Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
मुलांना गोष्टी कश्या सांगाव्या ...

Hitguj » Views and Comments » General » मुलांना गोष्टी कश्या सांगाव्या « Previous Next »

Bee
Thursday, March 01, 2007 - 7:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नेमस्तक धन्यवाद!

नंतर सविस्तर लिहिणारच आहे..


Milindaa
Thursday, March 01, 2007 - 11:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी, जेव्हा लिहायचे आहे तेव्हाच बीबी उघडायला सांगायचे ना..

आता इथे लोक येऊन टीपी चालू करतील. :-(


Bee
Thursday, March 01, 2007 - 12:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे मगाशी पोष्ट पुर्ण लिहिले आणि नेट बंद पडला. परत सुरु झाले तेंव्हा अजबच जे लिहिले होते तेही गायब झाले होते. मग म्हंटलं जाऊ द्या नंतर सवड असताना लिहू. पण टीपीची सुरवात तू करू नकोस आता आणि तशी मुभा कुणालाच नाही :-)

तर विषयाची सुरवात मी माझ्यापासूनच करतो. म्हणजे माझे एक उदाहरण देतो त्यावरुन विषयाला सुरवात करायला मदत होईल.

हल्ली भारतात load shading चा प्रश्न इतका वाढला आहे की मुलांना TV बघायला मिळत नाही. त्यात जर आजूबाजूला लहान मुले खेळायला नसतील तर मुले आणखीनच बोर होतात. सध्या तर इतके ऊन वाढत चालले आहे की मुलांना अंगणात बाहेर लपाछपीचे खेळ खेळायलाही आम्ही रागवतो. मी माझ्या ६ वर्षाच्या भाचीसाठी बिरबलच्या कथा, रामायण महाभारतातील कथा, पंचतंत्रातील कथा असे आणि बरेच सटरफ़टर बालकथा असणारी पुस्तके आणलीत. पण कथा वाचून दाखवताना भाचीला त्यातील सोपे शब्दही कळत नसत. मी जरी अर्थ सांगितला तरी माझी लिंक तुटत असे वर ती कथा पुर्णा होईपर्यंत तिचा आणि माझा patience संपत असे. माझी बहिण रोज रोज कथा गोष्टी न सांगता कधीमधी तिच्या बंडपणावरुन तिला धडा मिळेल ह्या उद्देशाने आपल्याच कथा cook करुन सांगते. मला तरी हे काम जमत नाही. म्हणून मी आधी पुस्तकातील कथा आत्मसात करुन मग माझ्या शैलीत तिला सोपी करुन सांगितली. थोडी पुस्तकातील चित्र वगैरे पण तिला दाखवली. तिला तो प्रकार किंचित आवडला. पण म्हणून माझे काही समाधान झाले नाही. मला तर उलट प्रश्न पडला हल्लीच्या मुलांना कुणाच्या तोंडुन गोष्टी ऐकायला आवडतात की नाही. मी डुब डुब घागरीची एक कथा तिला खूपदा सांगितली कारण तिला तिच एक कथा खूप खूप आवडते. पण तिला इतर कथा आवडाव्यात असेही वाटते. म्हणून नविन पुस्तकांचा हा प्रपंच मांडला.

तर मंडळी तुमच्याकडे जर काही ह्याबाबतीत तुमचे आपले किस्से असतील, काही टिप्स असतील तर इथे आपण एकमेकांशी share करु शकतो. इथे बरेच जण लेकुरवाळे आहे. सर्वांना मदत होईल.


Shonoo
Thursday, March 01, 2007 - 1:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी


मला मुलं व्हायच्या अगोदरच मी दोन्-तीन वेळा एक मैत्रिणीच्या मुलींच्या kindergarten मदल्या शिक्षकांना भेटले होते. त्यांनी काही गोष्टी सांगितल्या त्या माझ्या अजूनही चांगल्या लक्षात आहेत आणि मला तरी त्यांचा पुष्कळ फायदा झाला.

१. रोज साधारण ठराविक वेळी पुस्तकं वाचून दाखवायची/ गोष्टी सांगायची सवय करावी. मी आणि सर्व साधारणपणे इथले लोक रात्री झोपण्यापूर्वी पुस्तकं वाचून दाखवतात.

२. इथल्या पुस्तकांमधे चित्रं चिकार आणि सुंदर असतात. मुलांना नुसतीच पानावरील छापील अक्षरे वाचून दाखवण्या ऐवजी त्या चित्रांच्या अनुषंगाने प्रश्न विचारावेत. अशाने त्यांना वाचनाबद्दल विचार करायची सवय लागते व त्यांची vocabulary सुधारते.

३. मुलांना एखादं पुस्तक रोज हवं असतं. त्याबद्दल वाद घालू नये. दोन्-तीन आठवड्यात ती आपोआप दुसया पुस्तका कडे वळतात. पुस्तके आलटून पालटून वाचावीत. म्हणजे दरवेळेला त्यातून मुलांना नवा आनंद मिळतो.

४. प्रत्येक व्यक्तीची learning Style वेगळी असू शकते. मुलांमधे पण हा फरक असतो. One size fits all असा न्याय वापरू नये. मुलांच्या कलाने घेऊन हळू हळू सवय होईल असे पहावे. आई वडील स्वत: रोज वाचन करत असतील तर मुलांवर पण त्याचा प्रभाव पडतो.

५. एक-दोन दिवसात प्रयत्न सोडून देऊ नये.

६. शक्य असेल तर मुलांना लायब्ररीतून पुस्तके आणण्याची ओळख करून द्यावी.

७. पुस्तकातल्या गोष्टी बाहेर दिसल्या तर त्याचा परत उल्लेख करावा जसे snowman , bunny rabbit खारी वगैरे इथे पुस्तकातून असतात आणि बाहेर पण दिसतात.


Jo_s
Friday, March 02, 2007 - 10:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या मते ज्या मुलांना वाचता येतं त्याना गोष्टी सांगण्यापेक्षा वाचायलाच लावाव्या. वाचायची इच्छाहोण्या इतपत सुरुवातीला व नंतरही गोष्टी सांगाव्या.

अती चित्र असलेली पुस्तके, कॉमिक्स वगैरे टाळावी. त्यानी मुलांना वाचून वा ऐकून मनात/डोळ्यासमोर काल्पनीक चित्र उभकरण्याची क्षमता कमी होते असे मला वाटते. तो भाग त्यांच्या इमॅजीनेशन वर सोडावा.

मंडळी अजूनही बरेच विचार प्रवाह असतील या बाबतीत. ते जाणून घ्यायला नक्कीच आवडेल.


Manya2804
Friday, March 02, 2007 - 11:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी माझ्या मुलाला वाचनाची आवड लागावी म्हणून एक प्रयोग केला. रोज रात्री त्याला एक गोष्ट सांगायला सुरुवात केली. गोष्टी ऐकायला चिरंजीव सोकावल्यावर मग मुद्दामच गोष्टी अर्धवट सोडायला लागलो. चिरंजीवानी मी गोष्ट पूर्ण करेन म्हणून बराच वेळ वाट पाहिली. शेवटी मुकाट्याने पुस्तक घेवून उरलेला भाग वाचायला लागला.



Bee
Saturday, March 03, 2007 - 3:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझे असे एक लक्षात आले की परदेशातील मुलांना बर्‍यापैकी वाचनाची गोडी आहे. त्या तुलनेने देशातील लहान शाळकरी मुले अवांतर असे फ़ारसे काही वाचत नाही. ह्याला कारण आपले माध्यम जगतही आहे. बहुतेक वाचकांची वाचनाची सवय ही त्यांनी त्यांनाच लावलेली असते असे मी अनुभवले.

वाचनाची गोडी कशी लावावी हा देखील एक नविन बीबी मला सुरु करावासा वाटतो. पण मला वाटतं ती चर्चा आपण इथेही करू शकतो. किंवा बीबीच्या नावात थोडा बदल करू शकतो. मात्र इतके लांबलचक शीर्षक एकाच ओळीत इथे बसणार नाही..

सर्वांची मते खूप आवडली.


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती







Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators