Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Premasathi kiti tadjod karavi

Hitguj » Views and Comments » Relationships » नवरा, बायको, संसार, तडजोड इ. » Premasathi kiti tadjod karavi « Previous Next »

Shravanip
Thursday, November 09, 2006 - 12:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अगदी सहज सगळ्यांचं मत विचारण्यासाठी हा प्रश्न. माझं गेल्या वर्षी लग्न झालं आणि सगळं खूप छान आहे. घरातले सगळे खूप छान आणि नवरा मला पुढे शिकायला मदत करतोय. मी पहिल्या भेटीत त्याला सांगितलं होतं की माझा देवावर विश्वास आहे पण कुठलेही स्वामी किंवा कुठल्याही माणसाला देव म्हणण्यात नाही. त्याच्या मते मी प्रेमासाठी बदलायला आणि बापुंच्या देवळात जायला त्यांची प्रार्थना करायला काय हरकत आहे? पण मी खूप बदललेय आणि ह्या बाबतीत मला अजिबात बदलता येत नाही. मला नाही पटत तेही मी प्रेमासाठी करायचं का? प्रेमासाठी नक्की किती बदलायचं?

Mrinmayee
Thursday, November 09, 2006 - 1:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गेल्याच आठवड्यात टल्साला गेले असता एका ब्रिटीश बाईंना भेटले. त्यांच्या लग्नाला ३५ वर्ष झालीत. नवरा काश्मिरी मुसलमान आहे. सासर श्रीनगरला. तिथे गेल्यावर पूर्ण वेळ त्या भारतीय पोशाखात असतात. इस्लामचे सगळे सोपस्कार पार पाडतात. ह्याची परतफेड पतीकडूनही होते (असं त्या सांगत होत्या). अशी कितीतरी उदाहरणं आहेत. तेव्हा नात्यातली तडजोड आवश्यक आहे. पण 'किती तडजोड' योग्य हा मापदंड कसा ठरवावा?
शेवटी प्रेमासाठी केलेली तडजोड हा मला वाटतं प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्ण आहे. त्यात 'किती करावी' हा मुद्दा ज्याने त्याने ठरवायचा. :-) तडजोड करताना आपल्या कंफर्ट लेवलच्या किती पलीकडे आपण जाऊ शकतो.. आपला तोल न जाऊ देता कुठवर स्वत:ला बदलु शकतो, ह्यावर बरंच काही अवलंबून आहे असं नाही का वाटंत?


Ajjuka
Thursday, November 09, 2006 - 3:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एकदा नवर्‍याला सांग बरं की प्रेमाखातर तूच हे accept कर की मी अश्या कुठल्याही बुवाच्या आश्रमात येणार नाही. त्याच्याच भाषेत त्याला विचार की माझ्यावरच्या प्रेमाखातर हे करायला काय हरकत आहे?
हे मी confrontation साठी सांगत नाहीये. पण तुझ्या नवर्‍याचे जे logic आहे त्याचाच उलटा विचारही होऊ शकतो हे सांगतेय.
अर्थात एरवी किती तडजोड करावी हा ज्याचा त्याचा मुद्दा असतो पण आत्मसन्मानाशी तडजोड करू नये प्रेमासाठी सुद्धा. असे मला वाटते.
माझा स्वतःचा या बुवा, गुरूंवर काडीचा विश्वास नाही. मुळात माणूस असलेल्या कुणालाच मी देव मानू शकत नाही. माहेरीही कोणाचा नव्हता. सासरी आहे. पण सुदैवाने नवर्‍याला यात interest नाही आणि विश्वासही त्यामुळे मी वाचले.


Ajjuka
Thursday, November 09, 2006 - 3:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अजून एक 'प्रेमासाठी नक्की किती बदलायचं?' हा प्रश्न जर तुला पडत असेल याचाच अर्थ पाणी डोक्यावरून वाहतेय. तू already प्रेमाच्या शर्करावगुंठनात खूप काही हरवलयस जे तुला डाचतय. अग बाई प्रेम एका जागी आणि माणूस एका जागी. प्रेम हा एक aspect आहे आयुष्याचा, आयुष्य नाही.

Shravanip
Thursday, November 09, 2006 - 3:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

thank you ajjuka खूप बरं वाटलं की मी चुकत नाहिये हे पाहून. मला सतत वाटतं की मीच अशी आहे की काय जिला कुठलेही गुरु वगैरे पटत नाही. खूप बरं वाटलं

Ajjuka
Thursday, November 09, 2006 - 4:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छे तू अजिबात एकटी नाहीस असे खूप आहेत ज्यांचा खरोखरच या बुवा महाराजांवर विश्वास नाही. आणि विश्वास नसण्यामधे काहीही चूक नाही. पण होतं काय विश्वास ठेवणारे मात्र ह्या गोष्टी 'आमच्या गुरूंचा अपमान' अश्या बालिश stance ने घेतात आणि वैयक्तिक पातळीवर उतरतात. BTW तू 'मिळून सार्‍याजणी' च्या यावर्षीच्या दिवाळी अंकातली शोभा चित्रे यांची 'हाऊ डेअर यू' ही कथा वाचलीस का? याच संदर्भात आहे. बुवा बिवांवर नवर्‍याचा अति विश्वास आणि तिचा अजिबात नाही आणि तिने adjust केल्यानंतर त्याने अती आहारी जाणं. मूल कधी व्हायला पाहिजे पासून संबंध कधी ठेवावेत यातही महाराजांनी ठरवून दिलेल्या वेळापत्रकाचा वापर करणं, त्यांच्या आज्ञेच्या बाहेर काही न करणं आणि त्यातून त्यांच्या नात्याला गेलेले तडे अश्या प्रकारची गोष्ट आहे. फार सुंदर गोष्ट आहे. वाच नक्की...

ए मी तुला घाबरवत नाहीये. I am sure तुझा नवरा असा extreme नसणार.
त्याला सांगून बघ की तुझ्या प्रेमाखारत मी जे करीन ते मला करायचंय म्हणून नाही तर तुला बर वाटावं म्हणून. याचा अर्थ मी माझ्याशी खोटं बोलणार आणि मग अस स्वतःशी सतत खोटं बोलत रहण्याने काय साधणारे.. मी माझाच तिरस्कार करायला लागेन आणि त्यातून येणारी चिडचिड, नैराश्य याने आपल्याच संसारात समस्या निर्माण होतील त्यापेक्षा... आपण काही बाबतीत आपली मते जुळत नाहीत हे मान्य करून हा विषय संपवून टाकूया.. नवरा बायको असले म्हणजे प्रत्येक गोष्टीवरची मते जुळलीच पाहीजेत असे नाही. आणि १००% मते जुळणे म्हणजेच सुखाचा संसार होतो असेही नाही.


Arati_halbe
Thursday, November 09, 2006 - 6:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला वाटते प्रेमाच्या माणसाला सुखी ठेवायचेअसेल तर व्यक्ती स्वतःबद्दल समाधानी असणे आवश्यक आहे. जी गोश्ट स्वतःचे fundamental principles disturb करते ती तडजोड म्हणूनही करु नये असे वाटते.
Mostly i am only trying to summarize what ajjuka has already said. My father did not beleive in god, but my mother used to. But I remember baba doinf puja when aai used to be out of station. The feeling behind that was that her gods should not stay without puja when she was away. So I guess it was more for her love and her feelings that he did that. But it was voluntary, and not forced. Mom never told him to do anything, and well, it was understood on both sides that it was not actually for god that father used to do it.

So, maybe you can tell him "I can accompany you to the math or whatever just to give you company, or maybe for you." If both of you are comfortable with the idea, it is fine in my opinion. But if following that guru or baba is expected, just make your stand clear :-)



Manuswini
Thursday, November 09, 2006 - 6:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अज्जुका छान लिहिलेस ग. पण कीती वेळा असे होते, समजा एखादी व्यक्ती अती भावनाशील असेल आणी आधीच तीने ह्या भावनेत नी प्रेमात Accept करायला किंवा तडजोड करायला सुरवात केली की लवकरच फक्त ही तडजोड तिच्याच नावी असते.
त्याची दखल किंवा ackwoledgment पन घेतली जात नाही.


प्लीज मी इथे हे म्हणत नाही की सर्व साधारण गोष्टीचा Record ठेवा किंवा सतत receipt expect करा की मी हे केले, ते केले पण काही बाबतीत जसे वरील post sender च्या बाबतीत स्वःताच्या मुळभूत thinking वर पाणी सोडुन जे अगदीच 'मनाला पटत नाही ते जर करायला लागले तर त्रास होतो'. काही काळाने जसे तु म्हणते ती व्यक्ती ज्यास्त अपेक्षा ठेवायला लागते.

किंवा तिच्या हे गृहीत असते की काय झाले एवढे केले तर? तेव्हा केलेस ना? आणी तु म्हणते तसे ते 'गुरुंचा अपमान' वगैरे StancE येतो.
आणि इथे जी व्यक्ती ही 'तडजोड' करते तीचा मानसिक कोंडमारा वाढीस लागतो.

श्रावणी,

तेव्हा श्रावणी, नीट एकदा बोलुन बघ नवर्‍याशी. ..... नसेल खुप पटत तर सांग. बघ की ह्याने दोघांमध्ये खुप दरी तर पडणार नाही Eventually, I mean if you do agains tyour wish, you would start hating and this frustration would show in some usual stuff too which you have been doing for "your husband with all love",
explain your husband, if this is ok for him if you feel suffocated? dont ask him , what if I ask you do to do this or that? I am sure this would add another argument rather than taking in right sesnse in given situation where he believes a lot in "guru" and he knows you dont so he might take it as you are threatning" see I am not sure how your husband might react but this is general tendency of people"

अज्जूका म्हणते ते बरोबर आहे अगदी, मनाला असा प्रश्न जेव्हा छळतो किंवा डोकावतो तेव्हा आधीच कुटअल्यातरी बाबतीत आपण ही 'तडजोड' केली असते अगदे आपल्या मनाविरुद्ध. आणि समोरच्या व्याक्तीने ते in a way aknowledge सुद्धा केले नसते.

मृणमयी,

हे उदाहरण छान आहे आणि प्रेमात केले तरी हरकत नाही पन त्या british बाईने स्वःता हा निर्णय घेतला असावा आणी ती नक्कीच स्वेछेने करत असेल.
तेव्हा प्रेमात कराव्या नक्कीच गोष्टी कधी कधी आपले मन मारले तरी हरकत नाही पण कीती नी कुठे हा प्रश्ण स्वःताला नक्की विचारवा





Manuswini
Thursday, November 09, 2006 - 7:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणखी एक तु बिलकुल हा point raise करु नकोस किंवा ह्या style ने put up करु नकोस
जर तुला करावे लागेले तर

आधी नीट स्वःताच्या मनातील तगमग स्वःताला होनारा त्रास सांग, कीती तो understand करतो, काय काय नक्की expect करतो, जसे तु सुद्धा रोज बापुच्या देवळात जावे, त्यांची पूजा करावी, बापुं म्हणतील ते करावे वगैरे असे आहे का त्याचे म्हणणे की नुसते त्याला तुझी company अपेक्षीत आहे?
तुझ्या बरोबर असण्याने त्याला नुसते बरे वाटते वगैरे असेल तर मग जर नी तर करावे का? ते तु ठरव.

जर अपेक्षा भारीस भार असतील मग ask him to imagin in your shoes, what if he is asked to do soemthing totallyy against then what is his thought अगदी शेवटचा resort म्हणुन.
नाहीतर भांडण हेच होते जर आपण जर तर करत गेलो तर.
ह्या गोष्टीवरुन भांडणं मी माझ्या जवळच्या मैत्रिणीच अगदी recently पाहीली, तिचे सुद्धा नविन लग्न झालेय आणि तेव्हा ती अशीच परेशान होती म्हणून हे सर्व मला पटकन कळले.

प्रेमासाठी कितीही काही केले आणि जर का समोरच्या व्यकतीला त्याची जाणीव नसेल किंवा 'समज' नसेल आणि आपल्याला होणारा त्रास ही समजत नसेल तर सगळेच मातीमोल असते. ............

जसे वरती biritsh बाईचा नवराही 'भरून' काढतो. ह्याचाच अर्थ प्रेमाला प्रेम असणे. ................ समजणे, ओळखणे.

ए मी तुला खुप घाबरवले का गं? sorry then
goodluck


Shravanip
Friday, November 10, 2006 - 2:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा तुम्ही सगळ्यांनी मला खूप मदत केलीत. नाही गं त्याच्या अशा खूप अपेक्षा नाहीत कींवा तो स्वत्: सुद्धा आहारी गेलेला नाही पण त्याच्या मते मी सुद्धा विश्वास ठेवावा आणि रोज प्रार्थना वगैरे करावी. अगं तुम्ही म्हणता तसं तर मी रोज पूजा करताना त्याच्या गुरुंची पूजा अगदी आधीपासून करते कुणीही न सांगता फक्त फारशी मनापासून नाही जशी माझ्या गणपतीची करते तशी नक्कीच नाही. मला वाट्टं मला नाही आवडत त्यावर खोट खोट माझा विश्वास आहे असं म्हणून खोटं वागण्यापेक्षा मी नाही हे स्पष्ट सांगते हे चांगलं नाही का? अज्जुका, अराती मला पटलं तुमचं बोलणं आणि मनु तू मला घाबरवलं नाहीस गं उलट एक वेगळा point of view दिलास की असंही असतं पण त्या britishi बाईला हे कधीतरी adjust करावं लागंतं म्हणून ठीक आहे पण आपल्याला म्हणजे ते रोजचंच होऊन बसेल मग कठीण होईल नाही का?

Zakki
Saturday, November 11, 2006 - 1:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुम्ही बरेच मोठे झालात की कळेल, की एव्हढे शिकून सवरून तुम्हाला असे कळायला पाहिजे होते की ह्यात प्रेमापेक्षा श्रद्धा (अंध किंवा डोळस) जास्त महत्वाची. प्रेमाखातर दररोज तडजोड होऊ शकणार नाही, काही बाबतीत इच्छा असूनहि. तेंव्हा दोघांनीहि शहाणे व्हावे नि ठरवावे, कि तुमच्या ज्या काही वैयक्तिक समजुती असतील तर त्या असू द्या, प्रेमाखातर वाटल्यास एकदोनदा मी सामिल होईन, पण नेहेमी नाही.

अखेर लग्नाआधी कितीही जोरात म्हंटले कि 'आमचे प्रेम अमर आहे, त्यापुढे आम्हाला पैशाची फिकीर नाही. एकमेकां बरोबर आम्ही जगाच्या अंतापर्यंत चालत राहू' तरी, लग्न झाल्यावर पैसे लागतातच, नि कधी कधी मठापर्यंत जाणेहि मनाने तरी, कठिण होते. (अगदी कदाचित् गाडीत बसून सुद्धा, पायी जायची गोष्टच दूर!)



Mansmi18
Monday, December 25, 2006 - 8:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Shravani,

If your husband really has a capable "GURU" he would never have asked you to accompany him to this ashram or wherever.

Let me tell you my experience that I am in the marg of paramapujya Kalawati Aai of Belgaum and regularly attend Bhajan. However when I first came to know that they have Bhajan in US and was ready to go there I did NOT ask my wife to come with me. She told me that she wants to join me at her free will and so then we went together.

In my opinion Devavarachi shraddha ha personal choice asava. Ase konala force karun, Gal ghalun, Konavar danapan aanun devache karane yaat kahich arth nahi. Tyatun tula tar anand milanarach nahi war by your behavior at that place he will become uncomfortable.

I think you should just talk to him and tell him clearly that even for this so called "love" you will not be able to do it because you simply dont trust it.

Mala watate swatachya ichhe virduha kahi karun tya thikanache vatavaran bighadavanyapeksha tithe na gelele bare.

Regards




मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators