. काही जण वय झाल्यामुळे निवृत्ती घेतील तर काही जणांची कायमची हकालपपट्टी होईल.


Imtushar
Friday, April 20, 2007 - 3:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सचिन, सौरभला एकदिवशीय सामन्यांतून विश्रांती,

हरभजन, पठाण आणि आगरकरला दोन्ही संघातून डच्चू

सेहवाग ला कसोटी संघात जागा नाही.

राजेश पवार (कसोटी) आणि मनोज तिवारी ( ODI ) यांचा समावेश.

http://content-uk.cricinfo.com/bdeshvind/content/current/story/291603.html


-तुषार


Robeenhood
Friday, April 20, 2007 - 3:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

डच्चू, जागा नाही, विश्रान्ती या सगळ्याचा अर्थ हाकलले असाच होतो ना?

Imtushar
Friday, April 20, 2007 - 3:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सचिन आणि सौरभ कसोटी संघात आहेत... त्यामुळे त्यांची विश्रांती ही खरोखरची (अखेरची नव्हे) असू शकते

-तुषार


Mansmi18
Friday, April 20, 2007 - 6:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे लोक विश्वचषक सरळ ऑस्ट्रेलियाला देउन का टाकत नाहीत?:-)

Zakki
Friday, April 20, 2007 - 7:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो ना. ऑस्ट्रेलिया ५ बाद ३४८ तर NZ ७६ मधेच ५ बाद! आता सेमि नि फ़ायनल ला काय फरक पडणार आहे या परिस्थितीत? हेडन नि पाँटिंग ठोकतातच आहेत. टेटला पण फॉर्म गवसला. मॅक ग्राथ तर अजूनहि फॉर्ममधे आहेच.

Satishmadhekar
Saturday, April 21, 2007 - 2:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मूर्खपणाची कमाल आहे. उथप्पा विश्वचषकाच्या तीनही सामन्यात अपयशी ठरून परत तो आत कसा? त्याच्यापेक्षा गांगुली काय वाईट होता? सेहवाग, धोनी अजून का बाहेर जात नाहीत? मग सचिनने काय पाप केले होते? एकच चांगला निर्णय म्हणजे हरभजनला दोन्हीमध्ये डच्चू. नाहीतरी तो बिनकामाचाच होता. बाकी मोंगियाला आणि उरलेला संघ म्हणजे जुन्या बाटलीत जुनीच दारू! :-)

Farend
Monday, April 23, 2007 - 4:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पॉल कॉलिंग्वूड काय एकेक जबरदस्त कॅच घेतो! हा परवाच्या वेस्ट इंडीज विरुद्ध च्या मॅच मधला
उजव्या हाताने पण डाव्या बाजूस घेतलेला

२००५ मधे Ashes च्या आधी झालेल्या Natwest मधे घेतलेला हेडन चा

आणी हे शोधताना आणखी एक सापडलेला टेस्ट मधील पॉंटिंग चा, २००५ Ashes मधला असावा

Robeenhood
Monday, April 23, 2007 - 5:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फार एन्ड शेवटच्या कॅचची मॅच पाकिस्तानबरोबरची आहे असे वाटते

Farend
Monday, April 23, 2007 - 8:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

oops रॉबिनहूड बरोबर आहे, मी आणखी एक दोन बघितले YouTube वर आणि त्या कोठेतरी पॉंटिंग चाही होता बहुतेक.

Nanya
Monday, April 23, 2007 - 9:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

" BCCI चे डोके ठिकाणावर आहे का?" :-)
7 member committee to select the coach :
http://www.cricketnext.com/news/bcci-appoints-panel-to-select-coach/top/24637-13.html
BCCI चा काही गैरसमज झाला आहे का? coach selection ला इतके जण काय करायचे आहेत? coach ला आता इतके महत्व दिले आहे की जणु players नाही तर coach ground वर जाउन खेळणार बहुतेक.
किती हा पैश्याचा अपव्यय?
***इतका खर्च तर bill gates ने त्याच्या घरातल्या coach वर पण केला नसेल :-)


Zakki
Monday, April 23, 2007 - 11:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अपव्यय आमच्यासारख्या कमी पैसे असलेल्या व्यक्तिला वाटतो. BCCI कडे एव्हढा पैसा आहे, एव्हढा पैसा आहे की काय करू नि काय नको असे झाले आहे. भारत जर पहिल्याच फेरीतून परत नसते आले, नि अपेक्षेप्रमाणे अंतिम सामन्यात पोचले असते तर नुसत्या celebration ला लागणार्‍या पैशात आता या सात जणांची चंगळ होणार. होऊ दे बापडी. आपणच पैसे देतो त्यांना. नाही दिले पैसे की नाही करणार असला 'अपव्यय'.

Satishmadhekar
Tuesday, April 24, 2007 - 4:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>> " BCCI चे डोके ठिकाणावर आहे का?"

नान्या,
या कमिटीमध्ये एकूण ७ जण आहेत. त्यातले रवि शास्त्री, गावसकर आणि वेंकटराघवन सोडले तर उरलेले ४ जण (पवार, निरंजन शहा इ.) पुढारी आहेत. म्हणजे प्रशिक्षक निवडणार्‍यांपैकी निम्यांहून अधिक लोकांनी हातात कधी बॅट सुद्धा धरलेली नाही. उरलेल्या तिघांपैकी एकजण तर वशिल्याचा तट्टू म्हणूनच संघात असल्याने काहीही न करता बरीच वर्षे टिकून होता. हे काय प्रशिक्षक निवडणार? बहुतेक हे पुढारी संभाव्य प्रशिक्षकांना गुपचुप भेटून त्याच्या मानधनातला कट मागतील आणि जो सर्वात जास्त कट यांना देईल तो प्रशिक्षक होईल. दुर्दैव भारताचं! :-)


Mandard
Tuesday, April 24, 2007 - 5:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भारतीय टिमला कोचची जरुरी नाही. कप्तान, फ़िजिओ, वगैरेंची पण नाही. आपल्या टिम मधिल सर्व खेळाडु उच्चप्रतिभा संपन्न आणि स्वयंभु आहेत. कोच सारखी फ़डतुस माणसे त्यांचा खेळ बिघडवतात.

Nanya
Tuesday, April 24, 2007 - 5:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणि मला आठवते त्याप्रमाणे शास्त्री आणि गावसकर २००५ मध्ये ग्रेग चप्पेल ला निवडले त्या committee मध्ये पण होते. काय उपयोग झाला?
पुन्हा ये रे माझ्या मागल्या होणार आहे.


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators