Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
NRI मुलांना मराठीमधून बोलके करण्याच...

Hitguj » Views and Comments » General » NRI मुलांना मराठीमधून बोलके करण्याचे काही खास प्रयत्न.. « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through September 04, 200620 09-04-06  11:52 am

Bee
Tuesday, September 05, 2006 - 7:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मराठी आईवडील असलेल्या मुलांची मातृभाषा मराठी आहे असे आपण सर्वसाधारणपणे मानतो. पण जरा wide angle नी विचार केल्यावर आणखी एक व्याख्या लक्षात येते.

की ज्या भाषेत मनातले विचार process होऊन शब्दात express होतात ती भाषा? (नंतर ती, बोलताना कोणाशी बोलतो आहे त्याप्रमाणे त्या त्या भाषेत भाषांतरीत होऊन बोलणे वेगळे.)

तुमच्या मते ह्यातील कुठली व्याख्या अधिक बरोबर आहे, पहिली की दुसरी?

दुसरी जर योग्य धरली तर मग सर्व NRI मुलांची मातृभाषा ही त्या देशातील त्यांना सहजपणे आकलन होणारी भाषा त्यांची मातृभाषा मानावी.. म्हणजे अमेरिकेत किंवा लंडन मध्ये वाढलेल्या सर्व मराठी आईवडीलांच्या मुलांची मातृभाषा ही मराठी नसून ईंग्रजी आहे असे म्हणावे लागेल.

मातृभाषेबद्दल अजुन वेगळे विचार वाचायला आवडतील.


Kashi
Tuesday, September 05, 2006 - 11:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

aai bolte ti matrubhasha...:-) :-) :-)
jokes apart ..apan jya bhashe madhe vichar karu shakto ti matrubhasha mhanayla harkat nahi..
bharta baher rahanarya mulanchi english hich matru bhasha aahe..


Storvi
Tuesday, September 05, 2006 - 9:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे किती तो उहापोह. ह्याला एकच उपाय घरी कटाक्षाने मराठी बोलणे. आता ज्या पालकांनाच मराठी टिकवायची नसेल अश्यांच्या मुलांनी मराठी येत नाही याची दिलगीरी व्यक्त करून काय उपयोग? ते तर महराष्ट्रातही होतं. आई ची मम्मी तर महराष्ट्रात झालीये. आमचे सासु - सासरेच आरोहीला तुझी मम्मी कुठे आहे म्हणुन विचारतात.. ती मात्र आई म्हणते. त्यात त्यांची चुक नाहीये. ते पुण्यात रहातात आणि आम्ही इथे. तेंव्हा आमचं मराठि जास्त शुद्ध असणारच ना:-O करण तिथे आजुबाजुचीइ मुलं मम्मी पप्पा. ओह किती क्युट बेबी आहे. हिला आम्ही घरी नेऊ का आंटी असं विचारतात:-O
त्यामुळे त्यांनाही ती सवय झालीये.. मूळ प्रश्न असा आहे, की भारतात असलेल्या आपल्या नातलगांची मात्रुभाषा कशी टिकवायची. मागच्या वर्षी मी दुकानात गेले कुठल्याही तर लगेच तिथ्ले salesman "yes madam how can I help you" वगैरे म्हणतात आणि मी आपली शुद्ध मराठीत, जर बर्यातल्या साड्या दाखवा असं सागते.. :-O
असो, तर सांगायचा मुद्दा काय आपण मराठीत बोललं पाहिजे.
आमची आरोही आता महाचतुर झालीये. घराबाहेर पाय पडला की आई ची मोमी होते. परवा तित्च्या टीचर ला म्हणाली लुक माय चष्मा आणि मला म्हणाली आय अम गोईन्ग टू नवीन शाळेत



Arch
Tuesday, September 05, 2006 - 9:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शिल्पा हे चालत रहात. मुलं जेन्व्हा शाळेत जायला लागतात तेंव्हा उत्तर English मध्ये द्यायला लागतात. आपण मराठीत बोलल तरी. आरोहीच्या बोलण्यावरून माझा मुलगा ३ वर्षांचा असतानाचा त्याच्या तेवढ्याच वयाचा American मुलाशी झालेला संवाद. दोघही माझ्या घरी चपाती भाजी खात होते.

Daniel: E what is this?
माझा मुलगा Daniel, this is चपाती आणि भाजी. आणी Do not do कोंबा कोंबा.


Mrinmayee
Tuesday, September 05, 2006 - 10:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आर्च, " do not do कोंबा कोंबा" फारच मजेदार!
तु म्हणतेस तोच प्रकार माझ्या मुलाच्या बाबतीतही आहे. बंगलोरला असताना (वय वर्षे २) तो उत्तम मराठी, कानडी, हिंदी आणि तोडकं मोडकं कोकणी (शेजार्‍यांमुळे) बोलायचा. अडीच वर्षांचा असताना इथे येऊन ९ ते ६ day care ला. ४ महीन्यात निव्वळ ईंग्रजी! संध्याकाळी घरी आल्यावर शुभंकरोती साठी पण धरून बसवावं लागायचं. हा बदल दुर्दैवानी झालाच. आम्ही त्याच्याशी बोलताना मराठीची कास सोडली नाही. पण "तु मराठीतून बोलला नाहीस तर तुझ्याशी बोलणार नाही" असाही प्रकार केला नाही. त्याला एखादा पदार्थ 'जळणं' आणि 'करपणं' यातला फरक समजतो, तरी मराठी बोलायला कंटाळा करतो. पण भारतभेटीत आपोआप मराठी बोलायला लागला.
सध्या मराठी लिहिण्या वाचण्याची आवड निर्माण करायचे प्रयत्न चाललेत!


Bee
Wednesday, September 06, 2006 - 7:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्याकडे एक विचार आलाय, तो असा:

मराठी वाचवायची असेल तर ती इथे परदेशात वाढणार्‍या आपल्या मुलांना जबरदस्तीने शिकवून काही उपयोग नाही, जेवढी मेहनत घेऊ तेवढी बहुतांशी वाया जाइल कारण ती मुले ज्या environment मधे वाढणार / राहणार आहेत त्यात त्यांनी मराठी टिकवणे त्यांना अशक्य आहे (हाच मुद्दा पुण्या-मुम्बईतील english medium मधे शिकणार्‍या मुलांनाही थोड्या कमी प्रमाणात पण तरी applicable आहे), त्यापेक्षा भारतीय ग्रामीन भागातील मुले ज्यांची development naturally मराठी भाषेसह झालेली आहे, त्यांच्यासाठी NRI's नी मिळून उत्तम साहीत्य, काव्य त्यांच्यापर्यंत कसे पोहोचेल आणि मातृभाषेसह त्यांची वैयक्तिक, सामाजिक, आर्थिक उन्नति कशी होईल यासाठी प्रयत्न करावे. मराठी अजून १-२ generations पर्यंत वाचवायची असेल तर हाच पर्याय आहे.

हा विचार पटला पण मनात भाषेविषयी चलबिचल निर्माण झाली. जेंव्हा प्रगतीपथावर चाललेली राष्ट्र आपली भाषा विसरत नाही तेंव्हा प्रगतीपथावर आपण येताना आपली ओळख मागे टाकतो आहे असे वाटले..



Bee
Wednesday, September 06, 2006 - 7:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मूळ प्रश्न असा आहे, की भारतात असलेल्या आपल्या नातलगांची मात्रुभाषा कशी टिकवायची>>

त्यासाठी बहुतेक वेगळा बीबी लागणार आहे.. पण हे चित्र फ़क्त महानागरांमधेच दिसू शकेल..



Jillbeer
Wednesday, May 09, 2007 - 2:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माज़्या मुलिशी आम्हि मराथिच बोल्तो.. अगदी तिने एन्ग्लिश मधे उत्तर दिले तरिहि.. हि सवय थेव्ल्यने ती आत्ता खूप चान मरथी बोलते.. अग्दि मराथी चित्रपत देखिल बघ्तए ति आत्ता ७ वर्शचि आहे..

देव्नगरित लिहयला जर त्रस होतो.. काहि मदत?


Vinaydesai
Wednesday, May 09, 2007 - 5:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

थोडं शोधलात तर आपोआप जमेल.. प्रत्येक पानावर Help/Instructions दिल्या आहेतच... काही गोष्टींमध्ये तुम्ही भान पाळले आहे, तेच सगळीकडे पाळा...
उदा:

माझ्या = maajhyaa हे तुम्हाला कळले पण

वर्शंची =varShaa.nchii हे लिहिताना चूक झालेली आहे...



Satishmadhekar
Friday, May 11, 2007 - 4:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आमच्या एनाराय किड्सना मराठी ऍज अ लॅंग्वेज म्हणून टीच करणं मस्ट आहे. पण आम्हाला स्वत:लाच मराठी वर्ड्स रेमेंबर करायला खूपच डिफिकल्ट जातं. मग ते कसं लर्न करणार!

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती







Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators