Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through April 04, 2007

Hitguj » Views and Comments » General » Cricket » Archive through April 04, 2007 « Previous Next »

Jaymaharashtra
Tuesday, April 03, 2007 - 6:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सचिनवर टिका करणार्‍यांसाठी महत्वाचा असा वाचनिय लेख! म टा मधिल!


जय हिंद!
जय महाराष्ट्र!


खेलो, सचिन खेलो!


[ ंओन्दय, आप्रिल ०२, २००७ १२:०७:११ अम]


पराभवात कोणी सहभागी होत नसतो, विजयाचे श्रेय मात्र प्रत्येकजण स्वत:कडे घेत असतो हा क्रिकेटमधला अलिखित नियम आहे. त्याचा अनुभव र्वल्डकप भरविणाऱ्या यजमान वेस्ट इंडिजचा कर्णधार ब्रायन लारा घेतोय, पाकिस्तानी कर्णधार इन्झमाम उल हक घेतोय आणि भारतीय कर्णधार राहुल दविड आणि त्याच्यापेक्षा जास्त सचिन तेंडुलकर घेतोय.

वेस्ट इंडिजचा संघ सुपरएटमध्ये पोहोचला आहे; पण पहिले दोन सामने हरल्याने पुढील चारही सामने जिंकणे त्यांना आवश्यक आहे. (हा मजकूर प्रसिद्ध होईपर्यंत रविवारच्या श्रीलंकेविरुद्धच्या सामन्याचा निकाल आला असेल आणि त्यांचा संघ सेमीफायनलला जाणार की नाही याची कल्पना आली असेल) पण तेज गोलंदाज अँडी रॉबर्टस् यांनी लारावर आधीच तोफ डागली आहे. पाकिस्तानी कर्णधार तर आपल्याला खेळाडू कोणतेच सहकार्य देत नव्हते, अशा तक्रारी जाहीरपणे करत आहे. पराभवानंतर सगळेच पोपटासारखे बोलायला लागतात हेच खरे!

लारा आणि इन्झमामचं काय व्हायचे ते होवो, पण राहुल, सचिन यांचं काय होणार हा खरा प्रश्न आहे. राहुलला र्वल्डकपपुरतेच कर्णधार करण्यात आले होते. पराभवानंतर कर्णधाराची हकालपट्टी करण्याची भारतीय परंपरा असली तरी पराभवाला केवळ कर्णधार जबाबदार नसतो, हे कोणीतरी समजून घ्यायला हवे. राहुलने स्वत:च कर्णधारपद न स्वीकारण्याची तयारी दर्शवली तर भाग वेगळा; पण सारे खापर राहुलच्या माथ्यावर फोडून भारतीय क्रिकेटचे भले होणार आहे का, हा खरा प्रश्न आहे. राहुलच्या दृष्टीने एक गोष्ट चांगली आहे की त्याला कर्णधार न होण्याचे सल्ले जाहीरपणे कोणी देत नाहीये. भारतातच नव्हे तर परदेशातूनही सध्या जे सल्लासत्र सुरू आहे, त्याबाबत चीडच येते. राहुलइतका सचिन 'सुखात' नाही. त्याला सल्ला देणाऱ्यांची तर रांगच लागली आहे. इयान चॅपेलने सचिनला आरशात पाहून कारकीदीर्बाबत फेरविचार करण्याची सूचना केली आहे. आत्मचिंतन केव्हाही चांगले यात वाद नाही; पण याच आरशात ते स्वत:च्या भावाला का पाहण्यास सांगत नाहीत? बंधू ग्रेग चॅपेल यांनीही आरशात पाहून स्वत: घातलेल्या गोंधळाचा खेळ पाहावा आणि मग निर्णय घ्यावा. चॅपेल बोलल्यावर आपल्या रवी शास्त्रीनेही का मागे राहावे? त्यानेही सचिनला फेरविचार करण्याचा सल्ला देऊन टाकला. उद्या या दोघांचे अनुकरण आणखी कोणी करील आणि सचिनने बॅट म्यान करावी असे सुचवेल. सचिन १७ वषेर् आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आहे. त्याची बॅटिंगची शैली फटकेबाजीची असली तरी विचाराने आणि वागण्याने तो फटकेबाज नाही. आत्ता निवृत्त व्हावे का आणि आत्ता व्हायचे नसल्यास केव्हा व्हावे याचा निर्णय तो स्वत: घेऊ शकतो. २३ मार्चला पोर्ट ऑफ स्पेनमधल्या भोपळ्यामुळे सचिन एकदम हिरोचा झिरो होतो, ही बाब मनाला न पटणारी आहे. भारतीय क्रिकेट रसिक सल्ले देण्यास नेहमीच तयार असतात, पण सचिन पुन्हा चांगले खेळू शकतो यावर विश्वास का ठेवला जात नाही? फलंदाजांवर अशा सल्ल्यांचे बाऊन्सर टाकण्यात आपण नेहमीच पुढे असतो. आधी गांगुलीला आपण नामोहरम केले (पण त्यातून तो जिगरीने बाहेर आला) नंतर सेहवागकडे मोर्चा वळवला आणि आता सचिनला टागेर्ट करत आहेत. त्यासाठी आकडेवारीचा आधार घेतला जात आहे. मार्च २००० ते सप्टेंबर २००२पर्यंतच्या ६० वनडेमध्ये त्याची सरासरी ५४.३२ होती व स्ट्राइक रेट ८७.१४ होता; पण २००३च्या र्वल्ड कपनंतर हेच आकडे ४२.३९ आणि ८२.१८ असे झाले असे सांगण्यात येत आहे. गेल्या चार वर्षांत सचिन मंदावलाय ही बाब खरीच; पण म्हणून तो संपलाय असाच निष्कर्ष काढायला आपण घाई करतो आहोत का? १७ वर्षांपूवीर्चा सचिन आता राहिलेला नाही हे मान्यच करायला हवे. पण इतक्या वर्षांनंतर त्याचा खेळ मंदावणार हे आपण गृहीतच धरायचे नाही, हे आपले आंधळे प्रेम झाले.

सांगायचा मुद्दा एवढाच की खेळत राहायचे की दुरून क्रिकेट पाहायचे याचा निर्णय सचिनलाच घेऊ द्या. तो घ्यायला तो सक्षम आहे.

- अशोक पानवलकर



Satishmadhekar
Tuesday, April 03, 2007 - 6:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>> सतिश सचिन कडुन मागच्या कप च्या फ़ायनलला मोठ्या खेळीची अपेक्षा होती. पण तो फ़ेल झाला.

मंदार,

म्हणजे तुम्हाला इतरांकडून चांगल्या खेळीची अपेक्षा नव्हती का? सचिन २००३ च्या अंतिम सामन्यात चांगला खेळला नाही हे सर्वांना माहिती आहे. पण म्हणुन लगेच त्याला काढून टाकायचे? सचिनप्रमाणेच द्रविड, गांगुली, युवराज, कैफ हे सुद्धा २००३ च्या अंतिम सामन्यात अपयशी ठरले होते. त्यांच्याप्रमाणेच सर्व गोलंदाजांनी (मुख्य म्हणजे झहीर खानने) अतिशय खराब गोलंदाजी केल्यामुळेच ऑस्ट्रेलियाने ३६० धावांचा डोंगर रचला होता. तो सामना हा संपूर्ण भारतीय संघाचे सामूहिक अपयश होते. एकटा सचिन ऑस्ट्रेलियाच्या ३६० धावा व्हायला किंवा भारताची फलंदाजी कोलमडायला कारणीभूत नव्हता.

आणि मुख्य म्हणजे भारत अंतिम फेरीत स्थान मिळवायला सचिनने पाकिस्तानविरूद्ध ७५ चेंडुत ९८ धावा, इंग्लंडविरूद्ध ५२ चेंडुत ५० धावा, श्रीलंकेविरूद्ध ९२ धावा अशा मोठ्या खेळ्या करून हातभार लावला होता. प्राथमिक फेरीत भारत एकमेव सामना ऑस्ट्रेलियाविरूद्ध हरला. त्यात भारताने सर्वबाद फक्त १२५ धावा केल्या होता. त्यात सचिनचा वाटा सर्वाधिक ३५ धावांचा होता.

तो अंतिम फेरीत लवकर बाद झाला हे सर्वांनी अजून लक्षात ठेवले आहे, परंतु त्याआधी अंतिम फेरीत भारताला पोचविण्यामध्ये त्याचा मोठा हातभार होता हे सर्वजण मात्र सोयिस्करपणे विसरतात. तसेच अंतिम फेरीत सेहवाग वगळता इतर सर्व फलंदाज आणि सर्व गोलंदाज संपूर्ण अपयशी ठरले असताना फक्त सचिनलाच दोषी ठरवले जाते. काय म्हणावे अशा लोकांना? :-)


Anamikaa
Tuesday, April 03, 2007 - 7:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्री महेश!
मला तरि मी कुठेहि वैयक्तिक टिका केल्याचे लक्षात नाहि आणि आढळत देखिल नाही.
आणि शरद पवार सामनाला किंवा पर्यायाने बाळासाहेबांना घाबरातात असे मी कुठेच म्हणालेले नाहि आणि त्यांनी घाबरावे अशी माझी इच्छा देखिल नाहि. आणि सचिनवर टिका अथवा त्याचा पुतळा जाळण्या एव्हढी" पवारांची राष्ट्रवादी" मोठी(लायकि असे वाचावे) झाली नाही अजुन!!!!!!
हा बादरायण संबंध तुम्ही स्वतःच जोडलात.
आणि गावस्कर यांच्या बद्दल म्हणाल तर माझ्या मनात जितका आदर सचिनबद्दल आहे तितकाच तो गावस्कर यांच्या बद्दल देखिल आहे. आपापल्या काळातिल श्रेष्ठ खेळाडु आणि मराठी मनाचा आणि माणसाचा मानबिंदु आहेत दोघे.
सतिश यांनि दिलेली प्रतिक्रिया त्यांची स्वतचि असु शकेल त्याच्याशी माझा काहि संबंध नाहि.जिथे मला सतिश यांचे विचार पटतिल तिथे मी त्यांना अनुमोदन देईनच!
पण तरीही एक गोष्ट मात्र नक्कि आज पर्यंत सचिनने कधिहि कुणावरही टिका केल्याचे माझ्या ऐकीवात आणि बघण्यात, तसेच वाचनात देखिल नाहि.पण या उलट गावस्कर यांनी मात्र दुसर्‍यांवर नाहक टिका केलि आहे आणि त्यासाठि त्यांना जाहिर माफ़ि देखिल मागावी लागली आहे. सचिनने अजुनतरि अशी परिस्थिति किमान ओढवुन घेतलेली नाहि. कुणाच्या आरोपांना उत्तर देखिल त्याने कधी दिलेले नाहि जे काहि असेल ते त्याने मैदानात करुन दाखवले आहे. पण डोळ्यावर झापड ओढ्णार्‍यांना ते दिसायचे नाहि.
दुसरे असे कि यश अपयश हा एका खेळाडुच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे आणि ते कुणालाहि चुकलेले नाहि. आताच्या कठिण परिस्थितित आपल्या खेळाडुंना समर्थनाची जास्त गरज आहे मग तो सचिन,राहुल,सौरव,सेहवाग कुणीहि असो अशा प्रतिकुल परिस्थितितुन आपले खेळाडु जात असताना त्यांच्यावर टिकेचि झोड उठवणे केंव्हाही गैरच आहे असे एक सच्चा क्रिकेट्प्रेमि आणि भारतिय या नात्याने किमान मी तरी मानते.ईतरांचे मला माहित नाही!!!!!
मी केलीली टिका तुम्हाला इतकी का लागली कुणास ठावुक?पण वैयक्तिक दोषारोप किमान मी तरि केले नाहित. माझी मायबोली ईतकी प्रगल्भ आहे की त्यातील प्रत्येक वाक्याचा अर्थ ज्याने त्याने स्वतःच्या कुवतीप्रमाणे आणि आकलनशक्तिप्रमाणे लावावा.
चु भु द्या घ्या!

अनामिका




Mandard
Tuesday, April 03, 2007 - 8:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सतिश, अदि
वरिल हाणामारीच्या नादात कुंबळेच्या रिटायरमेंटचा उल्लेख करायचा राहुन गेला.भारतीय क्रिकेट मधील त्याचे योगदान खुप महत्वपुर्ण आहे. आपण या बाबतीत अधिक लिहावे.


Satishmadhekar
Tuesday, April 03, 2007 - 9:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुंबळे खूपच चांगला खेळाडू आहे. परंतु तो एक दिवसीय सामन्यांसाठी योग्य नाही. एक दिवसीय सामन्यांमध्ये धावा रोखून ठेवणारी गोलंदाजी करणे, हमखास बळी मिळविणे, वेगात फलंदाजी करणे आणि उत्तम क्षेत्ररक्षण करणे यांपैकी निदान एक कौशल्य तरी चांगले असावे लागते. दुर्दैवाने कुंबळे यापैकी एकाही बाबतीत सामर्थ्यवान नव्हता. त्याने काही सामन्यात बर्‍यापैकी गोलंदाजी केलेली आहे. पाकिस्तानविरूद्धच्या एका एकदिवसीय सामन्यात शेवटच्या षटकात ९ धावा हव्या असताना त्याने एक षटकार मारून भारताला विजय मिळवून दिला होता. परंतु फारच थोड्या वेळा तो अशी कामगिरी करू शकला. परंतु त्याच्याप्रमाणेच हरभजन, मनिंदर सिंग असे अनेक खेळाडू एकदिवसीय सामन्यांसाठी फारसे उपयोगी नसताना सुद्धा वर्षानुवर्षे खेळत होते.

तो खरं तर कसोटी सामन्यांचा खेळाडू. अनेक कसोटी सामन्यांमध्ये (भारतात खेळलेल्या) तो मॅचविनर ठरला. कसोटी सामन्यांमध्ये त्याची जिद्द वाखाणण्यासारखी होती. काही वर्षांपूर्वी त्याने वेस्ट इंडिजविरूद्ध जबडा फाटलेला असताना सुद्धा बॅंडेज बांधलेल्या अवस्थेत गोलंदाजी करून एक बळी मिळविला होता. त्याचप्रमाणे तो कोणत्याही वादांपासून दूर राहिला. तो कसोटी सामन्यांतला एक थोर खेळाडू आहे यात शंकाच नाही. परंतु शेन वॉर्न, मुरलीधरन यांच्याप्रमाणे त्याचा दरारा कधीच वाटला नाही. बेदी, चंद्रशेखर, प्रसन्ना, सुभाष गुप्ते अशांच्याही तुलनेत तो फारसा प्रभावी ठरत नाही. त्याने प्रत्येक कसोटीमागे पावणेपाचच्या आसपास बळी मिळविले आहेत. भारतात झालेल्या सामन्यात त्याची सरासरी प्रत्येक कसोटीमागे जवळपास सहा बळी एवढी येते. पण परदेशात खेळलेल्या कसोटी सामन्यात हीच सरासरी साडेतीनपर्यंत घसरते.

एक अतिशय सभ्य आणि त्याच्या काळातला एक चांगला खेळाडू म्हणूनच तो ओळखला जाईल. त्याची खेळावरील निष्ठा आणि मिळविलेले भरघोस यश (५०० पेक्षा जास्त कसोटी बळी) हे अतिशय कौतुकास्पद आहे.


Lukkhi
Tuesday, April 03, 2007 - 10:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>दुर्दैवाने कुंबळे यापैकी एकाही बाबतीत सामर्थ्यवान नव्हता.
सतीश, उगीचच काहीतरी...?

कुंबळेचा economy rate आहे ४.३०

त्याची वॉर्न (४.२५), व्हेटोरी (४.२२) आणि मुरली (३.८४) शी तुलना करा...


आता तुम्ही हरभजनलाही निरुपयोगी म्हणता... त्याचा ER आहे ४.१३

आपले दोघेही फिरकी गोलंदाज मुरली वगळता बाकीच्या फिरकी गोलंदाजांपेक्षा महागडे वाटत नाहीत.


>> बेदी, चंद्रशेखर, प्रसन्ना, सुभाष गुप्ते अशांच्याही तुलनेत तो फारसा प्रभावी ठरत नाही.

कुंबळे ने दर कसोटीमागे ४.८४ बळी, प्रत्येक बळीसाठी २८.६५ धावा मोजत घेतले आहेत. याची तुलना तुम्हीच
बेदी (३.९७, २८.७१), प्रसन्ना (३.८६, ३०.३८), चंद्रा (४.१७, २९.७४), ग़ुप्ते (४.१४, २९.५५) यांच्याशी करा आणि आपले वरील वाक्य पुन्हा वाचा.

अगदी वॉर्न (४.८८, २५.४१) शी तुलना केलीत तरी कुंबळे फारसा डावा वाटत नाही. मुरली प्रमाणे अनिल नेही फ़ेकी गोलंदाजी केली असती तर तो मुरलीच्या खूप पुढे गेला असता.


Vinaydesai
Tuesday, April 03, 2007 - 2:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अति परिचयात अवज्ञा...

एक सर्वोत्तम खेळाडू असतो.. जगात सर्वात जास्त धावा, शतकं, भागिदार्‍या सगळे विक्रम त्याच्या नावावर असतात. बर्‍याच बर्‍याच वेळा त्याने सामने सहज जिंकून दिलेले असतात..
मग एकादा निर्णायक सामना असतो. आपल्या सर्वांना तो जिंकायची आशा असते. जगातला सर्वोत्तम खेळाडू आपल्या संघात असताना हा सामना जिंकणं सहज वाटतं. आणि नेमका त्यादिवशी तो शुन्यावर बाद होतो. आपण सामना हरतो.

त्या आधीची त्याची खेळी विसरली जाते. त्या निर्णायक सामन्यात तो खेळला नाही, याचं दुःख कायम सलत रहातं..

2003 मध्ये पाकिस्तान विरुध्द तो शुन्यावर बाद झाला असता, तर आपण Final ला पोहोचलो नसतो कदाचित. पाकिस्तानचा सामना विसरला जातो, पण Final ला तो खेळला नाही याचं दुःख विसरता येत नाही..



Adi787
Tuesday, April 03, 2007 - 3:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुंबळेला "जम्बो" संबोधतात.. त्याला कारणही तसेच आहे.. आधी त्याला स्पीनर मानायला कोणी तयार नव्हते .. कारण काय तर त्याचा स्पीड आणी मग तोच आपला मैच वीनर झाला! आकडेवारी तर वर दिलेली आहेच.. तसेच.. एका test inning मध्ये १० वीकेट्स (vs pakistan) हेही नसे थोडके .. त्याचा क्लास सिद्ध करायला. हेच समिक्षक कुंबळेचे मैच वीनर म्हनुन कौतुक करायचे.

So he deserves a salutation for his contribution...


Kedarjoshi
Tuesday, April 03, 2007 - 4:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खास सचिन वर टिका करनार्यांसाठी.


Tendulkar in numbers: ODIs: 374, runs: 14,537, highest: 186 not out, average: 44.05, 100s: 40, 50s: 74, wickets: 143, best: 5/32.

Tendulkar in World Cups: ODIs: 33, runs: 1732, highest: 152, average: 59.72, 100s: 4, 50s: 12, wickets: 6, best: 2/28

He is only batsman who score more then 1700 runs.

दर वेळी match हारली की सचिन कसा match winner नाही हे सर्वजन म्हणत असतात. वल्डकप मध्ये एवढे रन काढुन सुध्दा आपण त्याचा कार्यकिर्दीत वल्डकप जिंकु शकलो नाही हा फक्त त्याचा दोष नाही.

Svsameer
Tuesday, April 03, 2007 - 11:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे सगळे वरचे आकडे पाहुन गांगुलीला संघातुन काढला तेव्हाच्या त्याच्या आणि त्याच्या पाठिराख्यांच्या बोलण्याची आठवण मला का बरं येत असावी? :-)

Kedarjoshi
Wednesday, April 04, 2007 - 3:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

का बर?

अरे मी पण चिडलोय सच्यावर. ऑफकोर्स आपल्या चिडन्याला काही महत्व नाही. पण उगीच रवि शास्त्री सारखे लोक त्याला बोलतात व IBN live वर सचिन नी जावे का असे व्होटींग घेतात. (त्यांची ओकात आहे का?)

सचिन खेळला नाही हे सत्य आहे. पण तोच का? वॉलराव तर चाचपडत होते. दोष हा कप्तानाचा जास्त होता. नको तेव्हा स्लिप काढने, नको तेव्हा झहीर ला आनने, ईरफान ला न घेने, टपरी टाइप ची फिल्डींग लावने.


Mandard
Wednesday, April 04, 2007 - 6:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सचिनने चपेल वर तोफ़ डागली आहे. परवा बोर्डाची बैठक आहे. एकंदरीत पराभवाचे राजकारण जोरात चालु आहे. आता चपेल घरी जाणार हे नक्की. आता दोन तीन दिवस धमाल आहे.

Me_sakhi
Wednesday, April 04, 2007 - 6:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शेवटी सचिनने प्रतिक्रिया दिलीच.................!
कारण प्रत्येक माणसाच्या सहनशक्तिला एक मर्यादा असतेच आणि सचिन देखिल त्याला अपवाद असु शकत नाहि.
त्याच्या क्रिकेटच्या कारकीर्दिमधे प्रथमच त्याने उद्विग्न होवुन पलटवार केलाय?चपेलने भारतिय क्रिकेटला आणि खेळाडुंना एका खोल गर्तेत झोकुन दिले आहे.
अथक परिश्रम करुन ज्या जॉन राईटने सौरवच्या मदतिने भारतिय क्रिकेटला आणि संघाला जिवदान दिले आज त्याच संघाचे आणि संघातिल प्रतिथयश खेळाडुंचे मानसिक खच्चिकरण करुन संपुर्ण संघाचा "बंटाधार" करण्याचे महान कार्य ग्रेग चपेल या गोर्‍यामानवाने केले. divide and rule हे एकच तत्व यांना माहित आहे बाकी सगळ्या गोष्टि यांच्या द्रुष्टिने गौणच म्हणायला हवे!.......
सचिनने आयुष्यात प्रथमच स्वभावाविरुद्ध जावुन एखादि गोष्ट केली असेल. आता त्याच्या प्रतिक्रियेवर अजुन तथाकथित विद्वानांच्या प्रतिक्रिया येतील. पण कुणी कितीही आरडाओरडा केला तरी सचिनला दिलेले त्याही पेक्षा त्याने परिश्रम करुन मिळवलेले आम्हा भारतियांच्या मनातील अढळपद कधिहि ढळणार नाहि आणि कुणी ते हिरावुनही घेवु शकत नाहि. मग तो चपेल असो किंवा आणि कुणी!


Svsameer
Wednesday, April 04, 2007 - 7:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे ही वाचा जरा

The real culprits

Satishmadhekar
Wednesday, April 04, 2007 - 8:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आजच्या इंग्लंड-श्रीलंकेच्या सामन्यातला विजेता हा उपांत्य फेरीतला चौथा संघ असेल. माझा पाठिंबा इंग्लंडला आहे.

Satishmadhekar
Wednesday, April 04, 2007 - 12:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नुकतीच आलेली बातमी . . . ग्रेग चॅपेलचा भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा. :-)

खालील मुलाखत वाचा. हातात कधी बॅट सुद्धा न धरलेले क्रिकेटची पुढची दिशा ठरविणार!


http://www.rediff.com/wc2007/2007/apr/04bcci.htm


Mahaguru
Wednesday, April 04, 2007 - 1:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बॅट धरणा-यांनी तरी असे काय दिवे लावले?

Imtushar
Wednesday, April 04, 2007 - 1:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

महागुरू, तुमच्याशी सहमत. चांगला administrator होण्यासाठी चांगला खेळाडू असणे गरजेचे नाही...

आता कुणी असेही म्हणेल की बांधकाम मंत्री एखाद्या प्रख्यात बिल्डर ला करावे आणि दुग्धविकास मंत्री एखाद्या खूप दूध देणार्‍या गायीला अथवा म्हशीला करावे... आमची भागिरथी ३०-३० लिटर दूध देते हो एका वेळेस... :-)


BTW वर्किंग कमिटीच्या बैठकीला बोर्डाच्या पदाधिकार्‍यांसोबत भारताचे ७ माजी कप्तानही हजर असणार आहेत. त्यामुळे भारताच्या क्रिकेटचे भविष्य सुरक्षित हातात नाही अशी आवई इतक्यात उठवण्याची काही गरज नाहीये.

आणि हो, चप्पल ने राजिनामा देऊन केवळ हकालपट्टीची नामुष्की टाळली


Asami
Wednesday, April 04, 2007 - 3:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

BTW वर्किंग कमिटीच्या बैठकीला बोर्डाच्या पदाधिकार्‍यांसोबत भारताचे ७ माजी कप्तानही हजर असणार आहेत.>> I think I read in Indian Express about the same,

Why limit to ex-captains only ? How about involving current selection committee (at least chairman of committee), coaches for junior level teams etc. After all these are people who are more plugged in to the whole process.

I have to say very apt observation.


Asami
Wednesday, April 04, 2007 - 3:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

About The real culprits link .......

समीर हे थोडे funny आहे. I'm not defending the whole fiasco, but isn't it expected that ballers will dominate on baller-friendly pitches ? why would one call it baller friendly if they do not. What will be interesting is to check how other teams have faired in such conditions. That will establish correct baseline for comparison.

Continuing on same thought process, well Indian batsmen did dominated their counter parts on batsmen friendly pitches. In other words, their counter parts (and check the range of them - SL, Eng, Pak, WI) failed to exploit the same conditions. Not bad, huh ? :-)

I guess statistics is an interesting mirror after all


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators