|
Sandyg15
| |
| Friday, June 02, 2006 - 6:03 pm: |
| 
|
तीन fast bowlers चा एकत्र अनुभव फक्त ४ टेस्ट मचेसचा. मग २० विकेट्स कशा घेणार? कठीण आहे
|
Nandya
| |
| Friday, June 02, 2006 - 6:27 pm: |
| 
|
संदीप, तीन अनुभवहीन गोलंदाज आहेत म्हणून टॉस जिंकून पहिली फ़लंदाजी करायची अन पहिल्या दिवशी फ़क्त २.५च्या भावात रन (कशाबशा) काढायच्या ह्यात मी म्हणतो काय पॉईंट हाय का? कसं जिंकावं अशाने? झक्की उत्तर द्या
|
Asami
| |
| Friday, June 02, 2006 - 7:37 pm: |
| 
|
पण जिंकण्यासाठी खेळ्त आहोत हे कशावरून धरायचे ?
|
ही टेस्ट गेली हातातून. पैकेज विकत घेउन पैसे वाया घातले असे वाटतेय.
|
Champak
| |
| Saturday, June 03, 2006 - 4:00 pm: |
| 
|
पैकेज विकत घेउन पैसे वाया घातले असे वाटतेय>>>>>>> for everything else...... Mastercard!
|
सचिन प्रथमच "टॉप ट्वेंटी'मधून बाहेर दुबई, ता. २८ - भारताचा मास्टर ब्लास्टर फलंदाज सचिन तेंडुलकरला १४ वर्षांनंतर पहिल्यांदाच कसोटी क्रिकेटच्या जागतिक क्रमवारीतील पहिल्या वीस फलंदाजांमधील स्थान गमवावे लागले आहे. तेंडुलकरने १९९२ पासून पहिल्या वीस खेळाडूंमधील आपले स्थान अबाधित राखले होते. तो आता २२ वा आहे. .... .... एलजी-आयसीसी जागतिक कसोटी क्रिकेट क्रमवारी आज जाहीर करण्यात आली. खांद्याला झालेल्या दुखापतीमुळे सचिनला वेस्ट इंडीज दौऱ्याला मुकावे लागले, तसेच गेल्या दोन वर्षांत त्याची कामगिरी सातत्यपूर्ण झालेली नाही. गेल्या वर्षीच्या अखेरीस त्याने श्रीलंकेविरुद्ध विश्वविक्रमी ३५ वे शतक झळाकावले होते. मात्र गेल्या दहा सामन्यांमध्ये त्याला केवळ २८ च्या सरासरीनेच धावा करता आल्या. त्याचाच परिणाम क्रमवारीत दिसून आला. कारकिर्दीत ५५.३९ च्या सरासरीने धावा काढणाऱ्या तेंडुलकरला पहिल्यांदाच इतका खालचा क्रमांक मिळाला आहे. भारताचा कर्णधार राहुल द्रविडने दुसरे स्थान कायम राखले आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार रिकी पॉंटिंगने अव्वल स्थान अबाधित राखले आहे. वीरेंद्र सेहवागची एका क्रमांकाने घसरण झाली असून तो १३ वा आहे. वेस्ट इंडीजविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात शानदार शतक झळकाविणाऱ्या व्ही. व्ही. एस. लक्ष्मणने दोन क्रमांकांची सुधारणा करताना २७ व्या स्थानावर मजल मारली आहे. वेस्ट इंडीजचा कर्णधार ब्रायन लाराने नववे स्थान कायम राखले आहे, तर शिवनारायण चंदरपॉलने चमकदार कामगिरीच्या जोरावर १७ वा क्रमांक मिळविला आहे. गोलंदाजीमध्ये श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरनने अव्वल स्थान कायम राखले आहे. दक्षिण आफ्रिकेचा मखाय एन्टिनी दुसरा, ऑस्ट्रेलियाचा शेन वॉर्न तिसरा, तर ग्लेन मॅकग्रा चौथ्या स्थानावर आहे. अनिल कुंबळेच्या क्रमवारीत एका स्थानाने घसरण झाली; आता तो आठव्या क्रमांकावर आहे. पहिल्या व तिसऱ्या कसोटीला मुकलेल्या इरफान पठाणचीही १३ व्या क्रमांकापर्यंत घसरण झाली आहे. अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत दक्षिण आफ्रिकेच्या जॅक्स कॅलिसने इंग्लंडच्या ऍण्ड्य्रू फ्लिंटॉफला मागे टाकून पहिला क्रमांक पटकावला. या क्रमवारीत पठाण पाचव्या क्रमांकावर आहे. क्रमवारी - फलंदाज - १) रिकी पॉंटिंग (ऑस्ट्रेलिया), २) राहुल द्रविड (भारत), ३) जॅक्स कॅलिस (दक्षिण आफ्रिका), ४) इंझमाम उल हक (पाकिस्तान), ५) मॅथ्यू हेडन (ऑस्ट्रेलिया), ६) युनूस खान (पाकिस्तान), ७) महंमद युसूफ (पाकिस्तान), ८) माईक हसी (ऑस्ट्रेलिया), ९) ब्रायन लारा (वेस्ट इंडीज), १०) केविन पीटरसन (इंग्लंड). गोलंदाज - १) मुथय्या मुरलीधरन (श्रीलंका), २) मखाय एन्टिनी (दक्षिण आफ्रिका), ३) शेन वॉर्न (ऑस्ट्रेलिया), ४) ग्लेन मॅकग्रा (ऑस्ट्रेलिया), ५) मॅथ्यू होगार्ड (इंग्लंड), ६) ऍण्ड्य्रू फ्लिंटॉफ (इंग्लंड), ७) शोएब अख्तर (पाकिस्तान), ८) अनिल कुंबळे (भारत), ९) शेन बॉंड (न्यूझीलंड), १०) चामिंडा वाझ (श्रीलंका). अष्टपैलू - १) जॅक्स कॅलिस (दक्षिण आफ्रिका), २) ऍण्ड्य्रू फ्लिंटॉफ, ३) शॉन पोलॉक (दक्षिण आफ्रिका), ४) डॅनियल व्हिटोरी (न्यूझीलंड), ५) इरफान पठाण (पाकिस्तान).>> दै.सकाळ च्या कोन्यातरी मुर्खाने इरफान ला पाकी केले आहे.
|
Moodi
| |
| Wednesday, September 27, 2006 - 10:10 pm: |
| 
|
क्रिकेट क्षेत्राकरता मला तरी ही बातमी खूपच आवडली, बघू कर्नल काय करतोय ते. http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/2033089.cms
|
Maitreyee
| |
| Sunday, December 24, 2006 - 6:37 pm: |
| 
|
शिरीष कणेकर चा सामना मधला लेख, सही आहे गांगुली बद्दल.... महागुरु, वाचला का 
|
Mahaguru
| |
| Thursday, December 28, 2006 - 4:00 pm: |
| 
|
आणि गांगुली परत फॉर्मात आला दुसर्याच बॉलवर दांडी गुल S Ganguly c Gibbs b Ntini 0 2 0 0 0.00
|
Mandard
| |
| Monday, January 08, 2007 - 5:53 am: |
| 
|
महागुरु तरीपण गान्गुलीने सर्वात जास्त धावा केल्या तीन कसोटीत मिळुन
|
Farend
| |
| Thursday, January 11, 2007 - 7:05 pm: |
| 
|
आजतक, NDTV , इतर बातम्यांच्या चॅनेलवर सद्ध्या सचिन बद्दल काही चर्चा चालू आहे का? (त्याच्या तिसर्या कसोटीतील खेळाबद्दल). नोव्हेंबर मधे मी तिकडे होतो तेव्हा ते चॅपेल व संघाविरुद्ध संसदेत टीका, देशभर जबरदस्त प्रतिक्रिया वगैरे दिवसभर चालू असायचे, तेव्हा वन-डे मधे भारत हरत होता. आत्ता नक्कीच काहीतरी जोरदार चर्चा जो कोणी माजी खेळाडू मिळत असेल त्याला पकडून हे चॅनेलवाले करत असतील.
|
Farend
| |
| Thursday, January 11, 2007 - 7:12 pm: |
| 
|
आणि मध्यंतरी 'दादा' कोठेही जाहिरातींत दिसत नव्हता, आता संघात परत, फ़ॉर्म परत आणि जाहिरातीही...
|
Mahaguru
| |
| Friday, January 12, 2007 - 7:17 am: |
| 
|
दादाचे रणजीमधे शतक ! आता काय चॅपलच्या बा ची हिम्मत त्याला काढायची. दादा वर्ल्डकप खेळणारच ! चिंता करायच्ही पाळि सेहवाग आणि तेंडुलकरवर आहे.
|
Svsameer
| |
| Friday, January 12, 2007 - 7:51 am: |
| 
|
चिंता नको विरु पण देशात आल्यावर say वाघ झाला आहे त्याचही शतक आणि ६ बळी आहेत.
|
Mahaguru
| |
| Friday, January 12, 2007 - 2:55 pm: |
| 
|
नुसते गल्लीतच दादा बनणाऱ्या वाघांना कर्नल साहेबांनी exit चा रस्ता दाखवला. "सेहवाग, पठाणला वगळले, सौरवचे पुनरागमन" (तेंडुलकरला वनमोर चान्स?)
|
क्या बात है सेहवाग ला जरा सक्तीच्या विश्रांतीची गरज होतीच. जोगींदर ला चान्स! अरे कसलेले खेळत नाहीत नी नसलेल्यां कडुन अपेक्षा. आता आधीच ढेपाळलेल्या विंडीज ला हारवून येतील नी आपण परत जयजयकार करायला (रिड - पर्यायाने वल्डकपवर हक्क सांगायला)मोकळे.
|
Mukund
| |
| Wednesday, January 17, 2007 - 9:19 am: |
| 
|
अजुन एका ऑस्ट्रेलियन क्रिकेटरची निव्रुत्ती..... http://content-usa.cricinfo.com/australia/content/current/story/276643.html वॉर्न,मेक्ग्राथ आणी डॅमियन मार्टीन नंतर आता बेव्हन.... एकाच वेळेला असा एवढ्या चांगल्या खेळाडुंचा एक्झोडस कधीच झाला नसावा.... माझ्या मते वॉर्न आणि मेक्ग्राथ ला जेवढी वाहवा मिळाली(आणी ती योग्यच होती!) तेवढी बेव्हनला मिळाली नाही. पण बेव्हन हा त्या संघाचा १० वर्षे एक अविभाज्य भाग होता व असे कितीतरी एक दिवशिय सामने त्याने प्रतिस्पर्धी संघाच्या घशातुन काढुन त्याच्या संघाला विजय मिळवुन दिला आहे. तो असताना ऑस्ट्रेलियाचे ६ किंवा ७ आउट झाले तरी असे वाटायचे की जोपर्यंत बेव्हन आहे तोपर्यंत ते जिंकु शकतात..आणी तसे त्याने करुनही दाखवले..एकदा नाही... दोनदा नाही तर अनेक वेळेला.... तब्बल ५० पेक्षा जास्त वेळा तो नाबाद राहीला आहे व त्याची सरासरी ५० च्या वर आहे(२२५ पेक्षा जास्त सामने खेळुनही...) हेच त्याच्याबद्दल बरेच काही सांगुन जाते. आपल्या भारतिय टिममधे एकेकाळी कैफ़ ला भरताचा बेव्हन म्हणुन पाहीले जात होते..पण लॉर्ड्स वरची एक खेळी सोडली तर कैफ़ बेव्हनच्या तोडीस अगदीच फिका पडतो. कैफ़च काय पण जगात बाकीच्या संघात ६ व्या किंवा ७ व्या नंबरवर बेव्हनसारखा एकही खेळाडु गेल्या १० वर्षात झाला नाही.एक क्रिकेटचा चाहता म्हणुन या चार महान ऑस्ट्रेलियन्सच्या यशस्वी कारकीर्दीवर पडदा पडताना पाहुन खुप वाईट वाटत आहे. अजुन १ ते २ वर्षात आपल्यालाही तेंडुलकर,द्रविड,गांगुली,लक्षमण व कुंबळे असे चार ग्रेट खेळाडु एकाच वेळेला निव्रुत्त होताना दिसणार आहेत... पण ऑस्ट्रेलिया आणी आपल्यात फरक एवढाच की आज ते चारही खेळाडु निव्रुत्त झाले तरी ऑस्ट्रेलियन संघ कुठेही कमजोर वाटत नाही... क्लार्क,ब्रेकन,मिचेल जॉन्सन,टेट यांसारखी फ़ास्ट बोलर्स आणी मायकेल हुसे,सीमंड्स,ब्रॅड हॉजेस, ब्रॅड हॅडिन,मायकेल क्लार्क सारखे उमदे खेळाडु आणी कॅमेरुन व्हाइट सारखा तडाखेबाज फलंदाज त्या संघाला येत्या वर्ल्ड कप मधे वर्ल्ड कप जिंकुन देउ शकण्याची क्षमता बाळगुन आहेत.आणी पाँटींगचा गेल्या ४ वर्षाचा फ़ॉर्म बघता लारा आणी तेंडुलकर त्याच्यापुढे एकदमच फिक्के पडतात हे कोणीही मान्य करेल He is in a sublime form for last 4 years.....and scary thing is he is only 32 year old! पण तेच जर भारतीय संघाकडे बघीतले तर तेंडुलकर,द्रविड,गांगुली,लक्ष्मण,कुंबळे नंतरचा भारतीय संघ कसा असेल याचा विचार करायलाही भिती वाटते.... वर्ल्ड कप जिंकणे तर सोडाच पण बाकीचे सामनेही जिंकायला काही काळ मुष्कील होणार आहे. याला जबाबदार कोणाला ठरवावे? ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्ड सारखी दूरद्रूष्टी आपल्या बोर्डाकडे का नाही? एक कारण हे असु शकेल की शरद पवार सध्या टिव्ही साठी मोठ मोठे स्पॉँसरशिपची कंत्राट मिळवायच्या मागे आहेत. आज भारतीय क्रिकेट बोर्ड जगात सगळ्यात श्रिमंत बोर्ड आहे पण असे असुनही भारतिय क्रिकेटची सध्याची अवस्था आणी नजीकचे भविष्य एवढे निराशाजनक का असावे? विचार करण्यासारखी गोष्ट आहे... नाही का? कोणी लाॅर्ड्स पाॅंटींग, वाॅर्न हे कसे लिहायचे सांगेल का? हिमांशु....... धन्यवाद!
|
Himscool
| |
| Wednesday, January 17, 2007 - 9:48 am: |
| 
|
लॉर्ड्स, पाँटींग, वॉर्न... lOrDs, pA.NTI.ng, vOrn हे असे लिहा
|
Farend
| |
| Wednesday, January 17, 2007 - 10:11 pm: |
| 
|
मुकुंद, बेव्हनला नंतर स्वार्थी खेळतो..., नाबाद राहण्यासाठी, म्हणून वगळले गेले होते. अर्थात भारताला स्वार्थी तर स्वार्थी निदान खेळ तरी असे म्हणायची वेळ आलेली आहे फलंदाजांना कैफ़ मला आजकाल त्याच्या २००४ च्या पाक सिरीज मधील कॅचेस मुळे जास्त आठवतो
|
Mahaguru
| |
| Thursday, January 18, 2007 - 5:48 am: |
| 
|
Australian Open: Sania loses in second round 
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|